विंशोत्तरी दशावर्ष व्युत्पत्ती


विषय : विंशोत्तरी दशावर्ष व्युत्पत्ती

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : ज्योतिष तत्व दर्शन (१९४३)

मूळ लेखक : ज्यो.शंकरदादा शास्त्री (राज ज्योतिषी, ग्वाल्हेर)

नमस्कार,

विंशोत्तरी दशा हा वर्षानुवर्षे माझा अभ्यासाचा, अनुभवाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या विषयावर कुठे काही लिहिलेले आहे का याच्या सतत शोधातच असतो. मराठी व इतर साहित्यात दशाफळांची भरभरून वर्णने लिहिलेली आढळतात. पण या पुरातन भविष्य कथन पद्धतीच्या व्युत्पत्तीविषयी मात्र लिखाण मात्र अगदी नाही म्हणण्या इतके आहे. असेच वाचत असताना अगदी पत्रावळ्या झालेले काही जीर्ण कागद (पुस्तक) माझ्या माझ्या हाती लागले.  

आणि खजिना सापडल्याचा आनंद झाला. कारण त्यामध्ये मध्य पाराशारीतील एक संस्कृत श्लोक होता, जो विंशोत्तरी दशांची वर्षसंख्या कशी उत्पन्न झाली याचे वर्णन विषद करत होता. त्याचे विवेचन येथे देत आहे. ही मौलिक माहिती आपणास नक्की आवडेल.

आदित्यचंद्रकुजराहु सुरेशमंत्रीमंदज्ञकेतुभृगुजा नव कृत्तिका द्याः

तेनो नय सीन दया तट धन्य सेव्य सेना नरा दिनकरादि दशाब्द संख्या ॥ १ ॥

कादयोंकाष्ठावयोंका पाद्या पंच प्रकीर्तिर्ता, पादयोष्ठौतथा प्राज्ञः गणकैः बुद्धिमत्तरैः ॥२॥

याचे विश्लेषण सोबत तयार केलेल्या कोष्टकांमध्ये दिले आहे, ज्यात कंसात त्याचा दर्शक अंक दिला आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment