आयुष्यावर बोलू काही (आयुष्य योग)


विषय : आयुष्यावर बोलू काही (आयुष्य योग)

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : कुंडलीची भाषा (खंड ३ रा)

मूळ लेखक : ज्यो. कृष्णराव वाईकर

नमस्कार,

सर्वांच्याच मनात भय, कुतूहल आणि उत्सुकता असते असा विषय म्हणजे आयुष्य योग. या विषयाबद्दल जातकास काही सांगताना ज्योतिषास काही मर्यादा व संकेत पाळावे लागतात. तसेच आयुष्य निश्चित करणे सोपे नाही. नाना तन्हेचे योग पाहून काळजी पूर्वक कुंडली तपासून मग एखादी निष्कर्षावर यावे लागते. अनुभवाचा कस लागतो. तरीही विश्व नियन्त्याचे हे गूढ गणित सुटेल याची खात्री नसते, पण काही अंदाज निश्चित बांधता येऊ शकतात.

या आयुष्य योगावर ज्यो. कृष्णराव वाईकर गुरुजींनी कुंडलीची भाषा खंड ३ रा यामध्ये विपुल व विस्तारित माहिती देऊन ज्योतिष अभ्यासकांना भरपूर खाद्य पुरवले आहे. त्यातील काही संकली माहिती अपाल्यासाठी येथे देत आहे. ज्यांना या विषयात अधिक रस आहे त्यांनी वरील ग्रंथ आणून त्याचे मनन चिंतन करावे.

आयुष्य योगाचे मोजमाप करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी महत्वाचे नक्षत्र आर्युदाय पध्दत, ग्रहदत्त पिण्डार्युदाय पध्दत, महर्षी जैमिनी पध्दत, अष्टकवर्ग पध्दत, दशा अंतर्दशा आर्युदा पध्दत व गोचर आर्युदाय पध्दत इत्यादि.

आयुष्य योग हा चार भागात विभागला आहे.

१) बालारिष्ट योग, २) अल्पायु योग, ३) मध्यायुयोग, ४) दिर्घायु योग अगर पूर्णायु योग.

(१) बालारिष्ट योग –

वय वर्षे १ ते ८ किंवा मुल १२ वर्षाचे आत मृत्यु पावल्यास बालारिष्ट योग ठरतो. या बालारिष्ट योगात _

१) नक्षत्रसंधीमध्ये जन्म असता वाईट समजला जातो. रेवती-अश्विनी, आश्लेषा-मघा, जेष्ठा-मूळ या संधीमध्ये जन्म असता बालारिष्ट योग होतो. संधी काल मागील पुढील नक्षत्रात २४ मिनीटाचा धरतात. (ह्या योगाला नक्षत्र गंडांत योग म्हणतात.)

२) जन्म लग्न संधीत वाईट समजला जातो. तो मीन-मेष, कर्क-सिंह, वृश्चिक-धनु या राशी संधीत जन्म नसावा. मागच्या पुढच्या लग्नाचे प्रत्येकी २४ मिनिटे हा काल संधीचा असतो. हा बालारिष्ट योगात मोडतो. (ह्याला लग्न गंडात योग म्हणतात.)

३) तिथीसंधी : आमावस्या शुध्द प्रतिपदा दोन्ही पक्षातील पंचमी षष्ठी व पौर्णिमा वद्य प्रतिपदा यामधील संधीकाल मागील पुढील तिथीमध्ये २ घटिका किंवा ४८ मिनिटांचा धरतात हा काल बालारिष्ट काल असतो (ह्यास तिथीगंडांत म्हणतात.)

४) दिवा-रात्री संधीकाल-दोन्ही बाजूस बारा बारा मिनिटाचा काल धरला जातो.

५) दुष्ट नक्षत्रात जन्म अश्विनी प्रथम चरण, मघा प्रथम चरण, जेष्ठा नक्षत्राचा पांचवा भाग (१० भाग करावेत) मूळ नक्षत्रातला १२ वा भाग (१५ भाग करावेत.)

६) पापग्रह २/१२ स्थानात, सप्तमात, अष्टमात, व व्ययात असता, हे ग्रह लग्नभावापासूनच मोजावेत.

७) लग्नापासून क्षीण चंद्र ६-८-१२ स्थानात असता.

८) लगेशाचा अगर चंद्र लग्नाचा शत्रु लग्नात असून तो पापग्रह असणे.

९) लग्नापासून २/१२ अगर ६/८ स्थानात पापग्रह शुभ दृष्टी रहित असणे.

१०) सारांश लग्नी, २-१२ स्थानी, ६-८ स्थानी पापग्रह शुभ ग्रह दृष्टी रहित असता बालारिष्टाला पोषक ठरतो.

११) ग्रह युध्दात लग्नेश पराभूत होऊन पापग्रह संबंधीत असून सप्तमात असणे.

१२) चंद्र ४-७-८ स्थानी पापग्रहामध्ये असता.

१३) लग्न चंद्र पापमध्यात, शुभग्रह दृष्टीरहीत आणि सप्तमात व अष्टमात पापग्रह असता.

१४) ग्रहण योगातला जन्म बालकास घातक असतो.

यापैकी एकाच वेळेस दोनपेक्षा जास्त योग बालकाच्या कुंडलीत झाले असता बालारिष्ट योग होतो. बलवान गुरुच्या दृष्टीने बालारिष्ट योगाचा भंग होतो.

१५) पुढील ग्रह योगामुळे बालारिष्ट योग निर्माण होतो. ती स्थाने त्या ग्रहांना अनिष्ट असतात. :- १) रवि पंचमात, २) चंद्र लग्नी, षष्ठात, अष्टमात व व्ययात, ३) मंगळ सप्तमात, ४) राहू नवमात, ५) गुरु तृतीयात, ६) शनि लग्नी ७) शुक्र षष्ठात, ८) बुध चतुर्थात, ९) केतू व्ययात हे बालारिष्ट योग निर्माण करतात. सर्वच ग्रह कुंडलीत या स्थानी असतील. अगर तीन किंवा चार ग्रह वरील स्थानात असता बालारिष्ट योगास पुष्टी मिळते. काही अनिष्ट नक्षत्रावर जन्म झाल्यास बालकाचे आई-बाप व जवळचे नातेवाईक यांना अनिष्ठ असते. उदाहरणार्थ भरणी तिसरा चरण, रोहिणी पहिली दोन चरणे, पुष्य ३/४ चरण, आश्लेषा १/३/४ चरणे, हस्त तिसरे चरण, चित्रा १/ २ चरण, विशाखा सबंध नक्षत्र, मूळ १/२/३ चरणे. धार्मिक शांती केल्याने नक्षत्र. परिस्थितीमुळे आलेला हा दोष कमी होतो.

२) अल्पायु योग :- वय वर्षे ८ ते ३२

१) अष्टमेश पापग्रहयुक्त षष्ठात अगर व्ययात.

२) अष्टमेश निर्बली लग्नेशासह षष्ठात अगर व्ययात.

३) अष्टमेश धरुन सर्व पाप ग्रह केंद्रात मात्र लग्नेश यामध्ये येत नाही.

४) सर्व शुभ ग्रह अपोक्लिम स्थानात.

५) गुरु, शुक्र, बुध हे सर्व ग्रह षष्ठ, अष्टम, व्ययात.

६) पाप ग्रह रवि, मंगळ, शनि राहू व केतू हे केन्द्रात (१-४-७-१० स्थानात) व त्रिस्थानात (६-८-१२ मध्ये) आयुष्य योगास विघातक असतात.

७) लग्नेश केंद्रात अगर कोणात शुभ ग्रहांनी दृष्ट नसता अगर लग्न शुभ ग्रहांनी दृष्ट नसता अगर लग्नेश स्थित राशीचा स्वामी हा शुभ ग्रहांनी दृष्ट नसात अल्पायु योग होतो. (या तिन्हींपैकी एक तरी शुभ ग्रहांनी दृष्ट असल्यास आयुष्य योग वाढतो. उत्तर कालामृत)

८) (अ) लग्नेश अगर लग्नेश स्थित राशीचा स्वामी यांच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसल्यास व लग्न अगर चंद्र लग्न हे अष्टमेशांनी दृष्ट असल्यास अल्पायु योग होतो.

(ब) लगेश अगर लप्रेश स्थित राशीचा स्वामी यांच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसल्यास व लग्न अगर चंद्रापासून अष्टमेशावर शनी मंगळाची दृष्टी असल्यास (उत्तरकालामृत) अल्पायु योग होतो

९) अष्टमेश केन्द्रांत असून लग्नेशापेक्षा बलवान असता व पाप ग्रह अष्टमात व्ययात असता अल्पायु योग होतो.

१०) लग्नेश अष्टमेश वाईट स्थानात अगर वाईट दृष्टी योगात असता शुभ ग्रह दुर्बल व पाप ग्रह बलवान केंद्रात असता अल्पायु योग होतो.

११) गुलीक अष्टमात व शनि दृष्ट अगर शनिच्या वर्गात असता अल्पायु योग होतो.

१२) जेव्हा चार किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह नवम ते व्ययस्थानापर्यंत असतात तेव्हा अल्पायु योग होतो.

३) मध्यायु योग :-

वय वर्षे ३३ ते ७४ वर्षे. मध्यायु योग होतो.

मध्यायु योगाचे तिन प्रकार १) अल्पायु-मध्यायु, (वय वर्षे ३३ ते ४६) २) मध्यायु (वय वर्ष ४७ ते ६०)

३) पूर्ण मध्यायु (वय वर्ष ६१ ते ७४).

जुन्या ग्रंथातील काही योग :-

मध्यायु योगात काही अल्पायु योग व काही दिर्घायु योग समन्वय झालेला असतो. उदाहरणार्थ बलवान रवि लग्नी पापमध्य, शुभ ग्रह दृष्टी विरहीत असता आयुष्य मध्यायुच्या काठावरच असते.

क्षीण चंद्र लगी वर्गोत्तम पापग्रह दृष्ट व शुभ ग्रह बलहिन जातक ४८ वर्षे पर्यंत जगतो.

मध्यायु योगाचे नियम

१) ४/५ ग्रह पंचम ते अष्टम भावापर्यंत असल्यास मध्यायु योग होतो.

२) पाप ग्रह अष्टमेश धरुन व लग्नेश सोडून पणफर स्थानात (२-५-८-११) असता मध्यायु योग होतो.

३) गुरु, बुध, शुक्र व्दितीयात-तृतीयात-लाभात अनुक्रमे असल्यास मध्यायु योग होतो (उत्तर कालामृत)

४) लग्नेश गुरु दुर्बल असेल व ६-८-१२ मध्ये पाप ग्रह असतील.

५) पाप ग्रह ६-८ स्थानात व शुभ ग्रह केन्द्र कोणात.

६) लग्नेश दुर्बल, पाप ग्रह ६-८-१२ मध्ये गुरु केन्द्र कोणात व लग्नात पाप ग्रह.

७) लग्नी वृषभ चंद्र, व्ययात मेषेचा शनि अगर सप्तमात वृश्चिकेचा रवि आयुष्य ६६ वर्षापर्यंत असते.

८) जन्म लग्नेश, चंद्र स्वामीचा अष्टमेश केन्द्रात व गुरु लग्री अगर केन्द्रात नसणे ६५ वर्षा पर्यंत आयुष्य असते.

९) मकर लग्न शनि चतुर्थात, मेषेचा मंगळ पंचमात, रवि कर्केचा ७० वर्षे पर्यंत आयुष्य असते.

वरील प्रमाणे ग्रहमान असल्यास मध्यायु योग होतो. मध्यायु योग ७४ वर्षे पर्यंत आहे.

४) दिर्घायु योग – (वय वर्षे ७५ ते १०० पर्यंत)

१) अष्टमेश अष्टमात.

२) लग्नेश व अष्टमेश षष्ठात वा व्ययात दिर्घायु योग (जातक परिजात)

३) अष्टमेश शुभ ग्रह युक्त अगर दृष्ट, शुभ स्थानात अगर अष्टमात.

४) लग्नेश अष्टमेश केन्द्र कोणात अगर लाभात बलवान (जातक परिजात.)

५) लग्नेश अष्टमेश बलवान केन्द्रात.

६) अष्टमेश उच्च अगर शुभ ग्रह युक्त किंवा शुभ ग्रह अष्टमेशाच्या केन्द्रात त्रिकोणात असणे.

पुर्णायु योग

७) (अ) शुभ ग्रह केंद्रात (बु.गु.शु.) व लग्नेश शुभ ग्रह युक्त अगर दृष्ट, (ब) अष्टमात तीन ग्रह त्यापैकी एक उच्च व एक स्वगृही व एक मित्रगृही, (क) आयुष्यकारक शनि अगर अष्टमेश उच्च ग्रहाबरोबर असणे.

८) लग्न लग्नेश अगर लग्नेशस्थित राशीचा स्वामी शुभ ग्रहांनी दृष्ट असणे (उत्तरकाला मृत)

९) बुध, गुरु, शुक्र केन्द्र कोणात दिर्घायु योग (उत्तर कालामृत)

१०) जन्म लग्न विषम राशीत असून जन्म लग्नी पूर्ण चंद्र व सर्व ग्रह विषम राशीत.

११) पापग्रह ३-६-११ स्थानात शुभ ग्रह बुध, गुरु, शुक्र ६-७-८ मध्ये (६- ७-८- स्थानातील शुभग्रह लग्नाधीयोग करतात) दिर्घायु योग.

१२) लग्नेश केन्द्रात, गुरु, शुक्र युक्त किंवा गुरु व शुक्र दृष्ट दिर्घायु योग.

१३) शनि लग्री, दशमात (शनि आयुष्यकारक) व अष्टमेश केंद्रात दिर्घायु योग.

१४) अष्टमेश स्वगृही अगर शनि अष्टमात दिर्घायु योग होतो.

१५) शुभ ग्रह व लग्नेश केंद्रात (१-४-७-१०) पणफर स्थानात (२-५-८-११) अगर अपोक्लिम (३-६-९-१२) स्थानात आयुष्य अनुक्रमे दीर्घ, मध्यम, अल्प असते. त्यांच्या उलट पापग्रह व अष्टमेश केंद्रात (१-४-७-१०), पणफर स्थानात (२-५-८-११), अपोक्लिम स्थानात (३-६-९-१२) आयुष्य अनुक्रमे अल्प. मध्यम, दीर्घ असते.

१६) शनि हा अष्टमेश युक्त अगर दृष्ट असता दिर्घायु योग होतो. (भावार्थ रत्नाकर अध्याय ७)

मारक (मृत्यु) कालाबद्दल काही नियम :

आयुष्याबद्दल विचार करतांना पहिल्यांदा जातक हा अल्पायु आहे, मध्यायु आहे, अगर दिर्घायु आहे हे ठरवून मग खाली दिलेल्या मारक ग्रहांच्या दशा अनुक्रमे श्रेणीने तपासून मारक दशा ठरवावी लागेल. श्रेणी तीन प्रकारच्या आहेत.

अ) प्रथम श्रेणी :-

तृतीय व अष्टमस्थाने ही आयुष्य स्थाने आहेत. यांच्यापासूनची व्ययस्थाने अनुक्रमे व्दितीय व सप्तम मारक स्थाने ठरतात.

१) व्दितीयेश व सप्तमेश संबंधीत पाप ग्रह (युक्त अगर दृष्ट).

२) व्दितीयेश व सप्तमेश (सप्तमापेक्षा व्दितीय स्थान जास्त बलवान आहे.) पाप ग्रह दृष्ट.

ब) व्दितीय श्रेणी –

१) व्दितीयेश व सप्तमेश यांच्याशी संबंधीत शुभ ग्रह.

२) तृतीयेश व अष्टमेश असलेले ग्रह (कन्या लग्नाला मंगळ व मीन लग्नाला शुक्र असतो.) संबंधीत.

३) तृतीयेश अगर अष्टमेश हे व्दितीयेश सप्तमेश संबंधीत असता.

क) तृतीय श्रेणी –

१) शनिचा प्रथम अगर व्दितीय श्रेणीच्या मारकेशाशी सहवास अगर दृष्टीसंबंध असता.

२) षष्ठेश अगर अष्टमेश यांच्या दशा.

ड) कुंडलीतल्या सर्वात निर्बली ग्रहाची दशा.

वरील ग्रह श्रेणीप्रमाणे व आपल्या गुणवत्तेप्रमाणे मारक आहेत.

खालील ग्रहांना छिद्र ग्रह म्हणतात व जो जास्त बलवान असेल त्याच्या दशेत मृत्यु संभवतो.

१) अष्टमेश, २) अष्टमस्थ ग्रह, ३) अष्टमाला पहाणारा ग्रह, ४) २२ व्या द्रेष्काणाचा स्वामी, ५) अष्टमेशाशी संबंधीत ग्रह, ६) चंद्राचा ६४ व्या नवमांशाचा स्वामी, ७) अष्टमेशाच्या अतिशत्रुच्या दशेत मृत्यु संभवतो.

जातक परिजातक ग्रंथाप्रमाणे अष्टम स्थानाचे योग

१) अष्टमेश हा आयुष्यकारक आहे तो जर दुषित झाला तर मृत्यु आणतो. अष्टमेश ६-८-१२ स्थानात असता खालील दशा भुक्तीत मृत्यु संभवतो. (अ) अष्टमेश दशा व भुक्ती (ब) शनि स्थित राशीच्या स्वामीच्या दशेत अष्टमेशाची भुक्ती (क) अष्टमेशाची दशा व नवमेशाच्या भुक्तीत मृत्यु संभवतो.

२) लग्नेश, अष्टमेश, दशमेश व शनि ह्यांच्यामध्ये जो दुर्बल ग्रह राहूयुक्त असता मृत्यू दुर्बल ग्रहाच्या दशेत येतो किंवा ह्या दुर्बल ग्रहाबरोबर असलेला ग्रह किंवा त्याला पाहणाऱ्या ग्रहांच्या दशेत येतो.

३) अष्टमेश अष्टमात असता जातकास अष्टमेशाच्या दशेत शारिरीक भोग भोगावे लागतात. अष्टमेश बलवान असता लग्नेशाच्या दशेत मृत्यू येतो.

४) लग्न दुर्बल असता लग्नेश अष्टमेशाची दशा निर्णायक समजावी. (मारक समजावी.)

५) लग्नेश बलवान असता अष्टमेशाची दशा मारक समजावी.

६) लग्नेश अष्टमेश हे इतर ग्रहाबरोबर असले तर ह्या दोघात जो बलहीन त्याची दशा मृत्युकारक समजावी.

७) लग्नेश ६-८-१२ मध्ये राहू केतू युक्त असता मृत्यु येतो. तो लग्नेशाबरोबरच्या अगर अष्टमेश ग्रहाच्या दशेत येतो.

८) अल्पायुषी, मध्यायुषी अगर दिर्घायुषी योगात राहूची महादशा आल्यास ती दशा त्या कालखंडात मारक समजावी.

९) राहू केतू त्रिकोणात असून द्वितीयेश सप्तमेश संबंधीत असता ते मृत्यु आणतात. (उत्तर कालामृत खंड ५)

१०) राहू केतू ६-८-१२ स्थानात असून ६-८-१२ च्या स्वामीने युक्त अगर दृष्ट असता जातकास फार त्रासदायक ठरतात. मात्र ते जर २-७ स्वामीने युक्त असता दृष्ट असता मृत्युकारक ठरतात. येथे हे ग्रह केंद्र कोण स्वामीने युक्त असता अगर दृष्ट असता काही काल सुख देवून नंतर मृत्यु आणतात. (उत्तर कालामृत खंड ५)

११) व्ययेशाचा मारक ग्रहांशी संबंध आल्यास व्ययेश मारक होतो. व्ययेशाच्या दशेत व व्दितीयेशाच्या भुक्तीत मृत्यु संभवतो. किंवा व्ययस्थ ग्रह जर व्ययेशांनी दृष्ट असल्यास द्वितीयेशाच्या दशेत व्ययस्थ ग्रहाच्या मुक्तीत मरण संभवते. (भावार्थ रत्नाकर)

भावार्थ रत्नाकर प्रमाणे खालील दशाभुक्तीमध्ये मरण संभवते.

दशानाथ अष्टमेश – भुक्तीनाथ अष्टमेश

दशानाथ षष्ठेश – भुक्तीनाथ अष्टमेश

दशानाथ अष्टमेश – भुक्तीनाथ षष्ठातला पाप ग्रह

दशानाथ षष्ठेश – भुक्तीनाथ अष्टमातला पाप ग्रह

दशानाथ अष्टमेश – भुक्तीनाथ षष्ठेशाशी युक्त ग्रह किंवा अष्टमेशाने दृष्ट असलेले ग्रह

दशानाथ अष्टमातला पापग्रह – भुक्तीनाथ षष्ठेश

दशानाथ षष्ठातला पापग्रह – भुक्तीनाथ अष्टमेश

दशानाथ षष्ठातला पापग्रह – भुक्तीनाथ अष्टमेश अष्टमात

दशानाथ अष्टमस्थ पापग्रह – भुक्तीनाथ षष्ठस्थ पापग्रह

गोचर आर्युदाय :

मृत्यु दाखविणारी ग्रहांची भ्रमणे :- (Span of Life by G. कृष्ण मूर्ती ह्या ग्रंथातून)

जन्म चंद्राच्या संबंधात ग्रहांची चंद्रापासून विशिष्ट राशीतील भ्रमणे मृत्यू आणतात. जेव्हा रवि-मंगळ-गुरु-शनि जन्मस्थ चंद्रावरुन, त्याच्या अष्टमातून व व्ययातून भ्रमण करतात तेव्हा चिंता व आजारपण तर कधी कधी मृत्युही देतात.

नुसत्या ग्रहांच्या भ्रमणाने मृत्यु ठरविण्याच्या अगोदर जातकाचा आयुष्याचा कालखंड निश्चित केला पाहिजे. तो ठरविल्यावर मारक दशा भुक्तीची निश्चिती करुन मग ग्रहांचे भ्रमण पहावे. समजा जन्म कुंडलीत चंद्र वृषमेत आहे तर शनिचे मेष (व्ययस्थ) वृषभ (प्रथम) व धनु (अष्टम) राशीतले भ्रमण मारक मृत्युकारक ठरेल. शनिला सर्व राशीतून भ्रमण करण्यास साधारण ३० वर्षे लागतात. कुंडलीत गुरु अगर मंगळ हे जन्म चंद्राच्या १-८-१२ स्थानातून जर जात असतील तर मारक काल तीव्र होतो.

अ) कोणत्याही भावापासून जेव्हा शनि आपल्या भ्रमणात त्या स्थानाच्या अष्टमेशाच्या अगर व्ययेशाच्या राशीत अगर नवमांश राशीत येतो अगर त्या राशीच्या त्रिकोणात येतो तेव्हा तो त्या भावाचे नुकसान करतो. त्या भावासंबंधी वाईट फले निर्माण करतो. (फलदीपिका अध्याय १७/१)

ब) अष्टमेश गुलिक शनि व २२ व्या द्रेष्काणाचा स्वामी (लग्नापासून) यांची जन्म व नवमांश राशी पहावी जेव्हा शनि या राशीतून अगर त्यांच्या त्रिकोण राशीतून जातो तो काल मृत्यु काल समजावा. (फलदिपीका १७/२)

क) लग्नी कोणत्या द्रेष्काणाचा उदय होत आहे. त्या द्रेष्काणाचा स्वामी अष्टमेश व २२ व्या द्रेष्काणाचा स्वामी यांची जन्मराशी अगर नवमांश राशीतून अगर यांच्यापासून त्रिकोण राशीतून गुरुचे भ्रमण होत असता मृत्यु संभवतो. (फलदिपीका अध्याय १७/३)

ड) शनिचे खालील ग्रहांवरुन अगर त्यांच्या त्रिकोणातून भ्रमण मृत्यू संभव दाखवितो.

१) जन्मचंद्र २) जन्मशनि ३) चंद्राच्या राशीचा स्वामी ४) अष्टमस्थानात उदय पावणारा स्वामी ५) चंद्रापासून अष्टमेश ६) लग्नेशाचा नवमांशस्वामी ७) अष्टमेशाचा नवमांश स्वामी ८) रविपासून ६-८ स्थाने ९) गुलिक राशी.

ग) गुरुचे भ्रमण खालील परिस्थितीत मृत्युकारक ठरते.

१) अष्टमेश राशीचे त्रिकोण राशीत गुरु आला असता.

२) लग्न, रवि, मांदी राशी अंश कलेची बेरीज ज्या राशी अंश कलेत असेल ती राशी.

३) गुरु, राहू यांच्या राशी अंश यांच्या बेरजेइतक्या राशीत गुरुचे भ्रमण अगर त्या राशीच्या त्रिकोणातल्या राशीत गुरु असता मृत्यु कारक असतो. मृत्यु आणण्याकरता एका पाप ग्रहाचे भ्रमण अपुरे आहे. दोन अगर तीन अनिष्ट पाप ग्रह एकाच वेळी अनिष्ट स्थानातून भ्रमण करतात. तो काल आयुष्यास धोकादायक समजावा. मृत्युसमयी राहू अगर केतू बहुतेक जन्म लग्न अगर चंद्र लग्न यांच्या व्दितीय व्ययातून भ्रमण करतात. मंगळ हा लग्न व चंद्र लग्नापासून तृतीयात, चतुर्थात अगर चंद्र लग्नावर दृष्टीयोग करीत असता अगर लग्न चंद्रावरुन भ्रमण करताना आणि मंगळाची ४-८ प्रभावी दृष्टी असता मृत्यु येतो. गुरुचे लग्न चंद्रावरुन भ्रमण हा मृत्यु योग आहे. हे वृषभ, तूळ लग्नाच्या बाबतीत खरे ठरते. ग्रह मारक ग्रहावरुन भ्रमण करीत असता ते मारक होतात अगर मारकेशाला मदत करतात. हा भ्रमणाच्या बाबतीत महत्वाच्या नियम आहे.

मृत्युसंबंधी काही विशिष्ट योग

अ) योगकारक ग्रह हा जर योग मारक ठरला तर योग देऊन मृत्यु देईल. हा नियम लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबतीत खरा ठरला आहे. योग मारक ग्रह व्दितीयात सप्तमात असता अगर व्दितीयेश सप्तमेश असता मृत्यु संभवतो. लाल बहादूर शास्त्री धनु लग्न बुध दशेत बुध भुक्तिने ते पंतप्रधान झाले व त्याच भुक्तित त्यांना मरण आले. बुध सप्तमेश आहे. लग्नेशही मारक होऊ शकतो पण अशा परिस्थितीत लग्नेश कुंडलीत वाईट परिस्थितीत असतो अगर वाईट नक्षत्रात असतो. रविंद्रनाथ टागोर मीन लग्न लग्नेश गुरुचा परिवर्तन चंद्राशी आहे. चंद्र पंचमेश हा कर्क राशीत, सप्तमेश बुधाच्या नक्षत्रात आहे. नेहमीचा अनुभव म्हणजे लग्नापासून व्दितीयेश सप्तमेश हा चंद्र लग्नाच्या व्दितीयात सप्तमात असता मृत्यु आणतो. किंवा त्याच्या उलट चंद्रापासून व्दितीयेश सप्तमेश हा लग्नाच्या व्दितीयात सप्तमात असता मृत्यु आणतो. ग्रह ज्या नक्षत्रात आहे. तो नक्षत्र स्वामी जर कुंडलीत २-७ स्थानाचा स्वामी असला किंवा २-७ स्थानात असता त्या नक्षत्र स्वामीच्या गुणधर्माप्रमाणे त्या ग्रहावर परिणाम होऊन मृत्यु येतो. टागोरांचा मृत्यू गुरु दशा गुरु मुक्त्ति झाला. राहूच्या नक्षत्रातील ग्रह आपल्या दशेत नेहमीच वाईट फले देतात.

ब) बाधक ग्रहही मारक होतो हे मेष, कर्क, तूळ, वृषभ, सिंह व कुंभ लग्नाच्या बाबतीत प्रामुख्याने खरे ठरते. वरील लग्नाला अनुक्रमे बाधक ग्रह शनि-शुक्र-रवि- शनि-मंगळ-शुक्र आहेत. वर दिलेली तीन लग्ने वृषभ, सिंह व कुंभ या लग्नाला योगकारकच बाधक होतो. या लगाला योगकारक बाधक न होण्याकरता कोणता तरी शुभ ग्रह त्याचे संबंधीत असता मृत्युयोग दूर करतो. बाधक ग्रह है जर केंद्र कोनात असता जास्त अनर्थ करतात म्हणून ते दुःस्थानात असलेले बरे. तृतीयात असता सर्वात चांगली परिस्थिती समजावी.

अल्पायु योगात तिसरी दशा, मध्यायु योगात पाचवी दशा, दिर्घायु योगात सातवी दशा मृत्युकारक असते.

सर्वात जास्त मारक ग्रह कोण आहे, हे जन्म लग्न, चंद्र लग्न व नवमांश लग्रावरुन ठरवावे. व ग्रह हा वरील तिन्ही दृष्टीने २-३-७-८ मध्ये असता अगर व्दितीयेश तृतीयेश सप्तमेश असता अगर या स्वामीबरोबर असता अगर या स्वामीने दृष्ट असता भारक अवगुण त्या ग्रहात येतात. ज्याला जास्त मारक अवगुण येतात तो ग्रह सर्वात जास्त मारक समजावा. व त्या ग्रहांची मारक प्रवृत्ती आयुष्याचा कालखंड (अल्प-मध्यम-दीर्घ) काढून ठरवावी.

मृत्यु कसा येईल

मृत्यू कोणत्या रोगाने होईल, तो रोग दीर्घ आहे की अल्प मुदतीचा असेल, मृत्यु शांततेत येईल किंवा विपन्न अवस्थेत येईल, मृत्यु नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक असेल, मृत्यु घरी येईल किंवा परदेशात येईल, असे अनेक प्रश्न उद्भवतात.

अष्टमाचा जर एकापेक्षा जास्त ग्रहांशी संबंध असेल तर रोग एक दोन असू शकतील, ग्रहाच्या राशीवरुन शरीराचा कोणता भाग रोगाला बळी पडेल अगर शरीराला जखमा होतील हे कळते. अष्टमात पापग्रह व अष्टमाला पाहणारे ग्रह कुर असतील तर मृत्यु दुःखकारक होतो. मग तो मृत्यु नैसर्गिक असो अगर अनैसर्गिक असो. पण अष्टमेश शुभ ग्रहांनी दृष्ट असता अगर अष्टमेश अष्टमाला पहात असून बलवान शुभ ग्रहांनीही अष्टमस्थान व अष्टमेश दृष्ट असता मृत्यु एकदम होतो. सुखकर असतो. त्यातले त्यात अष्टम हे गुरुचे स्थान असून गुरुने दृष्ट असता याचा अनुभव जास्त येईल, अष्टमात ग्रह नसता व अष्टमाला कोणी ग्रह पहात नसता २२ व्या द्रेष्काणावरुन मृत्युचा अंदाज घ्यावा.

२२ व्या द्रेष्काण कसा काढावा. लग्न मेष २७ अंश आहे तर २२ वा द्रेष्काण धनुचा तिसरा द्रेष्काण होतो. ज्या ग्रहाचा संबंध अष्टम स्थानाशी येतो त्या ग्रहाच्या अनुरोधाने मृत्युचे कारण कळते. रवि-अग्निमुळे, चंद्र पाण्यामुळे, मंगळ-शस्त्रामुळे, बुध-ज्वरामुळे, गुरु-शुक्र-खाण्यापिण्याच्या अतिरेकामुळे, शनि-उपासमारीमुळे अगर अपुऱ्या अन्नामुळे मृत्यु येतो.

अष्टमात चर राशी असता मृत्यु परप्रांती, स्थिर राशीत असता घरीच मृत्यु येतो. व्दिस्वभाव राशी असता प्रवासात मृत्युयोग संभवतो. शनि-राहू हे दीर्घ आजार देणारे ग्रह आहेत. रवि, मंगळ, हर्षल अल्प मुदतीचे आजार देणारे ग्रह आहेत. दुसऱ्या प्रकाराने हीच गोष्ट पहाता येते. प्रत्येक भावाला जीव व शरीर हे दोन भाग असतात. ते भावाची फले देतात.

मृत्यु नैसर्गिक व अनैसर्गिकही असू शकतो. नैसर्गिक मृत्यु हा आजारपणाने अगर म्हतारपणाने येतो. तसा अनैसर्गिक मृत्यु नसतो. हा मृत्यु एकदम येतो व भयंकर असतो.

उदाहरणार्थ अपघाताने आलेला मृत्यु रेल्वे, मोटार, विमान अपघात होणे, बुडणे, अग्नीमध्ये जळणे विषप्राशन करुन, खुनामुळे अगर फाशी दिल्यामुळे येणारे मृत्यु या सदरात मोडतात. बहुतेक असे मृत्यु भयंकर असतात.

या मृत्युमध्ये अष्टम भावाचे व २२ व्या द्रेष्काणाचे प्राबल्य दिसून येते व ग्रहांमध्ये मंगळ, राहू व शनि, हर्षल, नेपच्यून यांचा मोठा भाग आढळतो. नक्षत्रांचासुध्दा यात प्रभाव दिसून येतो. काही देष्काणे, उदाहरणार्थ आयुध, पाश, निगल (Fetters) सर्प ही द्रेष्काणे जास्त कुर असतात याचे प्राबल्य अष्टमभावावर अगर २२ व्या द्रेष्काणावर अगर लग्नेशावर असता मृत्यु अनैसर्गिक व भयंकर रितीने होतो.

एकंदर द्रेष्काण सहा प्रकारची आहेत. आयुध, पाश, निगल, पक्षी, सर्प, चतुष्पाद.

१) आयुध द्रेष्काण : मेष, सिंह, धनु, तूळेचा द्रेष्काण; मेष, धनुचा पहिला द्रेष्काण व मिथुन कन्येचा २ रा द्रष्काण (आयुध-शस्त्र)

२) पाश (गळफास) (Noose) वृश्चिक दुसरा द्रेष्काण.

३) निगलः- (बंदिवास) मकरेचा पहिला द्रेष्काण.

४) सर्पः- वृश्चिक १ ला, कन्येचा व मीनेचा ३ रा द्रेष्काण.

अष्टमावर अगर २२ व्या द्रेष्काणावर या चारांचा प्रभाव असता मृत्यु कोणत्या प्रकारे येईल याचा बोध होतो.

जीव व शरीर संकल्पना :

जीव व शरीर ही भावाची दोन तत्वे आहेत. नक्षत्र पध्दतीत खालील रितीने जातकाचा मृत्यु दीर्घ आजाराने होईल किंवा कसे हे पाहतात व ते अष्टम स्थानावरुनही पहातात.

अष्टमेश ज्या नक्षत्रात असेल त्याचा स्वामी हा जीव ठरतो. जीव म्हणजे आत्मा (Soul)

व जीव ज्या नक्षत्रात असेल त्याचा स्वामी शरीर ठरतो. शरीर म्हणजे देह (Body) यांची बलवत्ता पहावी लागते. व मरणसमयी आजार दीर्घ किंवा अल्प मुदतीचा यांचा विचार होतो. आत्मा किंवा शरीर ह्यापैकी जो बलहिन असेल त्याला दुःख होईल.

१) जीव जर शरीरापेक्षा दुर्बल असेल तर मृत्युसमयी आजार अल्प असतो व दोघांच्या बलवत्तेत फारच फरक असल्यास आजारपणाचा काल फारच अल्प असतो.

२) जीव हा शरीरापेक्षा जास्त बलवान असेल तर मृत्युपूर्वी दीर्घ आजार देतो. यांच्या बलवत्तेत फार फरक असता आजारपण जास्त दीर्घ होते.

३) जीव शरीर हे दोन्ही सारखे बलवान अगर सारखेच दुर्बल असता आजारपणाशिवाय एकदम मृत्यू देतात. बलवत्तेत मरण दुःख कमी असते व दुर्बलते मध्ये शारिरीक हालअपेष्टा जास्त असतात.

आयुष्य निश्चित करणे सोपे नाही. नान तन्हेचे योग पाहून काळजी पूर्वक कुंडली दिर्घायु, मध्यायु किंवा अल्पायु आहे. हे ठरवून नंतर मारक दशा ठरवावी लागते.

दीर्घायु योगात ७५ ते १२० वर्ष पर्यंत ज्या बलवान मारक दशा असतील तेच मृत्यु देतील. त्याच्या अगोदरच्या आयुष्याचा काल खंडात मारक दशा आली असता तो मृत्यु योग न समजता आजारीपणाचा योग समजावा, अगर कष्ट, दुःख हानी होईल असे समजावे.

टीप : ही माहिती मुख्यत्वे ज्योतिष अभ्यासकांसाठी दिलेली आहे. केवळ लेख वाचून कोणताही निष्कर्ष काढू नये व जेथे आवश्यक असेल तेथे जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment