
विषय : अंश सूत्र
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : प्रश्न मार्ग
नमस्कार,
आज आपण एका प्रश्न कुंडली मांडल्यावर झटपट अंदाज देणाऱ्या एका अंश सूत्राची माहिती घेणार आहोत.
केरळीय प्रश्न ज्योतिष पद्धतीत अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास केला गेला आहे. प्रश्न मार्ग या पुस्तकात केरळीय प्रश्नज्योतिषा वरील ग्रंथाचे संक्षिप्त भाषांतर व टीका मराठीत दिलेली आहे. या त्रिस्फुट पासून सूत्र पंचक पर्यंत व अनेक प्रश्नाचा खूप सुंदर उहापोह केला आहे. मुळातूनच हे पुस्तक वाचण्यासारखे आहे व संग्राह्य आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष मा.श्री अनिल चांदवडकर गुरुजींचे आभार, ज्यांनी हे पुस्तक भेट म्हणून दिले.
सहाव्या अध्यायात सूत्रपंचकाची मांडणी करताना पाच सूत्र व त्यांची पंचमहाभूत तत्त्वांशी जोडणी केली आहे. त्यातील अंश सूत्राचा व्यवहारात अनुभव अधिक येतो. याचे नैसर्गिक कारण असे की जो घटक जास्त वेगवान असतो व लवकरात लवकर बदलतो, तो घटक ज्योतिषात सूक्ष्म निर्णयात अधिकतर निर्णायक होतो.
उदा. एका राशीत शनी अडीच वर्ष असतो. त्यापेक्षा गुरूचा १२ ते १३ महिन्यांचा एका राशीतील काळ जास्त स्पष्ट फरक दाखवू शकेल. तर त्याहीपेक्षा महिनाभर रवीचा काळ महिन्यातील बारीक सारीक घटनांचा जास्त खुलासा करेल. याच न्यायाने चंद्र एक दोन दिवसातील घटना सांगू शकेल, तर लग्नभाव दोन तासातील घटनांमधील फरक सांगेल व साहजिकच नवांश १० – १५ मिनिटांतील घटनांचाही परिणाम दाखवेल. तेव्हा नवांशाचे फल केव्हाही अधिक सूक्ष्म असेल.
ह्याच्या पलीकडे सूक्ष्म भेद कृष्णमूर्ती पद्धतीत उप नक्षत्र रूपाने दाखविला आहे, तर नाडी ग्रंथात १२ कलांपर्यंतचा भाग जो लग्न भावात ४० सेकंदात बदलेल इतके सूक्ष्म विवेचन आहे.
अत्यंत झटपट निर्णय घेण्यास अंशसूत्राचा फार चांगला उपयोग होतो. या पद्धतीत जीव, रोग व मृत्यू हे शब्द सांकेतिक स्वरूपात वापरले आहेत. आहे.
जीव म्हणजे जीवकारक. याचा अर्थ फक्त आयुष्य न घेता, शक्ती, बळ धन ई. यात वृद्धी व व्यावहारिक उपयोग असा घेतला जातो.
रोग म्हणजे रोगकारक. याचा अर्थ फक्त आयुष्य न घेता, आजारपणा बरोबरच अडथळे, संघर्ष, पीडा, मनोबल कमी असणे ई. असा घेतला पाहिजे.
मृत्यू म्हणजे मृत्युकारक. याचा अर्थ फक्त मृत्यू असा न घेता, धननाश, पीडा, भय व कार्यनाश ई. अत्यंत नुकसानदायी अशा रीतीने घेतला पाहिजे. कंठभरणातील त्रिसूत्रीचा येथे उपयोग केला आहे.
१) या साठी सुरुवातीस स्पष्ट लग्नाची प्रश्न कुंडली मांडण्याची आवश्यकता आहे.
सध्या लग्र साधनसाठी पुस्तके व पंचांग उपलब्ध असल्याने सोफट वेअर उपलब्ध असल्याने सोयीचे झाले आहे.
२) कृष्णमूर्ती अयनांश वापरणे जास्त सयुक्तिक ठरेल.
३) प्रश्न कुंडली चर लग्नाची असल्यास, लग्न नवांश चर आल्यास तो जीवकारक असेल.
४) प्रश्न कुंडली चर लग्नाची असल्यास, लग्न नवांश स्थिर आल्यास तो रोगकारक असेल.
५) प्रश्न कुंडली चर लग्नाची असल्यास, लग्न नवांश द्विस्वभाव आल्यास तो मृत्युकारक असेल.
६) प्रश्न कुंडली स्थिर लग्नाची असल्यास, लग्न नवांश द्विस्वभाव आल्यास तो जीवकारक असेल.
७) प्रश्न कुंडली स्थिर लग्नाची असल्यास, लग्न नवांश चर आल्यास तो रोगकारक असेल.
८) प्रश्न कुंडली स्थिर लग्नाची असल्यास, लग्न नवांश स्थिर आल्यास तो मृत्युकारक असेल.
९) प्रश्न कुंडली द्विस्वभाव लग्नाची असल्यास, लग्न नवांश स्थिर आल्यास तो जीवकारक असेल.
१०) प्रश्न कुंडली द्विस्वभाव लग्नाची असल्यास, लग्न नवांश द्विस्वभाव आल्यास तो रोगकारक असेल.
११) प्रश्न कुंडली द्विस्वभाव लग्नाची असल्यास, लग्न नवांश चर आल्यास तो मृत्यूकारक असेल.
एकदा कशा प्रकारचे फळ मिळू शकते याचा अशा रीतीने अंदाज आल्यावर प्रश्न कुंडलीतील ग्रहस्थिती, नवांश राशी व लग्न राशी यांचे तील इष्ट अनिष्ट संबंध, स्वभाव, तत्वे, गुणधर्म, ई घटकांचा वापर करून कालनिर्णय व स्वरूप जातकास सांगू शकतो.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)