
भारतीय संस्कृतीचा वर्षातील शेवटचा महिना अर्थात फाल्गुन महिना. आज फाल्गुनी पौर्णिमा.. हुताशनी पौर्णिमा. सगळ्या सणामागे विशिष्ट उद्देश असतो.. हे सण आनंद देतात पण आजच्या या सणाची गोष्टच आगळी. लहान थोर सगळेच याची वर्षभर वाट बघतात.
फाल्गुन पौर्णिमेला केसरीया रंगाच्या बहरलेल्या पळस फुलानें निसर्ग सौंदर्य आणखी खुललेय. त्याचा मनसोक्त आनंद आज लुटला जाणार. हिवाळ्यातील थंडीला दूर सारणारी आज होळी. महाराष्ट्रात घरोघरी छोट्या होळीचा होम करुन विधीवत पूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जाणार. निसर्गात पसरलेल्या रोगट जीवजंतूंचे या होळीत दहन होणार.
जेव्हा असुरी शक्तीचे निर्दालन होते तेव्हाच आनंद निर्माण होतो. असुरी प्रवृत्तीत असलेला अहंकार नातेही विसरतो. हिरण्यकश्यपूचे असेच झाले. हिरण्याक्ष हा असुर त्याचा भाऊ होता. त्याने पृथ्वीवर संकट आणल्याने त्या असुराला भगवान विष्णूनी वराह अवतार धारण करून संपवून पृथ्वीचे रक्षण केले. भगवान विष्णूविषयी हिरण्यकश्यपूच्या मनात हा राग होता.
हिरण्यकश्यपूने ब्रम्हदेवाची भक्ती करून अनेक वर प्राप्त केले. तो दैत्यांचा राजा झाला होता. त्याने आपल्या राज्यात देवतांचे नावही घेण्यावर बंदी घातली.
पण पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्त. या पुत्राला भक्तीपासून थांबविण्यासाठी खूप प्रयत्न केले. सगळे प्रयत्न संपले तेव्हा त्याने आपली बहिण होलीकेच्या मांडीवर आपल्या मुलाला.. विष्णूभक्त प्रल्हादाला बसवून होळीत दहन करण्याचे त्याने ठरविले.
होलिकेला अग्नीपासून अभय होते. हे लोकांना कळताच लोकांनी घरोघर अग्नीपूजन करुन होलिकेला प्रल्हादाला वाचविण्याची गळ घातली. तिने अग्नी ज्वाळातून सद्प्रवृत्तीच्या प्रभूनिष्ठ प्रल्हादाला सुखरुप ठेवले. याचे स्मरण म्हणून होलिका दहन. यामध्ये राग.. व्देष.. मत्सर.. अहंकार या असुरांचे.. शत्रूचे दहन करायचे. मग जीवन आनंदीच.
असुरीशक्तीचे दहन करुन प्रभूनिष्ठांचे रक्षण करते ती होलिकादेवी. या होळीत शत्रूभावना संपली की मग अग्निपरिक्षेतून सुखरुप बाहेर पडता येते.
या शिमगा सणाला देव माझ्या घरी येणार हा प्रत्येकाला आनंद. असुरी शक्तीवर विजय मिळणार.. भगवंत भक्तांचे रक्षण होणार हा विश्वास देणारा हा सण. प्रदूषण हे विचारांचेही असते जे असुरी शक्तीना बळ देते. असुरी विचारांचे दहन करत आनंदाने संपन्न होणारी ही होळी…
((व्हाट्सअप पोस्ट)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)