अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी उपाय


(संग्रहित पोस्ट)

अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी उपाय

शुक्ल पक्षातल्या एखाद्या सोमवारी हा उपाय सुरु करा आणि पुढील २१ दिवस हा उपक्रम चालू ठेवा. सकाळी लवकर उठून स्नान करा. एका तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये पाच गुलाबाचे फुल टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. आणि सूर्याकडे सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करा.

जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसतील तर दररोज गणेशाची पूजा करा. असे म्हणतात की दररोज श्रीगणेशाची पूजा केल्याने तुमचे थकीत पैसेही परत मिळतात आणि जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही हळूहळू फेडू लागते. जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसेल तर तुम्ही दररोज दुर्गा सुक्ताचा जप करावा.

एखाद्याला दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी हनुमानास लाल वस्त्र अर्पण करा आणि मोहरीच्या तेलात सिंदूर मिसळून लावा. तुमचे पैसे परत मिळण्यासाठी तुमच्या कुलदेवता आणि देवीची पूजा करा. तुमच्या कमाईतील काही रक्कम धर्मादायासाठी बाजूला ठेवा.

तुमचे थकीत पैसे वर्षानुवर्षे परत मिळत नसतील तर हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी आहे. दररोज स्नानानंतर गायत्री मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा. असे केल्याने तुम्ही तुमची थकबाकी परत मिळवू शकता किंवा हळूहळू पैसे मिळवण्याचा मार्ग सापडेल. याशिवाय श्रीसूक्त मंत्राचा जप केल्याने उधार घेतलेले पैसेही परत मिळू शकतात. याशिवाय ४० दिवस सतत हनुमान चालिसाचा जप केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल आणि धन परत मिळू शकते.

सूर्य देवाला सत्तेचा कारक ग्रह मानले जाते आणि त्यांची पूजा केल्याने मान आणि संपत्ती मिळते. रोज स्नान झाल्यावर तांब्याच्या भांड्यात लाल मिरची आणि सिंदूर टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. हा उपाय केल्याने तुम्ही दिलेले पैसे परत मिळतील.

पैसा अडकून पड़लाय त्याची रिकव्हरी होत नाही आहे. याला एकमेव कारण म्हणजे वास्तुमधला अग्नि बिघडण. आग्नेय आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजे उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल इंटीरियर असणे हे कारण आहे.

दुसर कारण म्हणजे आग्नेय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण होण. पाण्याचा साठा आग्नेय कोनात असण किंवा आग्नेय दिशेत निळी किंवा काळी रंगसंगती असण. बऱ्याचवेळा आग्नेय दिशेत किचनचा बर्नर असूनही जर किचनचा प्लॅटफार्म काळ्या ग्रेनाइटचा असेल तरीही अग्निदोष निर्माण होतो. उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाचे ऑब्जेक्ट्स किंवा रंगसंगती येऊन पृथ्वीतत्व निर्माण झाल तर, तुम्ही केलेल्या परिश्रमांचा योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही. पैसा अडकून राहतो. तसेच आग्नेय बिघडली की वायव्य दिशाही बिघडते ज्याकडून आपल्याला आधार मिळतो.

आपल्या वास्तुच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आणि त्याच्या समोरच्या दिशेत बिघाड आढळतो. वास्तु म्हणजे एका तबकड़ी सारखी असते, एक बाजु बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल बिघडतो.

उपाय काय ?

उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापना करुन श्रीमहालक्ष्मीची प्रतिमा लावावी.
आपल्या घरात केरसुणी अथवा झाडू आणि आपली कचराकुंडी पटकन कोणाच्याही दृष्टिक्षेपात येईल अशी ठेऊ नका.
आपल्या वास्तुमध्ये कधीही भांडणतंटे, मोठ्या आवाजात बोलण टाळा.
कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकण टाळा.
आपल्या कुठल्याही दरवाजाच्या बीजागर किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो तो बंद करा.
घरात जाळ्याजळमट नसावी आणि घरातील गळते नळ बंद करा.
जुनी बंद पडलेली घड्याळ, टाइप राइटर, बिघडलेल इलेक्ट्रॉनिक सामान, जुने न वापरत असलेले कपडे किंवा मृत व्यक्तींचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा.

(ही पोस्ट कोणी लिहिली आहे माहीत नाही, पण सुंदर लिहिली आहे. आपल्या माहितीसाठी देत आहे.)

संग्राहक : ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

Leave a comment