वारी


वारी
लागता जेष्ठा ची चाहूल
लागे पालखीची आस
हरीनामा च्या घोषात
मनी विठूचाच ध्यास
नाही कोणा आवतण
ना पत्रिका अक्षत
विठुराया च्या भेटीसाठी
वेड जीवा लागत
निघता माऊलींची पालखी
कसा कळस डोलतो
ज्ञानियाला निरोप देता
कंठ का ग दाटतो
पंढरी च्या वाटेवरी चाले
भक्त जनांचा हो मेळा
दिंड्या पताका झळकती
कधी दिसेल विठू डोळा
भजन कीर्तनाची गोडी
साखरेहूनी गोड
विठू च्या नामघोषाला
त्या फुगडी ची जोड
अश्व घालती रिंगण
सोहळा तो वाखरीत
वारकरी होती दंग
भक्ती भावा च्या रंगात
विठू च्या नामघोषात
दुमदुमली पंढरी
हरिनामा च्या गजरात
रंगली वैखरी
विठुराया च्या दर्शनाने
होई वारी ची सांगता
माहेरा च्या भेटीने होते
मनास शांतता
विठू आमची माऊली
आम्ही तिची लेकरं
कृपावंत हो विठाई
घाली मायेची पाखर.

सौ मंजिरी

(संग्रहित कविता)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment