
विषय : प्रश्नत्रिकोण ठोकताळा पद्धत
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : प्रश्नज्योतिष
नमस्कार,
भविष्यात घडू पाहणार्या संभाव्य घटनेविषयी जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच बहुतेक सर्वांना राहिली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रणालींचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. मग तो क्रिकेट सामन्याचा निकाल असो, हवामान खात्याचा अंदाज असो, निवडणूक पूर्व अंदाज असो इथपासून व्यक्तिगत जीवनातील समस्या, विवाह योग ई. असो. ज्योतिष शास्त्रात देखील अशा अनेक पाध्ती उदयास आल्या. प्रश्न ज्योतिष या प्रांतात अनेक दिग्गज ज्योतीषाचार्यांनी अनेक प्रकारे उत्कृष्ट पूर्वीपासून काम केलेले आहे.
आज आपण अशाच एका अंकशास्त्र व होराशास्त्र यांचे मिश्रणावर आधारित माहित पडलेली एक जन्म कुंडली ई.ची काही आवश्यकता नसलेली एक ठोकताळा मांडण्याची ५ मिनिटात अंदाज देणारी एक पद्धत पाहणार आहोत.
यासाठी माहित हवी ती नऊ ग्रहांच्या गुणधर्म स्वभावाची माहिती. कारण प्रश्नत्रिकोण पद्धत ही प्रधानतः आकडेशास्त्रावर आधारित असली, तरी प्रश्नांची उत्तरे ग्रहांच्या गुणधर्माप्रमाणेच द्यावी लागतात.
प्रश्नवेळेनुसार प्रश्नत्रिकोण कसा मांडावा व त्यात ग्रह कसे मांडण्यासाठी तसेच उत्तरे अचूक येण्यास खालील गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे.
(१) वेळ पाहण्याचे घड्याळ रेडिओ टाईमप्रमाणे असावे. (अचूक वेळ)
(२) प्रश्न पाहण्याची वेळ उत्स्फूर्त असावी. अगोदर वेळ ठरवून त्यानुसार दिलेले उत्तर चुकण्याचीच जास्त शक्यता असते.
(३) उत्तर बघताना तुमचा शुद्ध भाव व सकारात्मकता खूप महत्वाची आहे.
प्रश्नत्रिकोण मांडण्याची पद्धत :
१) कोणी एखादा प्रश्न विचारताच वेळ पाहा. वेळ पाहण्यात मिनिटेही बरोबर पाहणे आवश्यक आहे. नाही तर उत्तर बरोबर येणार नाही.
समजा, प्रश्न सकाळी ६ वाजून ०२ मिनिटांनी विचारला गेला आहे.
२) आता कागदावर एक ठसठशीत त्रिकोण काढा.
३) आता त्रिकोणाच्या पायाच्या डावीकडील कोनात ६ हा आकडा मांडा व दुसर्या कोनात मिनिटांचा एकांक २ (०+२) हा मांडा.
४) त्रिकोणाच्या वरच्या कोनात तास व मिनिटे यांच्या बेरजेचा एकांक मांडा. (६+०+२=८)
५) आता १०८ या संख्येतून हा वरील कोनातील आकडा बजा करा व त्याचा एकांक त्रिकोणाच्या मध्यात मांडा. हा आकडा १ येतो. (१०८-८=१००=१)
६)आता नऊ ग्रहाचे खालील प्रमाणे आकडे लक्षात ठेवा म्हणजे आपला त्रिकोण पुरा करता येईल.
चंद्र (८) : मंगळ (५) : बुध (१) : गुरु (४): शुक्र (६): शनी (३): रवी (२) : हर्षेल (९) : नेपच्यून ७) आता बरील प्रश्नत्रिकोणात मांडलेल्या आकड्यांऐवजी त्यांचे दिग्दर्शक ग्रह लिहा. तुमचा पूर्ण त्रिकोण आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसेल.
हा झाला प्रश्न त्रिकोण तयार.
प्रश्नत्रिकोणाबाबत महत्वाच्या गोष्टी :
१. सकाळी ६ ते दुपारी १२.५९ वाजेपर्यंत त्रिकोणातील पायाच्या डाव्या बाजूकडील, कोनात असणारा ग्रह प्रभावी असतो.
२. सकाळी ६ ते दुपारी १२.५९ वाजेपर्यंत उजवीकडील ग्रह बलहीन असतो.
३. दुपारी १ पासून ५.५९ वाजेपर्यंत पायाच्या डाव्या बाजूकडील, कोनात असणारा ग्रह बलहीन व पायाच्या उजव्या बाजूकडील, कोनात असणारा ग्रह बलवान असतो.
४) मध्ये असलेला ग्रह सर्वात महत्त्वाचा असतो व त्या ग्रहावर पायाच्या वरील कोन असणारा ग्रह पूर्ण दृष्टीने पहातो.
५) या १२ तासांच्या कालावधीतच या पद्धतीने उत्तर द्यावे असा शास्त्र संकेत आहे.
६) नऊ ग्रहांपैकी शनी व मंगळ हे दोन ग्रह अशुभ समजावेत व चंद्र, बुध, गुरु, शुक्र व रवी हे ग्रह शुभ समजावेत. हर्षेल या ग्रहाचे गुणधर्म मंगळ ग्रहाप्रमाणेच आहेत. पण तो ज्या ग्रहाशी संबंधित असतो त्या ग्रहाच्या गुणधर्मात अकस्मितपणा निर्माण करतो. नेपच्यून हाही शुभ अह असला तरी प्रश्नातील घटना शुभ असल्या तरी त्या लांबवितो. मात्र अशुभ घटना नेपच्यून ग्रह लांबवीत नाही, उलट अशा घटना सौम्य करतो असा अनुभव आहे.
प्रश्नत्रिकोणातील घटनेसाठी कार्येश ग्रह :
१. नोकरीबाबत प्रश्न असेल तर रवी, गुरु व बुध यापैकी एक तरी ग्रह त्रिकोणात असावा.
२. स्थावरबांबत प्रश्न असेल तर मंगळ व चंद्र ग्रहांची आवश्यकता आहे. मात्र या प्रश्नाला नेपच्यून ग्रह त्रिकोणात कोठेही असणे प्रतिकूल आहे.
३. हरवलेल्या वस्तुबाबत प्रश्न असेल, तर चंद्र व हर्षेल ग्रह त्रिकोणात असले, तरच अनुकूल उत्तर समजावे.
४. बाळतपणाबाबत प्रश्न असेल, तर शुक्र, चंद्र व गुरु यापैकी दोन तरी ग्रह त्रिकोणात असावेत.
५. प्रवासाबाबत प्रश्नासाठी नेपच्यून व चंद्र हे ग्रह अनुकुलता दर्शवतात.
६. आजारपणा बाबत शुभ उत्तर येण्यासाठी चंद्र, नेपच्यून व रवी या तीन ग्रहांपैकी दोन तरी ग्रह त्रिकोणात असले पाहिजेत.
७. परीक्षेत यश येण्यासाठी रवी, गुरु व बुध यांपैकी एक तरी ग्रह त्रिकोणात असला पाहिजे.
८. त्रिकोणात जर रवी; बुध अगर गुरु यांपैकी दोन ग्रह येतील, तर दिवाणी दाव्यात यश येते, त्रिकोणात शनी-मंगळ अगर हर्षेल यांपैकी एक जरी ग्रह आला, तरी फौजदारी खटला अंगाशी येऊन त्रास होईल असे समजावे. पण अशा प्रसंगी रवी, नेपच्यून अगर गुरु ग्रहापैकी एक जरी ग्रह त्रिकोणात असेल तर फौजदारी दाव्यातून सुटका होईल असे समजावे.
९. परदेशगमनाबाबत प्रश्न असेल, तर नेपच्यून व चंद्र यांपैकी एक तरी ग्रह असावा.
१०. सट्टा, लॉटरी ई. पैसा मिळेल किंवा नाही या प्रश्नास त्रिकोणात चंद्र, बुध व शनी यांपैकी दोन ग्रह तरी अवश्य असणे अगत्याचे आहे, अशा वेळी चंद्र त्रिकोणाच्या मध्यभागी व वरील कोनात शनी असेल, तर सट्टा, रमी, रेस वगैरेपासून खूप धनप्राप्ती होते.
११. विवाहाबाबत प्रश्न असेल तर, चंद्र, शुक्र व गुरु या तीन पैकी निदान दोन ग्रह तरी असावेत, त्यापैकी शुक्र मधे व वरील कोनात चंद्र आला, तर विवाह फारच त्वरित व सुमंगल होतो असा अनुभव आहे.
१२. लेखनात यश देण्याबाबत प्रश्न असेल, तर बुध, शुक व गुरु या तीनपैकी दोन ग्रहांची आवश्यकता आहे.
१३. राजकारण, निवडणूक वगैरेत यशप्राप्तीसाठी प्रश्न असेल तर, रवी, गुरू व नेपच्यून या ग्रहांपैकी दोन तरी ग्रहांची अपेक्षा असते,
१४. दुकानदारी, व्यापार, बगैरे उत्तम चालतील का नाही या प्रभाच्या अनुकूल उत्तरास बुध, चंद्र, शनी या ग्रहांची अपेक्षा आहे,
१५. शेवटी परमार्थात गती होणे, गुरु भेटणे व साक्षात्काराबाबत प्रश्न असेल, तर नेपच्यून व गुरु यांपैकी एक ग्रह प्रश्नत्रिकोणाच्या पायाच्या उजव्या बाजूस व शनी मध्यावर अगर वरील कोनात असला पाहिजे.
अशा प्रकारे दिवसभरातील कोणत्याही तास मिनिटास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता व ग्रह गुणधर्म व स्वभावाच्या पक्क्या अभ्यासाने व सततच्या सरावाने त्यात अचूकता येतो.
वरील उदाहरणातील ठोकताळे देतो, त्याप्रमाणे तुम्ही उत्स्फूर्त प्रश्न वेळेच्या दिल्या जाणाऱ्या उत्तरांची कल्पना येईल.
उत्स्फूर्त प्रश्न वेळ : सकाळी ६-०२ वा.
१) नोकरी : अचानकपणे नोकरी मिळण्याचे योग, व्यापारी फर्ममध्ये जास्त संभव, रवी क्षीण आहे. एकदम मोठी नोकरी मिळणे कठीण आहे.
२) स्थावर : घर घेण्यापेक्षा बागाईत जमीन घेण्यासाठी शुभ वेळ. मात्र घर खरेदीसाठी अशुभ काळ नाही.
३) हरवलेली वस्तु : वस्तु घराबाहेर गेली, सापडणार नाही. उसनी दिलेली बस्तुही परत येणार नाही.
४) बाळंतपण : प्रसूती जरा त्रासदायक, पण धोका नाही. कन्या लाभ संभवतो. कन्या लक्ष्मी आहे. भाग्य घेऊन येईल.
५) प्रवास : प्रवासास शुभकाल. जलप्रवास जास्त यशस्वी व्यापार-धंद्यासाठी प्रवास केल्यास चांगले यश मिळेल.
६) आजारपण : धोका नाही, पण औषधोपचार चालू ठेवावे, अनेमिया व मासिक पाळीच्या तक्रारी असतील, तर लवकर बरे वाटणार नाही.
७) परीक्षा : नशिबाने परीक्षेत यश येईल. क्लासही मिळेल. व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस जास्त अनुकुल काळ.
८) कोर्ट कचेरी : केस जिंकाल, पण खर्च फार होईल, हरकतीबाबत फिर्यादी दाखल करण्यास काल अनुकूल नाही.
९) लॉटरी : सट्टा, लॉटरी, रेसमध्ये लाभ होईल. स्त्रियांस जास्त शुभ. एकादशी ते पौर्णिमा हा भाग्यशाली काल आहे.
१०) व्यापार : व्यापारी वर्गास शुभ. मधला ग्रह बुध आहे. तो व्यापारी वृत्तीचा.
११) विवाह : सौंदर्यवान पत्नी मिळण्याचा योग. कुमारिकेस नाजुक प्रकृतीचे पती मिळतील. शुक चंद्र युती फार मंगल ठरेल.
१२) निवडणूक : चमत्कारिक निकाल लागेल. रवीही क्षीण आहे, यशस्वी होण्याची फार आशा करू नये.
१३) परमार्थ : ईश्वरोपासनेकडे लक्ष लागणे कठीण. चैनीकडे प्रवृत्ती होईल. मनात लैंगिक विचाराचे थैमान माजेल.
१४) इतर : इतर कोणत्याही प्रश्नास अनुकूल उत्तर आहे.
तर जरूर बघा प्रयत्न व अभ्यास करून तुम्हाला असे फक्त उत्स्फूर्त प्रश्न वेळेवरून अचूक ठोकताळे मांडता येतात का ते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)