कुंडली तील १२ स्थाने काय फळ देतात हे दाखवणारा चार्ट


नमस्कार मित्रांनो,
आज आपण कुंडलीतील १२ स्थाने कशाप्रकारचे फळ देऊ शकतात हे पाहणार आहोत. स्थान आणि रास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सूर्य मालेत ग्रह ज्या ३६० अंशाच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात. ती कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण पट्टया प्रमाणे १२ भागात विभाजित करून त्या प्रत्येक भागास मेष, वृषभ अशी नावे दिली आहेत त्या राशी आहेत. सूर्य एका राशीत साधारण १ महिना असतो.
पृथ्वीवरून पाहिले असता पृथ्वी स्वतः भोवती २४ तास एक ३६० अंशाची गिरकी घेऊन परत सूर्या समोर येते या कक्षेचे १२ भाग करून त्यास १ ले स्थान, २ रे स्थान असे १२ स्थान तयार होतात. सूर्य एका स्थान मध्ये साधारण फक्त २ तास असतो (२४ तास भागिले १२). त्यामुळे स्थान फळ हे राशी फळापेक्षा खूप सूक्ष्म असते. जन्म काळी पूर्व दिशेला जी रास उदित होत असते तिला लग्न रास म्हणतात. ते कुंडलीत सर्वात वरचे स्थान १ ले स्थान गणले जाते. त्यानंतर डावीकडे ( anti clockwise ) २ रे, ३रे अशी बारा स्थाने मोजली जातात. कुंडलीत स्थान ही कायम असतात, त्यास कोणतेही आकडे दिलेले नसतात. रास अंका द्वारे दर्शवली जाते. जन्म काळी पूर्व दिशेला कर्क रास असेल तर ४, सिंह असेल तर ५ अशाप्रकारे लग्नरास ठरते त्यापूढे एकेका स्थानात पुढील रास येते.
तर कोणते स्थान काय फळ देऊ शकते हे तुम्हाला दिलेल्या कुंडलीवर नजर टाकली तर सहज लक्षात येईल.

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

5 thoughts on “कुंडली तील १२ स्थाने काय फळ देतात हे दाखवणारा चार्ट

Leave a reply to Sunil Umarani Karad Cancel reply