अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचा भव्य स्नेह समारंभ व पदवीप्रदान सोहळा


मुबंई येथे दि. ४ एप्रिल २०२६ रोजी हॉटेल राधाकृष्ण बँक्वेट, बोरिवली (पश्चिम) मुबंई येथे भव्य स्नेह समारंभ व पदवीप्रदान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष (मुंबई) या आय.एस.ओ. मानांकन प्राप्त संस्थेच्या उत्तीर्ण ज्योतिष अभ्यासकांना मेडिकल एस्ट्रोलॉजी पदवीदान, पीएचडी पदवीदान, महर्षी पदवीदान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे मा. नंदकिशोर जकातदार व प्रदीप पंडित, मा. मालती शर्मा, मा. सुहास समुद्र यांनी व्यासपीठ भूषविले व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. अनिल महामुनी व उपाध्यक्ष मा. अजिंक्य नालोले यांनी भूषवले. असे संस्थेच्या संस्थापिका व कुलगुरू डॉ. सौ. समीक्षा शिरीष दारवलिकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

Leave a comment