
विषय : प्राचीन दिक्पाल संकल्पना
संग्राहक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : अध्यात्म शास्त्र खंड ७
नमस्कार,
आपल्या वैदिक आणि अध्यात्म शास्त्रात इतक्या विविध गोष्टींचा विस्ताराने विचार केला आहे, की जसा जसे शोधात राहावे, तसे तसे हे आयुष्य या अभ्यासाच्या पासंगालाही पुरणार नाही याचीच जाणीव होत राहते.
आज आपण मा. डॉ. जयंत आठवले गुरुजी यांच्या अध्यात्म शास्त्र खंड ७ यातील संकलनातून संदर्भ घेऊन दिक्पाल या संकल्पने विषयी माहिती घेणार आहोत.
दिक्पाल हा शब्द दिक् (म्हणजे दिशा) व पाल (म्हणजे पालन व संरक्षण करणे) या दोन शब्दांपासून बनलेला आहे. दिक्पाल म्हणजे दिशांचे पालन व संरक्षण करणारा देव.
दिशा या शब्दाच्या व्युत्पत्ती व अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.
दिश् दानयति : ज्या माध्यमातून आपल्याला हवे ते प्राप्त होते.
द (दान) : जे देत असते.
दि दृक् – ज्या माध्यमातून आपणांस पाहता येते.
दिक्पाल यास दिशास्वामी व लोकपाल असेही संबोधले जाते.
अष्ट दिशा व दिक्पाल : आठ प्रमुख दिशा व त्यांचे दिक्पाल यांची माहिती आपण आता पाहू. काही विचारसरणीं नुसार अध: (खालील) व ऊर्ध्व (वरील) यांच्यासह दश दिशा होतात. त्यांचे दिक्पाल निराळे आहेत. अष्टदिशांचा उल्लेख कधी कधी अष्टधा प्रकृती संबंधात व अष्टदिशांकडून येणाऱ्या पवित्रकांच्या संबंधात केला जातो.
मुख्य दिशा
१. पूर्व दिशा :
पूर्व दिशेचा दिक्पाल इंद्र असून याचा पिवळा वर्ण आहे. याचे हातात वज्र व स्तन असून ऐरावत हे वाहन आहे.
२. पश्चिम दिशा : पश्चिम दिशेचा दिक्पाल वरून असून याचा शुभ्र वर्ण आहे. याचे हातात नाग्पाश व शंख असून मगर हे वाहन आहे.
३. दक्षिण दिशा : दक्षिण दिशेचा दिक्पाल यम असून याचा काळा वर्ण आहे. याचे हातात दंड व शूल असून रेडा हे वाहन आहे.
४. उत्तर दिशा : उत्तर दिशेचा दिक्पाल कुबेर असून याचा पिवळा वर्ण आहे. याचे हातात अंकुश व गदा असून नर हे वाहन आहे.
अवांतर दिशा :
५. आग्नेय दिशा : आग्नेय दिशेचा दिक्पाल अग्नी असून याचा तांबडा वर्ण आहे. याचे हातात सुचा (लाकडी पळी) व कमंडलू असून बोकड हे वाहन आहे.
६. नैऋत्य दिशा : नैऋत्य दिशेचा दिक्पाल निऋति असून याचा निळा वर्ण आहे. याचे हातात खड्ग व खेटक (सोटा) असून शव हे वाहन आहे.
७. वायव्य दिशा : वायव्य दिशेचा दिक्पाल वायू असून मृग हे वाहन आहे.
८. ईशान्य दिशा : इशान्य दिशेचा दिक्पाल ईशान असून याचे हातात कपाल (कवटी) व त्रिशूल आहे.
दिशेपासून मिळणार्या लहरी :
१. पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या मुख्य दिशांतून सत्त्वलहरी येतात व त्यांत पवित्रके असतात.
२. आग्नेय, नैऋत्य, वायव्य व ईशान्य या उपदिशांतून रजलहरी येतात.
३. अधः दिशेतून म्हणजे पृथ्वीकडून तमलहरी येतात.
त्या त्या लहरींच्या संदर्भातील गोष्टी दिशांकडून मिळतात.
मुख्य दिशांतून सत्त्वलहरी येत असल्या तरी त्यांच्या प्रमाणात फरक असतो.
ज्या खोलीच्या चारही भिंतींच्या पूर्व, पश्चिम दिशा माहीत नाहीत, अशा खोलीच्या चारही भिंतींकडे प्रत्येकी काही मिनिट तोंड करून उभे रहा आणि काय अनुभवायला येते का ते पहा.
एका सत्संगात ३४ साधक होते. प्रत्येकाची पातळी वेगवेगळी असते. त्यांनी हा प्रयोग केल्यावर त्यांना पुढील अनुभूति आली.
१) १५ साधकांना पूर्व दिशेला बरे वाटले. ८ साधकांना त्रासदायक वाटले. ११ साधकांना काही जाणवले नाही.
२) ११ साधकांना पश्चिम दिशेला बरे वाटले. ६ साधकांना त्रासदायक वाटले. १७ साधकांना काही जाणवले नाही.
३) ३ साधकांना दक्षिण दिशेला बरे वाटले. १० साधकांना त्रासदायक वाटले. २१ साधकांना काही जाणवले नाही.
४) २४ साधकांना उत्तर दिशेला बरे वाटले. २ साधकांना त्रासदायक वाटले. ८ साधकांना काही जाणवले नाही.
या प्रयोगावरून लक्षात येते की,
साधना करतांना दक्षिण दिशेला तोंड करून साधकाने का बसू नये. यमराजाच्या या दिशेकडून येणाऱ्या स्पंदनांमुळे साधकाला त्रास होतो व त्याची साधना नीट होत नाही. याउलट पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड केल्यास बरे वाटल्याने साधना चांगली होते.
सर्व दिशा चांगल्या वाटल्यास त्या व्यक्तीची पातळी ६०% हून जास्त आहे. सर्व दिशा त्रासदायक वाटल्यास ती व्यक्ति बहुधा मनोरुग्ण अथवा मनोबल कमी असणारी असते. (सर्वसाधारण व्यक्तीची पातळी २०% असते.)
मुख्य दिशांच्या दिक्पालांचे कार्य व वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहे.
१) पूर्व : प्रकाश, उष्णता, जीवन, सुख व समृद्धि
२) पश्चिम : अंधकार, शीत, मृत्यु व विनाश
३) दक्षिण : यमाची दिशा व अशुभ
४) उत्तर : अध्यात्म व मरणोत्तर स्वर्गगति
आठ दिक्पालांची वर्णने पुराणांत व तंत्रग्रंथांत दिलेली आहेत. तथापि यांची स्वतंत्र मंदिरे नाहीत. परंतु खजुराहो आदि लेण्यांमध्ये त्यांची शिल्पे कोरलेली आढळतात.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)