Category: Uncategorized

रविची स्थानागत फळे


विषय : रविची स्थानागत फळे

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना

नमस्कार,

आज आपण रवीची स्थानागत फळे पाहणार आहोत.

प्रथम भाव : जन्मलग्नी रवि असेल तर जातक पित्त प्रकृतीचा, नेत्ररोगी, बुद्धिमान चारित्र्यवान, तीव्र जठराग्नीयुक्त, अल्पभाषी आणि प्रवासाची आवड असणारा’ आढळतो. जर रवि उच्च राशीचा मेष राशीचा असेल, तर जातक कीर्तिमान, शुभ व कारक ग्रहांनी दृष्ट असेल तर जातक प्रखर बुद्धीचा, पंडित असतो. नीच राशीचा -तुळेचा असेल, तर जातक विद्वानांशी वैर ठेवणारा, दरिद्री व तिरळा आढळतो; परंतु शुभ ग्रहाने दृष्ट असता, अशी अशुभ फळे मिळत नाहीत. स्वराशीचा किंवा सिंह नवांशाचा रवि लग्नी असेल,  तर जातक कोणत्या तरी प्रदेशाचा पुढारी बनू शकतो. कर्क राशीचा रवि लग्नी असेल, तर जातक ज्ञानी पंडित परंतु फोड, पुटकुळ्याने त्रासलेला असतो. कन्या राशीचा रवि लग्नी असेल तर जातक कन्या संतती अधिक असलेला, स्वीचिंतेने व्याकुळ व उपकारकर्त्याचा नाश करणारा असतो. मकर-रवि लग्नी असेल तर हृदय रोगी, कुंभ-रवि असेल तर जातक निर्धन, भाग्यहीन, स्वार्थी गूढ विद्येचा जाणकार असतो. मीन राशीचा रवि असेल तर जातक ज्वर-पीडित असतो.

द्वितीय भाव : धनस्थानी रवि असेल, तर असा जातक स्वतंत्र व्यवसाय करणारा आढळतो. नोकरी किंवा कोणाच्या आधीन राहून काम करणे त्याला आवडत नाही. कुटुंबीयांचा मृत्यू त्यांच्या डोळ्यांदेखत होण्याचा संभाव असतो. पिता-पुत्रात परस्पर सामंजस्य राहत नाही. शरीरात उष्णता, हात-पायाला घाम येणे, डोळ्यांत जळजळ, दृष्टी मंद होणे, उत्तमोत्तम भोजन करण्याची इच्छा होणे असे आढळते. मिथुन, तूळ, कुंभ राशीचा रवि धनस्थानी असेल, तर जातक स्वतः खूप पैसे मिळवतो. तो कंजूष असल्याने पैशाचा चांगला संग्रह करण्यात यशस्वी होतो. लोकांची सहानुभूती त्याला मिळत नाही. रवि हा कर्क, वृश्चिक, मीन राशीचा द्वितीय स्थानी असेल तर जातक उच्चाधिकारी बनतो. धनु राशीचा जातक स्वार्थी आढळतो. स्वतःला मोठे बनण्याची अपार इच्छा असते. जर वृश्चिक, धनु, मकर किंवा कुंभ लग्न असेल आणि रवि धनस्थानी असेल आणि धनभावाचा स्वामी धनेश, गुरू, शनि वक्री असून २, ४, ६, ८, १२ वे स्थानी असेल, तर जातका दारिद्य्र व उपासमारीची वेळ येऊ शकते.

तृतीय भाव : तृतीय स्थानी रवि असेल तर जातक बुद्धिमान आढळतो. त्यास लहान भावाचे सुख लाभत नाही. लहान भाऊ असला, तर त्याच्याशी पटत नाही. मोठ्या भावाचा मृत्यू होणे संभवते. तृतीय स्थानी रविबरोबर पापग्रह असेल, तर व्यक्तीचा स्वभाव हिंसक असतो. उच्चीचा रवि असेल तर व्यक्ती आळशी, गप्पीष्ट आणि कमकुवत विचारांची असते. मिथुन, तूळ, धनु, कुंभ या पुरुष राशींपैकी एका राशीत रवि असेल तर जातक शांत विवेकशील, पुढारी, बुद्धिमान, सामाजिक कार्यात भाग घेणारा असतो. सत्ता गाजविणारा, भावाभावांत वाटण्या गोडीत होतात. स्त्री राशी वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन यापैकी एक राशीतील रवि तृतीय स्थानी असेल तर वाटणीसाठी मारामाऱ्या, कोर्ट-कचेऱ्या व भांडणे होतात. कुंडलीत तृतीय स्थानी रवि असेल, तर अशा जातकाने भावाबरोबर राहू नये. अन्यथा दोघांचाही भाग्योदय होणार होण्यास कष्ट पडू शकतात.

चतुर्थ भाव : चतुर्थ भावात असलेला रवि बहुधा अनिष्ट फळे अधिक निर्माण करतो. भृगुसूत्रानुसार असा जातक हिनांग असतो. म्हणजे त्याच्या शरीरात कुठलातरी अवयव कमी असतो. तो अहंकारी व भांडकुदळ्या असतो. त्याच्या शरीरात कायम उष्णता असते. मन व्याकुळ, धनधान्याची कमतरता, त्याच्यामुळे पित्याच्या धनसंपत्तीचा, वास्तूचा नाश होतो. मंदबुद्धी, क्रूरपणा, परकीयांशी संबंध, पित्याशी वैर, अस्थिर विचारांचा व लोकांमध्ये अप्रिय असणे इत्यादी फळे रवि, वृषभ, कुंभ, सिंह, वृश्चिक राशीत असला तर दिसतात. चतुर्थेश बलवान असेल, स्वराशीत असेल, त्रिकोण किंवा केंद्रस्थानी असेल, तर वरील फळे मिळत नाहीत. उलट उच्च वाहन प्राप्त होऊ शकते. चतुर्थ भावात रविबरोबर शुभ ग्रह असेल, तर जातक लोकप्रिय व सर्वजन प्रिय असतो. तो युद्धकलेत पारंगत असतो व पुढे होऊन लढतो, पाठ दाखवत नाही. त्याला मृत्यू शांतपणे येतो. चतुर्थ भावात रवि असता जातक लहानपणी दुःखी, तरुणपणी सुखी व वृद्धावस्थेत पुन्हा दुःखी असतो.

पंचम भाव : रवि पंचम भावात असेल, तर जातक स्थूल, निर्धन, अल्प संपत्तीवान व संततिविहीन असतो. अशी फळे बहुधा मेष, सिंह, मिथुन, धनु, तूळ व कुंभ राशीत रवि असता मिळतात. कर्क, वृश्चिक व मीन या जल राशीत रवि असेल, तर संतती रुग्ण अवस्थेत जन्मान्याचा संभाव असतो. जर पंचम भावातील रवि, चंद्र, गुरू, शुक्र, दृष्टियुक्त, युक्तियुक्त असेल, तर संततीच्या जीवास धोका होण्याचा संभाव असतो.  रवि वृषभ, कन्या, मकर या पृथ्वीतत्त्वाच्या राशीचा पंचम भावात असेल, तर व्यक्ती दुष्ट बुद्धीची दुराचारी, क्रोधी, कुरूप असते. मिथुन, तूळ, कुंभ या वायुराशीत रवि असून तो पंचम भावात असेल तर जातक क्रोधी, मानसन्मानहीन, मूर्ख, नास्तिक व धार्मिक कार्यात विघ्ने आणणारा आढळतो. मेष, सिंह, धनु या अग्नितत्त्वाच्या रार्शीचा रवि पंचम भावात असेल, तर जातकाचे शिक्षण पूर्ण होते. जर हाच रवि उच्च असेल, तर संततीस धोका असतो. सिंहेचा रवि पंचम असेल, तर संततीस मृत्यूचा धोका असतो. अथवा माता-पित्याला खूप त्रास होतो. स्त्री राशीचा रवि पंचम भावात असेल तर जातक स्वार्थी आढळतो. पंचम भावात कोणत्याही राशीचा रवि असेल तर पुत्र कमी व मुली अधिक असतात.

षष्ठभाव : षष्ठभावात म्हणजे शत्रुस्थानी रवि असेल, तर जातकाला शत्रु फार असतात. याला विष, शास्त्र, संसर्ग रोग व व्यसनामुळे त्रास भोगावा लागतो. हाच रवि पाप प्रभावात असेल तर जातकाचे आरोग्य चांगले राहत नाही. दीर्घकालीन आजार भोगावे लागतात. वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या स्थिर राशींचा रवि षष्ठभावात असेल तर जातकाला गळ्याचे रोग, फोड- पुटकुळ्या, डिप्थिरिया, दमा व खोकला असे आजार होतात. रवि, कन्या राशीचा असेल तर क्षय होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. फुफ्फुसात कफ होतो, मेष-कर्क, तूळ, मकर या राशींचा रवि असेल तर संधिवात, पोटाचे रोग होतात. षष्ठभावातील रविबरोबर इतर शुभ ग्रह असेल तर जातक मंत्रशास्त्राचा जाणकार, सर्पाचे विष काढणारा असतो. मातुलपक्षाकडून फायदा मिळतो. नेहमी निरोगी व धन-संपत्तीने युक्त असतो.

सप्तम भाव : सप्तम भावात अग्नी राशीचा रवि असेल तर जातकाचे दोन विवाह होण्याची शक्यता असते. प्रथम विवाह विलंबाने होतो. जातक कोणाच्या आधीन कार्य करणे पसंत करीत नाही. स्वतंत्रपणे काही करण्याची इच्छा असते. वायुराशीचा रवि सप्तम असेल तर जातक शिक्षण विभागात मोठा अधिकारी बनतो. वृषभ, कन्या, मकर या राशींपैकी एखाद्या राशीतील रवि जातकाला यशस्वी व्यावसायिक बनवतो. निवडणूक लढवायला भाग पाडतो व जनपद किंवा विधानसभेत पद मिळवून देतो. जल राशीचा रवि सप्तम असेल तर जातक चिकित्सक किंवा विज्ञानवेत्ता बनतो. त्याची पत्नी प्रभावशालिनी, व्यवहारकुशल व संकटात पतीला साथ देणारी, धनप्रिया व दयाळू असते. मेष, सिंह, धनु व मीन राशींचा रवि सप्तम असेल तर जातकाला अपमान सहन करावा लागतो. वृषभ, कन्या, मकर, कर्क, वृश्चिक राशींचा रवि सप्तम असेल तर वयवर्षे ५० पर्यंत दुःखी व त्यानंतर सुखी होतो.

अष्टम भाव : अष्टम रविची बहुधा अशुभ फळेच मिळतात. याचे कारण अष्टम हे नाशस्थान आहे. अष्टम रवि पुत्रसुखात न्यूनता, पत्नी खर्चीक असणे, नेत्ररोग व डोकेदुखीसारखी फले देतो. वाईट फळे अग्नी राशीतील अष्टम रविच्या अनुभवास येतात. वायुराशीला ही फले कमी मिळतात. मिथुन, कर्क, मीन, धनु या राशींचा रवि अष्टम असेल, तर जातकाचा मृत्यु बेसावधपणणे होतो. मेष व सिंह राशीचा रवि अष्टम असता मृत्यु अचानक येतो. इतर रार्शीच्या रदिमुळे मृत्यू हा दीर्घकाळ रोगपीडा भोगल्यानंतर येतो. स्त्री राशीतील अष्टम रवि चांगली फले देतो

नवम भाव : नवम भावात असलेल्या रविची शुभ-अशुभ अशी संमिश्र फले मिळतात. महेश, धुंडिराज, वराहमिहिर या ज्योतिषाचार्यांनी नवम भावातील रविची शुभ फले सांगितलेली आहेत. नवम भाव शुभ आहे, हा त्यामागे तर्क असावा. नवम रवि जातकाला धार्मिक बनवतो; परंतु भाग्यवान नाही. पित्याशी वितुष्ट असते. हा रवि उच्चीचा किंवा स्वराशीचा असेल तर पिता दीर्घायु असतो. मिथुन, तूळ, कुंभ राशीचा रवि नवममध्ये असता जातकाची प्रगती लेखन, प्रकाशन, मुद्रण, अध्यापन या क्षेत्रांत होते. कर्क, वृश्चिक, मीन राशींचा रवि नवम असेल, तर जातक कविता म्हणणारा, नाट्यकलेत प्रवीण, नाट्यविद्येचा जाणकार असतो. हा रवि पृथ्वी तत्त्वाच्या राशीत नवम भावात असता जातक कृषीसंबंधित व्यापार करतो. अग्नी राशीतील रवि नवम असेल, तर जातक सैनिक किंवा इंजिनिअर बनतो. इतर राशींच्या जातकाला आपल्या बलाप्रमाणे ख्याती मिळवून देतो.

दशम भाव : दशम रवि जातकाला सुशिक्षित करून प्रसिद्धी देतो. दशम रवि, वृषभ, मिथुन, कन्या, मकर, मीन राशींचा असेल, तर जातक नोकरीत उच्च अधिकार प्राप्त करतो. इतर ग्रहस्थितीही या रविबरोबर बलवान असेल तर जातक राज्यपाल, मंत्री बनतो. वृश्चिक राशीचा रवि नवम असेल, तर जातक चिकित्साधिकारी बनतो. तूळ राशीत हा रवि असेल, तर जातक न्यायाधीशासारखे पद मिळवतो.  दशमभावस्य रवि मेष, कर्क, सिंह, धनु राशीचा असेल, तर जातक सेना, पोलीस, अबकारी, कस्टम इत्यादी विभागांत अधिकारी बनतो. जातक शेवटी धन, देह, पुत्रसुखाने वंचित राहतो.

एकादश भाव : एकादश भावात रवि असेल, तर जातकाला कसले तरी दुःख भोगावे लागते. संपत्ती, संतती यापैकी एक सुख जातकाला मिळते. दोन्ही सुखे तेव्हाच मिळतात, जेव्हा रवि जन्मकुंडलीत शुभ प्रभावात आणि बलवान असेल. नीचस्थ तूळ राशीतील रवि धनवान, प्रतिष्ठा व संततिसुख इत्यादी सर्व देतो. धनु राशीचा रवि जातकाला कायदेपंडित व न्यायाधीश बनवतो. कुंभ राशीत रवि असेल, तर जातक निर्धन असतो. पुरुष राशीचा रवि शुभ फले देतो.

द्वादश भाव : द्वादशम भावातील रविची अशुभ फले मिळतात. हे सर्व प्राचीन महर्षीनी एकमताने प्रतिपादन केलेले आहे. द्वादश भाव हे दुस्थान आहे. द्वादश स्थानी रवि असेल तर जातक आपल्या  पित्याशी शत्रुत्व ठेवतो. नेत्ररोग, धन व संततिहीन असतो. पत्नी पथभ्रष्ट असणे, पती-पत्नी स्त्रीगामी- परपुरुष असणे, हेही एक कारण यामागे आहे. जलराशीचा रवि जातकाला खर्चीक बनवतो. त्यामुळे धनभाव समाजात प्रतिष्ठा मिळते. पृथ्वी राशीचा रवि असेल, तर जातक आदर्शवादी असतो. तो हसत संकटांना सामोरा जातो. अग्नी राशीचा रवि जातकाला अभिमानी, दुराचारी, अपराधी व कंजूष बनवतो.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११६८)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११६७)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११६६)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११६५)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

भूत बाधा व दृष्टी बाधा विचार


विषय : भूत बाधा व दृष्टी बाधा विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : संतान दीपिका, प्रश्न कुंडली विचार

नमस्कार,

हे सारे विश्वच समतोल तत्वावर आधारलेले आहे. ऊन तिथे सावली, दिवस तिथे रात्र, प्रकाश तिथे अंधार, आनंद तिथे दु:ख, यश तिथे अपयश, आशीर्वाद तिथे शाप, देव तिथे दानव, सदिच्छा तिथे क्रूर इच्छा, वासना, दैवी तिथे अमानवी गोष्टी या येणारच, भूत बाधा, दृष्ट, पछाडने ई. त्याचाच परिपाक.  

ज्योतिष मार्गदर्शन करताना अनेक जातक असे प्रश्न घेऊन येतात की, कोणीतरी कारणी केली आहे, भूत बाधा झाली आहे, दृष्ट लागली आहे यावर काही उपाय आहे का. खर्र तर हा एक खूप मोठा तांत्रिक विषय आहे, तरी या विषयासंदर्भात काही साधारण माहिती व कुंडलीत आढळून येणारे काही या संदर्भातील कुयोग यांची थोडक्यात माहिती देत आहे.

बाधा, झपाटणे, अंगात येणे, बळी घेणे, अनैसर्गिक संभोग इच्छा असे विविध प्रकारे मानवजातीला त्रास देणाऱ्या ग्रहांची संख्या २७ आहे. या वाईट शक्ती वा देवतांना शक्तींना ग्रह असे म्हणतात. दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करताना भगवान रुद्राच्या कोपामुळे येथे सांगितलेले ग्रह आणि इतर अनेक लघु ग्रह निर्माण झाले.

या २७ त्या ग्रहांची १८ महाकष्टे आणि ९ लघु ग्रह अशी विभागणी केलेली आहे.

१८ महाग्रह या प्रमाणे आहेत :

१) अमर (देव)

२) असुर

३) नागा

४) यक्ष

५) गंधर्व

६) राक्षस

७) हेद्रक

८) चाल (कश्मल)

९) नष्टेज

१०) भस्मक

११) पितर

१२) कृष

१३) विनायक

१४) प्रलाप

१५) पिशाच

१६) अंत्यज

१७) योनिज

१८) भूत

९ लघु ग्रह या प्रमाणे आहेत :

१) अपस्मार

२) द्विज

३) ब्रह्मराक्षस

४) अवनिभुक

५) वैश्य

६) वृषाल

७) नीच

८) चांडाल

९) व्यंतर

सर्व ग्रह ३ प्रकारचे मानले जातात –

१) ज्यांना बळीची इच्छा आहे : काही ग्रह किंवा देव जे यज्ञ किंवा पूजा साहित्य व बळी याचे भोग इच्छितात ते या प्रकारात येतात. ज्यांना बळीचा उपभोग घ्यायचा आहे, ते उपभोग घेतल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून जातात.

२) ज्यांना रमणची इच्छा आहे : काही ग्रह किंवा देव ज्यांना पुरुष किंवा स्त्रीला वश करायचे आहे व भोगाच्या इच्छेने ते बाधा करतात, या प्रकारात येतात. ज्या ग्रह देवतांना रमण ची इच्छा आहे, ते शंभर वेळा उपभोग घेतला, तरीही त्या व्यक्तीचा पिच्छा सोडत नाहीत.

३) ज्यांना मारण्याची इच्छा आहे. : काही देव किंवा ग्रह ज्यांना मारण्याची इच्छा ठेवून ते बाधा करतात. ते या प्रकारात येतात. ज्या ग्रहांना मारण्याची इच्छा असते ते ग्रह माणसाला  मारल्याशिवाय रहात नाहीत.

अशाप्रकारे हे सर्व ग्रह सौम्य स्वभाव आणि क्रूर स्वभावाच्या भेदाने २ प्रकारचे आहेत. ग्रह आणि त्यांची स्थिती यांच्यातील फरकावरून हे फरक जाणून घेतले पाहिजेत.

सार संग्रह ग्रंथ असे विषद करतो, की सूर्याचे रुद्रगण म्हणजेच भगवान शिवाचे गण, उग्रदेव म्हणजेच भूत, इत्यादी आणि नागराज, चंद्राचे किन्नर, यक्ष इत्यादी ग्रह, नाग मंगळाचे, देव, दानव ग्रह, भूत आणि भैरव बुध आणि बृहस्पतिच्या गणेशाच्या पोटमाळ्यात राहणारे किन्नर हे देव, देवी, शुभ सर्प ई. विविध ग्रह आहेत.

शनीचे यक्षिणी, मातृका गण आणि सर्प नावाचे अशुभ ग्रह, शुक्राचे भस्मक, रुक्ष, पिशाच, चाल आणि नष्टेज नावाचे अशुभ ग्रह, राहूचे साप, पिशाच, नाग इत्यादि आणि केतूचे भूत आहेत असे म्हटले जाते.

संतान दीपिका ग्रंथामध्ये असे म्हटले आहे-

अशुभ स्थानी स्थित सूर्य व इतर ग्रह व इतर पूरक ग्रहस्थितीमुळे हे ग्रह कुप्रभाव किंवा रोगांमुळे सर्व जीवांना दुःख देतात. 

१) सूर्य बाधक स्थानात असल्यास शिव, गण, भूत इत्यादींच्या क्रोधाने रोग होतात.

२)चंद्र बाधक स्थानात असल्यास दुर्गेचा क्रोध किंवा धर्मदेवाच्या क्रोधामुळे हा रोग होतो.

३) मंगळ बाधक स्थानात असेल तर स्कंध, भैरवा इत्यादींच्या प्रकोपामुळे वेदना होतात.

४) बुध बाधक स्थानात असेल तर गंधर्व, यक्ष इत्यादी प्रतलात वास करणाऱ्या ग्रहांच्या प्रकोपामुळे रोग होतात.

५) गुरु बाधक स्थानात असल्यास ब्राह्मणाच्या शापाने व देवांच्या कोपाने दुःख होते.

६) शुक्र बाधक स्थानात असल्यास यक्षांच्या क्रोधामुळे रोग आणि ब्रह्मराक्षसामुळे वेदना होतात.

७) शनि बाधक स्थानात असेल तर भूतांचा अधिपती भगवान शंकराचा कोप होतो.

८) राहु बाधक स्थानात असेल तर सापाच्या क्रोधामुळे रोग होतो

९)) केतू बाधक स्थानात असल्यास चांडाळ इत्यादी देवांच्या कोपामुळे रोग होतो.

१०) जन्मस्थानी गुलिक किंवा मांदी बाधक स्थानात असल्यास भूतकोपामुळे हा रोग होतो

बाधा आणणारी स्थाने आणि राशि :

१) लग्नी चर राशी असेल, तर ११ वे स्थानी असलेली राशी बाधक आहे.

२) लग्नी स्थिर राशी असेल, तर ९ वे स्थानी असलेली राशी बाधक आहे.

३) लग्नी द्विस्वभाव राशी असेल, तर ७ वे स्थानी असलेली राशी बाधक आहे.

दृष्टी बाधा योग :

१) बाधक स्थानाचा स्वामी जर लग्ना स्थानी किंवा लाग्नेशाकडे पूर्ण दृष्टीने पाहत असेल, तर त्या वेळी दृष्य बाधा होते. येथे, बाधकेशची त्रिदश, त्रिकोण आणि चतुर्भुज दृष्टी म्हणजे शनि, गुरू आणि मंगळ यांची पूर्ण दृष्टी अनुक्रमे ३, १०, ५, ९ आणि ४, ८ स्थानांवर पडणे दृष्टी बाधा निर्माण करते.

२) जर सप्तम स्थानाचा स्वामी बाधक स्थानी स्थित असेल किंवा सप्तमेश आणि बाधकेश यांच्यात परस्पर संयोग किंवा दृष्टी संबंध असेल, तर दृष्य बाधा होते.

जर सप्तमस्थानात लग्नेश आणि मंगळ असेल आणि लग्ना स्थानी अशुभ ग्रह असेल, तर दृष्टिदोष संबंधी आजार होतात.

३) अशुभ ग्रह चढ्या भावात, शनि सातव्या भावात आणि चंद्र अशुभ ग्रहांनी स्थित असतील, तर पिशाच्च दिसल्याने रोग होतात.

४) बाधक स्थानात स्थित ग्रह शुक्र राशीत स्थित असेल किंवा शुक्रापासून गोचर असेल तर पती-पत्नीच्या मिलनात दृष्ट लावल्याने क्लेश, बाधा येतात. 

बाधा देणारी स्थळे :

बाधा निर्माण करणारा विशिष्ट प्रदेश किंवा स्थान बाधा स्थानावर असलेल्या राशीवरून ठरवावे. हे ग्रह त्या त्या ठिकाणी आपल्या असुरी इच्छा पूर्ण होण्यासाठी सावज हेरायला दबा धरून बसलेले असतात.  

१) मेष : सोने, चांदी, जस्त इत्यादी धातू व रत्ने मिळविण्याची ठिकाणे, लहान कालवे असलेली जमीन, सापाची घरटी आणि पूर्वेकडील देश ही मेष राशीची स्थाने आहेत.

२) वृषभ : शेतकऱ्यांची शेतं, बागा आणि आनंददायी जमिनीची ठिकाणे ओळखली पाहिजेत.

३) मिथुन : बागा, मंदिरे, रत्नजडित जमीन आणि सुंदर ठिकाणे ही मिथुन राशीची ठिकाणे आहेत.

४) कर्क : अप्सरांचे निवासस्थान, सुंदर तलाव आणि पाण्याजवळचे क्षेत्र कर्क राशीची ठिकाणे माहीत असावीत.

५) सिंह : पर्वत शिखरे, गोठा, शेते, देवाची मंदिरे आणि ब्राह्मणांची निवासस्थाने ही सिंह राशीची ठिकाणे आहेत.

६) कन्या राशीची मंदिरे, घोड्यांचे शेड, हत्ती राहत असलेली ठिकाणे आणि समुद्राजवळची ठिकाणे जाणून घ्यावीत.

७) तूळ : रस्त्यावरील बाजार आणि जंगलात,

८) वृश्चिक : तलाव, बाग, छावणी आणि रणांगणात वास्तव्य आहे असे म्हटले जाते

९) धनु : किल्ल्याच्या तटबंदीत राहते असे म्हटले जाते.

१०) मकर व कुंभ : नद्यांची मुखे, जंगले आणि निषादांची राहण्याची ठिकाणे, भिल्लांची वस्ती इत्यादी मकर राशीची आहेत आणि तीच ठिकाणे कुंभ राशीची आहेत असे म्हणतात.

११) मीन : तलाव, तलाव, जलाशय आणि देव मंदिरांमध्ये राहतात.

अशा प्रकारे पुवार्चारी ऋषींनी मेषादि राशींचे निवासस्थान मानले आहे. जन्मकुंडलीत बाधा दिसत असेल, तर संबंधित ठिकाणी जाणे टाळणे हितावह असेल.

विशेष सूचना : येथे या विषयाची थोडक्यात माहिती दिली आहे. हा विषय खूप विस्तृत व सखोल अभ्यासाचा व अनुभवाचा आहे. दिलेल्या लक्षणांव्यतिरिक्त अनेक गोष्टी व पीडित जातकाचे वागणे त्याचेत दिसणारी लक्षणे या सर्वाचा सारासार विचार करावा लागतो. तेव्हा अर्धवट समज करून घेऊन कोणाला पीडित ठरवू नये अथवा उपाय करू नयेत. काही अशा प्रकारची शंका येत असल्यास जाणकार व अधिकारी व्यक्तीच्या सल्ल्यानेच निष्कर्षावर यावे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

रेवती नक्षत्र विचार


विषय : रेवती नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण रेवती नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

रेवती नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील २७ वे नक्षत्र असून इंग्रजीत या नक्षत्राला ‘म्युपिशियम’ किंवा ‘झीटापेशियम’ म्हणतात. रेवती नक्षत्रामध्ये एकूण ३२ तारे असून ते अतिशय मंद व फिक्कट आहेत. आकृती मृदुंगासारखी आहे. रेवती नक्षत्राच्या आजूबाजूला जरा प्रखर व तेजस्वी तारे असल्याने उदा. उत्तरेला देवयानी, दक्षिणेला जटायू, पूर्वेला आश्विनी म्हणून या प्रखर ताऱ्यांपुढे ही फिक्कट वाटते. तारे पांढऱ्या रंगाचे असून हे नक्षत्र सत्त्वगुणी व सौम्य आहे.

रेवती नक्षत्राचे ४ ही चरण मीन राशीत येत असल्यामुळे हे नक्षत्र चतुष्पाद आहे. याच्या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनी, शनी व गुरु यांचे अधिपत्य आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध, राशीस्वामी गुरु व दैवत ‘पूषा’ नावाची देवता (जल) आहे. त्यामुळे रेवती नक्षत्रात बुधाची बुद्धीमत्ता, गुरुची भूतदया, उदारपणा, मानवता व पूषा देवतेचा थंड व शीतलपणा यांचा मिलाफ आढळतो. तसेच हे नक्षत्र तिर्यङ्क मुख, मृदु, मैत्रगणी व अंधलोचनी आहे. रेवती हे नक्षत्र नक्षत्र गंडातर तारा योगातील आहे. कारण या ठिकाणी सर्व १२ राशी व २७ नक्षत्रे संपतात.

हे नक्षत्र शुभ व देवगणी असल्याने अतिशय शुभ व सत्वगुणधर्मी आहे. तसेच ते थोडे नशिबवान व ऐश्वर्य भोगणारे आहे.

रेवती नक्षत्री जन्मणारे जातक सत्यप्रिय, शीतल, बुद्धीमान, विद्वान, चतुर पंडित, सत्कर्मी, न्यायी, परोपकारी, दयाळू धार्मिक, सदाचारी व कायदयाची जाण असणारे व पालन करणारे आढळतात. देवधर्माला भिऊन वागणारे, दुसऱ्याशी जुळवून घेऊन सामोपचाराने वागणारे असतात. हे नक्षत्र शुभ गुण व ऐश्वर्य देणारे असले, तरी दुसर्याचे सहाय्याने प्रगती करतात. या नक्षत्रामध्ये सौंदर्य, बुद्धी व धन यांचा सुंदर मिलाप झालेला दिसतो. शारीरिकदृष्ट्या मात्र हे नक्षत्र जरा अशक्त आहे.

रेवती नक्षत्र जातक पुरुषांना हे नक्षत्र साधारण आहे. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुषांचा बांधा मध्यम, उंच, जरासा ठेंगू पण आडवा, अवयव गोलाकार, फुगीर, चेहरा जरा नाजूक पण सुंदर, शरीरात रक्त व मांस बरे पण हाडापेराने साधारण. जीवन ऊर्जा व रोग प्रतिकारक शक्ती कमी. नाजूक, स्वभाव शांत, आनंदी, ममताळू, दयाळू, भावनाशील, विकारवश व भिडस्त असतो, मात्र सत्वगुणी व सदाचारी असतात. थोडा  सुस्तपणा आढळतो. आहे यात समाधान, मानण्याची प्रवृत्ती असते. थोडे घरकोंबडे असतात. चैन, मजा, विलास, छानछोकीपणा यांची बरीच आवड असते. बुद्धीमत्ता पण बरी असते. पण विद्येसाठी फारसे परिश्रम घेण्याची तयारी नसते. म्हणून शिक्षणाला मध्यम.

रेवती नक्षत्र जातक स्त्रियांना हे नक्षत्र शुभ व अनुकूल आहे. सौंदर्य, बुद्धी, वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने उत्तमच आहे. कारण स्त्रियांना लागणारे विनयशीलपणा, लज्जा, वात्सल्य, प्रणयलीला, संसाराची आसक्ती, संगोपणाची आवड, परावलंबीत्व, माया, लाजाळूपणा, हळूवारवृत्ती हे सर्व गुणधर्म या नक्षत्रात आहेत. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रियांचा बांधा मध्यम, आडवा, थोडा भरलेला, गोलाकार, मांसल पण वातूळ शरीर, त्वचा नितळ व मृदू असते. कपाळ भव्य व चेहरा गोल असतो. बांधेसूदपणा कमी असतो. चेहरा सुंदर, आनंदी, गोड व नाजूक भासतो. रेवतींच्या स्त्रीचे सौंदर्य तिच्या शांत व प्रसत्र चेहऱ्यात आहे. त्या हौशी, रसिक, आनंदी व कलाप्रिय असल्या तरी कलावंत नाहीत. नृत्य करण्यापेक्षा, संगीत वाजवण्यापेक्षा किंवा गाणे गाण्यापेक्षा या सर्व गोष्टी पाहण्यात व ऐकण्यातच तिला मजा वाटते व आरामप्रिय असतात. झोप, वाहनसौख्य फार प्रिय असते. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा अथवा सुबकपणा साधारण असतो. फारशा फॅशनेबल नसल्या, तरी वागण्यात व पोषाखात नाविन्य आढळते. भिडस्त व भावनाप्रधान व विकारवश होतात व बऱ्याचेळा फसल्या जातात. बुद्धी साधारण असते, फार किचकट विषयापेक्षा साधे, सरळ, सोपे विषय घेऊन त्या शिक्षण पूर्ण करतात. मनावर विचारांचा पगडा जास्त असतो. घरकाम व संसाराची आवड असली तरी त्यांच्या हातून हे काम कमीच होते. चित्रपट, टी.व्ही., नाटके, वाहन यांची फार आवड असते. मात्र उदासही लवकर होतात.

रेवती नक्षत्राखाली येणारा वर्ग हा जास्त करून समाजातील सुशिक्षित पण जरा सुखवस्तु व बुद्धीवान असतो. फार गरीब तसेच फार श्रीमंत वर्ग याखाली येत नाही. या नक्षत्राखाली येणारा वर्ग बँका, सरकारी वर्ग, रेल्वे, पोर्टट्रस्ट, विमा कंपनी, प्रवासी कंपन्या, खाजगी औद्योगिक क्षेत्रातील बुद्धीचे काम करणारा वर्ग, फिरते एजंट, दलाल, विक्रेते, सेल्स टॅक्स व इन्कमटॅक्स कन्सल्टंट, खेड्यातील बाग-बगीचे किंवा मळेवाले अथवा लहान प्रमाणात हिरे, माणके, मोती, अलंकार, उंची वस्त्र, अत्तरे, सुवासिक पदार्थ, शीतपेय विक्रेते, फळे, भाजीपाला, दूध विक्रेते, एअर होस्टेस, ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या स्त्रिया, तसेच हे नक्षत्र कायद्याला फार चांगले असल्याचे वकील, बॅरिस्टर्स, न्यायाधीश हा वर्ग याखाली जास्त येतो. शारीरिक व अंगमेहनतीची कामे करणारा व अंमलबजावणी खात्यातील वर्ग कमी आढळतो.

रेवती नक्षत्री रवी शरीर प्रकृतीच्या दृष्टीने मध्यम. धन व प्रतिष्ठेच्या दृष्टीने बरा. जातक विद्वान, देशभक्त, सज्जन व खर्चिक असतो.

रेवती नक्षत्री चंद्र असणे फारच चांगले. तो सौंदर्य, धन व सुखाच्या दृष्टीने उत्तम. बांधा भरलेला, पुष्ट, मांसल, गरगरीत असतो. चेहरा सुंदर, आकर्षक व गोल असतो. फार हौशी, चैनी विलासी व आनंदी असतात. धन व सुख भरपूर मिळते. जरा भावनाप्रधान व विकारवश पण आनंदी असतो.

रेवती नक्षत्री मंगळ साधारण असतो. स्त्रीत्व थोडे कमी प्रतीचे असते. बांधा आडवा व फोफसा असतो. जरा उतावळा व उदास असतो. धन व बुद्धीला कमीच.

रेवती नक्षत्री बुध स्वत:चे नक्षत्र असल्याने बरे असते. बुद्धीला ठीक, पण शरीर थोडे अप्रमाणबद्ध,  जरा वातुळ पण बुद्धीवान, धनवान, लेखक, वक्ता, ग्रंथकार, भाषांतर करणारा व कायदे जाणणारा विलासी व ऐश्वर्य भोगणारा असतो.

रेवती नक्षत्री गुरू शरीर, बुद्धी व धन अशा सर्व दृष्टीने उत्तम आढळतो. गुरु असता शरीर पुष्ट, मांसल, भरलेले, भरदस्त, कपाळ विशाल, चेहरा भव्य पण सुंदर व सात्विक असतो. उतार वयात टक्कल पडते. स्वभावाने शांत व आनंदी व भोगी वृत्तीचा असतो. बराच बुद्धीमान असतो. कायदेशास्त्र, भाषा, व्याकरण, जमाखर्च तसेच वकिली व न्यायाधीश यांना चांगला. थोडासा विलासी व रंगेलपणा असतो. बराच श्रीमंत व सुखवस्तू असतो.

रेवती नक्षत्री शुक्र फारच अनुकूल व भाग्याचे लक्षण आहे. सुंदर शरीर, धन, ऐश्वर्य व भोग मिळतात. शरीर भरलेले, पुष्ट, मांसल व गुबगुबीत असून त्वचा साबणासारखी (लक्स) नितळ असते. गाल फुगीर व चेहरा भव्य असतो. डोळे काळेभोर व पाणीदार असतात. चेहऱ्यावर सौंदर्य व उंची तेज, श्रीमंती तेज दिसते. मात्र शरीराला सुडौलपणा व आकार कमी असून त्या उतारवयात अंगाने सुटलेल्या व बेढब दिसतात. त्या बऱ्याच चैनी, विलासी, ख्याली खुशालीत दंग असलेल्या व सुस्त, आळशी असतात. उंची राहणीची आवड असते. मात्र बहुधा या व्यक्ती श्रीमंत व सुबत्तावान असतात. बुद्धी व कला यांना मात्र तो जरा कमी असतो.

रेवती नक्षत्री शनी हा शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम, पण बुद्धीला बरा. विशेषतः कायदेशास्त्र, पंडित, वकील, बॅरिस्टर यांना चांगला. घनही बरे देतो.

रेवती नक्षत्री राहू फारसा साधारण असतो. बेढब बांधा, जरा रोगी, अशक्त व बुद्धी आणि धनाला कमी.

रेवती नक्षत्री केतु शरीर प्रकृतीला खराब, गॅसेस फार होतात. बांधा बेढब तर धार्मिक, दैविक, आध्यात्मिक व पारमार्थिक विधेला बरा.

रेवती नक्षत्र हर्षलला मध्यम. शरीर मध्यम उंच व आडवे असते. बुद्धी बरी पण प्रेम, प्रणय, शृंगारिकपणा, विलास याकडे जास्त लक्ष असते. धन व कला कमी.

रेवती नक्षत्र नेपच्यूनला चांगले आढळते, बांधा मध्यम उंच व जरा भरलेला पुष्ट. चेहऱ्यावर सात्विक तेज असून तो भव्य व प्रसन्न असतो. तो अंतःस्फूर्ती, ध्यानधारणा, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणण्याची शक्ती, संगीत, तंतुवाद्य, थिऑसॉफी, भाषण यांना चांगला. लोकांना मोहित करण्याचे सामर्थ्य असते.

रेवती नक्षत्रावर होणारे आजार फारसे क्रूर किंवा दाहक नसले, तरी मोठे व बराच काळ रेंगाळणारे असतात. यांना बारीक बारीक व किरकिऱ्या रोगांनीही बराच त्रास होतो. शीताधिक्याचे आजार फार होतात. विशेषतः अतिशय थंडी, मुरणारी सर्दी, नाक वाहणे, कफ, थंडी ताप, जलोदर, साथीजन्य कावीळ, जलत्वाचे असल्याचे साथीचे जंतू लवकर पकडते. तसेच चंद्र शनी युनी असता मुडदूस (रिकेटस्) आकडी वगैरे येणे, पोट साफ नसणे, आतड्याचे विकार, शौचाच्या तक्रारी, मंगळ असता रक्तन्यूनता, रक्तदोष, रक्ताचा कॅन्सर तसेच गुरु असता वाताधिक्य, मधुमेह, चरबी साठणे. चंद्र – शनी युती असता दमा, कफ, क्षय, पायाचे विकार, पायाला चिखल्या होणे, हत्तीपाय असे विकार जास्त होतात. पंगूपणा व पक्षघाताची भीती असते. तसेच या व्यक्ती जरा मलीन, अस्वच्छ व आळशीही असल्याने पचन होत नाही व साथीजन्य विकार होतात. यांनी नेहमी स्वच्छ राहून नियमित थोडा व्यायाम घ्यावा. हे गंडातर तारा योगातले नक्षत्र असल्याने सामुदायिक अपघाताचाही संभव असतो.

रेवती नक्षत्री या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींचे हस्ताक्षर मोठे, टपोरे, गोल व सुंदर असते. व, ब, क, ग, न अशा पोकळी बरोबर गोल असतात. नक्षत्र अंधलोचनी असल्याचे या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती पूर्व दिशेला सापडू शकते. गुरुचा पुष्कराज किंवा शुक्राचा हिरा लाभदायक ठरतो, या नक्षत्रावर ५ किंवा ६ या अंकाचे वर्चस्व वाढते.

मुहूर्तशास्त्रात रेवती नक्षत्र शुभकार्याला फार चांगले आहे. मौंजी, विवाह, चौल करणे, नवीन वस्त्र किंवा अलंकार धारण करणे, गायनारंभ, नाक कान टोचणे अन्नप्राशन, जमीन नांगरणे, प्रयाण, प्रथम स्त्रीसंग, गलबत पाण्यात सोडणे, जनावरे घेणे, औषध घेणे, औषधी वृक्ष लावणे, बी पेरणे, नृत्यारंभ, राज्याभिषेक, राजदर्शन, पुंसवन, मंचकारोहण, घर बांधणे, पाया घालणे यांना फार चांगले.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)