Category: Uncategorized

Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) : एक केस स्टडी (सोन्याचे इअरिंग्ज परत मिळाले)


Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) : एक केस स्टडी (सोन्याचे इअरिंग्ज परत मिळाले)

Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) हा माझा लेख प्रकाशित झाल्यावर अतुल बर्वे व इतर काही जणांनी एखादी प्रश्न कुंडली सादर केल्यास विषय चांगला समजेल असे कळवले हेच हा लेख लिहिण्याचे प्रयोजन.

२६ सप्टेंबर २०२१ रोजी अचानक ध्यानी मनी नसताना अचानक…… या व्यक्तीने मला संपर्क केला व मदत मागितली. घडले असे होते ती व्यक्ती सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान पुण्याहून अलिबाग ला कार ने निघाली व साधारण ३ वाजता पोहोचली तेव्हा लक्षात आले कि तिच्या कानातले सोन्याचे ईअरिंग्ज हरवले आहेत आणि सापडत नाहीत. आणि कोणाला न सांगता एकतर बाहेर गावी जाण्याचा उद्योग आणि त्यात हे नवे संकट समोर. त्यामुळे आमची आठवण आली.

त्यामुळे लागलीच ठोकळा प्रश्न कुंडली मांडली.

हरवलेली वस्तू परत कधी मिळेल ?

प्रश्न कुंडली वेळ : दि.२६ सप्टेंबर, २०२१ दु. ३ वा.३५ मि. स्थळ पुणे.

प्रश्न कालीन Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) खालील प्रमाणे

लग्न मकर स्वामी : शनी

चंद्र नक्षत्र स्वामी : चंद्र

चंद्र राशी स्वामी : शुक्र

दिन स्वामी : रवि

विश्लेषण : प्रश्न समयी मकर लग्न असून लग्न स्वामी शनी व गुरु लग्न स्थानी. धन स्थान चे मागील स्थान धनाचा व्यय दाखवते. त्यामुळे शनी ईअरिंग्ज चे हरवणे दाखवतो. गुरु शनी बरोबर लग्नस्थानी व ३ रे व १२ वे स्थानाचा स्वामी जो प्रवासातील सोन्याचा व्यय दाखवतो.

चंद्र नक्षत्र स्वामी चंद्र ५ वे स्थानात फसव्या राहू बरोबर असून ७ वे स्थानाचा मालक आहे जो प्रतिस्पर्ध्याचा लाभ दर्शवतो.

राशी स्वामी शुक्र आहे जो दशम स्थानात म्हणजे लाभ स्थानाच्या व्ययात आहे म्हणून लाभ हानी दाखवतो.

दिन स्वामी रवि आहे जो ९ वे स्थानात असून अष्टमेश आहे जो प्रवासातील नुकसान दर्शवतो.

आता हेच Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) पुनर्प्राप्तीच्या २ व ११ वे स्थानाशी संबंधित असतील तेव्हा वस्तू परत मिळेल. तर अशी स्थिती शोधून मि २७ तारखेला दुपारी १२ ते ३ वा.दरम्यान शोध घेतला असता सापडेल असे सांगितले. सोबत लग्न स्वामी शनी विचारात घेता कार ड्रायव्हर मध्यम वयीन आथवा वृद्ध असेल व शनी चामडे चा कारक असल्याने तुमच्या पर्समध्ये वा लेदर सीट पाशी शोध घ्या सांगितले. त्याप्रमाणे २७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता कानातले सोन्याचे इअरिंग्ज सीट कव्हरच्या फटीत सापडले.

आता वस्तू परत मिळाली ती कुंडली वेळ तपासा : दि.२७ सप्टेंबर, २०२१ दु. १२ वा.३५ मि. स्थळ पुणे.

वस्तू प्राप्तीचे Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) खालील प्रमाणे

लग्न धनु स्वामी : गुरु (शनी बरोबर मकर राशीत)

चंद्र नक्षत्र स्वामी : चंद्र

चंद्र राशी स्वामी : शुक्र

दिन स्वामी : चंद्र

विश्लेषण : धनु लग्न असून लग्न स्वामी गुरु व शनी धनस्थानी (२ रे स्थानात) मकर राशीत जी सोन्याच्या वस्तूचा लाभ दाखवते.

चंद्र नक्षत्र स्वामी चंद्र ६ वे स्थानात फसव्या राहू बरोबर असून जो ८ वे स्थानाचा मालक आहे जो प्रतिस्पर्ध्याचा व्यय दर्शवतो.

राशी स्वामी शुक्र आहे जो लाभ स्थानात असून म्हणजे ६ व ११ वे स्थानाचा अधिपती आहे म्हणून जातकाचा लाभ लाभ व प्रतिस्पर्ध्याची हानी दाखवतो.

दिन स्वामी चंद्र चे फळ वर आलेच आहे.

या वरून लक्षात येईल कि केवळ Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) चा वापर करून व ठोकळा कुंडलीचा योग्य तार्किक व कल्पक वापर करून व थोडी कारकत्वाची मदत घेऊन किती सहजपणे प्रश्न सोडवता आला. (एक गोष्ट अनुभवाने सांगावी वाटते ती म्हणजे जेव्हा प्रश्न् कर्त्याची कळकळ वा भाव प्रामाणिक असेल तेव्हा योग्य वेळ साधली जाते. उठला सुटल्या तुम्ही प्रश्न कुंडली मांडत बसलात तर हे दैवी मार्गदर्शन फळ देणार नाही. यात लग्न स्वामी २ तासांचाच स्वामी असल्याने तो महत्वाचा ठरतो.

अर्थात हे एक उदाहरण Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) चा उपयोग समजण्यासाठी सोपे करून सांगितले आहे. या पद्धतीत ही अनेक घटक व नियम आहेत ज्याचा व कुंडली अभ्यासाचा  योग्य वापर तुम्हास नक्कीच सहाय्यकारी ठरेल.

ज्योतिष मित्र मिलिंद ( ७०५८११५९४७ )

For any query or Astrological guidance (fees applicable)

Do contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

कुंडलीची रचना म्हणजे पृथ्वी वरून दिसणारी सूर्यमाला


नमस्कार,

अनेक समस्यां वा संधी जाणून घेण्यासाठी ज्योतीषाकडे जाऊन कुंडली दाखवून मार्गदर्शन घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. परंतू कुंडली म्हणजे काय हे अनेक जणांना माहीत नसते. कसले तरी चौकोन आखून त्यात आकडे व ग्रह लिहून काय सांगितले जाते हे तर अगाध ज्ञान.

वास्तविक पणे ज्योतिष शास्त्र आपली सूर्यमाला व त्यातील ग्रहांची आकाशस्थ स्थिती, ग्रहांची गती व त्यांचा एकेमेकांशी साधला जाणारा कोन आणि या सर्वांचा आपल्यावर होणारा परिणाम यावर आधारित आहे.

आपल्या सूर्यमालेतील सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांचा क्रम पहिला तर लक्षात येईल

  • सूर्य
  • बुध
  • शुक्र
  • पृथ्वी
  • मंगळ
  • गुरु
  • शनी

आता या वर्तुळाकार मार्गास मधून छेद दिला असता त्याचे डावा व उजवा असे दोन भाग होतील.

आता पृथ्वी वरून सूर्यमाला पाहिली असता पृथ्वी सोडून सूर्य, इतर ६ ग्रह व सूर्याचा प्रकाश पृथ्वी वर परावर्तीत करणारा चंद्र आपल्या नजरेस वास्तविक क्रमाने दिसतील.

या सर्व आकाशस्थ स्थितीचा अभ्यास करण्यासाठी मांडलेला नकाशा म्हणजे कुंडली.

कुंडलीची रचना म्हणजे पृथ्वी वरून दिसणारी सूर्यमाला जी ची मांडणी अत्यंत वास्तविक व थक्क करणारी आहे.

सूर्यमालेत ज्याप्रमाणें ग्रहांचा अनुक्रम वास्तविक आहे, त्याप्रमाणे राशींची वाटणी केली गेलीं आहे. सर्व राशींत जी सिंह राशि तिचें स्वामित्व दैदीप्यमान व जगाचें उत्पत्तिस्थान असा मुख्य ग्रह जो सूर्य त्याच्याकडे आलें.

सूर्याच्या खालोखाल चंद्राचें तेज असल्यामुळें  सूर्यराशीच्या पूर्वीची जी कर्क राशि तिचें आधिपत्य चंद्राकडे आलें.

नंतर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध त्याच्या राशी सिंह राशीच्या पुढील कन्या व कर्क च्या मागील मिथुन असा बुधाचा पट्टा विभागला गेला.

बुधाच्या नंतर शुक्र आहे, म्हणून बुधाच्या ज्या दोन राशि मिथुन व कन्या त्यांच्या मागील एक व पुढील एक म्हणजे वृषभ व तूळ अशा दोन राशींवर, वरील न्यायानें शुक्राचें स्वामित्व ठरलें.

शुक्राच्या नंतर मंगळ आहे. म्हणून शुक्राच्या मागील व पुढील एक एक राशि म्हणजे मेष व वृश्चिक अशा दोन राशि मंगळाच्या झाल्या.

मंगळानंतर गुरु आहे, म्हणून मेष च्या मागील एक व वृश्चिक च्या पुढील एक म्हणजे मीन व धनु अशा दोन राशि गुरूच्या झाल्या.

शेवटीं शनि आहे म्हणून मीन च्या मागील राशि कुंभ व धनु राशीच्या पुढील राशि मकर अशा दोन राशींवर शनीचें स्वामित्व ठरलें. आता लक्षात येईल कि शनीच्या दोन्ही राशी शेजारी का येतात.

खरोखर ही रचना पाहून मनास अत्यानंद वाटतो. ज्योतिषांत अशा तऱ्हेचें सयुक्तिक व चमत्कारिक प्रकार अनेक असतील; किंबहुना प्रत्येक गोष्टीविषय असें मौजेचें कांहींतरी असेल. परंतु आपल्या अल्प बुद्धीला तें गम्य नाहीं इतकेंच. शिवाय आमच्या प्राचीन विद्वान ज्योतिर्विदांनी जरी अनेक शोध, मूल्यवान विचार ग्रंथित करून ठेविले आहेत

वर दिलेल्या सूर्यमालेच्या आकृतीवरून कुंडलीची रचना सहज समजून येईल.

ज्योतिष मित्र मिलिंद

(संदर्भ : ज्योतीर्मयुख)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

जोतिष मित्र मिलिंद लेखमाला ( Blogs & Articles )


.

1. ज्योतिष अभ्यासकाच्या नजरेतुन”

2. कुंड्लीतील राशींची मांडणी

3. ठोकळा कुंडलीद्वारे जन्म काळ, जन्म तिथी, जन्म महिना व जन्म वर्ष ओळखण्याची युक्ती

4. न्यूटन चा गती प्रतिगती चा नियम आणि कुंडली

5. कुंडली तील १२ स्थाने काय फळ देतात हे दाखवणारा चार्ट

6. मानवी शरीर व त्यावरील राशींचा प्रभाव

7. “नवपंचम योग / त्रिकोण योग”

8. श्रीकृष्णाची कुंडली

9. अध्यात्म आणि अध्यात्मिकता

10. ॐ स्वरूप व तत्वे व राशी

11. मांगल्य चिन्ह आकाशातील स्वस्तिक च्या निर्मितीची भूमिती

12. रास व उपासना

13. वैदिक घड्याळाची संकल्पना

14. जैमिनी सूत्रम

15. शरीरातील ७ प्रमुख आधार चक्र

16. ग्रहांचे मित्र, शत्रु व सम ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई.कोष्टक

17. फुलवा आयुष्याचे रंग – राशिनुसार फुले व रोपांची लागवड

18. मंगळ – मंगल की अमंगल

19. ग्रहण-एक खगोलिय़ घटना, पौराणिक कथा व पथ्ये

20. त्रिक स्थाने, ग्रह, मानसिक रोग आणि भूत बाधा

21. श्रीराम व रावणाची कुंडली व विश्लेषण

22. दीपावली : जडत्वाचा अंत

23. शेयर्स आणि ज्योतिष (Shares & Astrology)

24. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु शनी युतीचे होणारे परिणाम

25. Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह)

26. ओंकार बीजाक्षर साधना व ज्योतिष शास्त्र (astrology)

27. प्रत्येक राशीची प्रेमाची नैसर्गिक प्रवृत्ती (astrology)

28.DURATION OF EACH PLANET IN A ZODIAC SIGN

29. नवग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Planets)

30. अलौकिक “सिद्धि”

31. विंशोत्तरी दशा पद्धति : आयुष्यातील चढ़ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र

32. आयुष्याचा जोडीदार/प्रेमी कोणत्या राशीचा असावा

33. कोणत्या अक्षराने तुमच्या नावाची / व्यवसायायाची / प्रकल्पाची सुरुवात फ़ायदेशीर ठरेल ?(Which Letter will be beneficial to Name yourself / Business / Project etc)

34. तुमच्या – माझ्या मनातील प्रश्न व त्याची उकल ( Question & Solutions in our mind)

35. सोन्याची आभूषणे दगिने घालणे ठरते कोणास फायदेशीर (To whom it’s beneficial wearing Gold)

36. कोणत्या महिन्यात झाला विवाह – थोडी रंगत थोडी गंमत आपल्या वैवाहिक नात्याबद्दल

37. गोष्ट देवाच्या गणिताची

38. अर्थ स्वप्नांचा ( Meanings of Dreams )

39. सूर्याच्या नवग्रह मालेतील बिरबल

40. महाशिवरात्री साजरी करण्यामागील आख्यायिका व पौराणिक कथा

41. आजच्या बाजारात गुरुबळ कमी होत चालले आहे आणि शुक्र बलवान होत चालला आहे

42. विवाह योग की कृत्रिम विवाह विलंब योग ?

43. दत्तक पुत्र योग ( Child Adoption )

44. ग्रहांनुसार कडे वा ब्रेसलेट घालणे ठरते कोणांस फ़ायदेशीर?

45. तीळा तीळा दार उघड….

46. गर्भधारणा ते प्रसूती काळातील ग्रहांचा प्रभाव

47. कोणती लग्न रास उदित असताना कॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर

48. कोणत्या रंगाची उधळण करेल तुमच्या प्रेमास व आयुष्याच्या जोडीदारास तुमच्याकडे आकर्षित 🥰

49. जन्मकुंडलीत आर्थिक उन्नती कशी पहाल ?

50. आपल्या राशीनुसार कोणते रुद्राक्ष धारण करणे ठरते फ़ायदेशीर ?

51. Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) : एक केस स्टडी (सोन्याचे इअरिंग्ज परत मिळाले)

52. कुंडलीची रचना म्हणजे पृथ्वी वरून दिसणारी सूर्यमाला

53. विशोत्तरी दशा पध्दतीतील समतोल तत्वानुसार ग्रहांची खगोलशास्त्रीय बैठक

54. मुखसामुद्रिक शास्त्र (FACE READING) : चेहरा वाचाल तर वाचाल

55. नाम आणि नाम स्मरण

56. नक्षत्र धार्योषधि आणि त्याचा उपयोग

57. माया विचार (अध्यात्मशास्त्र)

58. ज्योतिष शास्त्राचे एक अंग : शकून ज्योतिष (Omen)

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

Feel the Sign (राशी स्पंदन)


Feel the Sign (राशी स्पंदन) प्रत्येक राशीचे वेगवेगळे आविष्कार, 🤪

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

सशुल्क ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

आपल्या राशीनुसार कोणते रुद्राक्ष धारण करणे ठरते फ़ायदेशीर ?


हिंदू संस्कृती तसेच वैदिक ज्योतिष शास्त्रात रुद्राक्षाचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच हा एक पूजन, उपासना, आराधना, नामस्मरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच रोगनिवारण, व्याधीमुक्तीचा अध्यात्मिक उपाय म्हणून गणला जातो. ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या अनुकूलतेसाठी, अशुभ ग्रहांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास राशीनुसार रुद्राक्ष धारण करणे लाभदायक असल्याचे मानले जाते. सामान्य माणसाला ही रुद्राक्षाचा विशिष्ट आकार, रंग व त्यावरील गूढ रेखाकृती यामुळे रुद्राक्षाविषयी कुतुहल व श्रद्धाभाव वाटत आला आहे.

रुद्राक्ष हे भगवान शिव शंकराचे प्रतिक मानले जाते. रुद्राक्ष हा रुद्र आणि अक्ष या दोन शब्दांचा संधी आहे. रुद्र म्हणजे शंकर व अक्ष म्हणजे डोळा. महादेवाच्या डोळ्यातील अश्रुंमुळे रुद्राक्ष तयार झाली असे मानले जाते. वास्तवत: रुद्राक्ष हे हिमालयात येणारे एक प्रकारचे फ़ळाच्या आत मिळणारे बीज आहे.

रुद्राक्ष कोण धारण करु शकतो ?

रुद्राक्ष धारण करण्यासाठी कोणते ही जात, धर्म, स्त्री-पुरुष, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक असे बंधन नाही.

कोणीही व्यक्ती रुद्राक्ष धारण करु शकतो. लहान मुले, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, वृद्ध, आजारी असे कोणीही वेगवेगळ्या लाभासाठी रुद्राक्ष धारण करु शकतो. एकवेळेस वेगवेगळ्या लाभासाठी दोन तीन प्रकारचे रुद्राक्ष एकावेळेस सुद्धा धारण करु शकतो. रुद्राक्षाचा कोणताही वाईट वा नकारात्मक परिणाम होत नाही.

रुद्राक्षांचे अनेक प्रकार आहेत. रुद्राक्षाच्या अस्सलतेची खातरजमा केल्यानंतरच तो धारण करावा, असा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. रुद्राक्ष खरा नसेल, तर तो धारण करून त्याचे लाभ मिळत नाहीत.

अनु. क्र.रुद्राक्षांचे प्रकारवर्णनया राशींसाठी उपयुक्तराशी स्वामी
01एक मुखीशिवाचे प्रतीक, सूर्यस्वरूप, भुक्ति मुक्ती, धन समृद्धी, पाप मुक्ती, कोणताही त्रासापासून संरक्षण ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.सिंहरवी
02दोन मुखीव्यक्तिमत्त्वात अनुकुल बदल, कुण्डलिनी जागृती, पती-पत्नीमधील एकोपा, वैवाहिक सौख्य, दु:ख नाश, मनःशांती, व्यवसाय, उद्योग, प्रगती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.कर्कचंद्र
03तीन मुखीअग्निरुपी तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही, वाचा सिद्धी, प्राप्त होते. तहान, भू्क आदि शारिरिक गरजांबाबत आत्मसंयम प्राप्ती, तल्लख बुद्धी, व्यक्तिमत्त्व विकास, कार्यसिद्धी, प्रगती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.मेष, वृश्चिकमंगळ
04चार मुखीधनप्राप्ती, धनाचा योग्य विनिमय, प्रभावी वाणी तीव्र स्मरणशक्ती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.मिथुन, कन्याबुध
05पंच मुखीपंच महाभूतं, शिवाचे प्रतीक, काळाचा शत्रू, अकाली मृत्यू पासून संरक्षण, मनःशांती,सर्व रुद्राक्षाचे गुण
ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.
धनु, मीनगुरु
06सहा मुखीकार्तिकेय स्वरूप, शक्तीवर्धक, व्यापारात यश, धन संचय ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.वृषभ, तुळशुक्र
07सात मुखीसप्त मातृका, अनंत नागाचे प्रतीक, दीर्घायुष्य व अपघातापासून रक्षण, मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर, सर्पदंशापासून रक्षण ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.मकर, कुंभ,शनी
08आठ मुखीभैरवरूप, दीर्घायुष्य,अशांती, सर्पभय, त्वचा रोग, गुप्त रोग इतर आजार ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.
09नऊ मुखीदुर्गा माहेश्वरी चे प्रतिक, फुफ्फुसासाठी, ताप, नेत्र रोग, कान रोग, संतती, ओटीपोटात वेदना, संक्रामक रोग शांती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.
10दश मुखीजनार्दन देवाचे प्रतिक, सर्व इच्छापूर्ती, पिशाच्च, ब्रह्मराक्षस, सर्प भय, सर्व ग्रह अनुकूलता, फुफ्फुसासंबंधी आणि हृद्यासंबंधी आजार ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.मिथुन, कन्याबुध
11अकरा मुखीरुद्ररूप, इंद्राचे प्रतिक, सर्वत्र विजय, स्त्री रोग, स्नायू रोग आणि वीर्य संबंधी आजार, लाभप्राप्ती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.धनु, मीन. मेष, वृश्चिक गुरु, मंगळ
12बारा मुखीसूर्यस्वरूप, १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतीक, तेजस्वी व्यक्तिमत्व, शत्रू व अपघाता पासून रक्षण, अनमोल लाभ प्राप्ती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.
13तेरा मुखीविश्वेश्वराचे प्रतिक, सर्व इच्छापूर्ती, आकर्षकता, सुंदरता, समृद्धी प्राप्ती, मूत्राशय, नपुंसकता, गर्भासंबंधी आजार, किडनी, लिव्हर संबंधी आजार ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.वृषभ, तुळशुक्र
14चौदा मुखीशिवरूप, हनुमान स्वरूप, पापक्षालन, तंत्र मंत्र, चेटुक, भूत-प्रेत, पिशाच्च यापासून रक्षण, वैराग्य, बेचैनी, भीती, पक्षाघात, कर्करोग, प्रेत बाधा समस्यांवर लाभदायकई. साठी उपयुक्त असे मानले जाते.सिंह, मकर, कुंभ रवी, शनी

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

माझी रास – माझी वैशिष्ट्ये : RashI Phala in detail


जाणून घ्या तुमच्या राशी विषयी बरेच काही, तुमची विस्तृत वैशिष्ट्ये, तुमचा स्वभाव, शारीरिक रचना, मानसिक प्रवृत्ती, विशेषता, आरोग्य, धन व संपत्ती, कौटुंबिक वातावरण, आयुष्याचा जोडीदार, प्रेमी, नोकरी – व्यवसाय, भाग्य दिन, भाग्य रत्न, भाग्यांक आणि बरेच काही, तुमच्या राशीची लिंक ओपन करा आणि पहा…

वृषभ राशीफ़ल ( Vrushabh Rashi Phala )

मिथुन राशीफ़ल ( Mithun Rashi Phala )

कर्क राशीफ़ल ( Kark Rashi Phala )

सिंह राशीफ़ल ( Sinha Rashi Phala )

कन्या राशीफ़ल ( Kanya Rashi Phala )

तुळ राशीफ़ल ( Tula Rashi Phala )

वृश्चिक राशीफ़ल ( Vrushchik Rashi Phala )

धनु राशीफ़ल ( Dhanu Rashi Phala )

मकर राशीफ़ल ( Makar Rashi Phala )

कुंभ राशीफ़ल ( Kumbh Rashi Phala )

मीन राशीफ़ल ( Meen Rashi Phala )

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

जन्मकुंडलीत आर्थिक उन्नती कशी पहाल ?


आजच्या धकाधकीच्या काळात माणूस दिवसागणिक यंत्र होत चाललाय. आणि त्यात सुद्धा त्याला खुद्द यंत्रमानवांची देखील स्पर्धा आहे. कोविड सारख्या घातक साथी, जगभर युद्धाचे सावट अशा गोष्टींमुळे आर्थिक अस्थिरता अवघ्या जगभर पसरत चालली आहे. उद्योजक, नोकरदार मंडळी यांच्यावर कमालीचा आर्थिक ताण आला आहे. महागाई वाढत चालली आहे आणि उत्पन्न मात्र दिवसेंदिवस अशाश्वत होत चालले आहे.बेरोजगारी वाढत चालली आहे. आणि सामान्य माणसाची तर रोजच जगण्यासाठी अथक लढाई चालू आहे.

त्यामुळे हल्ली अनेक वेगवेगळ्या कुंडल्या माझ्याकडे येताहेत, पण रोख साधारण सारखाच की आमचा अडचणीचा काळ कधी संपणार आणि आर्थिक उन्नती कधी होणार? म्हणून आज हाच विषय घेऊन सर्वांशी बोलायच ठरवलं.

पारंपारिक ज्योतिष शास्त्रात आपल्याकडे ४ त्रिकोनांना फ़ार महत्व आहे.
१. धर्म त्रिकोन ( १ ५ ९ ) : तुमचे धर्म कार्य, कर्तव्य याबाबतीत तपासावयाचा त्रिकोन
२. अर्थ त्रिकोन ( २ ६ १० ) तुमचे धनप्राप्तीचे योग, प्रयत्न व कर्म याबाबतीत तपासावयाचा त्रिकोन
३. काम त्रिकोन ( ३ ७ ११ ) तुमचे वैवाहिक, सांसारिक आयुष्य याबाबतीत तपासावयाचा त्रिकोन
४. मोक्ष त्रिकोन ( ४ ८ १२ ) तुमचे निवृत्ती, मोक्ष याबाबतीत तपासावयाचा त्रिकोन

यावरुन तुमच्या लक्षात आले असेलच की आपल्या ला अर्थ त्रिकोन तपासणे आर्थिक उन्नती पाहताना तपासणे आवश्यक ठरते.

अर्थ त्रिकोन हा २ रे, ६ वे, १० वे स्थान मिळून तयार होतो. या तीन ही स्थानात नव पंचम वा शुभ पंचम योग तयार होतो. म्हणजेच प्रत्येक स्थान हे एकमेकांकडून ५ वे व ९ वे येते. मुळात त्रिकोनाचे वैशिष्ट्य हे असते की या स्थानातील प्रत्येक राशीची सुरुवात ही समान तत्वाचे नक्षत्र भावारंभास येते. उदा. मेष मधील अश्विनी या केतुच्या भावारंभाने सुरुवात झाली तर ५ वी रास सिंह व ९ वी धनू या तीनही राशींची सुरुवात केतूच्या नक्षत्रानेच होते. त्यामुळे समन्वय साधला जातो.

आता एक एक स्थान क्रमा कमाने आपण ‘बघू या.

२ रे स्थान : या स्थानाचे नाव धन स्थान असे आहे. आर्थिक स्थिती कशी असेल? धनलाभ अथवा धनहानी केव्हा संभवते हे या स्थानावरून समजते.

६ वे स्थान : या स्थानाचे वरुन धनप्राप्ती साठी करत असलेले प्रयत्न समजतात. हे एक संंघर्षाचे स्थान आहे. प्रयत्न केल्या शिवाय धनप्राप्ती होणे फार अवघड आहे. नोकर किंवा नोकरी या स्थानावरुन पाहतात.

१० वे स्थान : या स्थानास कर्मस्थान म्हणतात. तुम्ही करत असलेले कर्म अथवा कर्माकडे असलेला नैसर्गिक ओढ या स्थानावरून समजते.

११ वे स्थान : या ३ स्थानां बरोबरच ११ वे स्थान देखील पाहिले जाते. तुमची धनप्राप्तीची शक्यता, प्रयत्न व योग्य कर्म यांच्या लाभाचा विचार या स्थानावरून केला जातो.

वरील मुख्य स्थानांबरोबरच १ ले व ९ वे स्थान तपासणे देखील गरजेचे असते.

१ ले स्थान जे लग्नस्थान म्हणुन संबोधले जाते, या वरुन तुमचे व्यक्तिमत्व व प्रतिमा लक्षात घेतली जाते तर ९ वे स्थानावरुन भाग्य व कीर्ती पाहिली जाते. व्यक्तिमत्वाची व भाग्याची साथ असेल तर आर्थिक उन्नती साठीच्या कष्टांना व प्रयतांना नक्कीच बळ प्राप्त होईल.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार १, ५, ९ ही अर्थ त्रिकोनाची व्यय स्थाने असल्याने ती जास्त बलवान असतील तर नोकरी व्यवसायात वा कामाच्या स्वरूपात बदल संभवतो.

या जोडीला नकारात्मक स्थाने म्हणून ८ वे व १२ वे स्थानाचे अवलोकन करणे गरजेचे आहे. ८ वे स्थान (मृत्यू स्थान) धनहानी व दूर्भाग्य दर्शवते. १२ वे स्थान व्यय स्थान असल्याने . खर्च, नुकसान दर्शवते. ( ८ वे स्थान अकस्मिक धनलाभ वा सासर द्वारे धन लाभ ई. सुद्धा दर्शवते )

परिक्षण करताना या स्थानातील राशी, त्यांचे अधिपती कोण व कोणत्या स्थानात वा भावात स्थित आहेत, भावारंभावर कोणते नक्षत्र व राशी आहेत, कारक ग्रह स्वभाव उदा. गुरु वाढ दर्शवतो, शनी संकुचित फळ वा विलंब ई., दृष्टीवयोग अशाअनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा कोठे आर्थिक उन्नती कधी होणार याच्या उत्तराच्या जवळ जाता येते.

याकारक ग्रहांच्या दशा अंतर्दशेत अनुकूल वा प्रतिकूल परिणाम प्राप्त होतात .

एखादा जाणकार ज्योतिषी या सर्व बाबी विचारात घेऊन आर्थिक उन्नती कधी होईल या बाबत योग्य मार्गदर्शन व आवश्यक उपाय वा तोडगे सुचवू शकतो.

ज्योतिष मित्र मिलिंद ( jyotishmitramilind )

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

कोणत्या रंगाची उधळण करेल तुमच्या प्रेमास व आयुष्याच्या जोडीदारास तुमच्याकडे आकर्षित 🥰


रंग काय आणि किती लावायचा, जो आज आहे तर उद्या निघून जाईल. लावायचा आहे तर असा जीव लावा, जो आयुष्यभर राहील…

होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी च्या सर्वांना शूभेच्छा…


रंगपंचमी च्या निमित्ताने जरा माझ्या मेंदूने ज्योतिष शास्त्रानुसार पंचमेष जो प्रेमाचा कारक आहे व सप्तमेष जो आयुष्याच्या जोडीदाराचा कारक आहे. त्यांचे फळ देणारे रंग तुम्हाला खेळायला सुचवून प्रेम पंचमी चे मिश्किल रंग उधळले आहेत. तर मग बघा खेळून तुमचा प्रेमाचा रंग कायमचा आहे का ते 😊

अनु क्र.लग्न रासउधळणखेळायचा रंग
मेषमेष वाले सोनेरी, लाल, चंदेरी रंग लावा आणि बघा कदाचित तुमची प्रेमिका/ आयुष्याची जोडीदार तुम्हाला काही संकेत देते का ते. 🤪सोनेरी, लाल, चंदेरी रंग
वृषभवृषभ वाले तुम्ही मात्र हिरवा आणि लाल रंगाची उधळण करा आणि बघा बरं तुम्हाला तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार ग्रीन सिग्नल देते का ते. 🤪हिरवा आणि लाल रंग
मिथुनमिथुन वाले तुम्ही चंदेरी आणि पिवळा, रंग खेळा आणि बघा तुमची प्रेमिका/जोडीदार गोड कटाक्ष टाकतेय का 🤪चंदेरी आणि पिवळा रंग
कर्ककर्क वाले तुम्ही मात्र लाल व गडद जांभळ्या रंगाचा वर्षाव करा आणि पहा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार तुम्हाला आनंदाने चिंब करतेय का 🤪लाल व गडद जांभळा रंग
सिंहसिंह राशी वाले तुम्ही पिवळा आणि गडद जांभळा रंग खेळा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार आयुष्यात रंगत आणते का 🤪पिवळा आणि गडद जांभळा रंग
कन्याकन्या वाले तुम्ही गडद जांभळा व पिवळा रंग खेळा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार आकर्षिला जातो आहे का. 🤪गडद जांभळा व पिवळा रंग
तूळतूळ वाले तुम्ही गडद जांभळा आणि लाल रंग खेळा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार प्रेमाचे माप तुमच्या पारड्यात टाकते का 🤪गडद जांभळा आणि लाल रंग
वृश्चिकवृश्चिक वाले तुम्ही पिवळा आणि चंदेरी रंग खेळून बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार तुमच्यावर आसक्त होते का 🤪पिवळा आणि चंदेरी रंग
धनुधनु वाले तुम्ही लाल व हिरवा रंग हातात धरून नेम धरा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार तुमच्या टप्प्यात येतेय का 🤪लाल व हिरवा रंग
१०मकरमकर वाले तुम्ही चंदेरी रंग घेऊन शुभ्र कुर्ती घालून तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार गाठून रंग खेळा आणि बघा तुमचे प्रेम चमचमतेय का ते 🤪चंदेरी रंग
११कुंभकुंभ वाल्यानो तुम्ही हिरव्या आणि सोनेरी रंगाचे हंडे तयार ठेवा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार तुम्हाला प्रेमाने भिजवतेय का 🤪हिरवा आणि सोनेरी रंग
१२मीनमीन वाले तुम्ही चंदेरी आणि हिरवा रंगाने तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार भिजवा आणि बघा त्यांच्या प्रेम भावना उचंबळून येतात का 🤪चंदेरी आणि हिरवा रंग

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

कोणती लग्न रास उदित असताना कॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर


गधड्या अभ्यास करण्यासाठी मुहुर्त लागतोय की नाही पासून, अहो ऐकलत का? गुरुजींना भेटून लेकीच्या लग्नासाठी येत्या मे मधे काही चांगले मुहुर्त पाहून या…इथपर्यंत मुहुर्त या शब्दाचा बोलबाला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी मग ते एखादे नवीन काम, उद्घाटन, विवाह, मुंज, सण, उत्सव, प्रतिस्थापना असो वा प्रवास करायचा असो आपल्याकडे मुहुर्त बघण्याची प्रथा आहे.

मुहुर्त शास्त्र हे फ़लज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचे अंग मानले जाते. ऋग्वेदामधे देखील मुहुर्ताचा उल्लेख आढळतो. वैदिक पद्धतीनुसार पंचांगातील वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगांच्या आधारावर मुहूर्त काढला जातो. मुहुर्त याचा अर्थ ठराविक थोडा काळ असा आहे. शुभ कार्यासाठी योग्य असणारा काळ यास ही मुहुर्त संबोधले जाते. दिवसाच्या पंधराव्या भागास मुहूर्त म्हणतात. रात्रीचे ही तेवढेच मुहूर्त असतात.

२ घटिकांचा एक मुहुर्त मानला जातो.
मुहुर्ताचे अनेक प्रकार व नावे आहेत.
१. सूर्योदयापासून ६ घटिका – प्रातःकाळ
२. त्यानंतरचे ६ घटिका – संगवकाळ (गाईंना व वासरांना एकत्र आणून दूध प्राशन व चरायला नेण्याचा काळ.)
३. त्यानंतरचे ६ घटिका – मध्यान्हकाळ
४. त्यानंतरचे ६ घटिका – अपराण्हकाळ – ( श्राद्धासाठी महत्त्वाचा काळ.)
५. त्यानंतरचे ६ घटिका – सायंकाळ -हा कोणत्याही कामांस फ़ारसा प्रशस्त मानला जात नाही.

कामे काही विशिष्ट नक्षत्रांवर. तिथीवर, करणावर वा मुहुर्तावर केली तर त्या ग्रह देवतेच्या आशिर्वादाने कार्यसिद्धी होते, अशी समजूत आहे.
एखादे कार्य करण्याला योग्य असा काळ वा मुहुर्ताला ग्रह, बारा भाव (कुंडलीतील १२ स्थाने) आणि राशी यांची माहिती असणे आवश्यक असते.
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार कोणतेही कार्य वा घटनेविषयी जाणून घेताना भावारंभावर जास्त लक्ष द्यावे लागते.
मुहुर्त या विषयावर बरेच काही लिहिण्यासारखे आहे. पण जास्त खोलात न जाता कार्य करताना कोणते लग्न उदित आहे यानुसार वेळ ठरवण्यासाठी एक सोपा तक्ता देत आहे. त्यानुसार आपण कामांस सुरुवात केली तर कार्यसिद्धी साठी सहाय्यक ठरेल. लग्न वा लग्न रास म्हणजे कार्याच्या त्या विशिष्ट वेळी कोणती रास पूर्व दिशेला उगम पावली आहे ती रास. या काळाचा भावारंभ गाठता आला तर सर्वोत्तम सहाय्यकारी ठरेल.

कोणती लग्न रास उदित असताना कॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर याचा तक्ता

अनु.क्र.लग्न रासकॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर
१.मेष चर कार्य. प्रवास, यात्रा, नविन वस्त्र नेसणे, नविन अलंकार धारण करणे, जमीन खणणे, सुलेनामा करणे, साहसी व धाडसाची कामे ई.
२.वृषभस्थिर कार्य. शेतीची, विहिरीची, बागायती कामे करणे, जनावर खरेदी वा विक्री. विवाह, मंगल कार्य, गृह प्रवेश, नवीन दुकान उद्घाटन करणे ई.
३.मिथुनसर्व शुभ कार्य, विवाह, अधिकार ग्रहण, विज्ञान कार्ये, शिल्प, कला, युध्द, ई.
४.कर्कविहिरीची कामे, लेखन करणे, शांतीकार्य, ई.
५.सिंहस्थिर कार्ये. वस्तुची खरेदी, दुकान उदघाटन, अलंकार बनविणे, नोकरीवर रुजु होणे, सर्व शुभ कार्ये, ई.
६.कन्याचर स्थिर कार्ये, विद्यारंभ, औषधी तयार करणे, विवाहादी सर्व मंगल कार्ये, ई.
७.तुळशेतीकाम, पशुपालन, यात्रा, व्यापार, विवाह मौंजी, ई.
८.वृश्चिकस्थिर कार्य, अधिकारग्रहण करणे. नोकरीवर रुजु होणे, ई.
९.धनुविवाह, मौजी, जनावर खरेदी वा विक्री, शुभ कार्ये ई.
१०.मकरशेतीची कामे, जनावर खरेदी वा विक्री, शुभ कार्ये ई.
११.कुंभशेती, व्यापार, जल पर्यटन. ई.
१२.मीनविवाह मौजी. वस्त्र व अलंकार बनविणे व धारण करणे. अधिकार ग्रहण करणे. सरकारी कामे. ई.

टीप : अधिक खोल तपशीलासाठी व मुहुर्तासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

ज्योतिष मित्र मिलिंद ( jyotish mitra milind )

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

गर्भधारणा ते प्रसूती काळातील ग्रहांचा प्रभाव


तुम्हाला म्हणून सांगते, अजून बोलले नाहीय कोणाला, पण लवकरच मी एका बाळाची आई होणार आहे असे ती माऊली लाजत सांगत असते, नवरोजी मिशीला पीळ मारत किंवा गोड हसताना लवकरच बाबा होणार असल्याची प्रौढी चेहऱ्यावर झळकत असते. आजी आजोबा नातवंडे खेळवायला मिळणार म्हणून खुशीत असतात व अनुभवाचे सल्ले द्यायला तत्पर असतात.
घरात बाळाच्या जन्माची नुसती चाहूल लागताच आनंदी आनंद पसरतो.
थोडा आनंद, थोडी उत्सुकता, थोडी भीती, थोडी हुरहूर असा हा काळ.
तर असा हा ९ महिन्यांवरचा काळ बाळ प्रत्यक्षात आकार घेत असताना आईच्या जन्मकुंडली नुसार कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो व एखादा ग्रह कमजोर व अशुभ आढळल्यास, काही दोष वा कमतरता निदर्शनास आल्यास वा या काळात दशा वा गोचर ग्रह अनुसार कोणत्या ग्रहाचे उपाय सहाय्यभूत ठरतात या साठी हा लेख प्रपंच…

गर्भधारणा ते प्रसूती काळातील ग्रहांचा प्रभाव

अनु. क्र.महिना काळगर्भाची अवस्थाग्रह प्रभावग्रह उपाय
28 दिवसांचा १ला महिना,फलित समगमा नंतरचा लगेच चा काळ. शुक्राणू आणि बीजांड यांचे मिलन होऊन गर्भ राहतो. भ्रूणातील अतिशय उच्च क्रियाकलापाचा काळ जिथे पेशी नवीन शरीर म्हणून नियुक्त असलेल्या गर्भाशयात स्थिर होण्याचा काळ. कार्य अद्याप निश्चित न झालेल्या द्रवरूप प्रारंभिक पेशीद्वारे अनेक प्रकारच्या पेशींना जन्म देण्याचा काळ.शुक्रशुक्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा २रा महिनाशरीराच्या पेशी कडक होण्याचा काळ. एक पेशी विभाजित होऊन अनेक पेशी तयार व ठराविक कार्यासाठी विकसित होण्याचा काळ. यकृतासाठी नियुक्त केलेल्या पेशी स्नायू बनण्यासाठी कार्य करू शकत नाहीत. शरीराचा आकार स्पष्ट होणे.मंगळमंगळाच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा ३रा महिनाजलद विकासाचा काळ. गर्भाच्या शरीराचा आकार अधिक ठळक. गर्भ जागृत होऊन आई/वडिलांना योग्य प्रतिसाद देणे. गुरूगुरूच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा ४था महिनाबाळाच्या बुद्धिमत्तेचा विकास आत्म्याची शक्ती स्थापित होते. शरीराची ताकद वाढते, हाडे आणि स्नायूंची रचना तयार होऊ लागते. सूर्यसूर्याच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे. ग्रहण वा अमावस्या दिवशी काळजी घ्या.
28 दिवसांचा ५वा महिनागर्भाची रक्ताभिसरण यंत्रणा कार्यरत. रक्त आणि रक्तपेशी कार्यरत. रोगप्रतिकारक शक्ती चा विकास. भावनिक जाणिवेची निर्मिती व व्यक्त करणे. मन आणि भावना ची जडण घडण चंद्रचंद्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे. ग्रहण व अमावस्या दिवशी काळजी घ्या.
28 दिवसांचा ६वा महिनाशरीराची हाडे, नसा आणि आधार देणारी शरीराची बनावट, केस आणि नखे यांची वाढ. मुलाची सहनशक्ती कमी होते. शनीशनीच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा ७वा महिनाबाळाची विचारशक्ती, मज्जासंस्था आणि मेंदू विकासाचा महत्वाचा टप्पा. स्वतःच्या गर्भाच्या शरीराची आणि त्याच्या आई आणि बाह्य वातावरणाकडून प्राप्त होणारे संकेत स्पष्टपणे माहित होतात. बुद्धिमत्ता आणि जागरूकता महत्त्वपूर्ण टप्प्यावर.बुधबुधाच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा ८वा महिनासंवेदनशील काळ ज्यात संपूर्ण व्यक्तिमत्व ठरते. मातेच्या सकारात्मक व आनंद लहरी गर्भास प्रक्षेपित करण्याचा काळआईच्या कुंडलीतील लग्न राशीचा स्वामीआईच्या कुंडलीतील लग्न राशीचा स्वामीच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
२८ दिवसांचा ९वा महिनागर्भाला स्वतःच्या शरीराची समज आणि नियंत्रण प्राप्ती.भूक आणि तहान याची जाणीव. प्रसूतीच्या तयारीत शरीराची रचना अंतिम टप्प्या कडे वाटचाल करण्यास सुरुवात.सूर्यसूर्याच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
१०२८ दिवसांचा १०वा महिनाप्रसूती आधीचा शेवटचा टप्पा. बाळाचे मन आणि भावना सक्रिय आणि प्रसूतीसाठी मानसिकदृष्ट्या तयार चंद्रचंद्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे

अशाप्रकारे २८० दिवसांच्या या अविरत क्रिया प्रक्रियांनंतर बाळाचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगात प्रवेश होतो आणि त्याच्या जन्मवेळे नुसार त्याची स्वतः ची अशी भोग कुंडली अर्थात जन्मकुंडली तयार होते.

शुभं भवतु 🙏🏻

(टीप : एखादी उपाय योजना करण्यापूर्वी जाणकार ज्योतिष सल्ला अवश्य घ्यावा.)

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in