
विषय : अग्निवास
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : सुलभ ज्योतिष शास्त्र
नमस्कार,
आज आपण वैदिक पद्धतीमधील अग्निवास या विषयी माहिती घेणार आहोत.
अग्निवास म्हणजे अग्नी चे वास्तव्य. विधीनुसार अग्नि पृथ्वी, पाताळात आणि आकाशात वास करतो. शास्त्रानुसार दिवस आणि तिथीनुसार अग्नी वेगवेगळ्या प्रतलात म्हणजेच अग्नि स्वर्ग, पृथ्वी किंवा पाताळात राहतो. अग्नीचे निवासस्थान त्या दिवशी किंवा तिथीला हवन करणे योग्य आहे की नाही हे दर्शविते.
१) यज्ञ, हवन इत्यादींसाठी अग्नीची स्थापना आणि पूर्णता त्या दिवशीच करावी, जेव्हा अग्नीचा पृथ्वीवर वास असतो. यामुळे त्या कृतीचे शुभ फळ प्राप्त होईल.
२) स्वर्गात अग्नी वास करत असताना हवन वगैरे केल्याने यजमानाचा मृत्यू होऊ शकतो अथवा अग्निभय राहू शकते.
३) अग्नी पाताळामध्ये राहत असताना काम केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते.
अग्निवास पाहण्याची पद्धत
१) शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून ज्या दिवशी हवन करायचे आहे, त्या दिवसापर्यंत तिथींची संख्या मोजावी. जर कृष्ण पक्षातील पंचमीला हवन करायचे असेल तर
तिथी संख्या १५+५=२० असेल.
२) त्यात त्या दिवसाच्या क्रमांकाची संख्या मिळवावी.
(रविवार-१, सोमवार-२, मंगळवार-३, बुधवार-४, गुरुवार-५, शुक्रवार-६, शनिवार-७.)
३) त्यात १ ही संख्या मिळवावी.
४) येणार्या बेरजेस ४ ने भाग द्यावा.
५) येणारी बाकी अग्नी कुठे वास करत असेल, हे दर्शवते.
अ) बाकी ३ किंवा ० आल्यास, अग्नी पृथ्वीवर वास करतो.
ब) बाकी १ आल्यास, अग्नी स्वर्गात वास करतो.
क) बाकी २ आल्यास, अग्नी पाताळात वास करतो.
उदाहरणार्थ : ज्या दिवशीचा अग्निवास पहायचा आहे, ती कृष्ण सप्तमी आणि शनिवार असेल तर,
१५+७++७+१=३० भागिले ४ = बाकी २
म्हणजे अग्नी पाताळात वास करत आहे.
निमित्तक हवन, नित्य होम, दुर्गाहोम, रुद्र होम, वास्तुशांती, विष्णूची प्रतिष्ठा, ग्रहसंती होम, नवरात्री होम, शतचंडी, लक्षोम, कोटीहोम, पितृमेध, उत्पात शांती या विधींमध्ये अग्निवास पाहणे आवश्यक नाही.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)