राशीचक्राचे अंश स्वरूप (मिथुन)


विषय : राशीचक्राचे अंश स्वरूप मालिका (मिथुन अंश स्वरूप)

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : सुलभ जातक

मुळ लेखक/आभार : ज्यो. विष्णू गोपाळ नवाथे

नमस्कार,

जसे आपल्या भारत देशात अनेक व्यासंगी, ज्ञानी व नामांकित ज्योतिषी होऊन गेले. तसेच पाश्चात्य देशांतही अनेक उत्तम ज्योतिष अभ्यासक होऊन गेले. आपल्या कडील जैमिनी ऋषींनी जशी ज्योतिष शास्त्रीय तत्वे गूढ भाषेत सूत्रबद्ध केली. तसे चारुबेल, सेफारिअल, राफेल या पाश्चात्य ज्योतिष अभ्यासकांची नावे डोळ्यासमोर येतात, ज्यांनी चित्र वर्णनात्मक भाषेत ३६० १६ व्या शतकामध्ये झालेल्या जोन आंग्ले या आंग्ल अभ्यासकाने केलेले अंश वर्णन राफेल याने “द फेसीस एन्ड डिग्रीज ऑफ झोडिआक” या पुस्तकात अंशाच्या राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत. “द डिग्री ऑफ झोडिआक सिम्बोलाईज्द” या पुस्तकात चारुबेल आणि सेफ़ारिअल यांनी १८९८ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत.

त्याचे रुपांतर पूर्वीचे नामांकित ज्योतिषी कै.विष्णू गोपाळ नवाथे यांनी त्यांचे १९२९ साली प्रकाशित झालेल्या सुलभ जातक या ग्रंथ मालिकेतील चतुर्थ खंडात दिलेले आहे. अर्थात त्या वर्णनांचा मतितार्थ हा प्रत्येक जन आपली तर्कबुद्धी प्रमाणे घेत असतो. त्यामुळे अर्थामध्ये मत मतांतरे असू शकतात.

प्रत्येक लग्नांश साधारण ४ मिनिटाने बदलतो. या पुस्तकात दिलेली अंश वर्णने व ज्यो. नवाथे यांनी केलेले रुपांतर पाश्चात्य पद्धतीची असल्याने ती सायन राशिना लागू होतात. त्यामुळे सायन कुंडलीनुसार फळे पडताळून पहावीत.

आज आपण राशिचक्रातील मिथुन मधील प्रत्येक अंशाचे स्वरूप पाहणार आहोत.

१. मिथुन अंश स्वरूप

अंश १ ला

राफेल : दोन पुरुष एकमेकाचा हात धरून जमिनीवर बसलेले आहेत.

चारुबेल : काळ्या पदार्थावर एक अंडाकृति आकाराचे पांढरे चित्र.

सेफारिअल : पिवळ्या रंगाची दोन फुले जी विस्तृत वृक्षाच्या छायेत उमलली आहेत.

अंश २ रा

राफेल : ज्याच्या कंबरेला तलवार आहे असा पुरुष दोन नग्न पुरुषाना बांधून नेत आहे.

चारुबेल : पुष्कळ लांब व निमुळते चौकोनी नळीप्रमाणे आकार ज्याच्या आतल्या बाजूला प्रकाश आहे, परंतु तो कोठून येतो हे सांगता येत नाही.

सेफारिअल : एक पुरुष दोरीच्या शिडीने भिंतीवर चढत आहे. त्याने दातात तलवार धरली असून हातात बंदूक आहे.

अंश ३ रा

राफेल : तंतुवाद्य वाजवीत असलेला व गाणारा पुरुष.

चारुबे; : एक मोठा खांब, त्याच्यातून पुष्कळशा नळ्या काढलेल्या असून त्यांच्यावर पुष्कळ माती पडलेली आहे. त्यावर एक इमारत आहे व आसपास एक खडकाळ कोट आहे. हा खांब त्या इमारतीचा आधारस्तंभ आहे.

सेफारिअल : खडकाळ किनाऱ्यावर पाय देऊन उभा असलेला एक पुरुष. कंबरेला एक वाद्य उटकत आहे व कसले तरी गायन ऐकत आहे.

अंश ४ था

राफेल : एक पुरुष आपल्या स्त्रीचा हात धरून नेत आहे.

चारुबे; : ज्याचा एकच डोळा दिसत आहे असा एका बाजूने काढलेला चेहरा.

सेफारिअल : प्रधानाप्रमाणे पोषाख केलेला दयार्द्र असा पुरुष

अंश ५ वा

राफेल : ज्याच्या डाव्या हातात धनुष्य व उजव्या हातात कंबरेला बांधण्याचा पट्टा आहे.

चारुबेळ : बांधेसूद शरीर, डोळे काळेभोर व भुवया कमानदार असा सुंदर पुरुष.

सेफारिअल : अरण्यात उमे असलेले दोन पुरुष युद्ध करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या मध्यभागी मौल्यवान जांभळ्या रंगाचा, कलाकुसर केलेला पोषाख व रत्नाचा करंडा आहे.

अंश ६ वा

राफेल : उजव्या हातात तराजू धरलेला पुरुष.

चारुबेल : जनावराचा अव्यवस्थित समुदाय. ज्यात गुरे, डुकरे, मेंढरे, कोंबडी, बकरी, बदके वगैरे प्राणी आहेत. सेफारिअल : जिच्या एका हातात पुस्तक व दुसऱ्या हातात तराजू आहे अशी एक स्त्री.

अंश ७ वा

राफेल : हातात हात घातलेल्या दोन स्त्रिया.

चारुबेल : या अंशात काहीच चिन्ह दिसत नाही.

सेफारिअल : शांततामय अशी पर्वतातील खिंड. तेथे एक सरोवर व त्यात एक हंस पोहत आहे. मागच्या बाजूला अति उंच पर्वत आहे.

अंश ८ वा

राफेल : एक लोहार लोखंडावर घण मारीत आहे. जवळ एक बाई उगीच उभी आहे.

चारुबेल : फार मोठे ऑफीस असून त्यात डेस्कजवळ काम करीत असलेला व खात्यात काही लिहीत असलेला एक मनुष्य आहे.

सेफारिअल : रात्री आग लागलेले घर.

अंश ९ वा

राफेल : सिंहासनावर बसलेला राजा. उजव्या हातात पृथ्वीचा गोल व डाव्या हातात राजदंड.

चारुबेल : स्वर्गात मार्ग काढता येत नाही असा चक्रव्यूह असून तेथून रुप्याची एक तार पृथ्वीपर्यत लोंबत आहे.

सेफारिअल : एका हातात पृथ्वीचा गोल व दुसऱ्या हातात राजदंड असलेली स्त्री.

अंश १० वा

राफेल : जमिनीवर पडलेल्या एका पुरुषाला दुसरा पुरुष उचलीत आहे.

चारुबेल : जमिनीतून उगवणारा एक मोठा वृक्ष असून त्याची वाढ प्रत्यक्ष दिसत आहे.

सेफारिअल : आनंदी दिसणारी बाई जवळ उभ्या असलेल्या मुलाला काचेच्या पेल्यात काही पेय देत आहे.

अंश ११ वा

राफेल : एक गरुड आपल्या तीन पिलांवर पंख फडकावीत आहे,

चारुबेल : एक त्रिकोण ज्याच्या प्रत्येक कोनावर चक्र आहे.

सेफारिअल : भटकत असणाऱ्या लोकांची एक टोळी (काही गुप्त विद्या साध्य असून त्या विद्येवर उपजीविका करणारे आहेत. त्यांना घरदार नाही. एक मोठे भांडे शिजत आहे व त्याच्या भोवती हे लोक बसले आहेत.

अंश १२ वा

राफेल : रडत असलेल्या दोन स्त्रिया उभ्या आहेत.

चारुबेल : दोन माणसे एका क्रेनचा (वजन उचलण्याच्या यंत्राचा) हँडल फिरवीत आहेत. त्या यंत्राचा साखळदंड व आकडा एका मोठ्या दगडाला बांधलेला आहे.

सेफारिअल : लहानसे फुलझाड वाऱ्याने मोडलेले व तसेच सुकलेले आहे.

अंश १३ वा

राफेल : जमिनीवर ठेवलेले तीन मुकुट.

चारुबेल : पुष्कळशा पायऱ्या. जिन्यावर जिना असून मध्ये उभी राहण्याची जागा आहे. त्या जागेवरून दुसऱ्या जिन्याने वर कोठेही जाता येत नाही.

सेफारिअल : चांदण्यात दोन लांडगे एका मेलेल्या जनावरावर तुटून पडत आहेत.

अंश १४ वा

राफेल :- कोंबड्या खात असलेले दोन कोल्हे.

चारुबे; : पुष्कळसे चतुष्कोणी आकार. ते सर्व लघुकोनाचे आहेत. अशा चौकोनांवर दोन दोन त्रिकोण ठेवलेले आहेत. अशा रीतीने त्यांचा एक घन ठोकळा झाला आहे.

सेफारिअल : रात्रीच्या समयी एका झाडाच्या छायेत तोंडावर बुरखा घेऊन बसलेला मनुष्य. त्याच्या पायाशी एक मृत गाय आहे.

अंश १५ वा

राफेल : तीन हात असलेला एक पुरुष

चारुवेल : जमिनीवर शीघ्र गतीने वाहणारा प्रवाह.

सेफारिअल : लहान लहान जळाऊ लाकडांचे एक बंडल घेतलेली, केश मोकळे असून ते वाऱ्याने पसरलेले आहेत व काही तरी शोधाच्या नादात आहे अशी स्त्री.

अंश १६ वा

राफेल : पाण्याच्या बाजूला असलेला पूल. (पूल एका बाजूला व पाणी दुसऱ्या बाजूला.)

चारुबेल : मंगलोरी कौलासारख्या दगडांनी छप्पर शाकारीत असलेला एक मनुष्य. दुसरा एक मनुष्य उंच शिडीने त्याला ती कौले देत आहे.

सेफारिअल : टांचेवर बसलेला एक मनुष्य घणाने दगड फोडीत आहे.

अंश १७ वा

राफेल : हात नसलेला पुरुष

चारुवेल : एका मोठ्या चतुष्कोणांत १२ लहान चतुष्कोण आहेत. (धर्मोपदेशकाच्या छातीवर असे संरक्षक चिन्ह असते.)

सेफारिअल : एक मातीची फुटलेली घागर जमिनीवर पडली आहे व तिच्या आसपास पुष्कळशी फळे पडली आहेत.

अंश १८ वा

राफेल : चपळतेने धावत असलेला कोल्हा.

चारुबेल : या अंशात ६ व्या अंकाचे प्राबल्य आहे.

सेफारिअल : जलद गतीने जाणारा असा सोडलेला बाण.

अंश १९ वा

राफेल : खांद्यावर दंड घेतलेला एक गरीब मनुष्य.

चारुबेल : रिकामी जागा

सेफारिअल : उदास असलेली एक उभी बाई स्तन आपल्या केसांनी झाकीत आहे.

अंश २० वा

राफेल : जमिनीवर पडलेले तीन सर्प.

चारुबेल : सोनेरी फळाने छादलेला तांबडा वृक्ष.

सेफारिअल : दोन उभी माणसे पोषाख नीटनेटका करीत आहेत.

अंश २१ वा

राफेल : घोड्यावर बसलेला पुरुष

चारुबेल : अतिशय बर्फ पडत असून एक वाटसरू पुरुष आडोसा मिळण्याच्या आशेने इकडेतिकडे शोधात आहे. पण वादळ वाढतच जाऊन अंधार पडल्याने गोंधळून गेला आहे.

सेफारिअल : एक तरुण पुरुष.

अंश २२ वा

राफेल : दोन पक्षी आवाज काढीत आहेत.

चारुबेल : तेजःपुंज सूर्य क्षितिजावर येत आहे. बाकीच्या आकाशात काळे मेघ पसरले आहेत. रात्रीचा अंत झाला असताही तिचा थोडा भाग शिल्लक आहे असा भास होत आहे.

सेफारिअल : एक तरुण स्त्री झाडाखाली लोळत आहे व पक्ष्यांना अन्नाचे तुकडे टाकीत आहे. त्यामुळे पुष्कळसे पक्षी जमा होत आहेत.

अंश २३ वा

राफेल : एक अशक्त म्हातारा काठीवर भार टाकून उभा आहे.

चारुबेल : निर्जन प्रदेशात उभा राहून रडत असलेला मनुष्य.

सेफारिअल : अतिशय जुना असा ओक वृक्ष ज्याच्यावर पालवी नाही, साल नाही असा विस्तीर्ण मैदानात एकटाच आहे व त्याच्यावर वादळामुळे भेगा पडल्या आहेत.

अंश २४ वा

राफेल : दोन बायका एका ठिकाणी खेळत आहेत.

चारुबेल : एक हरीण

सेफारिअल : पुष्कळ लहान लहान पक्षी आवाज काढीत आहेत व पंखांनी धूळ उडवीत आहेत.

अंश २५ वा

राफेल : हातात उघडे पुस्तक घेतलेला पुरुष.

चारुबेल : एक मोठा फुगा.

सेफारिअल : एक टेवलावर उघडे ठेवलेले पुस्तक. बाजूला एक दिवा लावलेला आहे.

अंश २६ वा

राफेल : दोन भांडत असलेले कुत्रे.

चारुबेल : एक मोठा दिवाणखाना असून त्यात पुष्कळ मौल्यवान् सामान ठेविले आहे व कित्येक आरसे लावलेले आहेत.

सेफारिअल : बाजाराची जागा. तेथे पुष्कळसे तरुण भांडत आहेत व मारामारीने आपली मते मांडत आहेत.

अंश २७ वा

राफेल : रडत असलेली बाई.

चारुबेल : एक मोठा दिवाणखाना. छतावर सोनेरी रंगाचा तारा काढलेला आहे.

सेफारिअल : एक तरुण मनुष्य ज्याचे केश विखरलेले असून समुद्राच्या किनारी एका खडकावर बसून रडत आहे.

अंश २८ वा

राफेल : दोन मोठाले पोळ. एक लहान व दुसरा मोठा.

चारुबेल : एक सरदाराचा वाडा. त्याच्या आसपास बाग आहे व त्यात मोठाले वृक्ष आहेत.

सेफारिअल : शेतकीला लायक विस्तृत असा प्रदेश.

अंश २९ वा

राफेल : तीन कुत्रे. दोन एका बाजूला व तिसरा उलट दिशेला धावत आहे.

चारुबेल : घोड्याच्या चाबकाने एका मुलाला मारीत असलेला मनुष्य.

सेफारिअल : उदास आकाश, वर ढग आले आहेत व काळ्या पक्ष्यांचे कळप वाऱ्याच्या विरुद्ध पंख उडवीत आहेत.

अंश ३० वा

राफेल : दोन पुरुष. प्रत्येकाच्या हातात साखळीने बांधलेले कुत्रे आहेत.

चारुबेल : कोणाला तरी फाशी देत आहेत.

सेफारिअल : निर्जन रस्त्यातून जात असलेली मेंढी व तिच्या मागे लागलेला एक कोल्हा.

मिथुन अंश फलसार

१ आयुष्य भरभराटीत जाईल. थोरांचा आश्रय मिळेल व गृहसौख्य उत्तम मिळेल.

२ पराक्रमी, आपल्या कर्तृत्वाने उदयास येणारा व पारलौकिक गोष्टींचा विचार करणारा.

३ करारी स्वभाव, एखाद्या संस्थेचा चालक, कल्पनाशक्ति उत्तम, मान्यता मिळेल.

४ निरीक्षणशक्ति उत्तम, मान्यता मिळेल,

५ चारुबेलच्या मते या अंशावर मनुष्य बहुगुणी होतो.

६ बुद्धिमान्, विद्वान्, सभ्य, श्रीमंत, नीतिमान् व सारासार विचार करणारा.

७ चारुबेलला या अंशांतले गूढ उकलले नाही. सेफारिअलच्या मते अति शांत स्वभाव, सुखी व स्मरणशक्ति उत्तम.

८ लोकात भांडणे लावील व आपण अडचणीत येईल.

९ ज्ञानसंपन्न, सत्ताधारी, स्वाभिमानी व गहन कोडी उकलणारा.

१० विलक्षण उत्साहशक्तीचा, ममताळू, जे काम हाती घेईल त्यात यश मिळवणारा.

११ हा अंश असामान्य स्वभावाचा आहे. नेहमी काही तरी नवीन संधि शोधण्याच्या कामांत गुंतलेला.

१२ हा अंश चांगल्या गुणांचा आहे. चारुबेलच्या मते यंत्रशास्त्रज्ञ होतो.

१३ लोभी, सूड उगवणारा, उच्च महत्त्वाकांक्षा परंतु अस्थिर चित्ताचा.

१४ पैसा मिळविण्यासाठी वाटेल ते उपाय योजणारा.

१५ आवाक्याबाहेर कामे करणारा. सर्व आयुष्य घोटाळ्याचे.

१६ चांगल्या कामांत उत्तेजन देणारा, श्रम पुष्कळ पण फळ अल्प.

१७ जादूगार, अव्यवहार्य कामे करणारा व दुसऱ्याच्या हातून कदाचित मृत्यु.

१८ उच्च महत्त्वाकांक्षा, अवलोकनशक्ती उत्तम, व कर्तृत्ववान्.

१९ दुःखमय आयुष्य.

२० दुःखमय आयुष्य.

२१ अध्यात्मवादी, स्वप्ने व दृष्टांत यांवर विशेष भरंवसा व मोठ्यांचा मित्र.

२२ दुर्दैवी, परावलंची व बेपर्वा वागणूक.

२२ आकांक्षा अतृप्त राहतील व काव्यगायनाचा शौकीन.

२३ निरुत्साही, त्याचे नातेवाईक व मित्र सोडून जातील व पुष्कळ संकटे येतील.

२४ कलाप्रिय, आनंदी, निःस्वार्थी व प्रेमी.

२५ मानसिक शक्ति उत्तम. दीर्घ प्रयत्नाने जगामध्ये महत्त्वाची गोष्ट घडवून आणील.

२६ कलहप्रिय व ठराविक चाली पाळणारा.

२७ सदा उद्विग्न चित्त. कृत्रिम सौंदर्याचा भोक्ता.

२८ बिद्वान, आनंदी स्वभाव व खेड्यातील आयुष्याचा शोकीन.

२९ निराशा, अनेक प्रकारच्या विचारांत गर्क पण चित्ताची चलविचल.

३० चारुबेलच्या मते दुसऱ्याच्या अपराधाबद्दल शिक्षा भोगीट. विश्वासघातकी.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment