Category: Uncategorized

सूर्याच्या नवग्रह मालेतील बिरबल


सूर्याच्या नवग्रह मालेतील बिरबल

लहानपणी आपण अकबर बिरबलाच्या गोष्टी अगदी आवडीने वाचल्या आहेत. अकबराच्या दरबारात जे नवरत्न मंत्री मंडळ होते, त्या पैकी बिरबल हा सर्वात प्रसिद्ध झाला, कारण बिरबलाकडे अशी एक गोष्ट होती जी इतरांपेक्षा विशेष नजरेत भरणारी होती ती म्हणजे ती म्हणजे त्याचे बुद्धीचातुर्य.

एका दोरीवर काही कपडे वाळत घातले आहेत तर समजा १ ड्रेस व १ शर्ट वाळायला १५ मिनिटे लागतात, तर ४ ड्रेस व ४ शर्ट वाळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने तात्काळ दिलेच असते वर अजून ४ कोडी आपल्याला घातली असती आणि निरुत्तर केलं असतं.

ही प्रचंड बुद्धिमत्ता व तल्लखपणा देणारा सुर्याच्या दरबारातील बिरबल रुपी रत्न म्हणजे बुध.

आपल्या अवती-भोवती जी काही बुध्दीमान, चतुर, चलाख, धुर्त मंडळी ई. वावरत असतात, त्यांचा ‘बुध’ हा ग्रह सुस्थितीत असतो. बुध ‘चांगला’ म्हणजे काय? हे विस्तृत पणे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करावा लागेल, पण इथे या गोषवारा जरी कळला तरी पुरेसं आहे.

बुध म्हटले की बुद्धी व धुर्तपणा आपल्याला नजेरेसमोर येत असला तरी बुधाच्या कारकत्वाखाली बुद्धी, वाकचातुर्य, संपर्क, अनेकत्व, ई अनेक गोष्टी येतात.

त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘अनेकत्व’ एखादया व्यक्ती बाबतीत तुम्ही बघितलं असेल की त्याला एका वेळेला कामाच्या दोन चांगल्या संधी चालून येतात आणि मग त्यातली कुठली निवडावी हा प्रश्न पडतो, किंवा लग्नाच्या जोडीदाराचा शोध चालू असताना दोन उत्तम स्थळे एकाच वेळेला चालून येतात आणि कोणांस होकार दयावा, हा प्रश्न पडतो. काही वेळेला एकच स्थळ हे काही काळाने परत सांगुन येतं. एखादया व्यक्तीचे ‘एकापेक्षा अधिक’ उदयोगधंदे असतात, म्हणजेच धन प्राप्तीचे स्त्रोत (Source of income) हे ‘एकापेक्षा अधिक’ असतात. अशा सर्व गोष्टी बुधाच्या अंमलाखाली येतात. बुध हा बुध्दीमत्ता देतोच पण त्यात देखील उत्तम ‘आकलनं शक्ती’ (Grasping Power) आणि तर्ककला (Logic) देतो. विनोदबुध्दी, मिस्किलपणा हे सुद्धा बुधाचेच गुण. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण बुध व्यक्ती सार्थ ठरवतो.

एका नवरोजी ला कोर्टात वाद चालू असताना एका वकिलाने प्रश्न विचारला की, ‘तुम्ही तुमच्या बायकोला पूर्वी इतकीच सध्या मारहाण करता का? फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मधेच उत्तर दया’ नवरोजी ची पंचाईत झाली. ‘हो’ उत्तर दिलं तरी पंचाईत ‘नाही’ उत्तर दिलं तरी पंचाईत.

बुधाच्या अंमलाखाली येणारी कार्यक्षेत्रे म्हणजे सॉफ्टवेअर व त्या संबंधातील सर्व क्षेत्रं, कॉल सेन्टर्स, बीपीओ, इलेक्ट्रॉनिक्स. इथ पासून ते लेखन, साहित्य, प्रकाशन, प्रिंटिंग, वधुवर सूचक, ज्योतिष ई. अनेक कार्यक्षेत्र येतात..

बुधाचा अजून एक गुण म्हणजे परिवर्तन. बुध हा सतत बदल घडविणारा ग्रह आहे. असे उदयोगधंदे की, ज्यात समोरचा ‘ग्राहक’ हा सारखा बदलत असतो. उदाहरणार्थ- दुकान किवां तत्सम व्यवसाय हे बुधच्या अंमलाखाली येतात. बुधाच्या अंमलाखाली येणारं सॉफ्टवेअरचं क्षेत्र हे सतत बदलणारं क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर क्षेत्रात नोक-या बदलण्याचं प्रमाण हे खूप अधिक आहे. ज्या व्यक्तीचं कामाचं स्वरूप हे सतत बदलत असतं ते देखील बुधामुळेच.. शेअर बाजार हा देखील बुधाच्याच अंमलाखाली येतो. तिथे तर रोज नविन चित्र असतं, सतत बदल, व चढ उतार. बुधाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे एकाच कामासाठी अनेक वेळा किंवा एकापेक्षा जास्तवेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्याच फटक्यात काम होत नाही. बुधवारी किंवा बुधाचं नक्षत्र असणा-या दिवशी एखादं काम करायला गेल्यास बहुतेकवेळा त्याच कामासाठी परत जावं लागतं. म्हणजेच पहिल्याच फटक्यात काम होत नाही.

बुधाच्या अधिपत्याखाली येणा-या दोन राशी म्हणजे ‘मिथून’ व ‘कन्या’ या दोन्ही राशी जरी बुधाच्याच अधिपत्याखाली येत असल्या तरी या दोन्ही राशीत बुधाच्या गुणधर्माची वेगवेगळी झलक पहायला मिळते. दोन्हीही राशी बुध्दीमान आहेत पण मिथून राशीत बुधाचा चलाखपणा, वाक्चातुर्य, विनोदबुध्दी, धुर्तपणा हया गोष्टी अधिक आहेत.

कन्या राशीत बुधाची आकलंन शक्ती, चिकित्सकवृत्ती कुठल्याही गोष्टीचा अतिविचार, काही वेळेला या अतिविचारामुळे कन्याराशी निर्णय घ्यायला प्रचंड वेळ लावते. समोरचा माणूस वैतागून जातो, तरी यांचा निर्णय अजून झालेला नसतो. हयांना निर्णय घेण्यासाठी सतत कोणाच्या तरी आधाराची गरज असते. कन्या ही अत्यंत शास्त्रीय पध्दतीने विचार करणारी राशी आहे. प्रत्येक गोष्ट सिध्द व्हावी लागते. थोडीशी अतिशयोक्ती म्हणजे, समजा कन्या व्यक्तीने ‘पिवळा’ शर्ट घातलेला असेल तरी ते एकदा समोरच्या माणसाला विचारतील की मी कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय? समोरच्या व्यक्तीने एकदा ‘पिवळा’ म्हटलं की मग हयांची खात्री पटते. मिथून ही वायु  तत्त्वाची रास असल्याने सतत विचार ‘बदलणारी राशी’ आहे हे लोक त्याचे निर्णय सतत ‘बदलत’ असतात. सकाळी संध्याकाळी फ़िरायला जाऊ. दुपारी म्हणतील घरीच आराम करु.

संदेशवहनाचा’ कारक देखील बुधच! त्यामुळे आपल्या हातातला ‘भ्रमणध्वनी’ (मोबाईल) हा देखील बुधाच्याच अधिपत्याखाली येतो. बुध हा बुध्दीचा कारक आणि बुध्दी जिथे साठवली जाते त्या मेंदुचे देखील ‘दोन’ भाग आहेत, मोठा मेंदू व छोटा मेंदू! हयात देखील बुधाचं ‘एकापेक्षा अधिक’ हे कारकत्व चुकलेलं नाही!

बुधा संबंधी इतक्या अनेक गोष्टी आहेत त्या सगळया गोष्टीचा एकाच लेखात उल्लेख करणंही अवघड आहे.

‘रवि’ला ज्योतिषशास्त्रात ‘राजा’ म्हटलेलं आहे आणि ‘बुध’ हा सूर्यमालेतील रविच्या म्हणजे सुर्याच्या सगळयात जवळचा ग्रह आहे. अकबर बादशहा देखील बिरबलाला कायम त्याच्याबरोबर ठेवत असे, म्हणूनच बुध्दींच्या कारक बुधाला नवग्रह मालेतील बिरबल हे नाव सार्थ वाटते..

(मध्यंतरी वाचनात आलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद)

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

अर्थ स्वप्नांचा ( Meanings of Dreams )


फ़ार पूर्वीपासून माणसाला अनेक प्रकारची चित्र-विचित्र स्वप्ने पडत आली आहेत आणि नेहमीच या स्वप्नामागे काय अर्थ दडलेला असावा ही उत्सुकता वाटत आली आहे. याला मी तरी कसा अपवाद असेल. सगळ्या प्रकारची स्वप्ने मला नक्कीच पडलेली नाहीत त्यामुळे प्रतेक स्वप्न व त्याचा अर्थ एका माणसाला पडताळून पाहणे एका माणसाला शक्य नाही. तरी मित्रांनो आज अशीच काही स्वप्ने आणि त्यांचा काय अर्थ असावा याचे संग्रहित केलेले संक्षिप्त अर्थ वा फ़ळ इथे देत आहोत.

अनु. क्र. स्वप्न ( स्वप्नात आलेली गोष्ट )स्वप्न संक्षिप्त अर्थ वा फ़ळ
001पान / दही / दूध पाहणेलवकरच धनलाभ होईल
002बूट / चप्पल पाहणेलवकरच प्रवास होईल
003चारपाई पलंग पाहणेखोटेपणा समोर येईल
004चारपाई पलंगावर झोपलेले पाहणेव्यर्थ क्लेश होतील
005माणूस पाहणेसामान्य
006लहान मुलगा पाहणेयोग्य काळ येईल
007स्त्री / जुळी मुले पाहणेलवकरच धनलाभ होईल
008मुलगी पाहणेलवकरच चांगले दिवस येतील
009वाळू पाहणेलवकरच धनलाभ होईल
010तार पाहणेसमृद्धी वाढेल
011दंडुका पाहणेनिंदा वाट्यास येईल
012दिवा पाहणेसंकट टळेल
013देवता / देवी पाहणे / साधू पाहणे / साधूचा आश्रम पाहणेआनंद व शांती लाभेल
014कोणाची चांगली प्रतिमा पाहणेआयुष्य वाढेल
015पान खाणेसमाजात मान वाढेल
016पान थुंकने / फ़ेकणेसमाजात मानहानी होईल
017सामानाची पेटी पाहणेसुविधा प्राप्त होतील
018सामानाची पेटी हरवणेअडचणी येतील
019पुस्तक पाहणे / पुस्तक मिळणेसमाजात मान वाढेल
020पुस्तक हरवणेसमाजात मानहानी होईल
021उपाशी पाहणेसंततीविषयी अडचणी
022जळता कंदील पेटलेली विजेरी पाहणेअडचणीतील परिवाराशी संपर्क
023कबुतर पाहणेव्यावसायिक लाभ होईल
024तळ्घर पाहणेहीन व्यक्तीशी संबंध येईल
025पतंग कापलेला पाहणेधनहानी होईल
026उडता पतंगधनलाभ होईल
027समारंभ पाहणेअविवाहित चे लग्न जमेल
028चंद्र पाहणेचांगली मैत्री लाभेल
029समई पाहणेभाग्यवृद्धी होईल
030नग्न पाहणेअशुभ काळ येईल
031औषध घेणेवाईट गोष्टी दूर होतील
032ओळखीचा संभोगआरोग्याच्या अडचणी
033अनोळखी संभोगआकर्षण वाढेल
034पार्सल येणेभाग्यवृद्धी होईल
035पार्सल पाठवणेहानी होईल
036दुर्घटना पाहणेआरोग्याच्या अडचणी
037दुर्घटनेतून वाचणेआरोग्य सुधारेल
038मूंगी पाहणे / मारणेसंघर्षातून सफ़लता
039अनेक मुंग्या पाहणे / मारणेअडचणी येतील
040दाढी वाढलेली पाहणेअशुभ संकेत
041सफ़ेद दाढी वाढलेली पाहणेशुभ संकेत
042प्रशंसा पाहणेअधोगती होईल
043अपमान पाहणेप्रगती होईल
044स्त्रीस अलिंगण पाहणेप्रगती होईल
045स्तन पाहणेशुभ संकेत
046दस्ताऐवज पाहणेव्यावसायिक लाभ होईल
047प्रसव पीडा पाहणेसमृद्धी वाढेल
048शौचालय पाहणेयोजना सफ़लता
049परिचारिका दिसणेरोगमुक्ती
050नळ पंपातून पाणी पाहणेधन/ व्यावसायिक लाभ होईल
051कोरडा नळ पाहणेधन/ व्यावसायिक हानी होईल
052तीर्थ यात्रा पाहणेभाग्यवृद्धी होईल
053आवडती मूर्ती चोरी होणे / तुटणेअशुभ संकेत
054चिखल पाहणेअडचणी येतील
055पाणी पाहणेलवकरच धनलाभ होईल
056दात / केस पाहणेशुभ संकेत
057दात पडणे / केस तुटणे पाहणेअशुभ संकेत
058पितृ पाहणेशुभ संकेत
059साप चावणेलवकरच धनलाभ होईल
060तलाव दिसणेशुभ संकेत
061जेवन करणेमानसिक रोग
062जेवन फ़ेकणेरोगमुक्ती
063चिमणी पाहणेअशुभ संकेत
064तिजोरी पाहणेलवकरच धनलाभ होईल
065स्वच्छ आकाश पाहणेप्रगती होईल
066पोहताना पाहणेप्रगती होईल
067उडताना पाहणे लाभदायक प्रवास
068शाळा पाहणे विशेषता लाभेल
069परी पाहणे चमत्कारी प्रगती
070कात्री पाहणेव्यावसायिक लाभ होईल
071रडताना पाहणे सुखाचा काळ येईल
072चिंता करताना पाहणेप्रगती होईल
073यात्रा करताना पाहणे कार्यसिद्धी होईल
074भाजीपाला पाहणे समृद्धी दर्शक
075पत्नीचे दर्शन होणे सौभाग्य दर्शक
076अंगठी दिसणेलवकरच धनलाभ होईल
077अंगठी हरवणे धनहानी
078अंडे दिसणे सफ़लता प्राप्ती
079शवयात्रा दिसणे पारिवारीक संकटे
080आरसा दिसणे प्रसन्नता दर्शक
081तुटका आरसा अप्रसन्नता दर्शक
082तांदुळ भात दिसणे दु:ख समाप्ती
083चक्की दिसणे संकटाची चाहुल
084आंबा दिसणेलवकरच धनलाभ होईल
085ढग दिसणेप्रगती होईल
086पिंजरा दिसणेकष्ट्दायक काळ
087विंचू चावणे धनलाभ
088म्हैस दिसणे संकटावर मात
089रेडा दिसणे अडचणींत वाढ
090ताईत दिसणे क्लेष दर्शक
091ताईत हरवणे संकट मूक्ती
092मद्य प्राशन दिसणे भौतिक समृद्धी दर्शक
093प्रार्थना / पूजा / प्रसाद / स्वर्ग दिसणे शांती लाभ
094नरक दिसणे दु:खदायक
095शिडी दिसणे / शिडीवर चढणे प्रगतीकारक
096शिडी वरुन उतरणेअवनती कारक
097घर कोसळणे / पहाड दिसणे / उतरणेअडचणींत वाढ
098पहाड चढणे संकटावर मात
099तरतरीत नाक दिसणेसमाजात मान वाढेल
100बेढब नाक दिसणेसमाजात मानहानी होईल

(टीप : स्वप्नांचे अर्थ पाहून त्यासंबंधी फ़ळाचे व काळाचे अनुमान काढताना जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)

-ज्योतिषमित्रमिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क :

(७०५८११५९४७) (Whatsapp/Text Only)

For More info Visit : jyotishmitramilnd.in

Collection of 500 Dreams and their Meanings @ Rs.99/-
  • Just send Dreamcollection in reply

गोष्ट देवाच्या गणिताची


माणसाची प्रसंगाकडे बघण्याची, ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वरीय दृष्टीकोन हे एकदम भिन्न असतात. बरेच वेळा आपल्या मनाप्रमाणे गोष्ट घडत नसेल तर आपण नशिबाला दोष वा देवाविषयी शंका घ्यायला सुद्धा कचरत नाही. आपण ईश्वराची न्याय जाणण्यात, समजण्यात अपुरे आहोत. आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो, परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म याच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो.

हे महत्त्वाचे नाही कि आपण किती श्रीमंत आहोत, महत्त्वाचे हे आहे कि आपल्या सेवाभावी कार्यात त्याग किती आहे.
याच संदर्भात सुनील इनामदार यांची एक व्हॉट्स ॲप पोस्ट वाचनात आली, त्यातील “देवाचे गणित” जसे च्या तसे इथे देत आहे

देवाचे गणित…..

एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते. थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला.

थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे, त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती.

पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे ३ भाकर्‍या आहेत, दुसरा म्हणाला माझ्याकडे ५ भाकर्‍या आहेत, आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ.

आता प्रश्न आला कि ८ (३+५) भाकर्‍या तिघांमध्ये कशा वाटायच्या ? पहिल्या माणसाने सुचविले कि प्रत्येक भाकरीचे ३ तुकडे करुया, अर्थात ८ भाकर्‍यांचे २४ (८ x ३) तुकडे होतील आणि आपल्या तिघात ८ – ८ तुकडे समसमान वाटले जातील.

बाकी दोघांना त्याचे मत पटले आणि ८ भाकर्‍यांचे २४ तुकडे करुन प्रत्येकाने ८ – ८ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले.

सकाळी उठल्यावर तिसर्‍या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या ८ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना ८ सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला.

तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे ४ – ४ मुद्रा वाटून घेऊ. पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या ३ भाकर्‍या होत्या आणि तुमच्या ५ भाकर्‍या होत्या, म्हणून मी ३ मुद्रा घेईन आणि तुम्ही ५ मुद्रा घेतल्या पाहिजेत.

यावर दोघांची वादावादी चालू झाली. यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजार्‍याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली व ती सोडविण्याची प्रार्थना केली.

हे दोघेही दुसर्‍याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारीपण चक्रावून गेला. त्याने त्या दोघांना सांगितले की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या, मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन.

पुजार्‍याला खरेतर दुसऱ्या माणसाने सांगितलेली ३ – ५ ची वाटणी ठीक वाटत होती, पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता. विचार करता करता त्याला गाढ झोप लागली.
थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रगट झाला, तेव्हा पुजार्‍याने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. माझ्या दृष्टीने ३ – ५ अशी वाटणीच उचित आहे असेही त्याने देवाला सांगितले.

देवाने स्मित करुन म्हटले, “नाही, पहिल्या माणसाला १ मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला ७ मुद्रा मिळाल्या पाहिजेत.”
देवाचे म्हणणे ऐकून पुजारी चकीत झाला आणि त्याने आश्चर्याने विचारले, “प्रभू, असं कसं ?”

देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला: यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने आपल्या ३ भाकर्‍यांचे ९ तुकडे केले, परंतु त्या ९ पैकी त्याने फक्त १ वाटला आणि ८ तुकडे स्वतः खाल्ले. म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त १ तुकडा एव्हढाच होता. म्हणून तो फक्त १ मुद्रेचा हक्कदार आहे. दुसऱ्या माणसाने आपल्या ५ भाकर्‍यांचे १५ तुकडे केले, ज्यातले त्याने स्वतः ८ तुकडे खाल्ले आणि ७ तुकडे वाटून दिले. म्हणून न्यायधर्मानुसार तो ७ मुद्रांचा हक्कदार आहे. हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे.

देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला.

मित्रांनो आपले विचारांचे देखील स्वागत आहे.

  • ज्योतिषमित्र मिलिंद

कोणत्या महिन्यात झाला विवाह – थोडी रंगत थोडी गंमत आपल्या वैवाहिक नात्याबद्दल


विवाहित जोडपे ज्याला इंग्लिशमध्ये “soul mate” म्हटले जाते. म्हणजेच ज्यांचे आत्मा/अंतःकरण एकरूप होतात. ज्योतिष शास्त्रात सूर्यास आत्माकारक ग्रह मानतात. चला तर मग
आपले विवाह कोणत्या सुर्यराशीच्या महिन्यात झाले आहेत, याचा आपल्या नात्यावर कसा प्रभाव पडत असेल. हे ढोबळमानाने जाणून घेऊ…थोडी रंगत थोडी गंमत आपल्या वैवाहिक नात्याबद्दल

😊

टीप : हे ढोबळ अनुमान असून परस्पर पुरकता जाणून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक असते.

१४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी :
या दरम्यान झालेल्या विवाहावर मकर राशीचा प्रभाव असतो अर्थात असे जोडपे खूप जबाबदारीने वागणारे असू शकते पण त्यांच्यात प्रणय रसिकता थोडी कमी असू शकते.
😊

१४ फेब्रुवारी ते १३ मार्च :
या कालावधीत झालेले विवाहांवर कुंभ राशीचा प्रभाव असतो. अर्थात असे जोडपे जगावेगळे असतात. हे सकारात्मक विचारी आणि नेहमी आकर्षणाचे केंद्र असू शकतात.
😊

१४ मार्च ते १३ एप्रिल :
या दिवसांत झालेले विवाह मीन राशीने प्रभावित असतात. हे जोडपे भावुक असून एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण दाखवणे जमेल असे नाही
😊

१४ एप्रिल ते १३ मे :
या दरम्यान झालेले विवाहांवर मेष राशीचा प्रभाव असतो. असे जोडप्यांच्या प्रणयाविषयी कल्पना स्पष्ट असू शकतात. दोघांमध्ये प्रेमही असतं पण एकमेकांशी तुलना केल्याने काही मतभेद देखील होऊ शकतात.
😊

१४ मे ते १३ जून :
या काळातील विवाह हे वृषभ राशीने प्रभावित असतात. या एक प्रभुत्व गाजवणारा तर दुसरा जुळवून घेणारा असेल तर हे नातं सुरळीत राहू शकते.
😊

१४ जून ते १३ जुलै :
या काळातील विवाह मिथुन राशीने प्रभावित असतात. प्रत्येक गोष्टीत अतीपणा उतू जातो, प्रेम करताना अगदी आकंठ प्रेमात बुडतात आणि भांडतात तेव्हा अगदी हमरीतुमरीवर येऊ शकतात.
😊

१४ जुलै ते १३ ऑगस्ट :
या दरम्यान चे विवाह कर्क राशीने प्रभावित असतात. पती-पत्नी घराचा व सुखाचा वि‍चार करत असतात. दोघं कधी प्रेमात दंग होतात, पण कामाची जबाबदारी आठवताच प्रणयातून भानावर येतात.
😊

१४ ऑगस्ट ते १३ सप्टेबर :
या काळातील विवाह सिंह राशीने प्रभावित असतात. या जोडप्यात अहंकारामुळे वाद होऊ शकतात. एकमेकांच्यात प्रेम आणि काळजी असते, पण रागात सगळ्याचा विसर पडू शकतो.
😊

१४ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर :
या दरम्यान चे विवाह कन्या राशीने प्रभावित असतात. हे जोडपे खूप संवेदनशील असू शकते पण काहीसे गोंधळलेले असू शकतात.
😊

१४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेबर :
या दरम्यान झालेले विवाह तूळ राशीने प्रभावित असतात. या जोडप्यात प्रत्येक गोष्ट खूप संतुलित असते. म्हणून मेड फॉर इचं आदर असू शकतात.
😊

१४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर : या काळातील विवाह वृश्चिक राशीने प्रभावित असतात. असे जोडपे प्रणयासक्त असू शकते व वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगतात, पण याची पूर्ती न झाल्यास असमाधान निर्माण होऊ शकते.
😊

१४ डिसेंबर ते १३ जानेवारी :
या काळातील विवाह धनू राशीने प्रभावित असतात. हे जोडपे हट्टी असू शकतात तरी एकमेकाला समजून घेतात आणि नातेबंध जपतात.

टीप : हे ढोबळ अनुमान असून परस्पर पुरकता जाणून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक असते.


-ज्योतिषमित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क :

7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…


गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…
आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…

आज मन यापूर्वी च्या गणपती बाप्पाला निरोप देतानाच्या आरोळी नी दुमदुमतेय..मन भरून आले आहे. काही आरोळी लिहितोय…

१. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

३. अली में ढोल गली में ढोल, गणपती बाप्पा लवकर बोल

४. एक दोन तीन चार, गणपती चा जयजयकार…

तुम्हाला अजुन आठवत असतील तर तुम्ही ही लिहा…

-ज्योतिषमित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

सोन्याची आभूषणे दगिने घालणे ठरते कोणास फायदेशीर (To whom it’s beneficial wearing Gold)


सोन्याची आभूषणे दागिने घालने ठरते कोणास फायदेशीर

बऱ्याच जणाना सोने अंगावर घालून मिरवण्याची हौस असते, काहीजण रोज सोने अंगावर घालतात. विशेषतः स्त्रियांना सोन्याची फार आवड असते.
जाणून घ्या : ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची आभूषणे दागिने घालने ठरते कोणास फायदेशीर

जन्म कुंडली मध्ये गुरु शुभ असून

गुरु १ ले स्थानात असेल किंवा १ ले स्थानाचा अधिपती असेल तर :

शिरस्त्राण, बिंदी, डुल, बाळी, नथ सोन्याची घातल्यास व्यक्तिमत्त्व प्रभावी होईल, विवाहास सहाय्यकारी ठरेल

गुरु २ रे स्थानात असेल किंवा २ रे स्थानाचा अधिपती असेल तर :

नेकलेस, साखळी सोन्याची घातल्यास धनप्राप्ती, कौटुंबिक सौख्य साठी उपयुक्त

गुरु ३ रे स्थानात असेल किंवा ३ रे स्थानाचा अधिपती असेल तर :

ब्रेसलेट, बांगड्या, घडयाळ सोन्याची घातल्यास कर्तुत्व, संपर्क, भावांशी सबंध साठी उपयुक्त

गुरु ४ थे स्थानात असेल किंवा ४ थे स्थानाचा अधिपती असेल तर :

छातीवर येणारी साखळी, गंठण, हार सोन्याची घातल्यास मालमत्ता, सुख, वाहन, मातृ सुख साठी उपयुक्त

गुरु ५ वे स्थानात असेल किंवा ५ वे स्थानाचा अधिपती असेल तर :

लटकन सोन्याची घातल्यास विद्या, प्रेम, संतती, कला साठी उपयुक्त

गुरु ६ वे स्थानात असेल किंवा ६ वे स्थानाचा अधिपती असेल तर :

सोने घालणे शक्यतो टाळावे, सुवर्ण दान करावे

गुरु ७ वे स्थानात असेल किंवा ७ वे स्थानाचा अधिपती असेल तर :

कंबर पट्टा सोन्याची घातल्यास विवाहासाठी उपयुक्त

गुरु ८ वे स्थानात असेल किंवा ८ वे स्थानाचा अधिपती असेल तर :

सोने घालने शक्यतो टाळावे

गुरु ९ वे स्थानात असेल किंवा ९ वे स्थानाचा अधिपती असेल तर :

मांडीवर कशिदा कारागिरी सोन्याची घातल्यास उपयुक्त

गुरु १० वे स्थानात असेल किंवा १० वे स्थानाचा अधिपती असेल तर :

छातीवर येणारी साखळी, गंठण, हार सोन्याची घातल्यास व्यवसायासाठी उपयुक्त

गुरु ११ वे स्थानात असेल किंवा ११ वे स्थानाचा अधिपती असेल तर :

पैंजण सोन्याचे घातल्यास लाभ होतील

१२ वे स्थानात असेल किंवा १२ वे स्थानाचा अधिपती असेल तर :

सोने घाळणे शक्यतो टाळावे, सुवर्ण दान करावे

टीप :
हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, वरील सूचना जे रोज सोने घालतात त्यांचेसाठी आहे, तसेच गुरु शुभ असून कोठे स्थित आहे त्यानुसार हे वर्णन केले आहे. गुरुची स्थिती, भावेश ई. गोष्टी ज्योतिष जाणकारा कडून जाणून घेऊन मगच वापर करावा. कधीतरी सोने घालून मिरवणाऱ्या मंडळींनी याचा फारसा विचार करू नये.

-ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

तुमच्या – माझ्या मनातील प्रश्न व त्याची उकल ( Question & Solutions in our mind)


तुमच्या – माझ्या मनातील प्रश्न व त्याची उकल

जेव्हा मनुष्य अंतर्मुख होतो तेव्हा, माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी हे प्रश्न जरुर डोक्यात येतात. त्यांची उत्तरे संक्षिप्त रुपात येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

१. आयुष्याचा हेतू काय आहे ?

आयुष्याचा हेतू त्या चैतन्यास जाणून घेणे आहे, जे जन्म आणि मृत्यू च्या बंधनाच्या परे आहे. हे जाणून घेणे म्हणजेच मोक्षप्राप्ती आहे.

२. जन्म आणि मृत्यू च्या बंधनापासून कोण मूक्त आहे ?

ज्याने त्या परम आत्म्यास जाणले जो जन्म आणि मृत्यू च्या बंधनापासून मूक्त आहे तो.

३. संसारात दू:ख का आहे ?

मोह, स्वार्थ आणि भीती हे संसारातील दू:खाचे मूख्य कारण आहे.

४. देवाने दू:खाची रचना का केली ?

देवाने संसाराची रचना केली आणि मनुष्याने आपल्या विचाराने आणि कर्माने सुख-दू:खाची रचना केली.

५. देव आस्तित्वात आहे का ? कोण आहे ? कसा आहे ? स्त्री आहे की पुरुष ?

कोणत्याही कारणाशिवाय कार्य नाही. हे जग त्या कारणाच्या आस्तित्वाचे प्रमाण आहे. तुम्ही आहात म्हणून तो आहे, त्या परमोच्च कारणास अध्यात्मात देव संबोधले आहे. तो न स्त्री आहे न पुरुष.

६. भाग्य काय आहे ?

कोणतीही कृती हा कार्याचा एक परिणाम आहे. परिणाम हा चांगलाही असू शकतो किंवा वाईटही असू शकतो. या परिणामाचे दुसरे नाव भाग्य आहे, तुम्ही आज कर्म पेरलेत तर कालांतराने तुमचे भाग्य म्हणून उदयास येईल.

७. या जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते ?

या जगात रोज हजारो लोक मृत पावतात हे आपण सर्वजण पाहतो, तरीही जास्त काळ जगण्याची धडपड करत राहतो यापेक्षा मोठे आश्चर्य काय असू शकते.

८. कोणत्या गोष्टीचा त्याग करुन माणूस धनवान बनू शकतो ?

लोभाचा त्याग करुन माणूस धनवान बनू शकतो.

९. सुखी होण्याचा एकमात्र उपाय कोणता ?

चांगला स्वभाव हाच सुखी होण्याचा एकमात्र उपाय आहे.

१०. कोणती गोष्टी गेली की माणसास दू:ख नाही होत ?

राग गेला की माणसास दू:ख नाही होत.

११. कोणती गोष्ट या जगात धर्मापेक्षा मोठी आहे ?

या जगात दया ही धर्मापेक्षा मोठी गोष्ट आहे.

१२. कोणती गोष्ट ईतरांना अजिबात देऊ नये ?

दू:ख व धोका ईतरांना अजिबात देऊ नये.

१३. कोणती गोष्ट ईतरांकडून अजिबात घेऊ नये ?

ईतरांचा तळ्तळाट अजिबात घेऊ नये.

१४. कोणती गोष्ट आयुष्यात सर्व काही करायला भाग पाडते ?

मजबुरी आयुष्यात सर्व काही करायला भाग पाडते.

१६. कोणती गोष्ट या जगात सर्वात जास्त विकली जाते ?

या जगात खोटेपणा सर्वात जास्त विकला जातो.

१७. कोणती गोष्ट या जगात सर्वात जास्त समाधान देते ?

या जगात परोपकार सर्वात जास्त समाधान देतो.

१८. कोणती गोष्ट मनुष्यास सर्वात घातक आहे ?

मनुष्यास मोह हा सर्वात घातक आहे.

१९. सर्वात मोठे पडलेले स्वप्न कोणते ?

आयुष्य हेच सर्वात मोठे पडलेले स्वप्न आहे.

२०. या जगात न बदलता येणारी गोष्ट कोणती ?

मृत्यू ही या जगात न बदलता येणारी गोष्ट आहे.

२१. अशी कोणती गोष्ट आहे जी स्वत:ला लवकर समजत नाही ?

स्वत:चा मूर्खपणा स्वत:ला लवकर समजत नाही.

२२. अशी कोणती गोष्ट आहे जी चिरंतन आहे ?

आत्मा व ज्ञान चिरंतन आहे.

२३. अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही थांबत नाही ?

काळ कधीही थांबत नाही.

मी स्वत: हे व अशा अनेक प्रश्नांची उकल करुन ती आयुष्यात अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात किती यशस्वी होईन ते येणारा काळ च ठरवेन. आपण ही आपले प्रश्न व त्याची उत्तरे शोधा व अध्यात्मिक प्रगती करा. इथे लिहिले तर ईतरांना त्याचा त्यांचा प्रकाश मार्ग शोधण्यासाठी उपयोग होईल.

आपणांस शुभेच्छा….

-ज्योतिषमित्रमिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क :

(७०५८११५९४७) (Whatsapp/Text Only)

For More info Visit : jyotishmitramilnd.in

(वाचनात आलेल्या लेखाचा व विचारांचा स्वैर अनुवाद)

तुमची समस्या व आमचा ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन (सशुल्क)


Timely we need an accurate astrological advice to plan the progress or losses in life.

OUR SERVICES

Fees are Rs.750/- per Question.

Urgent Consultation (24 hours) fees Rs.1000/-

We will have discussion of 40-45 minutes on your query on phone call.

Appointment will be scheduled in 7-8 days. (Please co-operate with us)

Share your Birth Name & Birth details (date, time, place) and your question in comment section or whatsapp on 7058115947

We also provide special consultation on mutual discussion.

For any query or Astrological guidance

feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

कोणत्या अक्षराने तुमच्या नावाची / व्यवसायायाची / प्रकल्पाची सुरुवात फ़ायदेशीर ठरेल ?(Which Letter will be beneficial to Name yourself / Business / Project etc)


पारंपारिक वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार (According to Vaidik Astrology)

तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते ?

(Which Letter comes under your Moon Sign)

कोणत्या अक्षराने तुमच्या नावाची / व्यवसायायाची / प्रकल्पाची सुरुवात फ़ायदेशीर ठरेल ?

Which Letter will be beneficial to Name yourself / Business / Project etc

मेष (Aries)चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.ch, che, cho, laa, la, le, aa
वृष (Taurus)ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वोii, oo, e, o, vaa, va, ve, vo
मिथुन (Gemini)का, की, कू, घ, ङ, छ, के, को, हkaa, kii, ka, gha, da, chh, ke, ko, ha
कर्क (Cancer)ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डोhii, hoo, he, ho, daa, doo, de, do
सिंह (Leo)मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टेmaa, mii, noo, me, mo, taa, tii, too, te
कन्या (Virgo)ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पोdho, paa, pii, pa, sha, na, tha, pe, po
तूळ (Libra)रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, तेraa, rii, roo, re, ro, taa, tii, too, te
वृश्चिक (Scorpio)तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यूto, naa, nii, na, ne, yaa, yii, ya
धनु (Sagittarius)ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भेye, yo, bhaa, bhii, bha, dhaa, faa, dhaa, bhe
मकर (Capricorn)भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गीbho, jaa, jii, khii, khoo, khe, kho, gaa, gii
कुंभ (Aquarius)गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दाgoo, ge, go, saa, sii, soo, se, daa
मीन (Pisces)दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, चीdii, doo, tha, za, nya, de, do, chaa, chii

-ज्योतिषमित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क :

(७०५८११५९४७) (Whatsapp/Text Only)

contact@jyotishmitramilind.in

For More info Visit : jyotishmitramilnd.in

ज्योतिषमित्र मिलिंद चित्र संग्रह ( jyotishmitramilind Image Gallery )


गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः 🙏🏻

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in