वक्री ग्रह (ज्यो. म.दा. भट गुरुजींच्या नजरेतून)


विषय : वक्री ग्रह (ज्यो. म.दा. भट गुरुजींच्या नजरेतून)

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ/सौजन्य : ग्रहांकित दिवाळी अंक १९७७

मूळ लेखक : ज्यो. म.दा. भट गुरुजीं

नमस्कार,

१९७५ च्या आसपास ज्यो. म.दा. भट गुरुजींचे वक्री ग्रहावरील दिलेला व्याख्यानाचा संक्षिप्त गोषवारा येथे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी देत आहे. त्यांचे सारख्या व्यासंगी ज्योतिषाचे विचार आपाल्याला निश्चित च मार्गदर्शक ठरतील.  

वक्रीणस्तु महावीर्यः शुभा

राज्यफलप्रदाः ।

पापाः हानिकारकः ॥

सूत्रांचा अर्थ अगदी सोपा आणि स्पष्ट असा आहे.

भारतीय फलज्योतिष शास्त्राच्या तत्त्वानुसार

१) कुंडलीतील वक्री असलेले, तसेच उच्च राशीत असलेले ग्रह महाबली म्हणजे बलवान असतात. येथे बलवान म्हणजे शुभाशुभ फले देण्याच्या दृष्टीने बलवान असा अर्थ घ्यावयाचा आहे.

२) दुसरं सूत्र पापग्रह वा शुभ ग्रह हे कुंडलीत वक्री असता काय फले मिळतात याचं दिग्दर्शन करतं. शुभ ग्रह कुंडलीत वक्री असतील तर राज्यफलप्रद समजावे असं सांगितलं आहे. फलज्योतिषशास्त्रात राज्यफलप्राप्ती, राज्योग इत्यादी संज्ञांचा अर्थ जपूनच घ्यावा लागतो. थोडक्यात कुंडलीत शुभ ग्रह वक्री असता, सुखदायक ठरतात इतकाच अर्थ मर्यादित घ्यावयाचा आहे.

३) हेच सूत्र पुढं सांगते की, कुंडलीत पापग्रह वक्री अंसतील, तर अशुभ, हानीकारक किंवा प्रतिकूल इत्यादी संभवतात.

गर्ग, वराहमिहीर, पराशर, महादेव, मत्र्येश्वर, वैद्यनाथ इत्यादी भारतीय आचार्यांनी ह्याचा अभ्यास केला होता. आपली मते मांडून ठेवली होती. वक्री किंवा स्तंभी ग्रहांची जो काही अभ्यास पूर्वाचार्यानी केला आहे; त्यानुसार वक्री किंवा स्तंभी ग्रह कुंडलीत फले देण्याच्या दृष्टीने बलवान् असतात.

कुंडलीत असे वक्री किंवा स्तंभी असलेले ग्रह नीट अभ्यासावे लागतात. त्या अभ्यासाची रीत अशी –

१) ग्रह सुटा असा वक्री वा स्तंभी आहे, का एखाद्या ग्रहांच्या युतीत आहे.

२) मानसशास्त्रीय दृष्टया महत्त्वाच्या म्हणजे कुंडलीत केंद्रस्थानी (१-४-७-१०) हया स्थानी असा वक्री वा स्तंभी ग्रह आहे का ?

३) आपत्ती, संकटे आणणारी अशी जी कुंडलीतील स्थाने म्हणजे ६-८-१२ ह्या स्थानी ग्रह आहे का ?

४) सदर ग्रहाची दशा अंतर्दशा चालू आहे का ?

५) असा वक्री वा स्तंभी ग्रह कुंडलीत दुसऱ्या एखाद्या पापग्रहाच्या केंद्र प्रतियोग वा युतियोगात आहे का ?

वरील सर्व प्रकारांत कुंडलीतील वक्री वा स्तंभी ग्रह व्यक्तीच्या जीवनात फले देण्याच्या दृष्टीने अत्यंत बलवान ठरत असतो असा अनुभव येतो.

निरनिराळे ग्रह कुंडलीत वक्री किंवा स्तंभी असता सर्वसामान्यः मिळणारी फले अशी :

१) शनि :

जीवनात स्थिरता अशी मिळत नाही. वातविकार उद्भावतात. नोकरपेक्षा जीवनात काही काळ निघतो. वय वर्षे ३२ किंवा ३६ नंतर थोडी स्थिरता येते. ६ ८ १२ वे स्थानी पापग्रहांच्या योगात वक्री शनि बंधन योग, दिवाण दाव्यात गुंतलं जाणं अपहार इत्यादी भानगडीत सापडणं, अपघात अशी फले देतो.

२) गुरु :

योग, उपासना, मठ, ट्रस्ट संस्था, सत्पुरुष इत्यादीशी संबंध येतो. महत्त्वाकांक्षी व्यक्ती असते. चिंतन करते. लेखन करते. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध येतो. पोटाचे, लिव्हरचे विकार उ‌द्भवतात.

३) मंगळ :

ज्वरपीडा, देवी, उष्णतेचे विकार, अपघात, शस्त्रक्रिया, भावाला वा बहिणीला अपघात इत्यादी फले कुंडलीत मंगळ वक्री असताना मिळतात. कुंडलीत ६८ १२ वे स्थानी असता अशी फले जास्त प्रमाणात मिळतात.

४) शुक्र :

विकारी व कामी असतो. परस्त्रीच्या प्रेमात पडतो. गुप्तप्रेम साहित्य शिवणकला, कशीदाकाम, चित्रकला, नाट्य, गायन, लेखन इत्यादी कलात प्रावीण्य असते. सर्वसामान्यतः पापग्रहाच्या युतियोगात आणि कुंडलीत ७ ६८ १२ वे स्थानी असता फले विशेषरीत्या अनुभवास येतात.

५) बुध :

बुद्धिमत्ता उत्तम असते. पापग्रह पीडीत असता वाचादोष. शुभग्रहाच्या योगात शुभ होतो. लेखन, चिंतन, मनन करतो. ६८ १२ वे स्थानी नर्व्हस डिस्ऑर्डर्स दाखवितो. पोटाची दुखणी संभवतात.

कुंडलीतील वक्री वा स्तंभी ग्रहांच्या बाबतीत एक सर्वसामान्य नियम सांगता येईल. ग्रह ज्या गोष्टींचा कारक असतो, त्या बाबतीत जीवनात एखाद वैशिष्ट्यपूर्ण फल देताना अनुभवास येतो.

स्थानपरत्वे वक्री ग्रहांची फले

शनि : (खालील स्थानी वक्री असता)

प्रथम स्थानी : वातविकार उत्पन्न होतात. वार्धक्य लवकर दिसतं स्नायूंचे आजार होतात.

द्वितीय स्थानी : फसला जातो वा संपत्तीचा अपहार होतो. मोतीबिंदू व डोळयाचे आजार दाखवितो.

तृतीय स्थानी : धाकटे भावा वा बहिणीला अशुभदर्शक संभवतो.

चतुर्थ स्थानी : वडिलोपार्जित स्थावराचे सुख देत नाही. मातेला दीर्घ मुदतीचा आजार उत्पन्न करतो.

पंचम स्थानी : शिक्षणात अडथळे, विलंब वा बदल. चुकीची लाईन घेतो. संततीचे सुख मिळत नाही.

षष्ठं स्थानी : स्वभाव हेकट असतो, दुसऱ्याशी पटत नाही. दमा, फुफ्फुसाचे विकार, वातविकार उद्‌भवतात.

सप्तम स्थानी : क्वचित द्विभार्या योग संभवतो. पतिपत्नीत मतवैचित्र्य दाखवितो. नोकरीत हळूहळू भाग्योदयकारक होतो.

अष्टम स्थानी : वडिलोपार्जित स्थावराला अशुभ होतो. देवघेवीच्या व्यवहारात फसतो. दीर्घ मुदतीचे आजार उत्पन्न करतो.

नवम स्थानी : स्थिर स्वरुपाचा असा भाग्योदय होतो. आयुष्याचा उत्तरार्ध भरभराटीचा जातो. कर्णदोष उत्पन होतात.

दशम स्थानी : नोकरी व्यवसायात लवकर स्थिरता देत नाही. आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीतून सारखा मार्ग काढावा लागतो. महत्त्वाकांक्षा व चिकाटी असतो. नोकरी व व्यवसाय दोन्ही करतो.

एकादश स्थानी : आयुष्यात बऱ्याच उलाढाली करतो. व्यवसाय भरभराटीला आणतो. लोकाभिमुख होतो. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळते.

द्वादश स्थानी : आयुष्यात एकदा तरी सांपत्तिक स्थिती मोठ्या प्रमाणावर खालावते. आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा पूर्वार्धात मोठा भाग्योदय होतो. उलाढालीचे जीवन जगतो.

गुरु : (खालील स्थानी वक्री असता)

प्रथम स्थानी : मधुमेह होतो. विशेषतः ४ ८ १२ राशीत प्रत्यय जास्त येतो. पोटाचे विकार उत्पन्न करतो.

द्वितीय स्थानी : संपत्तीचा संचय होत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि खर्च यांनी बेजार असतो घरात पोष्यवर्ग असतो.

तृतीय स्थानी : प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करतो. नोकरी व्यवसायात हळूहळू भाग्योदय होतो. सामाजिक प्रतिष्ठा लाभते.

चतुर्थ स्थानी : घरात सख्खेसावत्र असते वा इस्टेटीबद्दल वा स्थावराबद्दल वाद असतात. शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण होते. त्याचा उपयोग असा होत नाही. शैक्षणिक क्षेशशी संबंध येतो.

पंचम स्थानी : मुलामुलींचे प्रमाण सारखे असते, मुली जास्त भाग्यवान असतात. एखाद्या मुलाकडून सांपत्तिक त्रास होतो, संसार कधी संपत नाही.

षष्ठम स्थानी : गुप्त शत्रुत्व असते. मधुमेह, संग्रहणी, रक्तदाब हयांपैकी एखादा विकार असतो.

सप्तम स्थानी : घरात पत्नीचे प्रभुत्व असते. विवाहानंतर सांपत्तिक भाग्योदय होतो. मोठ्या घराण्याशी संबंध येतो. सासरा पुरोहित, न्यायाधिश वा शिक्षक असतो.

अष्टम स्थानी : लिटिगेशन्स करावयास लावतो. पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करतो काही वेळा फसतो. रक्तदोष उत्पन्न करतो, मूळव्याध होते.

नवम स्थानी : घरात पारंपारिक देवस्थान असते. कोणी साधु संन्यासी होऊन गेलेला असतो. शैक्षणिक संस्थांशी संबंध येतो. ट्रस्टी होतो.

दशम स्थानी : सामाजिक प्रतिष्ठा देतो. अधिकारयोग होतो. महत्त्वाकांक्षी असतो. यश मिळते.

एकादश स्थानी : संपत्तीमान असतो. खूप संपत्ती मिळाली तर संतती मिळत नाही. व्यवसायात यशस्वी होतो. ह्यापैकी एक मोठं असं यशस्वी फल देतो.

द्वादश स्थानी : शिक्षण पूर्ण होते. दोनदोन पदव्या मिळवितो. नोकरीत हळूहळू भाग्योदय होतो. योग, उपासना, गूढशास्त्रे ह्यांत गती असते.

मंगळ (खालील स्थानी वक्री असता) :

प्रथम स्थानी : तापट व तिरसट स्वभाव असतो. सहज शत्रुत्व उत्पन्न करतो. उष्णतेचे विकार

उत्पन्न होतात, अपघात होतो, शस्त्रक्रिया होते.

द्वितीय स्थानी : घरात चोरी वा अपहार होतो. या कोणाचा अपघाती मृत्यू येतो. घशाचे विकार होतात.

तृतीय स्थानी : भावाला किंवा बहिणीला अपघात होतो. एखाद्या भावा बद्दल किंवा बहिणी बद्दल सतत काळजी असते. कर्णदोष उत्पन्न करतो, डोकेदुखीचा विकार असतो, प्रवासात त्रास होतो.

चतुर्थ स्थानी : स्थावराला अग्निभय दाखवितो, घरात कोणाला वा स्वतःला आनीमुळे वा इतर प्रकारे मोठा अपघात होतो. नेहमी मानसिक त्रस्तता असते. कौटुंबिक सुख मिळत नाही, रक्तदाबाचे विकार उद्‌भवतात.

पंचम स्थानी : एखाद्या संततीचा वियोग दाखवितो, स्त्रियांच्या बाबतीत गर्भपात, सिझरेयन् इत्यादी दर्शवितो. पोटाची वा इतर प्रकारची शस्त्रक्रिया होते, शिक्षणात अडणाळे येतात. संततीकडून सांपत्तिक संकटे उत्पन्न होतात.

षष्ठ स्थानी : ज्वरपीडा होते. अधुनमधून उष्णतेचे विकार उद्भवतात. शत्रूपीडा असते. नेहमी टेन्शनखाली असतो. शस्त्रक्रिया होते. पोटाचे विकार उद्‌भवतात.

सप्तम स्थानी : द्विभार्यायोग होतो वा पती वा पत्नीशी पटत नाही. दूरावा होतो. स्त्रियांच्या कुंडल्यात बाळंतपणी शस्त्रक्रिया दाखवितो. कोर्टात अपयश देतो, पती वा पत्नीला अपघात होतो वा एखादी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. भागीदारीच्या व्यवहारात त्रास व कष्ट होतो. लघवीचे विकार दाखवितो. स्त्रियांच्या बाबतीत पदररोग, धुपणी, गर्भाशयाचे विकार उद्‌भवताना दिसतात.

अष्टम स्थानी : स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाची शस्त्रक्रिया दाखवितो. लघवीचे विकार वा मूळव्याध असे विकार होतात, अपघात होतो. शस्त्रभय संभवते. घरात चोरी होते वा दरोडा पडतो, फौजदारी किंवा दिवाणी दाव्यात गुंतला जातो, क्वचित बंधनयोग होतो.

नवम स्थानी : हाताचे व मांडीचे हाड मोडण्याचा अपघात होतो. फॅक्चर्स होतात. घरात देवाची उपासना असते किंवा स्थान असते, स्वतः गणपतीची उपासना करतो, कुंडलीत मंगळ वक्री असता गणपतीची उपासना हितकारक होते असे दिसते. फळ लाभर्त.

दशम स्थानी : एक्झिक्युटिव्ह, वहानखाते, मिलिटरी, पोलिस इत्यादी खात्याशी व्यक्तीचा संबंध येतो, अधिकारयोग होतो, वडिलांना अपघातदर्शक संभवतो. नोकरीत तीन बदल होतात, वरिष्ठांशी न जमल्यामुळे काही वेळा त्रास होतो.

एकादश स्थानी : पैशाच्या व्यवहारात फसला जातो. ठेव बुडते. मित्रमंडळीकडून वास होतो.

द्वादश स्थानी : फौजदारी गुन्ह्यात गुंतला जातो, रस्त्यातील मारामारीत सापडतो वा त्यामुळे इजा होते, क्वचित बंधनयोग संभवतो, पायाला अपघात होतो, पैशाच्या व्यवहारात फसतो वा दिवाणी दाव्यात गुंतला जातो.

शुक्र : (खालील स्थानी वक्री असता)

प्रथम स्थानी : व्यक्तिमत्त्व उत्तम असते. पोशाखी व रुबाबदार असतो. थोडा बायकी वागतो. आवाजाची वा एखाद्या कलेची देणगी दतो, अशुभ असतो वा पापग्रहाच्या योगात पीडित असता दृष्टिदोष उत्पन्न करतो.

द्वितीय स्थानी : शुभग्रहाच्या योगात पैसा खूप देतो, कलाभिरुचीचा संभव असतो. गायन वाद‌नाची आवड असते, हळू व गोड बोलतो, आवाज उत्तम असो.

तृतीय स्थानी : चित्रकला, गायनकला, वादन वा लेखनकला यांपैकी एखाद्या कलेत उत्तम गती असते मित्रमंडळ मोठे असते. एखादा भाऊ वा बहीण कलाकार होते. क्वचित् कवित्व संभवते. स्त्रीच्या प्रेमात पडतो.

चतुर्थ स्थानी : महत्त्वाकांक्षेने स्वतःचे स्थावर करतो. विलासी, चैनी व खर्चिक असतो. पति व पत्नी सुखरुप व सद्‌गुणी असते. कलाभिरुचिसंपत्र असतो. अत्तरे, फुले, सेंट इत्यादीची अतीव आवड असते. बागेचा छंद असतो. जनावरे पाळतो, आधुनिक सुखोपयोगी साधने खरेदी करण्याची आवड असते.

पंचम स्थानी : मुले कलाभिरुचिसंपन्न व सुस्वरुप असतात. परस्त्री वा परपुरुष प्रेमात पडण्याचे योग येतात. स्वत:जवळ एखादी कला असते.

षष्ठ स्थानी : कामी, विकारी व विलासी असतो, शुक्राच्या कारकत्वाखाली असणारे रोग संभवतात, नेत्रदोष उत्पन्न होतात.

सप्तम स्थानी : विवाहात वैचित्र्य दाखवितो. प्रेमांत पडतो, पापग्रहाच्या योगात सप्तमस्थानी वक्र शुक्र असता परस्त्री वा परपुरुषाच्या प्रेमांत पडण्याचे योग येतात. पत्नी वा पती सुस्वरुप मिळतो.

अष्टम स्थानी : सांपत्तिक सुख उत्तम मिळते. पीडित असता नेत्रदोष संभवताता. गुप्तप्रेम संबंध दाखवितो.

नवम स्थानी : देवीची उपासना करतो. सांपत्तिक भाग्योदय होतो. विवाहानंतर भाग्योदयाला सुरुवात होते. एखाद्या कलेत प्रावीण्य मिळवितो.

दशम स्थानी : शुक्रप्रधान वस्तूंचा व्यापार करतो. व्यवसायात यश मिळते. मोठ्या घराण्यातील स्त्रीशी विवाह होतो. जीवनात स्त्रीमुळे यशसंपत्र होतो. एखाद्या कलेत नैपुण्य असते. नाव मिळवितो.

एकादश स्थानी : पैसा खूप मिळवतो. अनपेक्षित धनलाभाचे योग येतात, विलासी व छंदी असतो. नाटकाची आवड असते.

द्वादश स्थानी : ह्या स्थानी वक्री शुक्र पापग्रह युक्त्त वा पीडित असा असता गुप्तप्रेम संबंध दाखवतो. व्यसनाधीन असतो. एखाद्या कलेत प्रावीण्य मिळते. पैसे खूप मिळवतो. क्वचित नेत्रपीडा उत्पन्न करतो.

बुध : (खालील स्थानी वक्री असता)

प्रथम स्थानी : पीडित वा पापग्रहाने युक्त असता वाणीदोष दाखवतो. शीघ्रकोपी असतो. स्वभाव चिडखोर असतो, बुद्धिमत्ता असते.

द्वितीय स्थानी : वरीलप्रमाणे वाणीदोष असतात, जलद बोलतो, वा अडखळत बोलतो; घशाचे विकार उद्‌भवतात, पैसा बाळगून राहते, स्वार्थी व आपमतलबी असतो.

तृतीय स्थानी : बुद्धिमान असतो, चिंतनशील असतो, वाचन व लेखनाची अतीव आवड असते शुभ ग्रहाच्या योगात ग्रंथनिर्मिती करतो, गूढविद्येची आवड असते. पीडीत असा वक्री बुध ह्या स्थानी असेल तर ऐकण्यात दोष उत्पन करतो व कर्णविकार उद्भवतात, तशी शस्त्रक्रिया होते.

चतुर्त स्थानी : बडबड्या वा अतीव बोलका असतो, घरात कोणाशी पटत नाही, बुद्धिमत्ता चांगली असते, पापपहाच्या अंशात्मक योगात वक्री असता कमी ऐकू येते.

पंचम स्थानी : पीडित वा पापग्रहाच्या योगात वक्री असता क्वचित वेड, फिट्स, ज्वरामुळे मेंदूवर परिणाम संभवतात. शुभ  ग्रहाच्या योगात पंचमस्थानी वक्री बुध शुभ फळे देतो, बुद्धिमान असतो, शिक्षण पूर्ण होते, लेखन करतो, बुद्धिमंतांमध्ये नाव कमवितो, संशोधन करतो.

षष्ठ स्थानी : पीडित असता वा पापग्रहाच्या योगात असा वक्री असता मेंदूची दुखणी दाखवितो. Nervous disorders उत्पन्न करतो, पोटाचे विकार उद्भवतात, क्वचित् Skin Disease दाखवतो, लोकात वागण्याबद्दल गैरसमज असतात व इतर प्रकारचे आतड्यांचे विकार होण्याचे योग संभवतात, षष्ठस्थानी वक्री बुध ज्या ग्रहांच्या अंशात्मक योगात असतो त्याच्या कारकत्वाप्रमाणे रोग उत्पन्न करतो.

सप्तम स्थानी : पीडित वा पापग्रहायुक्त असा वक्री बुध सप्तमस्थानी असता विवाहात वा विवाह जमताना पत्रव्यवहार वा वादविवाद जास्त होतात. ठरलेला विवाह क्वचित मोडतो. दिवाणी दाव्यात गुंतला जातो. लघवीचे विकार उत्पन्न होतात. पतिपत्नीत मतवैचित्र्य असते.

अष्टम स्थानी : ठेवीच्या वा देवघेवीच्या व्यवहारात फसण्याचे योग येतात, निद्रानाशाचे विकार उ‌द्भवतात, त्वचारोग व मेंदूचे रोग होतात.

नवम स्थानी : बुद्धिमान असतो, नोकरीत हळूहळू भाग्योदय होतो, घरात कोणाचा शिक्षणक्षेत्रांशी संबंध येतो.

दशम स्थानी : बुधाच्या कारकत्वाखालील सर्व व्यवहारात वा व्यवसायात यशदायक ठरतो, बोलका व खटपट्या असतो, शुक्र ग्रहाच्या योगात व्यावसायिकदृष्ट्या फारच शुभ फले देताना आढळतात, लेखन, वाचन, मनन व चिंतनाची आवड असते. ग्रंथ निर्मिती करतो. संशोधन करतो.

एकादश स्थानी : शुभग्रहांच्या योगात दशमस्थानाप्रमाणे फले मिळतात.

द्वादश स्थानी : पीडित वा पापग्रहांच्या योगात व्ययस्थानी वक्री बुध नेहमी सांपत्तिक अडचणी उत्पन्न करताना अनुभवास येतो. गुप्त शत्रुत्वपीडा असते, अपघात दर्शक होतो. पादरोगी असतो.

वक्री यह है कुंडलीत नीट अभ्यासावे लागतात. अशा ग्रहांची निश्चित अशी फले मिळत असतात. कुंडलीतील वक्री महांचा स्थानदृष्ट्या, ग्रहयोगात व कारक, गुणधर्मानुसार स्वतंत्र असा विचार करावयास पाहिजे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment