निचभंग राजयोग


विषय : निचभंग राजयोग किंवा विपरीत राजयोग

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : उत्तर कालामृत व मानसागरी

नमस्कार,

पारंपारिक ज्योतिष शास्त्रात अनेक प्रकारचे योग दिलेले आहेत, जे जातकाच्या आयुष्यावर परिणाम करतात. जन्मकुंडलीत शुभग्रहांच्या वेगवेगळ्या स्थितीत कधी राजयोग बनतात, ज्यामुळे जातक वैभवशाली व सुखी काल प्रदान करतात. अशुभ काही अथवा नीच योग तयार होतात, ज्यामुळे जातकास कष्ट व दु:ख भोगावे लागते., त्या त्या कुंडलीच्या दर्जानुसार इष्टानिष्ट फळे जातकास मिळत असतात.

जेव्हा जातक पीडित अवस्थेत दु:खी कष्टी होऊन मार्गदर्शन घेण्यासाठी येतो, तेव्हा माझी नजर एक विशिष्ट योग कुठे कुंडलीत सापडतो का, याचा शोध घेत असते. तो म्हणजे निचभंग राजयोग किंवा विपरीत राजयोग. कारण हा आयुष्याला कलाटणी देणारा असा योग आहे, जो जातकाचे आयुष्य संपूर्णपणे बदलू शकतो.

जन्मकुंडलीत एखाद्या ग्रहाचे नीच राशीत स्थित असणे हा नीच योग मानला जातो. परंतू कधीकधी ग्रह नीच राशीत असुनसुध्दा खूप चांगले फळ देताना आढळून येतात. अर्थात त्याच्या नीच होण्याचा जो दोष आहे, तो नष्ट अथवा भंग पावतो. व चांगले फळ मिळते. म्हणूनच या विशिष्ट ग्रह योगांना निचभंग राजयोग किंवा विपरीत राजयोग असे म्हणतात. या योगांचे कादिदास कृत उत्तर कालामृत, मानसागरी ई. प्राचीन ग्रंथात उल्लेख आहेत. आयुष्यातील कष्ट, संघर्ष, दु:ख संपुष्टात येऊन निचभंग राजयोग किंवा विपरीत राजयोगाची माणसाला संपत्ती, उच्च पद किंवा ज्या पदावर आहे तेथे मान, प्रतिष्ठा, आरोग्य ई. फळे हा योग करणाऱ्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेत प्रभावीपणे मिळतात.

निचभंग राजयोग किंवा विपरीत राजयोग कसा ओळखावा :

जर जन्माच्या वेळी एखादा ग्रह नीच राशीत स्थित असेल आणि

१) या नीच राशीचा स्वामी चंद्रापासून अथवा लग्नापासून केंद्र स्थानी (१,४,७,१० या घरात) असेल.

२) नीच राशी स्थित ग्रह ज्या राशीत उच्चीचा असतो, त्या राशीचा स्वामी, म्हणजे त्याचा उच्चनाथ चंद्रापासून अथवा लग्नापासून केंद्र स्थानी (१,४,७,१० या घरात) असेल.

३) कालिदासकृत ‘उत्तर कालामृत’ ग्रंथ खंड ४ था श्लोक २२ नुसार

१) अष्टमेश व्ययात अगर षष्ठात

२) षष्ठेश अष्टमात अगर व्ययात

३) व्ययेश अष्टमात अगर षष्ठात

या तिन्ही अधिपतींचा कोणत्याही प्रकारे संबंध, अन्योन्य योग, परस्पर दृष्टीयोग, अगर सहवास योग असून त्रिक (६-८-१२) स्थानांच्या स्वामीखेरीज इतर स्वामींचा संबंध नसावा.

मानसागरी या ग्रंथाकारानुसार, जेव्हा

सूर्यामुळे नीचभंग राजयोग तयार होतो, तेव्हा जातकास निरोगी शरीर, सरकारकडून लाभ व दाम्पत्य सुख प्राप्त होते.

चंद्रामुळे नीचभंग राजयोग तयार होतो, तेव्हा जातकास माता किंवा मातेच्या कुटुंबाकडून सौभाग्य प्राप्त होते. नृत्य, संगीत ई. कलेच्या प्रांतात मान सन्मान, प्रसिद्धी मिळते.

मंगळामुळे जेव्हा नीचभंग राजयोग तयार होतो, तेव्हा जातकास नोकरी किंवा मालमत्तेशी संबंधित काम, धन, स्थिर प्रगती, जीवनात आनंद, हुशार, विज्ञानकुशलता  प्राप्त होते.

बुधामुळे जेव्हा नीचभंग राजयोग तयार होतो, तेव्हा जातकास पत्नी आज्ञाधारक, सुंदर, बुद्धिमान आणि उच्च नैतिक प्राप्त होते. मित्रांकडून सौभाग्य प्राप्त होते.

जेव्हा गुरूमुळे नीचभंग राजयोग तयार होतो, तेव्हा जातकास बुद्धिमत्ता आणि ज्ञान वृद्धी, सुंदर जीवनसाथी, सर्वत्र मान-सन्मान ई. प्राप्ती होते.

शुक्रामुळे नीचभंग राजयोग तयार होतो, तेव्हा जातकास पत्नीकडून सन्मान, प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. नेहमी आनंदी, सभेत उत्तम वक्ता, विद्वान, राजकारण कुशलता असेल, मौल्यवान रत्ने ई. प्राप्ती होईल.

शनिमुळे नीचभंग राजयोग तयार होतो, तेव्हा जातक शत्रूंचा नाश करणारा, निरोगी शरीर, आकर्षक चेहरा, सम्राट, स्वतंत्र मनाचा, पत्नीवर आनंदी, स्वजातीच्या लोकांकडून मान-सन्मान मिळवणारा असेल.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment