
विषय : संभाव्य जोडीदाराचे उत्पन्न साधन
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : प्रेडिक्टिंव्ह स्टेलर अस्त्रोलोजी
सौजन्य/आभार : कृष्णमुर्ती सर
नमस्कार,
पूर्वीच्या काळी विवाह जमवताना मुलगा खात्या पित्या घरातील आहे, एवढे पुरेसे असे. तो कोणता नोकरी/व्यवसाय करतो. किती कमावतो या गोष्टी तशा दुय्यम समजल्या जायच्या. पण जसा काळ बदलला, तसा तसा जोडीदाराच्या कमाई बाबतचा दृष्टीकोन सुद्धा बदलत गेला. आज मुलगा असो वा मुलगी दोघे ही शिकलेले व कमावणारे असतात. एखादी मुलगी गृहिणी असू शकते, पण तिची अपेक्षा सुद्धा जोडीदार चांगले पैसे कमावत असावा ही अपेक्षा बाळगून असते. आजच्या महागाईच्या काळात जगायचे तर पैसा हवा हे सत्य आहे.
बरेच पालक कुंडलीत विवाह योग कधी आहे हे पाहताना, संभाव्य जोडीदाराचे उपन्न साधनाविषयी हमखास प्रश्न असतोच.
म्हणून आज हाच विषय घेऊन लिहायच ठरवलं.
पारंपारिक ज्योतिष शास्त्रात आपल्याकडे ४ त्रिकोनांना फ़ार महत्व आहे.
१. धर्म त्रिकोन ( १ ५ ९ ) : तुमचे धर्म कार्य, कर्तव्य याबाबतीत तपासावयाचा त्रिकोन
२. अर्थ त्रिकोन ( २ ६ १० ) तुमचे धनप्राप्तीचे योग, प्रयत्न व कर्म याबाबतीत तपासावयाचा त्रिकोन
३. काम त्रिकोन ( ३ ७ ११ ) तुमचे वैवाहिक, सांसारिक आयुष्य याबाबतीत तपासावयाचा त्रिकोन
४. मोक्ष त्रिकोन ( ४ ८ १२ ) तुमचे निवृत्ती, मोक्ष याबाबतीत तपासावयाचा त्रिकोन
यावरुन तुमच्या लक्षात आले असेलच की आपल्याला जोडीदाराचा अर्थ त्रिकोन तपासणे आर्थिक बाब पाहताना तपासणे आवश्यक ठरते.
अर्थ त्रिकोन हा २ रे, ६ वे, १० वे स्थान मिळून तयार होतो. या तीन ही स्थानात नव पंचम वा शुभ पंचम योग तयार होतो. म्हणजेच प्रत्येक स्थान हे एकमेकांकडून ५ वे व ९ वे येते. मुळात त्रिकोनाचे वैशिष्ट्य हे असते की या स्थानातील प्रत्येक राशीची सुरुवात ही समान तत्वाचे नक्षत्र भावारंभास येते. उदा. मेष मधील अश्विनी या केतुच्या भावारंभाने सुरुवात झाली तर ५ वी रास सिंह व ९ वी धनू या तीनही राशींची सुरुवात केतूच्या नक्षत्रानेच होते. त्यामुळे समन्वय साधला जातो.
सप्तम स्थान आयुष्याचा जोडीदार दर्शवते. जोडीदाराचा अर्थ त्रिकोण तपासताना सप्तम स्थान हे लग्न स्थान मानून आपल्याला कुंडलीचा अभ्यास करावा लागेल.
आता एक एक स्थान क्रमा कमाने आपण ‘बघू या.
२ रे स्थान (सप्तम पासून दुसरे म्हणून अष्टम स्थान) : या स्थानाचे नाव धन स्थान असे आहे. आर्थिक स्थिती कशी असेल? धनलाभ अथवा धनहानी केव्हा संभवते हे या स्थानावरून समजते.
६ वे स्थान (सप्तम पासून सहावे म्हणून व्यय स्थान) : या स्थानाचे वरुन धनप्राप्ती साठी करत असलेले प्रयत्न समजतात. हे एक संघर्षाचे स्थान आहे. प्रयत्न केल्या शिवाय धनप्राप्ती होणे फार अवघड आहे. नोकर किंवा नोकरी या स्थानावरुन पाहतात.
१० वे स्थान (सप्तम पासून दहावे म्हणून चतुर्थ स्थान) : या स्थानास कर्मस्थान म्हणतात. तुम्ही करत असलेले कर्म अथवा कर्माकडे असलेला नैसर्गिक ओढ या स्थानावरून समजते.
११ वे स्थान (सप्तम पासून अकरावे म्हणून पंचम स्थान) : या ३ स्थानां बरोबरच ११ वे स्थान देखील पाहिले जाते. तुमची धनप्राप्तीची शक्यता, प्रयत्न व योग्य कर्म यांच्या लाभाचा विचार या स्थानावरून केला जातो.
वरील मुख्य स्थानांबरोबरच १ ले (सप्तम पासून पहिले म्हणून सप्तम स्थान) व ९ वे स्थान (सप्तम पासून नववे म्हणून तृतीय स्थान) तपासणे देखील गरजेचे असते.
१ ले स्थान जे लग्नस्थान म्हणुन संबोधले जाते, या वरुन तुमचे व्यक्तिमत्व व प्रतिमा लक्षात घेतली जाते तर ९ वे स्थानावरुन भाग्य व कीर्ती पाहिली जाते. व्यक्तिमत्वाची व भाग्याची साथ असेल तर आर्थिक उन्नती साठीच्या कष्टांना व प्रयतांना नक्कीच बळ प्राप्त होईल.
तात्पर्य संभाव्य जोडीदाराचे उपन्न साधन बघताना ४ ८ १२ व ५ या स्थानाचा विचार करा
तसेच १, ५, ९ ही अर्थ त्रिकोनाची व्यय स्थाने असल्याने, ती जास्त बलवान असतील तर नोकरी व्यवसायात वा कामाच्या स्वरूपात बदल संभवतो. संभाव्य जोडीदाराच्या बाबतीत ही ३ ७ ११ हे स्थाने व्यय स्थाने नोकरी व्यवसायातील बदलाचे कार्येश ठरतील.
या जोडीला नकारात्मक स्थाने म्हणून ८ वे व १२ वे स्थानाचे अवलोकन करणे गरजेचे आहे. संभाव्य जोडीदारासाठी २ ६ हे नकारात्मक स्थाने असतील.
८ वे स्थान (मृत्यू स्थान) (सप्तम पासून आठवे म्हणून २ रे स्थान) : धनहानी व दूर्भाग्य दर्शवते. (८ वे स्थान अकस्मिक धनलाभ वा सासर द्वारे धन लाभ ई. सुद्धा दर्शवते )
१२ वे स्थान (व्यय स्थान) (सप्तम पासून बारावे म्हणून ६ वे स्थान) : खर्च, नुकसान दर्शवते.
परिक्षण करताना या स्थानातील राशी, त्यांचे अधिपती कोण व ग्रह कोणत्या स्थानात वा भावात स्थित आहेत, भावारंभावर कोणते नक्षत्र व राशी आहेत, कार्येश ग्रह स्वभाव व कोणत्या व्यवसायाचे कारक आहेत ते तपासावे. (उदा. गुरु वाढ दर्शवतो, शनी संकुचित फळ वा विलंब ई., दृष्टी व योग अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून, मग उप्तन्नाचे साधन निश्चित करा.
कृष्णमुर्ति पद्धतीनुसार ४ ८ १२ वे भावाचे अधिपति ग्रहांचा नक्षत्र व उपनक्षत्रातील स्थित ग्रह, या भावातील स्थित ग्रहई. गोष्टी तपासाव्यात.
तसेच हा अर्थ त्रिकोण कोणत्या स्थानांशी संबंधित आहे, हे पण तपासणे गरजेचे असते. उदा. अर्थ त्रिकोण ५ वे स्थानाशी संबंधित असेल, तर एखादा कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्र संबंधित नोकरी व्यवसायात असू शकतो. ८ वे स्थानाशी संबंधित असेल, तर तांत्रिक वा गूढ शास्त्र ई क्षेत्राशी संबंधित असू शकतो. १२ स्थान बहुराष्ट्रीय कंपनी, इस्पितळ, सेवा भावी संस्था ई. दर्शवत असल्याने तत्संबंधी क्षेत्रात कार्यरत असू शकतो.
जर पुरुष जातकाच्या कुंडली मधे जर ४ ८ १२ स्थान कारक ग्रहा मधे मंगळ असता, त्याची पत्नी व्यवसाय करणारी असू शकते. जर स्त्री जातकाच्या कुंडली मधे जर ४ ८ १२ स्थान कारक ग्रहा मधे शुक्र असता, त्याची पती व्यवसाय करणारा असू शकतो.
त्याजोडीला जातकाची मानसिकता व व्यक्तिमत्व याचा अभ्यास करण्यासाठी लग्न व चंद्र तपासावे.
या कार्येश व कारक ग्रहांच्या दशा अंतर्दशेत गोचर ग्रहांच्या स्थितीनुसार अनुकूल वा प्रतिकूल परिणाम प्राप्त होतात.
एखादा जाणकार ज्योतिषी या सर्व बाबी विचारात घेऊन आर्थिक स्त्रोत कसा असेल, या बाबत योग्य मार्गदर्शन व आवश्यक उपाय वा तोडगे सुचवू शकतो.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)