Category: Uncategorized

!! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११९४)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११९३)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष शास्त्रातील करण विचार


विषय : ज्योतिष शास्त्रातील करण विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : सुलभ ज्योतिष शास्त्र व मुहूर्त चिंतामणी

नमस्कार,

आज आपण ज्योतिष शास्त्रातील करण या संज्ञेविषयी माहिती घेणार आहोत.

चंद्र आणि सूर्याच्या अंशांमधील फरकाला ६ ने भागून येणाऱ्या संख्येला करण असे म्हणतात. दुसऱ्या शब्दांत, चंद्राला सूर्याच्या पुढे ६ अंश जाण्यास म्हणजेच अर्धी तिथी पार करण्यास जो वेळ लागतो, त्याला करण असे म्हणतात. प्रत्येक तिथीमध्ये दोन करण असतात. म्हणजेच ३० तिथींमध्ये एकूण ६० करण असतात.

करणांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१) बव

२) बालव

३) कौलव

४) तैतील

५) तैतिल

६) गर

७) वाणिज

८) व्यष्टी (भद्रा)

९) शकुनी

१०) चतुष्पाद

११) नाग

१२) किंस्तुघ्न

सोबतच्या कोष्टकात दाखवल्याप्रमाणे किंस्तुघ्नापासून मोजणी सुरू करून, पहिली ७ करणे क्रमाने ८ वेळा पुनरावृत्ती केली जातात. शेवटचे ४ करण स्थिर प्रकृतीचे आहेत. स्थिर करण प्रत्येक चंद्र महिन्यात फक्त एकदाच घडते तर चर करण प्रत्येक चंद्र महिन्यात आठ वेळा येतात. म्हणजेच ५६ चर व ४ स्थित करण आहेत. प्रत्येक करणाचा स्वामी आहे. बव करण चा स्वामी इंद्र, बालवचा ब्रह्म, कौलवचा सूर्य, तैतिलचाही सूर्य, गरचा पृथ्वी, वाणिज चा लक्ष्मी, व्यष्टीचा यम, शकुनीचा कलियुग, चतुष्पदाचा रुद्र, नागाचा सर्प आणि किंस्तुघ्नाचा स्वामी वायू असे करणांचे स्वामी आहेत.

कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या उत्तरार्धापासून अमावस्या आणि शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या पूर्वार्धापर्यंत ४ ही स्थिर करण अपरिवर्तित राहतात, म्हणून त्यांना स्थिर करण म्हणतात. यामध्ये व्यष्टीकरणालाच भद्रा असे हि नाव आहे. ज्योतिष शास्त्रानुसार दैवत यम असल्याने भद्रामध्ये शुभ कार्य वर्ज्य आहेत. परंतु हत्या, बंधन, विषाचा वापर, संभोग आणि अग्नी जाळणे हे भद्रामध्ये सांगितले आहे. विष्टी करण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीयेच्या उत्तरार्धात, सप्तमीच्या पूर्वार्धात, दशमीच्या उत्तरार्धात आणि चतुर्दशीच्या पूर्वार्धात राहते, त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या उत्तरार्धात, पूर्वार्धात. अष्टमीचा, एकादशीचा दुसरा अर्धा आणि पौर्णिमेचा पूर्वार्ध मध्ये येते.

भद्राचा चेहरा आणि शेपूट देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीच्या पाचव्या प्रहराच्या प्रारंभाच्या पाच घटीमध्ये भद्राचे मुख दिसते. तसेच अष्टमीच्या दुसऱ्या प्रहरात एकादशीच्या आठव्या प्रहरात, पौर्णिमेच्या चौथ्या प्रहरात आणि कृष्ण पक्षाच्या तृतीयेच्या आठव्या प्रहरात, सप्तमीच्या तिसऱ्या प्रहरात, दशमीच्या सहाव्या प्रहरात आणि पहिल्या प्रहरात. चतुर्दशीचा टप्पा, भाद्रच्या पहिल्या पाच घटीत एक मुख आहे. शुभ कार्यासाठी ते त्याज समजले आहे.

शुक्लपक्षातील चतुर्थी तिथीचा आठवा प्रहर, अष्टमीचा पहिला प्रहर, एकादशीचा सहावा प्रहर, पौर्णिमेचा तिसरा प्रहर आणि कृष्ण पक्षातील तृतीयेचा सातवा प्रहर, सप्तमीचा दुसरा प्रहर, दशमी आणि चतुर्दशीचा पाचवा प्रहर. शेवटच्या तीन घटींमध्ये भद्राच्या चौथ्या प्रहरमध्ये एक शेपूट आहे जी शुभ मानली जाते.

करणात कर्म करण्याचे नियम :

बव : पुष्टीकरणासाठी केलेली कर्मे,

बालव : वास्तू, गृहपालन, निधिस्थापना इत्यादी शुभ व स्थिर कर्मे, ब्राह्मणांना लाभदायक कर्मे,

कौलव : स्त्री आणि सज्जन संबंधित कर्मे

तैतील : सज्जनांची कर्मे. सेवा, शाही सेवा ई.  

गर : जमीन, शेतीसंबंधी कामे, बी बियाणे पेरणे, व्यवसायात खरेदी-विक्री ई.

विष्टी करण (भद्रा) : दुष्ट चोरांना मारणे आणि बांधणे ई. हिंसक कृत्ये

शकुनी : मंत्र, साधने, औषधी ई.

चतुष्पाद : गाय आणि ब्राह्मण यांची पूजा, पितरांचे श्राद्ध ई.

नाग : स्थिर कर्म, भूतादि साधन

किंस्तुघ्न : चित्रे काढणे, नृत्य करणे, गाणे ई.

पंचांगात करण व त्याचे वेळेविषयी माहिती दिलेली असते. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११९२)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११९१)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११९०)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

गुरूची स्थानागत फळे


विषय : गुरूची स्थानागत फळे

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना 

नमस्कार,

आज आपण गुरूची स्थानागत फळे पाहणार आहोत.

प्रथम स्थान : प्रथम स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक दीर्घायु, कार्यतत्पर, विद्वान, ज्योतिषी, स्पष्टवक्ता, स्वाभिमानी, धनवान, पुत्रवान, कीर्तिवान, राजमान्य, भोगी व दयाळू आढळतो.

द्वितीय स्थान : द्वितीय स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक सुंदर शरीराचा, धनवान भाग्यवान, पुण्यवान, रत्नांचा व्यापारी, दीर्घायू, भाग्योदायी, काव्यप्रेमी आढळतो.

तृतीय स्थान : तृतीय स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक जितेंद्रिय, कृपण, भोगी, प्रवासी, स्त्री वर्गात प्रिय, वाहनसुख भोगणारा, शास्त्रज्ञ किंवा लेखक आढळतो.

चतुर्थ स्थान : सुख स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक भोगी, अतिसुंदर, अल्प संतती, यशवान, लाभ, मोठा विद्वान ज्योतिषी, शत्रूकडून मान मिळवणारा व पितृभक्त गृहस्थ आढळतो.

पंचम स्थान : सुत स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक आस्तिक, ज्योतिषी, लोकप्रिय, कुलश्रेष्ठ, संततीयुक्त, साहित्यिक, विद्वान व सुखी आढळतो.

षष्ठस्थान : षष्ठ स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक हास्यविनोद प्रिय, नोकर-चाकर बाळगणारा, शत्रुंजय, गोड बोलणारा, आळशी, विवेकशील, शांत व गृहस्थी आढळतो.

सप्तम स्थान : सप्तम स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक देखणा, विद्वान वक्ता, धार्मिक, दयाळू, थोरामोठ्यांच्या ओळखी असलेला, कर्तव्यदक्ष, स्त्री प्रिय, उदार स्वभावाची पत्नी असणारा आढळतो.

अष्टम स्थान : अष्टम स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक गूढ विषयात पारंगत, चिताक्रांत, चंचल, लोभी, धननाश करणारा, पोटदुखी व गुप्तरोगाने त्रस्त, तीर्थयात्री आढळतो.

नवम स्थान : भाग्य स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक यशस्वी, रूढिवादी, दयाळू, परोपकारी, तीर्थयात्री, भाग्यवान, पुत्रवान, विनम्र, ज्योतिषी व श्रीमंत आढळतो.

दशम स्थान : कर्म स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक सत्कार्य करणारा, सदाचारी, धार्मिक संस्था प्रमुख, न्यायप्रिय, प्रसन्नचित्त भावाकडून लाभ मिळवणारा, लेखक, प्रकाशक, वाहनसौख्य प्राप्त आढळतो.

एकादश स्थान : लाभ स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक सुंदर, निरोगी, उद्योगपती, विश्वासू मित्र असणारा, धनाढ्य, नित्य आनंदी, अल्प संतती युक्त, सामाजिक कार्यकर्ता व ध्येयासक्त आढळतो.

द्वादश स्थान : व्यय स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक खर्चीक, वाईट मित्रांच्या संगतीत रमणारा, दुय्यम कार्यकर्ता, योगाभ्यासी, शास्त्रज्ञ, लोभी, दुष्ट आढळतो.

(सुचना : ही स्थानागत फळे असून रास, युती, दृष्टी ई. स्थितीनुसार फळामध्ये फरक होऊ शकतो.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (११८९)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

पारंपारिक ज्योतिषातील २७ योग त्यांचे योग स्वामी आणि फळे


विषय : पारंपारिक ज्योतिषातील २७ योग त्यांचे योग स्वामी आणि फळे

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ज्योतिष सिद्धांत सार, ज्योतिष अध्याय

नमस्कार,

आज आपण पारंपारिक ज्योतिष शास्त्रात २७ नक्षत्रांसाठी जे २७ योग सांगितलेले आहेत, त्यांचे योग स्वामी व फळे पाहणार आहोत.

सूर्य रोज जवळपास ५९ कला एवढे अंतर पार करतो, तर चंद्र रोज ७९० कला एवढे अंतर पार करतो. योग म्हणजे चंद्र सूर्याच्या राशी-अंश-कला-विकालात्मक स्पष्ट भोगांची बेरीज. प्रत्येक ८०० कला इतक्या बेरेजेचा एक योग होतो. असे सत्तावीस योग आहेत. पहिला योग विष्कंभ आहे. पंचांगात योगाची समाप्तीची वेळ दिलेली असते. नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो. वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात. या योगावर जन्म झाल्यास शांती करावी असे सांगितले जाते.

कांही योग असे आहेत कीं, त्यांच्या आरंभापासून कांही घटिकांपर्यंत त्यांचा दोष असतो.

विष्कंभ आणि वज्र या योगांचा दोष आरंभापासून तीन घटिकांपर्यंत असतो.

परिधयोगाचा पूर्वार्ध संपेपर्यंत,

शूल योगाचा पहिल्या पांच घटिकांपर्यंत,

व्याघातयोगाचा नऊ घटिकांपर्यंत

गंड आणि अतिगंड योगांचा पहिल्या सहा घटिकांपर्यंत दोष असतो.

म्हणून तेवढ्या घटिका सोडून त्या त्या योगांवर शुभकार्ये करण्यास कांही हरकत नाहीं.

प्रत्येक योग विशिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असतो जो त्या विशिष्ट योगाच्या अंतर्गत जन्मलेल्या व्यक्तीमध्ये आढळण्याची शक्यता असते. ज्या नक्षत्रावर हा योग होतो, त्या नक्षत्राच्या उडू दशेत हे फळ प्रकर्षाने जाणवते. २७ योग, योग स्वामी व फळे सोबत दिली आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)