Category: Uncategorized

राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव (भाग ४)


विषय : राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव (भाग ४)

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडीक्टीव्ह स्टेलर ॲस्त्रोलॉजी रीडर

नमस्कार,

राशी वर्गीकरण भाग १, २ व ३ मध्ये आपण राशींचे १३ विभागात केलेले वर्गीकरण व सकारात्मक व नकारात्मक राशि,  उतरी व दक्षिणी, विषुवीय, अयन वृत्तिय राशि,अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि, चर, स्थिर व द्विस्वभाव राशी या बद्दल जाणून घेतले.

आज आपण (५) फलदायी व निष्फल राशी (६) मूक राशि (७) हिंसक राशि (८) मानवीय राशि (९) स्वर राशि (१०) चतुष्पाद राशि (११) द्विसंख्या राशि (१२) द्वि तनु राशि (१३) लघु व दीर्घ उदित राशि या बद्दल माहिती घेणार आहोत.

(५अ) फलदायी राशि :

कर्क, वृश्चिक व मीन या राशि फलदायी म्हटल्या जातात. वृषभ, तुळ, मकर व धनु या राशि अर्ध फलदायी राशी आहेत. ५ व ७ वे स्थानामध्ये फलदायी राशि असेल व त्यांचे राशी स्वामी फलदायी राशि मध्ये असेल तर विवाह लवकर होतो. निष्फळ राशि ५ वे लग्न स्थानी असतील (व इतर सूचक ग्रह स्थिती व घटक) हे दर्शवते की, योग्य समयी विवाह होणार नाही. फलदायी राशि ११ व ५ वे स्थानी असतील व त्याचे राशी स्वामी फलदायी राशि मध्ये असतील तर संतती होते.

(५ब) निष्फळ राशि :

मेष, मिथुन, सिंह व कन्या राशि निष्फळ अथवा वांझ राशी म्हटल्या जातात. लग्न स्थानी, ५ वे व ११ वे स्थानी निष्फळ राशि असेल, अथवा त्यांचे राशी स्वामी निष्फळ राशिमध्ये असतील, चंद्र फलदायी राशि मध्ये नसेल अथवा कोणताही फलदायी ग्रह ५ वे व ११ वे स्थानी नसेल, तर संतान योग कमी करतो.

(६) मूक राशि :

सर्व जल राशि कर्क, वृश्चिक व मीन राशि मूक राशि आहेत. जर बुध ६ वे स्थानाचा अधिपती असून २ रे स्थानी मूक राशि मध्ये स्थित असेल आणि बुध कुठेही मूक राशीत स्थित असेल व मंगळ व शनि ने पीडित असेल, तर अडखळत बोलणे, तोतरे बोलणे असू शकते. या वर मंगळाची अशुभ दृष्टी पडत असेल, तर जातक खूप जलद घाईत बोलणारा, बोबडा, चुकीचे शब्दोच्चार करणारा असू शकतो. बुध मूक राशीत चंद्राच्या प्रतियोगात असेल तर वाणी मध्ये दोष असू शकतो. लग्न स्थानी मूक राशीतील शनि वाचा दोष देऊ शकतो. २ रे स्थान स्वर इंद्रिये दर्शवते. जर २ रे स्थानी स्वर राशी मध्ये विशेष करून शुक्र वा बुध कोणत्या अशुभ दृष्टी विना स्थित असतील, तर वक्तृत्वाची अथवा विशेष आवाजाची देण दर्शवते. गुरु सल्ला व उपदेशात्मक आवाज (मग तो व्यवसाय असला नसला तरी) अथवा भाषण देणारा दर्शवतो.  

मंगळ व गुरु दृढ़ वक्ता बनवितात व तो व्यक्ति आपल्या उतेजक वाणी द्वारा सभेमध्ये बदल घडवून आणू शकतो. बुध व शनि हे दाखवितात, की ती व्यक्ति काल प्रसंगानुसार वा समूहाच्या मानसिकतेनुसार आपल्या बोलण्यामध्ये बदल वा सुधारणा करतात.

(७) हिंसक राशि :

मेष व वृश्चिक राशि हिंसक राशि म्हणविली जाते, ते भयहीन असतात. हे जातक सर्व साहसी कार्य हिमतीने व आत्मविश्वासाने करितात. हे जातक संकटाचा सामना करण्यास सक्षम असतात.

(८) मानवीय राशि :

मिथुन, कन्या, कुंभ व धनु राशीचा पहिला अर्ध भाग मानवीय राशि मध्ये येतात. यांची राशी चित्रे मानवीय आकृती युक्त आहेत. काही लेखक तुळ राशि ला ही मानवीय राशि मानतात. होरा सार १ ला श्लोक अध्याय ११ मध्ये पृथुयास चे म्हणणे आहे की, या राशि बलवान असतील जर लग्न मानवीय राशि मध्ये असेल अथवा कोणत्याही जातकाच्या कुंडली मध्ये प्रमुखग्रह मानवीय राशि मध्ये नसेल, तर तो सामाजिक नसतो. अधिक मानवीय पण नसतो. जर लग्न अथवा प्रमुख ग्रह मानवीय राशि मध्ये नसेल तर तो जातक स्वतः स्वभावाने विकृत असू शकतो.

(९) स्वर राशि :

मिथुन, तुळ व कुंभ या वायुमय राशि आहेत, त्याना स्वर जथवा संगीतमय राशि म्हणतात. काही पश्चिमी विद्वान कन्या व धनु राशिला स्वर राशि मानतात. काही वृषभला पण मानतात. स्वरा करिता वायुचे माध्यम आवश्यक आहे, म्हणून स्पर वायु राशिना स्वर राशि मानतात.

(१०) चतुष्पाद राशि :

मेष (मेंढी), वृषभ (बैल), सिंह (सिंह), मकर (बकरी) व धनू राशीचा उत्तरार्ध पशुच्या चित्राच्या आधारित चतुष्पाद वा पशु राशि म्हणतात.

पृथुयासच्या अनुसार या राशि जर १० वे स्थाना मध्ये असतील, तर शक्तिशाली म्हणविल्या जातात. जातकाच्या लग्न स्थानी या राशी असतील, तर त्या त्या पशुच्या गुणानी युक्त असू शकतात. सिन्हा प्रमाणे दृढ़, बकरीचाप्रमाणे विलासप्रिय ई.

(११) दिसंख्या राशि :

मिथुन, धनु व मीन या जुळ्या चिन्ह वाल्या राशि आहेत यांना का द्विसंख्या राशि म्हणतात.

(१२) द्वितनु राशि :

राशी चिन्हात मिथुन एक मुलगा एक मुलगी, धनु चा पूर्वार्ध धनुष्य व बाण युक्त व्यक्ती (धनुर्धारी) व मीन राशि दोन एकत्र बांधलेले मासे दर्शवतात. या राशि द्वितनू राशी मानल्या आहेत.

(१३अ) लघु उदीत राशि :

दक्षिण गोलार्धात मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ व मिथुन लघु उदित राशि आहेत, कारण या पुष्कळ कमी वेळात उदय पावतात.

(१३ब) दीर्घ उदीत राशि :

उत्तर गोलार्धात कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक आणि धनु या राशि अन्य राशिंपेक्षा उशीरा पर्यंत उदित राहतात, म्हणून दीर्घ उदीत राशी मानल्या जातात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

षष्ठी-पूर्ती विधी आणि ज्योतिष शास्त्र


विषय : षष्ठी-पूर्ती विधी आणि ज्योतिष शास्त्र
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : रिप्लिकेबल ॲस्त्रॉलॉजी टेक्निक्स

नमस्कार,

वयाची साठ वर्षे हा एखाद्या हिंदू व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. षष्ठी-पूर्ती, म्हणजे ६० वे वर्ष पूर्ण होणे हे हिंदूंमध्ये साजरे केले जाते.

“साठी शांत ” हा विधी हिंदू धर्मीय लोक करतात. ६० वयाची अवस्था येईपर्यंत आपल्या हातून आपल्या सांसारिक, सामाजिक जीवनात ज्या काही जाणते अजाणते पणी चुका, पाप, अयोग्य गोष्टी किंवा दुर्वर्तन आपल्या स्वतःच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत किंवा समाजा संदर्भात घडलं असेल, त्याचं परिमार्जन व्हावं, त्यातून पाप मुक्त व्हाव आणि दोष निवारण व्हावं. अशा प्रकारची भावना या शांती विधी मध्ये असते. आणि यापुढंचंही आयुष्य चांगलं जावं यासाठी प्रार्थनापूर्वक देवाला विनवणं ही भावना त्यात असते.

एकसष्ठी साजरी करण्यामागे केवळ एक प्रथा किंवा काहीतरी “विधी” अशी कुटुंबीयांची भावना असू नये, तर सर्वप्रथम त्यांना नमस्कार करुन, आपल्याला जे जसे वाढवले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत. त्यांनी ऐन उमेदीच्या काळात आपल्याला सक्षम बनविण्यासाठी उपसलेल्या कष्टांची, प्रसंगी केलेल्या सुखाच्या त्यागाची जाण दाखवावी व कृतज्ञता पूर्वक उत्तम आयुष्य व आरोग्य लाभावे म्हणुन अभिष्टचिन्तन करावे. जोडीस एखादी सुंदर उपयोगी भेटवस्तू द्यावी आणि आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही व केवळ अपेक्षांचे ओझे तुमच्यावर टाकत नाही, उलट आपण प्रेमादरास पात्र असुन आता आमच्याकडुन तुमच्या काय अपेक्षा आहेत ते विचारावे.

एक पथ्य मात्र आवर्जून पाळावे की, कोणत्याही परिस्थितीत, त्यांच्या वाढत्या वयाचा उल्लेख करू नये. उलट आजही तुम्ही आमच्या तेवढेच उपयोगी आहात, तुमचे तुमच्या अनुभवांच्या शिदोरी सकट हवे आहात व आम्हाला तुमचा मोठा आधार आहे असे हे त्यांना सांगा.

हल्ली एकसष्ठी हा एक उत्सव असतो. छान हसत खेळत, आपल्या जवळच्या माणसांसोबत मस्त खात पित हॉटेलिंग करत छान आनंदात वेळ घालवला जातो. आणि काळानुसार त्यात काही गैर ही नाही. त्यामागील योग्य भावना महत्त्वाची आहे.

आपल्याकडे साठी बुद्धी नाठी अशी एक म्हण आहे, जिचा वापर आपण पाणउतारा करण्यासाठी वापरतो. हिंदी भाषेत सठिया गया है असा शब्द प्रयोग केला जातो. खरेच असे शब्द का वापरले जातात. कारण वयाची साठ वर्षे पूर्ण होत असताना आपण सर्वच जण आजूबाजूला असणारे ज्येष्ठ नागरिक बघतो की सर्वसाधारण पणे हळूहळू त्यांची शारीरिक शक्ती कमी होत चालली आहे, दृष्टी, ऐकू येणे, उत्साह मंदावत चालले आहे.

या सार्वत्रिक अनुभवाचा ज्योतिष शास्त्रात काही संबंध आहे का, हे तपासले असता काही तथ्य समोर आले.

६० या आकड्याचे महत्त्व अथवा उपयोग बघितला तर पूर्वीच्या काळी काळ मापणासाठी ६० घटी, ६० विघटी असा केला जायचा. नंतरच्या काळात ६० मिनिटे, ६० सेकंद असा केला जाऊ लागला.
हिंदू ज्योतिषशास्त्रामध्ये १२० वर्षांचे जास्तीत जास्त आयुष्य मानून ९ नक्षत्रांच्या आधारे १२० अंश विभाजित केले गेले. व त्यानंतर परत त्याच क्रमाने १२० अंशाची नक्षत्र साखळी एकूण ३ वेळा मिळून २७ नक्षत्रांसह ३६० अंशाचे राशीचक्र पूर्ण केले.
आपणास माहीत असेल की आकाशात सर्व ग्रह त्यांच्या निर्धारित गतीने परिभ्रमण करत असतात.
लग्न स्थान साधारण २ तास असते, त्यापासून कुंडलीत सूर्य कोणत्या स्थानात किती अंशावर आहे या गणिताने जन्म वेळ समजते.
चंद्र व सूर्याच्या मधील कुंडलीतील अंतरावरून जन्म तारीख अथवा तिथी मोजता येते. ( अमावस्येला चंद्र व सूर्य एकत्र असतात तर पौर्णिमेला प्रतियोग असतो.)
सूर्याच्या परिभ्रमण वरून जन्म महिना मोजता येतो. कारण सूर्य साधारण १ महिना एका राशीत असतो. व १४ जानेवारी दरम्यान मकर राशीत प्रवेश करतो. त्यावरून सूर्य कोणत्या राशीत आहे त्यावरून जन्म महिना समजतो.
तसेच एखाद्याचे वय मोजताना शनी आत्ता कोणत्या राशीत आहे. व जन्मस्थ शनी स्थिती पासून किती पुढे आला आहे यावरून वय समजते. शनी एका राशीत २.५ वर्षे असतो. यात अचूकता साठी शनी व गुरूचे देखील परिभ्रमण विचारात घेतले जाते.

शनि राशी व नक्षत्र चक्र पूर्ण करून मूळ स्थितीला यायला ३० वर्षे लागतात (१२ राशी एक्स २.५ वर्ष) आणि गुरूला १२ वर्षे लागतात.

नीट निरीक्षण केले तर आयुष्याची जास्तीत जास्त मर्यादा १२० वर्षे चा वेळी शनी व गुरू त्याच्या मूळ स्थितीला परत आलेले असतात. त्यापुढे नवीन आयुष्याची सुरुवात होणार असते. यांच्या राशीच्या पूर्ण चक्रातील ही ग्रह स्थिती वयाच्या ६० व्या वर्षी सुद्धा आलेली असते. १२ वर्षे व ३० वर्षे याचा ल.सा.वी.( लघुतम साधारण विभाज्य) ६० येतो. म्हणजेच ६० वर्षे ही आयुष्याची कमीत कमी मर्यादा दर्शवते. म्हणून, व्यक्तीसाठी हा एक प्रकारचा दुसरा जन्म आहे.

आता तुमच्या लक्षात आले असेल की षष्ठी-पूर्तीला हिंदू धर्मात एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे. धन्य ते आपले पूर्वज ज्यांनी आयुष्याचा एवढा सखोल अभ्यास ज्योतिष शास्त्र द्वारे केला होता.

(टीप : ग्रहाच्या इतर घटक युती, दृष्टी, वक्री ई. मुळे या मर्यादेच्या अलीकडे, मध्ये व पलीकडे आयुष्य असू शकते. पण सर्वसाधारपणे वरील मर्यादा अनुभवास येते.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ऋतू, मराठी महिना, तिथी, पक्ष, वार व काळ अनुसार जन्मफल


विषय : ऋतू, मराठी महिना, तिथी, पक्ष, वार व काळ अनुसार जन्मफल
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : आपले नशीब आपले ग्रहयोग

नमस्कार,
हिंदू ज्योतिष शास्त्रात इतक्या विविध प्रकारे फळकथन केले गेले आहे, की वाचणारा गोंधळात पडेल की कोणत्या प्रकारचे अनुकरण करायचे. पण ही माहिती नक्कीच काही तत्वांवर आधारित व रसपूर्ण असते, असे निदान मला तरी वाटते. मला तर हा छंदच जडला आहे की विविध ज्योतिष शास्त्रीय माहिती संग्रहित करायची व त्या महितीमागे कोणते तत्व व विचार अथवा कोणत्या ग्रहास नजरेसमोर ठेवून वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्या उजाळा मिळतो, काही ठोकताळे पक्के होतात व काही माहिती आपल्या विचारांना नवीन दिशा देते, नवीन पैलू समोर आणते.

आज कोणत्या ऋतू मध्ये, मराठी महिन्यामध्ये, कोणत्या तिथीला, कोणत्या पक्षात, कोणत्या वारी व कोणत्या काळी जन्म झाला तर काय फळ असेल ही माहिती वा स्थूल वर्णन आज आपण पाहणार आहोत.

सहा ऋतू

वसंत : विद्यावान, नृत्य, अभिनय, संगीत मध्ये गती असलेला, सुगंधी द्रव्यांचा शौकीन, दीर्घायू

ग्रीष्म : ऐश्वर्यवान, जलक्रीडा शौकीन, कलावंत

वर्षा : स्त्रियांच्या बरोबर रमणारा, दुधाची आवड

शरद : वात प्रकृती, वाहन सुख, सुखी कामुक

हेमंत : मंत्री, सदैव आनंदी, कर्मयोगी, शेतीची आवड

शिशिर : जास्त भूक, व्यसनी, मिष्टात्र प्रिय

बारा मास

१) चैत्र : कलेत पारंगत, आनंदी, विनयशील, मंत्री, सुखी, वेदशास्त्रनिपुण

२) वैशाख : गुणवान, बलवान, रुपवान, चतुर, धनवान, शास्त्रज्ञ, स्वातंत्र्यप्रिय

३) ज्येष्ठ : उंच, परदेशाची आवड, चंचल वृत्तीचा, मंत्र तंत्र जाणणारा पुत्रवान, श्रीमंत

४) आषाढ : मितभाषी, विलासी, खर्चिक गुरुप्रिय, धनवान्, भोगी, परद्वेषी, कृपाळू

५) श्रावण : मित्रमैत्रिणीत प्रिय देव ब्राम्हण पूजेत रस असणारा ज्योतिषी

६) भाद्रपद : किरकोळ शरीरयष्टी, कल्पना विलासी, फिरणारा, स्वच्छंदी

७) आश्विन : दाता, लोकाश्रयी, सरकारी दरबारी मान, चंचल, स्वजनांचा द्वेषी

८) कार्तिक : धनाढ्य, कुरळे केस, शुर, पुष्ट, विशाल नेत्र

९) मार्गशीर्ष : सुशिल, आस्तिक, तीर्थयात्रेची आवड, देवपूजेत रमणारा, धार्मिक, पितृभक्त

१०) पौष : गुप्त चिता, वडिलांचे धन मिळत नाही, मंत्रज्ञ, गुणवान

११) माघ : बुद्धीवान, यंत्राची आवड, काळानुसार चालणारा

१२) फाल्गुन : कुशल, विलासी, चतुर, गायनपटू, परोपकार करणारा

पक्ष :

शुक्ल पक्ष : धनाढय, कृपाळु, धर्मरत, पुत्रपौत्रवान

कृष्ण पक्ष : शीलवान, प्रसन्न, चंचल, बंधूजनाशी वैर, मातृभक्त

तिथी :

शुक्ल पक्षात व कृष्ण पक्षात प्रत्येकी १५ तिथी असतात.

प्रतिपदा : रूपवान्, गुणवान, धनवान्, उद्योगी, पुण्यवान

द्वितीया : प्रसन्न व्यक्तीमत्व, दयाळू, कलाकार

तृतिया : भित्रा, धनवान्, अतिकामी

चतुर्थी : कृपण, जुगारी, कर्जबाजारी साहसी

पंचमी : कौटुंबिक सुख, राजदरबारी मान सन्मान

षष्ठी : बलवान, शुर, लांब पाय

सप्तमी : ज्ञानी, देवपूजेत रस, विशाल नेत्र, कफ प्रकृती

अष्टमी : दयाळू प्रतिष्ठित, कुटुंबावर प्रेम करणारा

नवमी : बंधूशी वैर, कठोर वचनी, आदर न मिळणारा, नामवंत

दशमी : विनयशील, दानी, देवपूजेत तत्पर

एकादशी : व्रत, दान, जप करणारा, तापट

द्वादशी : जन्मभूमी प्रेमी, दानी, राजाकडून सौख्य, पंडीत

त्रयोदशी : आजानबाहू, उंच, सुस्वरुप, लोभी

चतुर्दशी : शूर, कठोर, पराक्रमी, वाचाळ, रागीट

अमावस्या : पितृ-मातृभक्त, कठोर परिश्रमाने धनप्राप्ती

पौर्णिमा : धर्मशील, कुलवान, सौंदर्यवान

सात वार :

रविवार : क्रोधी, शुर, पित्त प्रकृती, मानी, श्रीमंत

सोमवार : चतुर, नाजुक आवाज, कफ तब्येत, चंचल, धार्मिक, प्रवासी

मंगळवार : धाडसी, संपत्तीवान, तमोगुणी, साहसी बलवान, शेती, यंत्राची आवड

बुधवार : चतुर, सुंदर, व्यापारी वृत्तीचा, एकवचनी, ज्योतिषी

गुरुवार : विद्वान, सर्वगुणसंपन्न, गोड बोलणारा

शुक्रवार : कुरळे, विपुल केस, शुभ्र रंगाची आवड यशप्रिय सौंदर्यवृत्ती,

शनिवार : वादविवाद प्रिय, परधन लुटणारा कृश शरीर, भांडखोर, चिरचिर करणारा, चिकाटीने काम करणारा.

काळ फळ :

पहाट : स्वधर्मप्रेमी, सत्कर्मे करणारा, सुखी, विचारवंत

सूर्योदय – समाधानी

माध्यान्ह : राजतुल्य, गुणवान

अपराण्ह : धनवान

संध्या : सुगंधप्रिय, स्त्रीलंपट, शौकीन

रात्र : खल, क्रूर कृत्ये करणारा, गुन्हेगार वृत्तीचा, साहसी

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)