विषय : अष्टक वर्ग नुसार ग्रहाचे स्थित राशीतील ग्रह बिंदू फळ
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : अष्टक वर्ग सिस्टम ऑफ प्रेडीक्षण
मुळ लेखक : ज्यो. बी. व्ही. रमन
नमस्कार,
पराशर ऋषी द्वारे निर्मित अष्टक वर्ग ही एक फलादेशासाठी वैदिक ज्योतिष शास्त्रास मिळालेली एक अमुल्य देण आहे. ही एक परिपूर्ण व विकसित अशी एक शाखा आहे. ज्यामुळे आजच्या सोफ्टवेअर च्या जमान्यात कमी वेळात व अत्यंत सोप्या पद्धतीने फळांचा अंदाज घेऊ शकतो.
ज्यांना या विषयात अधिक रुची आहे, त्यांनी बी. व्ही. रामन, सी. एस. पटेल आदी ज्योतिर्विदांचे ग्रंथ अभ्यासावेत. तसेच माझे मित्र श्री. हेमंत उपासनी हे अष्टक वर्ग पारंगत असून सोपी भाषेत अष्टक वर्ग उलगडून दाखवण्यात त्यांची हातोटी आहे. ते वेळोवेळी या वर कार्यशाळा घेत असतात. त्याचा लाभ जरूर घ्या.
अर्थात या लेखाचा उद्देश अष्टक वर्ग शिकवणे हा नसून अगदी ज्याला अष्टक वर्गातील काही फारसे कळत नाही, त्यांना देखील त्याचे कुंडलीतील ग्रह काय मर्यादेत कशा प्रकारे फळे देऊ शकतो याची कल्पना यावी एवढाच मर्यादित उद्देश आहे.
येथे माहितीसाठी ग्रहांच्या कारकत्वानुसार काही सामान्य फळे देत आहे. ज्यामुळे अष्टक वर्ग नुसार ग्रहास मिळालेले बिंदू कसे फळे देऊ शकतात याची कल्पना येईल. त्यास स्थान व राशी चे वैशिष्ट्यानुसार तसेच ज्योतिष शास्त्रातील नियमानुसार (उदा. एखादा अनिष्ट ग्रह भावात, अथवा ग्रह अनिष्ट भावात स्थित असेल, तर फळ कमजोर करू शकतो, तर इष्ट ग्रह फळात वृद्धी करू शकतो ई.)
एखादा ग्रह किती प्रमाणात त्याच्या दशा अंतर्दशा गोचर, कक्षा ई. मध्ये सकारात्मक अथवा नकारात्मक फळ देऊ शकतो, याची कल्पना येईल. त्यासाठी एखादा ग्रह कुंडलीत कोणत्या राशीत स्थित आहे हे प्रथम पहा. त्या राशीत प्रत्येक ग्रह किती बिंदू दिले आहेत हे तपासा आणि त्या बिंदु नुसार खालील फळे पहा.
सूर्य स्वत:च्या अष्टक वर्गात एक किंवा अधिक बिंदूशी संबंधित असल्यास पुढील परिणाम देतो :
१ बिंदू : विविध प्रकारचे आजार, दु:ख आणि ध्येयहीन भटकंती.
२ बिंदु : गैरसमज, राज्यकर्त्यांमुळे (किंवा सरकार) चिंता, नाराजी आणि पैशाचे नुकसान.
३ बिंदु : सततच्या प्रवासामुळे शरीर क्षीण, दगदग होणे, मानसिक त्रास होणे.
४ बिंदु : नुकसान आणि लाभ आणि दु:ख आणि आनंद मिश्र समान फळे.
५ बिंदु : धार्मिक व्यक्तींचा सहवास, एखाद्या समस्येचा जन्म, नवीन पोशाख मिळवणे आणि शैक्षणिक प्राप्ती.
६ बिंदु : चांगले आरोग्य, शारीरिक स्फूर्ती आणि विजयश्री, वाहन संपादन, चांगले नशीब आणि चांगली कीर्ती.
७ बिंदु : प्रगती होणे, योग्य सन्मान आणि संपत्ती दायक.
८ बिंदु : उच्च राजकीय शक्ती किंवा राजकीय सन्मान आणि सार्वत्रिक आदर.
चंद्र स्वत:च्या अष्टक वर्गात एक किंवा अधिक बिंदूशी संबंधित असल्यास पुढील परिणाम देतो :
१ बिंदू : शस्त्रे आणि सरपटणारे प्राणी यांचे पासून भय
२ बिंदु : आईचे दुःख, आजारपण.
३ बिंदु : थोड्या फार प्रमाणात आईचे दुःख, आजारपण
४ बिंदु : जातक ज्या घरात राहतो, त्या घरात समृद्धी येते.
५ बिंदु : मानसिक शांती, नैतिक धैर्य.
६ बिंदु : मनाची समता, उच्च आदर्श
७ बिंदु : मंत्र शास्त्रात प्राविण्य.
८ बिंदु : उच्च नैतिक धैर्य आणि आनंदी आणि भाग्यशाली जीवन.
मंगळ स्वत:च्या अष्टक वर्गात शून्य किंवा अधिक बिंदूशी संबंधित असल्यास पुढील परिणाम देतो :
० बिंदु : पचनाचा त्रास, अपस्मार आणि मृत्यू भय
१ बिंदू : शारीरिक त्रास, ताप.
२ बिंदु : भांडणे, आप्तेष्ट आणि नातेवाईकांपासून वेगळे होणे
३ बिंदु : आप्तेष्ट आणि नातेवाईकांपासून वेगळे होणे.
४ बिंदु : चांगल्या आणि वाईटाचे सम प्रमाण.
५ बिंदु : मोहक आचरण, चांगले वर्तन
६ बिंदु : राज्यकर्त्यांकडून अनुकूलता.
७ बिंदु : भावांना समृद्धीदायक आणि त्यांच्याकडून लाभ.
८ बिंदु : शत्रूंचा पराभव, जमीनजुमला आणि संपत्तीचा लाभ.
बुध स्वत:च्या अष्टक वर्गात शून्य किंवा अधिक बिंदूशी संबंधित असल्यास पुढील परिणाम देतो :
० बिंदु : मृत्यू आणि शत्रूं भय.
१ बिंदु : नुकसान.
२ बिंदु : कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमजामुळे अस्वस्थता.
३ बिंदु : संपत्तीच्या हानीमुळे चिंता.
४ बिंदु : नोकरी व्यवसायाचे नुकसान.
५ बिंदु : सर्वांशी मैत्री आणि सामंजस्यपूर्ण व्यवहार.
६ बिंदु : परस्पर सामंजस्यपूर्ण व्यवहार
७ बिंदु : संपत्ती, आनंद आणि सन्मान.
८ : राज्यकर्त्यांची कृपा.
गुरु : स्वत:च्या अष्टक वर्गात शून्य किंवा अधिक बिंदूशी संबंधित असल्यास पुढील परिणाम देतो :
० बिंदू : नातेवाईक आणि संपत्तीची हानी.
१ बिंदू : आजारपण आणि त्रास.
२ बिंदु : राज्यकर्त्यांकडून भीती.
३ बिंदु : कानाचा त्रास, ऊर्जा कमी होणे.
४ बिंदु : जास्त चांगले नाही आणि खूप वाईट नाही.
५ बिंदु : शत्रूंचा नाश, सर्वांगीण यश.
६ बिंदु : संपत्ती, वाहतूक इत्यादींचा लाभ.
७ बिंदु : उत्तम भाग्य आणि आनंद.
८ बिंदु : महान कीर्ती, आनंद आणि श्रीमंती.
शुक्र : स्वत:च्या अष्टक वर्गात शून्य किंवा अधिक बिंदूशी संबंधित असल्यास पुढील परिणाम देतो :
० बिंदू : दगाफटका आणि विनाश.
१ बिंदू : कफजन्य त्रास.
२ बिंदु : उद्देश हीन भटकंती.
३ बिंदु : अधिकारी आणि उच् पदास्थांशी शत्रुत्व
४ बिंदु : सुख दु:खाचे समान फळ.
५ बिंदु : मित्रांसह सहवास.
६ बिंदु : समविचारी स्त्रीशी सहयोग
७ बिंदु : दागदागिने आणि मोती लाभ
८ बिंदु : सर्व प्रकारचे सुख उपभोग.
शनी : स्वत:च्या अष्टक वर्गात शून्य किंवा अधिक बिंदूशी संबंधित असल्यास पुढील परिणाम देतो :
० बिंदू किंवा १ बिंदू : संपत्तीची हानी, आणि सर्व संपत्तीचा नाश.
२ बिंदु : तुरुंगवास आणि अस्वस्थता, मनोरुग्णता.
३ बिंदु : मुलं, बायको, पैसा यामुळे त्रास.
४ बिंदु : इतरांच्या सहाय्यामुळे आनंद.
५ बिंदु : संपत्ती आणि सुखाची प्राप्ती.
६ बिंदु : लुटारू किंवा अनिष्ट घटक किंवा शिकारींच्या टोळीचा प्रमुख.
७ बिंदु : दिमतीला नोकर चाकर असणे.
८ बिंदु : लोकांचे नेतृत्व किंवा शहर किंवा शहराचे प्रमुख बनणे.
अधिक अचूक व विस्तृत फळे मिळण्याबाबत जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)