

.

- 270.
- 269.
- 268.
- 267. अहंकारी व्यक्तिस सत्य स्वीकारने अवघड जाते व सत्य जाणणारा अहंकार येऊ देत नाही..
- 266. सत्य स्वतः साठी, प्रेम इतरांसाठी व दया सर्वांसाठी हा समाधानी आयुष्याचा कान मंत्र आहे.
- 265. पद, प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे, नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी आणि विचारांशी जोडलेली असतील, ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील..
- 264. यशाचा कधी गर्व करू नका, फूल किती ही ऊंच फांदी वर असले तरी माती ला धरून राहिले तरच उमलते.
- 263. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही. फक्त त्यांना दु:खाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते…
- 262. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो, पण फार काळ टिकवून नाही ठेवू शकत…
- 261. कोणतेही नाते टिकण्यासाठी आवड आणि निवड जेवढ़ी महत्वाची आहे तेवढ़ीच एकमेकांसाठी सवड़ ही तितकीच गरजेची आहे.
- 260. फक्त अत्तर च नाही तर चांगल्या माणसांचा सहवास देखील आयुष्य सुगंधित करतो.
- 259. सहकार्य आणि सत्कर्म जाहिरात न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधूर्य आणि समाधान अतुलनीय असते.
- 258. डोळे तर जन्मतःच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती “नजर” चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची.
- 257. सुखाचा क्षण बाजारात विकत नाही मिळत, त्यासाठी माणूसकी आणि माणसं कमवावी लागतात.
- 256. काही कारणामुळे एखादे नाते अनमोल वाटते, पण जे अनमोल नाते कारणा शिवायच बनते, ते आयुष्य भर जपून ठेवा.
- 255. आयुष्याने दिलेल्या सुख दुःखाचे पारडे कधीही समतोल नसते, कणभर सुख हे कायम सरस ठरते…
- 254. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की, मतभेद सुध्दा हसत-हसत स्विकारता आले पहिजेत.
- 253. ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहील असे नाही, पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून रहाते…
- 252. उलट उत्तर देणे नक्कीच चुकीचे आहे, पण नुसतेच ऐकून घेत बसलात, तर लोक बोलायची मर्यादा पार करतात.
- 251. “दिखावा” आणि “देखावा” यातला फरक कळला की, “आयुष्य” आणि “माणसं” समजायला सोपं जातं…
- 250. आयुष्यात बदल घड़वण्यास नेहमी तयार रहा, अन्यथा काय साध्य होऊ शकते या पेक्षा काय गमवू याचा जास्त विचार करत रहाल.
- 249. स्वतः:च्या ज्ञानाच्या अपूरेपणाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.
- 248. कोणाला हृदयात सामावून घ्यायचे असेल तर मन मोठे करा पण कोणाच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर स्वतः छोटे व्हा..
- 247. यश मिळे पर्यंत आपल्या संकल्पा वर ठाम रहा वेळ पाहून मार्ग बदलला तरी एक वेळ चालेल, पण हाती घ्याल ते तड़ीस न्या.
- 246. जगातील सर्वात मोठा आणि शाश्वत आनंद म्हणजे इतरांच्या आनंदाचे कारण होणे.
- 245. लॉटरी काय फक्त पैशाची नसते, चांगल्या माणसांचा सहवास लाभणे हे मोठी लॉटरी लागण्यासारखेच आहे.
- 244. मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत, तेव्हा रस्ता बदला,”सिद्धांत” नाही,कारण झाड नेहमी ‘पान’ बदलतात ‘मूळ’ नाही.
- 243. दगड पाण्यात फक्त भिजतो अन् माती निरागसपणे विरघळते; भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की, सगळी नाती नितळ होतील…
- 242. माणसं जरी सोन्या सारखी बावनकशी भासत असली तरी त्यांच्यातही कॅरेटचा फरक असतोच.
- 241. डोळे बंद केले म्हणून संकट निघून जात नाही, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर करा, नाहीतर संकट अंगलट आल्याशिवाय डोळे उघडणार नाहीत.
- 240. हातात रिकामे पात्र पाहून असे समजू नका काहीतरी मागायला आला आहे, कदाचित तो सर्वकाही दान करुन आला असेल.
- 239. लोक कौतुक करो वा ना करो, आपण आपल्यासाठी आपले काम चोख केले पाहीजे, कारण चुका तर लोक देवा च्याही काढतात.
- 238. पुस्तकांप्रमाणे माणसांना पण वाचायला शिका कारण पुस्तके माहिती देतात आणि माणसं अनुभव…
- 237. फुलपाखरू क्षण मोजते, मग त्याला आनंदाने जगण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो.
- 236. गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते, परंतु वटवृक्ष उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो, तसेच चांगले विचार रुजण्यासाठीखुप उशीर लागतो पण एकदा रुजले की आयुष्यभर विसरत नाही.
- 235. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य…
- 234. माणुसकी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, जाणली तर शेवटपर्यंत टिकते.
- 233. कसलं न कसलं वेड अवश्य हवं माणसाला, वेडं होता येत नाही तो शहाणा माणूस कसला..
- 232. ध्येयवेड्या व्यक्तिच्या कामाच्या वेळेला सुट्टी नसते व स्वप्नाना अंत नसतो…
- 231. पुर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या लेखात अपयश आले तरी नव्याने यशाची सुरूवात करु शकतो.
- 230. मन ओळखणाऱ्या माणसांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी असते.
- 229. फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही कारण ती फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवते.
- 228. सुख आणि दुःख आपल्या मनात उगवलेली दोन झाडे आहेत, आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार..
- 227. एखाद्या व्यक्तिची महानता त्याचेकडे काय आहे यापेक्षा तो इतरांना काय देऊ करतो यावर ठरते.
- 226. एखाद्या व्यक्तिचा समजूतदारपणा आणि परिपक्वता हे वयाने नाही तर आयुष्यात घेतलेल्या अनुभवांनी सिद्ध होते.
- 225. वयाला हरवायचे असेल तर छंदा ला जिवंत ठेवले पाहीजे.
- 224. नेहमी सकारात्मक रहा, कारण समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही.
- 223. आयुष्यात लांबुन पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेला पावसाळा अधिक महत्वाचा ठरतो नाही…
- 222. राग आणि वादळ शांत झाल्यावरच समजतं, की किती नुकसान झालं.
- 221. जीवनात संकटांवर मात करायची असेल तर स्वतः ला शांत सरोवरा सारखे ठेवा, ज्यात कोणी आगेचा गोळा जरी फेकला तरी थंड होईल.
- 220. आयुष्यात ज्या कामाची भीती वाटते ते काम नक्की करा कारण, भीती तुम्हाला संकटावर मात करायला शिकवते.
- 219. जो इतरांच्या सुखासाठी सोसतो स्वतः दुःखाची झळ, अभेदय असते त्याचे मनोबळ
- 218. या जगात समाधान शोधा, गरजा काही संपतच नाहीत.
- 217. काही गोष्टी अशा असतात ज्या मन दुखावतात पण जगाकड़े पाहण्याचा दृष्टिकोण एकदम ठीक करतात.
- 216. संयमात शाश्वती असते, मन शाबुत ठेवले की आयुष्य हसत हसत पैलथडीला नेता येते.
- 215. माणसाला चमकायचंच असेल तर’ स्वतःचा प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचे तेज निर्माण करता आले पाहिजे.
- 214. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदु होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ.
- 213. आयुष्यात कधी निराश व्हायचं नसतं, जिथे दुःख दाटतं तिथेच थोड्या दूर सुख सुध्दा वाट पाहात थांबलेल असतं
- 212. अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते आणि आयुष्याची वाट चालताना चांगल्या माणसांची गरज असते.
- 211. सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो आपुलकीच्या शब्दांनाही असतो.
- 210. विचार करण्याची पद्धत तुमच्या आयुष्याची दिशा ठरवते, गुलाबास काटे असतात यापेक्षा काट्याना गुलाब असतात हा विचार आनंद देतो.
- 209. प्रगती जरूर करा पण घमंडी व बेफिकीर होऊ नका, कारण गाड़ी किती ही वेगाने धावली तरी तिला रोकण्यास एक खिळासुद्धा पुरेसा ठरतो.
- 208. जिवंत तोच जो परिस्थिती बदलवण्याची जिद्द ठेवतो.
- 207. इच्छा प्रामाणिक असेल तर बदल करायचा की नाही हे ठरवायला जेवढा वेळ लागतो, त्या पेक्षा कमी वेळ स्वतः मधे बदल करायला लागतो.
- 206.सगळेच निर्णय आपले नसतात, काही वेळेचे असतात.
- 205. भाळणे संपल्यावर उरते ते फक्त सांभाळणे आणि हे ज्याला जमले त्याला आयुष्य कळले.
- 204. आपल्याला रडवण्याची ताकद त्याच व्यक्ती मधे असते जिला आपण आपल्यापेक्षा जास्त जीव लावलेला आहे.
- 203. आयुष्य हल्के फुलके आहे, ओझे असते ते अपेक्षेचे.
- 202. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात, त्या गैरसमज दूर करण्यास मदतच करतात.
- 201. पायातील काटा आणि वागण्यातील ताठा निघुन गेला की आयुष्य चालायला मजा येते.
- 200. जर यशाच्या गावाला जायचे असेल तर काही वेळा अपयशाच्या वाटेवरुन चालावेच लागते.
- 199. या जगात टिकण्या साठी आत्मविश्वास हा भीती पेक्षा कायम वरचढ असला पाहीजे.
- 198. जे पेरलय तेच उगवणार, फक्त आपल्या कर्मा शी प्रामाणिक रहा.
- 197. दिवस आणि रात्र याचे मर्यादे पलिकडे होते ती भक्ती, वेळ बघून होतो तो निव्वळ व्यवहार.
- 196. विचारांची पारदर्शकता हा यशस्वी नात्याचा कानमंत्र आहे.
- 195. काही वेळा काही गोष्टी केवळ निकट जाण्याने न मागता प्राप्त होतात, जसे की अग्नी मुळे उष्णता, बर्फामुळे शीतलता, फुलांचा सुगंध आणि ईश्वराची कृपा.
- 194. काही वेळा काही गोष्टी धरुन ठेवन्यापेक्षा सोडून देण्यात जास्त शहाणपण असते.
- 193. नात्याची मधुरता त्यालाच उमगते, ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रूसायचे हे कळते.
- 192. माणूस म्हणून जगता आले पाहीजे, जग खूप चांगले आहे, फक्त चांगले वागता आले पाहीजे.
- 191.कष्ट हा उम्बरया वरचा दिवा आहे ज्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीवर प्रकाश पडतो.
- 190. नेतृत्व व कर्तुत्व उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.
- 189.विचार करूनही फायदा होत नसेल तर खरच विचार करण्यासारखी वेळ आहे.
- 188. त्रास असतानाही, प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात…
- 187. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्यातरी रस्त्याने समुद्रा पर्यंत पोहोचतंच त्याचप्रकारे निःस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने देवा पर्यंत पोहोचतेच…
- 186. कोणती ही गोष्ट करण्यासाठी प्रत्येक क्षण हा योग्य च असतो, चुकतात ते आपले निर्णय.
- 185. अडथळा पार करत पुढे सरकायच असतं, धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवण थांबवायच नसतं.
- 184. नाते टिकण्यासाठी ओढ़ व संयम दोन्हीचा समतोल साधावा लागतो, नात्याची वीण घट्ट जरूर असावी, पण रुतेल अशी नसावी.
- 183. कधीही आपली तुलना इतरां बरोबर करु नका, प्रत्येक फळ हे वेगळे असते व स्वतः चे असे वैशिष्ट्य असते.
- 182. तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्यातील चुकांपासुन सुरक्षित अंतर राखून भविष्यकाळ उज्वल बनवू शकता.
- 181. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करावा.
- 180. जे साध सोप असते तेच छान असते मग ते जगणं असो वा वागण.
- 179. आशा व संवेदना कायम जागृत ठेवा, सूर्य मावळतो व परत उगवतो पण विझत मात्र नाही.
- 178. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही.
- 177. आयुष्य सोपे नसते, ते सोपे बनवायला लागते, काही अंदाज बांधून तर काही नजरअंदाज करून.
- 176. जेव्हा आयुष्यात पर्याय म्हणून कोणीच उभा नसतो, तेव्हा उत्तर बनून स्वतः च उभं राहायच असतं.
- 175. या रंगी बेरंगी दुनियेत दुःख विसरून समाधानी व्हायचे असेल तर उधळा रंग प्रेमाचा, स्नेहाचा, नात्यांचा.. बंधांचा..हर्षाचा आणि ऊल्हासाचा..
- 174. आवडीचे लोक सवड़ीने वागायला लागले की नात्याची किंमत कमी होते.
- 173. चांगली माणसे सोबत असली की वाईट दिवस ही सुसह्य होतात.
- 172. आयुष्य फक्त अनुभव देते, सुख आणि दुःख अशी आपण त्याची वाटनी करतो.
- 171. आनंद ही मनाची नैसर्गिक अवस्था आहे, फोटोसाठी सर्वच उसने हसताना दिसतात.
- 170. निःस्वार्थ मैत्रीचे कधी मोल करु नका, झाड़ कधी आपली सावली विकताना कोणी बघितलेय का
- 169. हुंकार हेच सांगतो की नेमकी भावना व्यक्त करायला शब्द पुरेसे नसतात.
- 168. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तेव्हाच पूर्ण ओळखता, जेव्हा ती व्यक्ती जे बोलायला जात नाही ते ही तुम्ही समजू शकता.
- 167. जपल्या तर आठवणी नाहीतर केवळ क्षण, राहतात त्या आठवणी आणि दुरावतात ते क्षण
- 166. शांत रहा, सहन करा, बघत रहा…तो पर्यंतच जो पर्यंत तुमची वेळ येत नाही.
- 165. साधेपणा त सौंदर्य असते व क्षमा करण्यात शक्ती दिसते
- 164. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते.
- 163. स्वतःचा खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरीबाच्या एका रुपयाचा ही तळतळाट नसावा.
- 162 रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते.
- 161. जर हारण्याची भीती झुगारुन दिली, तर जिंकण्याचे पर्याय समोर येत राहतात.
- 160. सुखासाठी धडपडने गैर नाही, परंतू त्यांस कुठेतरी समाधानाची व संतुष्टी ची सीमा हवी.
- 159. स्वतः स हिरा बनवण्यासाठी प्रयत्न करा…दुर्मिळ आणि किंमती.
- 158. आपण काय पाहतो या पेक्षा कसे पाहतो हे महत्वाचे
- 157. संवाद संपला की नातं थांबत, बोलून बघा कदाचित हरवलेले पुन्हा गवसेल.
- 156. दुःखा त सुद्धा ज्याने आनंदाचा क्षण शोधला, त्यालाच आयुष्याचा अर्थ उमगला.
- 155. प्रेमाची माणसं अवचित तुम्हाला वेदना देतीलही, पण खात्री असू दया त्यामागे तुमच्या भल्या चीच भावना असेल.
- 154. एक वेळ मन मोकळे असणे चालेल, जीभ मोकळी सोडू नका.
- 153. औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना ती माणसं आपली समजा.
- 152. शाश्वत प्रेम तिथेच जन्म घेतं, जिथे एकमेकांचे मन जपलं जातं
- 151. नाते सांभाळण्यासाठी चुका सांभाळून घेण्याची मानसिकता आणि नाते टिकविण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे टाळणे गरजेचे असते.
- 150. येणारी वेळ म्हणजे काय हे त्या लहाणग्या मुलाला विचारा जो दोन घास मिळावेत यासाठी खेळण्याच्या दुकानात काम करतो
- 149. एखादी गोष्ट कोणताही किँतु मनात न येता आवडते, तेव्हा ती स्विकारण्या योग्य समजावी.
- 148. दिसणे आणि असणे या पेक्षा महत्वाचे असते ते जाणवणे…
- 147. हसावे रूसावे, जे जे वाटेल रुचेल, ते ते करावे, आयुष्य मात्र भरभरुन जगावे.
- 146. शब्द हे एका चावीसारखे असतात, कधी मन मोकळे, तर कधी तोंड बंद करतात.
- 145. नेहमी लक्षात ठेवा हूरहूरच प्रेम व संबंध टिकवून ठेवते, भूंगा तोपर्यंतच फुलाभोवती रुंजी घालतो जोपर्यंत त्यास मध चाखायला मिळत नाही.
- 144. आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारे पान हे ‘बालपण’ असत…
- 143. युद्ध जेव्हा आपल्या माणसांशी असते तेव्हा एक वेळ हरावे लागले तरी चालेल, पण युद्ध जेव्हा स्वतः शी असते तेव्हा, प्राणपणाने लढायच असतं.
- 142. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाची कमतरता सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही.
- 141. समाधानी वृत्ती जोपासली तर स्वतःला आनंदी ठेवणं सोपं जातं.
- 140. आनंद हा चंदना सारखा असतो, इतरांच्या कपाळी लावताना आपली बोटे सुगंधी होतातच.
- 139. जीवनात सुखा बरोबर दु:खालाही झेलायच असत आणि स्वतःला विसरून सा-यांमध्ये मिसळायच असत
- 138. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते, महत्वाची असते ती फक्त असाधारण जिद्द.
- 137. समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली, तो जगात सर्वात सुखी.
- 136. जीवनात थोड सोसायच असत तर बरच भोगायच असत, ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायच असत.
- 135. एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.
- 134. मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. काही वेळा एकच साधता येतं, स्वतःच सुख नाहीतर दुसऱ्याचं मन.
- 133. सकारात्मक माणसांच्या मनात देखील कधी कधी नकारात्मक विचार येतात. फरक इतकाच की ते नकारात्मक विचाराच्या अधीन होत नाहीत.
- 132. एखाद्याच्या मनाचा ठाव घेणं खूप कठीण, शांत पणे पहुडलेला समुद्र बहुतेकदा जास्त खोल असतो.
- 131. पालकांनी हे स्वीकारणे गरजेचे की, आपलं घरटं सोडुन बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळणार नाही.
- 130. विजय निश्चित असेल तर डरपोक सुद्धा डरकाळी देतो, बहादुर तो जो हार निश्चित असून देखील लढायला तयार असतो.
- 129. काही मिळवायचे असेल तर त्याग करायला पण शिकले पाहीजे, श्वास सुद्धा सोडल्या शिवाय परत घेता येत नाही.
- 128. आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळ आली की नक्की मिळेल, फक हेतु शुद्ध व प्रामाणिक असू दे.
- 127. वेळ कधीही बदलू शकते, तेवढेच निष्ठुर व्हा, जेवढे तुमच्या वर वेळ आली तर सहन करु शकाल.
- 126. मोह संपला की संपते ती मिळवण्याची इच्छा व गमावण्याचे भय.
- 125. एका मिनीटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनीट नीट विचार करुन घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो..
- 124. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात…
- 123. आपले विचार नेहमी तपासून पहा, कारण विचारां मधून हेतू तयार होतो व हेतू मुळे कृती घडते.
- 122. दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, जो नेहमी विचार परावर्तीत करतो.
- 121. जिभेचं वजन खुप कमी असतं… पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं…
- 120. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड आतून असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक नाही घेता येत …
- 119. जेव्हा आपण म्हणतो, किती बदलला आहेस रे, त्याचा अर्थ एवढाच की तो आपल्या मनासारखा वागत नाहीये…
- 118. वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे, वृद्ध नाही. कारण… वृद्धत्व इतरांचा आधार शोधते तर जेष्ठत्व इतरांना आधार देते.
- 117. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो
- 116. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करावी ती सुगंधाचीच.
- 115. विचारांची काळजी घेतली तरच विचार तुमची काळजी घेतील.
- 114. असलेल्या गोष्टीत रमता आले की नसलेल्या गोष्टीची हळहळ कमी होते.
- 113. काही गोष्टी बाहेर मिरवण्यापेक्षा मनात गिरवल्या तर जास्त समाधान लाभेल.
- 112. श्वास पूर्ण होतो पण इच्छा अपूर्ण राहतात तो मृत्यू आणि श्वास राहतो तरी इच्छा लोप पावतात तो मोक्ष
- 111. कुठे थांबावं आणि कुठे थांबून राहू नये हे कळलं की जगणं सोप्पं होऊन जातं.
- 110. दुसऱ्यांच्या दुःखाने सुखी होतो तो “दानव”, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो “मानव” व दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतो तो “देव” जाणावा.
- 109. सर्वात मोठे ओझे हे आपल्या मनावरचे असतं, ते फेकून दिलं की आयुष्य हलकं फुलकं होतं.
- 108. शांत राहन्यासाठी तल्लख स्मरणशक्तीप्रमाणेच तल्लख विस्मरणशक्ती पण तेवढ़ीच महत्वाची असते
- 107. एखादी व्यक्ती तुमची मनापासून काळजी घेते ती त्याला गरज आहे म्हणून नाही तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून
- 106. प्रत्येक दिवस एक “अपेक्षा” घेऊन सुरू होतो,आणि एक “अनुभव”घेऊन संपतो…
- 105. विचाराकडून आकारा कड़े सरकणे हा मानवी स्वभाव आहे, त्यास निराकाराकडे वळवणे ही साधना होय.
- 104. सुंदर विचारांची जोपासना हीच तर परमेश्वराची उपासना.
- 103. इतरांचा आपल्याला त्रास होतो हे समजते, मग आपला कोणाला त्रास होईल असे वागू नये हे जड़ का जाते…
- 102. प्रचंड प्रेम करणारी माणसे कशाची शाश्वती मागत नाहीत.
- 101. व्यक्तिगत गरजें पेक्षा वृत्तिगत गरजा जास्त असतात, त्या आवरता आल्या तर आयुष्य सूखकर होते.
- 100. कोणी दखल घेवो अथवा दुर्लक्ष करो, शांतपणे कर्तव्य करत रहा… जग झोपेत असलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही.
- 99. कानाने ऐकलं तर शब्द ऐकू येतात आणि मनाने ऐकलं तर शब्दानमागील अर्थ…
- 98. ठेच तर लागत राहणार ती पचवायची हिम्मत ठेवा, कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा.
- 97. जीव लावणारी असली की वाईट दिवस सुद्धा थोड़े सुसह्य होतात.
- 96. काही नाती असून नसल्या सारखी असतात, तर काही नाती नसून सुद्धा असल्या सारखी असतात.
- 95. कीर्ती ही सदगुणांची सावली आहे.
- 94. माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे म्हणा.
- 93. दुःखाने मन कडू करण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे.
- 92. आशा ही उत्साहाची जननी आहे.
- 91. चंदनाला आपली ओळख सांगावी लागत नाही, त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
- 90. अंत:करणापासून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.
- 89. लहानांना मोठं करण्यासाठी काही वेळा मोठ्यांना लहान व्हावं लागतं.
- 88. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती वेळीच शांत करा.
- 87. जो वेळ वाया घालवतो त्याच्यावर एक वेळ अशी येऊ शकते की गमवायलाही काही उरणार नाही.
- 86. प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
- 85. नात्यात अपेक्षा ठेवणे गैर नाही, पण अपेक्षा मनात ठेवून नाते जोडणे नक्कीच.
- 84. काही लोक अशी पण आयुष्यात येतात, जी आयूष्यात राहिली नाही राहिली तरी आयुष्य बनून राहतात.
- 83. कोमल भावना नाते मात्र मजबूत बनवतात.
- 82. सदैव आनंदी राहण्यासाठी साधनांची नव्हे आंतरिक उर्मी जागृत होण्याची आवश्यकता असते.
- 81. तुम्ही तेव्हा श्रीमंत ठरता, जेव्हा पैशाने विकत न घेता येणारी एखादी गोष्ट कमवता.
- 80. ‘काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव’ ज्यांना कळतात.. त्याच, नात्यांना खरा अर्थ असतो..
- 79. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् प्रेमळ शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातात.
- 78. हक्क गाजवंण्या आधी त्या नात्यातील कर्तव्य पार पाडले तरच त्या हक्काची किंमत राहते.
- 77. जी परिस्थिती आपले मन स्वीकारते, तेच खरे सुख आहे
- 76. खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा सत्त्य अगोदरच माहित असतं…
- 75. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकार करुन साथ निभावण्यात आहे.
- 74. आयुष्यात हार न मानता जो झटेल तोच जिंकेल, आणि जो न लढेल तो हारेल
- 73. आयुष्य जेव्हा खडतर परिक्षा घेऊ लागते, तेव्हा जिद्द जन्म घेते.
- 72. सुंदर दिसावे हे वाटणे चांगले आहे, पण चांगले असणे हे केव्हाही सुंदर च वाटते
- 71. कधी कधी देव परिस्थिती बदलत नाही, कदाचित त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.
- 70. “सारे काही संपलेय” या नकारात्मक विचाराच्या मागे फक्त “नकारात्मक” जोडू शकलात तर ती एका नवीन सुरूवातीची चाहुल असू शकते
- 69. स्मित ही अशी वक्र रेषा आहे, जी अनेक गोष्टी सरळ व सरल करते.
- 68. लोक तुम्हाला वेडा ठरवून हसत असतील तर साफ दुर्लक्ष करा, लोक हसायला येतात, पोसायला नाही.
- 67. अनेक वेळा अमृत शिंपडणारे क्षण कठिन प्रसंगाचा बुरखा पांघरुन येतात त्यामुळे संयम सोडू नका
- 66. एखाद्या विषयात ऊंची गाठण्यासाठी त्या विषयाची खोली माहीत असणे गरजेचे आहे.
- 65. स्वतः च्या क्षमतांवर विश्वास हवा, ससा घाबरतो म्हणून सिंह स्वतः ला राजा समजत नाही.
- 64. एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वागवते हे माहीत असून देखील तुम्ही तिच्याशी कसे वागता हीच तुमच्या परिपक्वते ची खरी परीक्षा असते.
- 63. एखादे विषयी आपले मत बनावण्या पूर्वी आपला दृष्टिकोण तपासून पहा, शबरीने उष्टि बोरं दिली यामागचे तिचे रामा बद्दलचे प्रेम व भावना लक्षात घ्या.
- 62. नेहमी चांगल्या लोकांच्या संगती त रहा, जो व्यक्ती चांगल्या वॄक्षाचा आसरा घेतो त्याला चांगलीच सावली मिळते.
- 61. विझत चालला असाल तरी परत पेटून उठा, इच्छाशक्ती सारखे सामर्थ्य नाही.
- 60. अवास्तव अपेक्षा वाढल्या की वास्तवातील माणसं गमावण्याची वेळ येते.
- 59. प्रत्येकाचे स्वतः चे असे वैशिष्ट्य असते, केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
- 58. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.. त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते.
- 57. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावच लागतं.
- 56. जगातील सर्वात सुंदर रोपटे आत्मविश्वासाचे असते जे आपल्या मनात रुजवावे लागते.
- 55. खरं नातं एका चांगल्या पुस्तकासारख असत, ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत.
- 54. आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.
- 53. लोकांच बोलणं कधीच मनाला लावून घेवू नका….लोकं पेरू घेताना गोड आहे का विचारतात आणि खातांना मीठ लावून खातात.
- 52. पुस्तकाप्रमाणे माणसांना पण वाचायला शिका, कारण पुस्तके माहिती देतात आणि माणसे अनुभव
- 51. संवाद चालू ठेवण्यासाठी वेळ आणि शब्दांपेक्षा मनापासून इच्छा लागते.
- 50. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
- 49. जर अशा व्यक्तीच्या शोधात असाल, जो तुमचे आयुष्य बदलेल तर आरशात पाहा…
- 48. स्वप्ने पूर्ण होण्यासाठी हुशार नाही, वेडे व्हावे लागते.
- 47. पाण्याच्या लाटा पाहत किनाऱ्यावर बसून समुद्र पार करता येत नाही.
- 46. जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो.
- 45. वेगापेक्षा आपण वेगाने कोणत्या दिशेला चाललोय हे समजणे जास्त गरजेचे आहे.
- 44. माणसे कळण्यासाठी त्यांचे मनाविरुद्ध वागा आणि फक्त पहा…
- 43. कोणत्याही प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आधी एक पाऊल पुढे टाकावे लागते.
- 42. ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं जिथं ते सुरक्षित राहील.
- 41. मनापासून जपले जातं, तेच खरे नातं असतं आणि हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो.
- 40. कौतुक कमी शब्दांत देखील करता येते, पण त्यासाठी मन मात्र मोठे असावे लागते.
- 39. जिद्द असेल तर आयुष्याच्या वाटेवर चुकलेले एखादे वळणसुद्धा नवीन वाट शोधण्याची प्रेरणा देते
- 38. शब्द दिल्याने आशा निर्माण होते आणि शब्द पाळल्याने विश्वास.
- 37. आवड असेल तर सवड मिळेल
- 36. चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण ज्याला चिकटतो त्याचे आयुष्याचे सोने करतो.
- 35. खांद्या ना आव्हान पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष करु लागतात.
- 34. आयुष्यात पुन्हा सुरुवात करावी लागली तर घाबरू नका…कारण यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून असेल
- 33. तुम्ही प्रत्येक क्षणाची काळजी घ्या तास स्वतः ची काळजी घेतील…
- 32. नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकेल तो आत्म विश्वास आणि हरेल तो अहंकार
- 31. बोलताना आवाजाची नव्हे तर शब्दांची उंची वाढवा कारण.. पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटाने नाही…
- 30. हव्यास सोडला की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख…
- 29. प्रत्येक माणसात थोड़ा तरी चांगुलपपणा दडलेला असतो, प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते.
- 28. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण कृती करण्याची वेळ आली की स्वतःला कार्यात झोकून द्या.
- 27. नुसते पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत. माणसांचे देखील असेच असते.
- 26. मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळाल की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या स्वच्छ व निरभ्र होतात.
- 25. ध्येय साध्य होत नसेल तर मार्ग बदला ध्येय नाही, कारण झाडे पाने बदलतात, मुळे नाही.
- 24. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्ती-मंत आयुष्य घडते.
- 23. डोक शांत असेल तर निर्णय बरोबर येतात, भाषा गोड असेल तर माणसं जवळ राहतात.
- 22. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग भरकटू न देण्याचे नियंत्रण कौशल्य स्वतः जवळ हवे.
- 21. गैरसमज करुन घेण्यापेक्षा, थोड़े समजून घेणे बऱ्याच वेळा योग्य ठरते.
- 20.. एखादी गोष्ट विसरायचीय हेच विसरुन जा, कारण काही विसरायचे म्हटले की सगळच आठवते.
- 19. दोष शोधायची हौस असेल तर जरुर पूर्ण करा, फ़क्त सुरुवात स्वत:पासून करा
- 18. सावलीत उभे राहून स्वता:ची सावली निर्माण होत नाही, त्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते
- 17. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
- 16. मोठ मोठ्या गोष्टी करणारे बोलत राहतात, तेव्हा हलकेसे हसणारे बरेच काही सांगून जातात
- 15. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, मात्र प्रत्येक गोष्ट वेगळे पणाने करतात.
- 14. तुम्हाला खरी श्रीमंती मोजायची असेल तर कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले, तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
- 13. कोणाशी तुलना करु नका, स्वतः वर विश्वास ठेवा. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही
- 12. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
- 11. कोणाला भीती आहे की देव मला पाहतोय तर कोणाला ठाम विश्वास आहे की देव मला पाहतोय.
- 10. आयुष्याकडे पाहन्याचा सकारात्मक दृष्टिकोण हाच आनंदी आयुष्याच्या कानमंत्र आहे.
- 9. आयुष्याच्या वाटेवर मागे वळून जरूर पहा, पण चालायचे आपल्याला पुढेच आहे हे लक्षात ठेवा
- 8. जो कधीच विभक्त होत नाही, तोच खरा भक्त
- 7. जे तुमच्या साठी महत्वाच्या कामातून वेळ काढतात त्यांचा जरुर आदर करा. पण प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही जास्त महत्वाचे वाटत नाही
- 6. जरुरी नाही की प्रत्येक झाडाने फ़ळ दिलेच पाहीजे… काही झाडांची सावली सुद्धा समाधान देते.
- 5. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात…मनातही…शब्दातही आणि आयुष्यातही…
- 4. मित्र जर सुखात आहे तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये… आणि मित्र जर दु:खात आहे तर निमंत्रणाची वाट बघू नये…
- 3. मला ती नाती आवडतात ज्यात “मी” नाही …. आपण असतो
- 2. धन संपन्न होण्यापेक्षा मन संपन्न होणे हे केव्हाही उत्तम. धन संपन्नता अहंकार निर्माण करु शकते तर मन संपन्नता संस्कार…
- 1. विश्वास कधी चमत्काराची अपेक्षा करत नाही, पण बरेच वेळा ठाम विश्वासामुळे चमत्कार घडतात.