राशींचे घात चक्र


विषय : राशींचे घात चक्र

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : दाते पंचांग

नमस्कार,

पंचांगामध्ये अवकहडा चक्र तसेच राशींचे घात चक्र याचे रकाने दिलेले असतात. त्याचा उपयोग ज्योतिषास अनेक प्रकारे होत असतो. पूर्वीचे काळी ही सर्व माहिती चक्राकार स्वरूपात देण्यात येत असे. त्यामुळे याना चक्र असे नाव आहे.

राशीचक्रातील प्रत्येक राशीला काही गोष्टी इष्ट, तर काही गोष्टी अनिष्ट असतात. म्हणजेच काही गोष्टी उपयुक्त, तर काही गोष्टी घटक ठरू शकतात. आपल्या ऋषि मुनींनी या सर्वाचे अध्ययन करून सर्वाना सावध करण्यासाठी घातचक्राची निर्मिती झाली आहे.

विवाह आणि उपनयन यासाठी घात चक्राचा उपयोग केला जात नाही.

मात्र प्रवास, सरकारी कामे, मुलाखती या साठी घातचक्रात दिलेल्या माहितीमुळे कल्पना येऊन संबंधित काळ टाळून अथवा सावध व सतर्क राहून अनिष्टता टाळता येते.

या घात चक्रात प्रत्येक राशीला कोणता मराठी महिना, तिथी, वार, नक्षत्र, आणि प्रहर घातक ठरू शकतो याची माहिती दिलेली असते. दाते पंचांगात या जुन्या चकरा व्यतिरिक्त घातक योग व करण यांची माहिती समाविष्ट केलेली आहे.

  • मेष राशीला कार्तिक महिना, १, ६, ११ तिथी, रविवार, मघा नक्षत्र, विष्कम्भ योग, बव करण, १, १, १ प्रहर अनिष्ट असते.
  • वृषभ राशीला मार्गशीर्ष महिना, ५, १०, १५, तिथी, शनिवार, हस्त नक्षत्र, शुक्ल योग, शकुनी करण, ४, ५, ८ प्रहर अनिष्ट असतो.
  • मिथुन राशीला आषाढ महिना, २, ७, १२ तिथी, सोमवार, स्वाती नक्षत्र, परीघ योग, कौलव करण, ३, ९, ७ प्रहर अनिष्ट असतो.
  • कर्क राशीला पौष महिना, २, ७, १२ तिथी, बुधवार, अनुराधा नक्षत्र, व्याघात योग, नाग करण, १, २, ९ प्रहर अनिष्ट असतो.
  • सिंह राशीला ज्येष्ठ महिना, ३, ८, १३ तिथी, शनिवार, मूळ नक्षत्र, धृति योग, बव करण, १, ६, ४ प्रहर अनिष्ट असतो.
  • कन्या राशीला भाद्रपद महिना, ५, १०, १५ तिथी, शनिवार, श्रवण नक्षत्र, शुक्ल योग, कौलव करण, १, १०, ३ प्रहर अनिष्ट असतो.
  • तूळ राशीला माघ महिना, ४, ९, १४ तिथी, गुरुवार, शततारका नक्षत्र, शुक्ल योग, तैतिल करण, ४, ३, ६ प्रहर अनिष्ट असतो.
  • वृश्चिक राशीला आश्विन महिना, १, ६, ११ तिथी, शुक्रवार, रेवती नक्षत्र, व्यतिपात योग, गर करण, १, ७, २ प्रहर अनिष्ट असतो.
  • धनु राशीला श्रावण महिना, ३, ८, १३ तिथी, शुक्रवार, भरणी नक्षत्र, वज्र योग, तैतिल करण, १, ४, १० प्रहर अनिष्ट असतो.
  • मकर राशीला वैशाख महिना, ४, ९, १४ तिथी, मंगळवार, रोहिणी नक्षत्र, वैधृति योग, शकुनी करण, ४, ८, ११ प्रहर अनिष्ट असतो.
  • कुंभ राशीला चैत्र महिना, ३, ८, १३ तिथी, गुरुवार, आर्द्रा नक्षत्र, गंड योग, किंस्तुघ्न करण, ३, ११, ५ प्रहर अनिष्ट असतो.
  • मीन राशीला फाल्गुन महिना, ५, १०, १५ तिथी, शुक्रवार, आश्लेषा नक्षत्र, वज्र योग, चतुष्पाद करण, ४, १२, १२ प्रहर अनिष्ट असतो.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

Leave a comment