
स्वामी एकदा एका गृहस्थाशी चर्चा करत असतात.
गृहस्थ : स्वामी, तुम्ही म्हणता देव सर्वत्र आहे. मग तो खरेपणात आहे तसा खोटेपणात ही असायला हवा.
स्वामी : हो, तुम्ही पूर्ण सत्याने वागल्यास देव भेटेल, तसा पूर्ण खोटे वागल्यास ही भेटेल.
पण पूर्णपणे खोटे वागणे हे आपल्याला जमत नाही हीच तर आपली अडचण आहे.
यावर त्या गृहस्थाने खोटे बोलण्याची, खोटेपणाने वागण्याची पैज लावली.
गृहस्थ : मी आतापासून आठ दिवस तुमच्याशी खोट बोलेन. मला देव भेटायला हवा.
स्वामींनी ते कबूल केले.
गप्पा मारता मारता जेवणाची वेळ झाली.
स्वामी : चला आपण जेवून घेऊ या. तुम्हाला भूक लागली असेल, ना?
गृहस्थ : होय. भूक लागली आहे खरी.
दोघेहि जेवायला बसले, पण फक्त स्वामींच्या पानात अन्न वाढले गेले. संध्याकाळी हीच तन्हा. दुसऱ्या दिवशीही तसेच. भूक लागली नाही म्हणावे, तर स्वामी म्हणतील ठीक आहे, मी जेवून येतो. भूक लागली म्हणून सांगितले तर म्हणतील, तुम्ही खोटे बोलता.
तिसऱ्या दिवशीही तोच प्रकार घडल्यावर त्या गृहस्थाची सहनशक्ती संपली. गृहस्थ : स्वामी मी पैज मागे घेतो. मी पूर्ण खोटेपणाने वागू शकणार नाही पण मला जेवायला द्या. मला खरेच भूक लागली आहे. स्वामी ऐकेणात हे पाहून ते गृहस्थ आश्रमातून पळून गेले.
आपल्या रोजच्या व्यवहारात आपण खरेपणानेही वागत नाही की खोटेपणानेही. खोटेपणाने वागण्याचा मोह होतो, पण वाईट कर्माची शिक्षा मिळेल याची भीती वाटते. वाईट वागायचं तर इतके वाईट वागा की, प्रत्यक्ष देवाला तुमचे निर्दालन करण्यासाठी यावे लागेल.
रावणाचा संहार करण्यासाठी रामाने व कंसाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जन्मले. रावण व कंस या दोघांनाही मुक्ती मिळाली. जमेल का आपल्याला, नाही ना?
मग निदान खरेपणाने वागू या. जगात सद्गुणी माणसे आहेत म्हणून जग सुरळीत चालले आहे. नाहीतर केव्हाच नष्ट पावले असते.
मग आजच निश्चय करा खरे वागण्याचा आणि आचरणात आणा. मग समाधान, शांति व आनंदाचा दिवस दूर नाही.
शुभं भवतु 🙏
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)