
बडोद्याचे नामांकित ज्योतिषी श्री. हेमंतजी उपासनी यांची पुणे येथे सदिच्छा भेट.
आयुष्यात शुद्ध आनंद देणारे फार कमी दिवस वाट्यास येतात. आजचा दिवसही असाच सुंदर अनुभव देणारा ठरला. आज दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.५० वाजता बडोदा येथील नामांकित व अष्टक वर्ग तज्ञ ज्योतिषी व आमचे मित्रवर्य श्री. हेमंतजी उपासनी यांचे पुणे येथे माझेकडे आगमन झाले. त्यानंतर २.५० वाजेपर्यंत निखालस गप्पा, एकमेकांचे ज्योतिष ज्ञान व अनुभवाची देवाण घेवाण, काही कुंडल्यांचा एकत्र विविध पद्धतीने अभ्यास, त्यानंतर समीक्षा ताई सोबत व्हिडिओ कॉल वर काही चर्चा असा पर्वणी देणारा काळ होता. त्यानंतर सुजाता मस्तानी चा आस्वाद घेऊन एकमेकांचा निरोप घेतला. हेमंत जी आपण वेळात वेळ काढून भेट घेतली त्याबद्दल धन्यवाद.
असेच योग नेहमी यावेत हीच सदिच्छा 💐😊
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)