
विषय : अस्तंगत ग्रह
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : कृष्ण मूर्ती खंड, ज्योतिर्मयुख, भविष्य सिद्धांत
मूळ लेखक : मोघे गुरुजी, रघुनाथशास्त्री पटवर्धन गुरुजी, कृष्णमुर्ती गुरुजी
नमस्कार,
अस्गतंगत ग्रहाबद्दल कुठे काही फारसे लिहिलेले आढळत नाही. आज या विषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत.
आपणा सर्वांनाच माहित आहे की, आपल्या आकाशगंगेतील सूर्यमालेचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यातील सूर्य हा प्रखर व प्रचंड ऊर्जा असलेला एक तारा आहे व इतर सर्व ग्रह त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहेत. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या खूप जवळ येतो आणि सूर्याच्या प्रखर ऊर्जेच्या जवळ येण्यामुळे त्या ग्रहाची ऊर्जा क्षीण, कमकुवत अथवा “जाळली” जाते, अथवा सूर्य किरणांचा मुळे ग्रस्त होते, असे वैदिक ज्योतिषशास्त्रात मानले जाते, ज्यामुळे एखाद्या जातकाच्या जन्म कुंडलीमध्ये त्या ग्रहाच्या नैसर्गिक अभिव्यक्तीवर अथवा कारकत्वावर परिणाम होतो. या ग्रहालाच अस्तंगत ग्रह म्हटले जाते.
जर कोणताही गृह त्याच अंशामध्ये, ज्यामध्ये सूर्य स्थित असेल, तर तो सूयांच्या जोडीस पूर्ण युति म्हटली जाते व तो ग्रह अस्त व शक्तिहीन मानला जातो.
ते गृह जे सूयांच्या ५ अंश अंतरावर असतात ते अस्त म्हटले जातात. जर १० अंश अंतरावर असतील, तर तो साधारण अस्त असतो. जर १५ अंश अधिक दूर असैल, तर अस्तंगत मानू नये.
ग्रहांचे अस्तोदय आणि बाल्यवृद्धत्व :
रविणा सक्तिरन्येषां ग्रहाणामस्त उच्यते।
ततोर्वाग्वार्धकं प्रोक्तमूर्ध्वं बाल्यं प्रकीर्तितम् ॥७॥
प्रथम दिसत असलेला कोणताही ग्रह सूर्यासन्निध येऊन सूर्याच्या तेजोमय किरणांत लुप्त होऊन दिसेनासा झाला, म्हणजे त्या ग्रहाचा अस्त झाला असें म्हणतात. आणि सूर्यापासून फार अंतरावर गेल्यामुळे पुनः दिसूं लागला म्हणजे त्याचा उदय झाला असें म्हणतात. तसेंच, कोणत्याही ग्रहाच्या अस्तापूर्वीच्या कांहीं नियमित दिवसांना त्या ग्रहाचे वार्धक्याचे दिवस म्हणतात, आणि उदयानंतरच्या कांहीं दिवसांना शिशुत्वाचे किंवा बालत्वाचे दिवस असें म्हणतात.
ज्योतीर्मयुख ग्रंथाकाराच्या मते सर्व ग्रह नक्षत्रादिकांना उदयास्त आहेतच; परंतु गुरु-शुक्रांच्या अस्तोदयांचा मात्र आपल्या विवाहादि संस्कारांशीं व इतर धर्मकृत्यांशी संबंध आहे. त्यामुळे ते महत्वाचे ठरतात. मंगळ, बुध आणि शनि यांचे अस्त कोणत्याही कृत्याला प्रतिकूल मानिलेले नाहींत.
गुरु शुक्रांच्या अस्तोदयाचा काल :
मासमेकं गुरोरस्तं प्रायशो न भवेत् पुनः । खाद्रयग्निदिनपर्यंतमुदयात् कथ्यते बुधैः ॥८॥ प्राच्यामस्तंगतः शुक्रः प्रतीच्यां द्विस्वरैर्दिनैः । दृश्यते नोदयाच्चास्तं खेषुद्रौ दिवसान् खलु ॥ ९॥ पश्चिमस्यां यदाऽस्तं चेत् प्राच्यामुदयते भृगुः। प्रायो दशदिनादूर्ध्वमेवं ज्ञेयो विचक्षणैः ॥१०॥
गुरूचा अस्त २५ पासून ३०-३३ दिवसांपर्यंत असतो, आणि एकदां उदय झाला म्हणजे पुनः सुमारें ३६६ ते ३७५ दिवसांपर्यंत अस्त होत नाहीं. गुरूचा अस्त नेहमीं पश्चिमेस आणि उदय पुर्वेस होतो. ३९९ दिवसांत गुरूचा एकदां उदय व एकदां अस्त होतो.
शुक्राचा पूर्वेस अस्त झाला म्हणजे, ७२ दिवसांनी पश्चिमेस उदय होतो. पण कधी कधीं हा अस्त ५८ पासून ७५ दिवसांपर्यंतही असतो. आणि शुक्राचा एकदां उदय झाला म्हणजे, पुन्हा २४८ ते २५२ दिवसांपर्यंत अस्त होत नाहीं. तसेंच, शुक्राचा पश्चिमेस अस्त झाला म्हणजे, सुमारें ८ पासून १२ दिवसांनीं पूर्वेस उदय होतो. तात्पर्य, शुक्राचे अस्तोदय असे दोन प्रकारचे आहेत. शुक्राचा पश्चिमेस अस्त असतो, तेव्हां शुक्र वक्री असतो व शुक्राचा पूर्वेस अस्त असतो, तेव्हां शुक्र मौर्गी असतो. पूर्वेस उदय किंवा पूर्वेस अस्त होतो म्हणजे तो ग्रह पूर्व दिशेकडे दिसतो किंवा दिसेनासा होतो. याचप्रमाणें पश्चिमेच्या उदयास्तांविषयीं जाणावें. ५८४ दिवसांत शुक्राचा २ वेळां उदय व २ वेळां अस्त होतो.
बाल्य वृद्धत्वाचे त्याज्य दिवस
गुरु शुक्रांच्या अस्तांत चौलादि संस्कार करणें जसें वर्ज्य आहे, तसेंच अस्तापूर्वी कांहीं दिवस म्हणजे त्या ग्रहांच्या वृद्धावस्थेत, आणि उदयानंतर कांहीं दिवस म्हणजे त्या ग्रहांच्या बाल्यावस्थेत, तीं कृत्यें करूं नयेत असा नियम आहे. परंतु या नियमाविषयी बराच मतभेद आढळतो. गुरु शुक्राच्या उदयास्त समयी बाल्याचे आणि वृद्धत्वाचे उभयपक्षीं दहा दहा दिवस सोडावे असें गर्गपुत्रांचे मत आहे. कित्येकांच्या मतें बाल्यवृद्धत्वाचे सात सात दिवस सोडावे असें आहे; आणि तीन तीन दिवस सोडावे असेंही पुष्कळांचें मत आहे. तेव्हां संकटकाली गुरु शुक्रांच्या उदयास्त समयीं पूर्वपश्चात् निदान तीन दिवस तरी सोडून शुभकृत्य करावें; परंतु सात दिवस सोडावे असा सर्वसाधारण नियम आहे.
गुरु शुक्रांच्या अस्तांत वर्ज्य कृत्यें
विहीर-तलाव इत्यादि खणणें, यज्ञ करणें, यात्रेला जाणें, चौल करणें, देवप्रतिष्ठा, विद्यारंभ, नवें घर बांधणें किंवा नव्या घरांत रहावयास जाणें, मुलांचा कान टोचणें, प्रथम गुरूपदेश घेणें, तीर्थस्नान, विवाह, कामनिक हवन, मंत्रतंत्र शिकणें, इत्यादि कृत्यें गुरुशुक्रांच्या अस्तांत करूं
गुरु शुक्रास्त व मलमासादिकांचा (अधिक महिना) अपवाद
गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंत जे अष्टविध संस्कार आहेत ते, अधिक मासांत, गुरु शुक्रादिकांच्या अस्तांत करण्यास प्रत्यवाय नाहीं. त्याचप्रमाणें प्रतिमासांत केलीं पाहिजेत अशीं आवश्यक धर्मकृत्येंही गुरु शुक्रांच्या अस्तांत व मलमासांत करणें दोषावह नाहीं.
ज्योतिषाचार्य रघुनाथ शास्त्री पटवर्धन यांनी त्यांच्या भविष्य सिद्धांत या ग्रंथात म्हटले आहे.
सूर्याभोंवतीं आकाशांत ग्रह फिरत असतांना ते आपणाम ज्या वेळीं दिस नाहीत, अशा वेळी त्या ग्रहांचा अस्त झाला असे समजतात. त्याचप्रमाणें सूर्या भोंवतीत दिसतो, म्हणून त्याचा उदय झाला (तो ग्रह उदित आहे) असें मानतात. हे अस्तोदय नैमित्तिक अस्तोदय होत.
यहांचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणें व ते दररोज पूर्वेस दिसणें आणि पश्चिमेव त्यांचें अदर्शन होणें यास ग्रहांचे नित्य उदयास्त असें म्हणतात. ज्या राशीत, ज्या अंशांत असतात ती राशी व तो अंश ज्या वेळीं पूर्व क्षितिजावर येतो, त्या वेळीं त्याचा नित्योदय होतो व तो राशी व अंश पश्चिम क्षितिजावर जातो तेव्हां त्याचा अस्त होतो.
बुध हा सूर्याच्या सन्निध असल्याकारणानें त्याचे अस्त व उदय १ वर्षात ४-५ तरी होतात. बुध, मंगळ, शनि यांच्या उदयास्ताबद्दल विचार करण्याचे विशेष कांहीं नाहीं. परंतु गुरु, व शुक्र यांच्या अस्ताबद्दल मात्र ज्योतिषशास्त्र कर्त्याचा फार कटाक्ष आहे. याचें कारण इतकेंच कीं, गुरु शुक्राचें अस्तामध्ये वास्तुशांति, मोठमोठ्या संस्था स्थापणे व विवाहादि कृत्ये करणे अशुभ व निषिद्ध सांगितलेले आहे.
शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक व गुरु हा संततीचा, वंशवृद्धीचा व ऐश्वर्यकारक असल्यामुळे त्या दोघांचाही अस्त असतांना केलेल्या विवाहापासून सौख्य मिळणे दुर्लभ होते.. म्हणून मंगलकृत्ये गुरुशुक्रास्त समयीं वज्यं केली आहेत.
कोणत्याही ग्रहाची गति सूर्याच्या गतीपेक्षा कमी असून तो राश्यादि- कांनीहि सूर्यापेक्षां कमी असेल तर पूर्वेस उदय पावतो. तसेंच कोणत्याही ग्रहाची गति व राश्यादिक सूर्यापेक्षां अधिक असेल तर तो पश्चिमेस उदय पावतो.
सूर्याच्या गतीपेक्षा ग्रहाची गति कमी व राश्यादिक जास्त असें असल्यास त्याचा पश्चिमेस अस्त होतो, आणि सूर्याच्या गतीपेक्षां ग्रहाची गति अधिक व राश्यादिक कमी असें असतांना तो ग्रह पूर्वेस अस्त पावतो.
उदयास्ताचे ग्रहांचे अंश
चंद्र : १२, मंगळ : १५।।, बुध : १३, गुरु : १०, शुक्र : ७।।, शनि : १४
सूर्याच्या अंशापासून वर दिलेल्या अंशाइतकें, त्या त्या ग्रहांचें कालांश अंतर असले म्हणजे त्यांचा उदय किंवा अस्त होतो. बुध, शुक्र, वक्री असतांना त्यांच्या कालांशातून १ वजा करून बाकी राहिलेल्या अंशात्मक अंतराचे वेळीच त्यांचा उदय किंवा अस्त होतो.
प्राचीन दाखल्यानुसार
बुध-पूर्वेस अस्त झाल्यापासून ३२ दिवसांनी पश्चिमेस उदय. उदय झाल्यापासून ३२ दिवसांनी वक्रगति. वक्रगति झाल्यापासून ३ दिवसांनी पश्चिमेस अस्त. अस्त झाल्यापासून १६ दिवसांनी पूर्वेस उदय, उदय झाल्यापासून ३० दिवसांनीं मार्गी. मार्गी झाल्यावर ३२ दिवसांनीं पूर्वेस अस्त. याप्रमाणें पुनःपुन्हां सदोदितः (सामान्यतः) होते.
शुक्र-पूर्वस अस्त झाल्यापासून २ महिन्यांनी पश्चिमेस उदय. अ झाल्यावर ८ महिन्यांनी वक्री. वक्री झाल्यापासून २२ दिवसांनी पश्चिमेस क आता झाल्यापासून ३२ दिवसांनी पूर्वेस उदय. उदय झाल्यापासून २२ दिवसा माया. मागी साल्यानंतर ८ महिन्यांनी पूर्वेस अस्त. असा क्रम नेहमी (सामान्यत:) चालतो.
मंगळ-पश्चिमेस अस्त झालेल्या दिवसापासून ४ महिन्यांनी पूर्वेसर उदय झाल्यापासून १० महिन्यांनीं वक्री. वक्री झाल्यापासून २ महिन्यांनी मो मागी झाल्यापासून १० महिन्यांनी पश्चिमेस अस्त. याप्रमाणें मंगळाचे वक्रास्ता कालाची गणना सामान्यतः जुन्या पद्धतीनें जाणावी.
गुरु-पश्चिमेस अस्त झाल्यापासून १ महिन्यानें पूर्वेस उदय, उदय झाल्यावर ४ महिने ८ दिवसांनौ वक्री. वक्री झाल्यापासून ४ महिन्यांनी मा मार्गी झाल्यावर ४ महिने ८ दिवसांनी पश्चिमेस अस्त. याप्रमाणेंच पुनः सामान्यपणे होते.
शनि–पश्चिमेस अस्त झाल्यापासून ३८ दिवसांनी पूर्वेस उदय. झाल्यापासून १०५ दिवसांनीं वक्री. वक्री झाल्यापासून १३५ दिवसांनी ग मार्गी झाल्यावर १०५ दिवसांनी पश्चिमेस अस्त. या क्रमानें साधारणतः अस्त्याडी होतात.
पूर्व ग्रंथांतील ही मानें असून नवीन आधुनिक वेधसिद्ध निराळी आहेत. त्यामुळे यांत कांहीं दिवसांचा फरक पडतो. या प्रमाणें बुध २२ दिवस, शुक्र ५२ दिवस, मंगळ २ महिने, महिने, शनि ४।। महिने सामान्यमानानें वक्री असतात.
अस्तंगत ग्रहांचे परिणाम :
१. क्षीण ग्रह ऊर्जा : ग्रहाची नैसर्गिक ऊर्जा आणि वैशिष्ट्ये कमी होत असल्याने जातकासाठी ते कठीण होते.
२. भावनिक अशांतता वा अस्थिरता : अस्तंगत ग्रह भावनिक संघर्ष, अंतर्गत संघर्ष आणि निराशा किंवा रागाची भावना दर्शवू शकतात.
३. करिअर आणि जीवनाच्या उद्देशातील आव्हाने : करिअर आणि जीवनाच्या उद्देशाशी संबंधित अस्तंगत ग्रह (उदा., सूर्य, शनि किंवा गुरू) एखाद्याचा मार्गात किंवा यश मिळवण्यात अडचणी दर्शवू शकतात.
४. नातेसंबंधातील समस्या : संबंधांवर प्रभाव टाकणारे अतंगत ग्रह (उदा. शुक्र किंवा मंगळ) संघर्ष, गैरसमज किंवा अलिप्तता निर्माण करू शकतात..
५. आरोग्य समस्या : काही वेळा अस्तंगत ग्रह आरोग्याच्या समस्यांशी संबंधित असू शकतात, विशेषत: जर ग्रह अनिष्ट स्थानाशी संबंधित असेल.
विशिष्ट अस्तंगत ग्रहांचे साधारण प्रभाव :
१. अस्तंगत चंद्र : भावनिक गोंधळ, मूड स्विंग आणि आव्हाने आणि भावनिक नियमन.
२. अस्तंगत मंगळ : आक्रमकता, आवेग आणि संबंधांमधील संघर्ष.
३. अस्तंगत बुध : विपरीत बुद्धी, आव्हाने, शिकण्यात अडचणी आणि मानसिक धक्के.
४. अस्तंगत गुरु : तात्विक किंवा आध्यात्मिक कार्यात संकट, आयुष्याचा अर्थ किंवा उद्देश शोधण्यात अडचणी.
५. अस्तंगत शुक्र : नात्यातील आव्हाने, अलिप्तता आणि प्रेम किंवा आपुलकी व्यक्त करण्यात अडचणी.
६. अस्तंगत शनि : करिअरची स्थिरता, भावना जबाबदारी पार पाडण्यात किंवा यश मिळवण्यात अडचणी.
७. अस्तंगत राहू/केतू : तीव्र भावनिक संघर्ष, एकटेपणाची भावना किंवा वियोग आणि एखाद्याचा आध्यात्मिक मार्ग शोधण्यात आव्हाने.
अस्तंगत ग्रहांसाठी उपाय :
अस्तंगत ग्रहाशी संबंधित देवतेची प्रार्थना आणि पूजा, अस्तंगत ग्रहाला शांत करण्यासाठी आणि त्याची उर्जा संतुलित करण्यासाठी विशिष्ट मंत्र आणि मंत्रांचे पठण करा. मन शांत करण्यासाठी, भावना संतुलित करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव ई. उपाय जाणकार ज्योतिषाचे मार्गदर्शन घेऊन करू शकता.
शुभं भवतु !!!
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)