
विषय : जुळ्या मुलांची कुंडली
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्व अभ्यास
नमस्कार,
आज जुळ्या मुलांच्या कुंडल्यांबाबत थोडे लिहावेसे वाटले.
जुळ्या मुलांच्या कुंडल्या सोडवताना नवीन अभ्यासकास प्रश्न पडतो, की दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील भिन्नता शोधायची कशी? तर यासाठी येथे काही टिप्स देत आहे.
१. ग्रहांची स्थिती
व्यावहारिकदृष्ट्या, त्या दोन पाच मिनिटांमध्ये ग्रहांची स्थिती बदलण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ग्रहांची स्थिती सारखीच राहील आणि जन्मपत्रिकेत फरक होणार नाही.
२. लग्न भाव
साधारण दोन तासांतून एकदा लग्न भाव बदलतो. उदाहरणार्थ, ज्या वेळेस लग्नभाव बदल १८.०६ वाजता होणार असतो, आणि जुळ्यांपैकी एकाचा जन्म १८.०३ वाजता होतो आणि दुसरा १८.०८ वाजता जन्मतो, तेव्हा दोन्ही कुंडलींचा लग्नभाव भिन्न असेल आणि अशा प्रकारे दोन्ही जुळी मुलांच्या कुंडलीत भिन्न फळे प्राप्त होतील.
३. लग्न नवमांश :
लग्न नवमांश तपासून पहा. नवमांश वेगळा आला, तरी त्यानुसार तुम्हाला दोन्ही मुलांचे स्वाभव भिन्नत्व तपासता येईल. पण जन्म वेळेत अंतर फारच थोडे असेल, तर नवमांश कुंडली देखील सारखीच येण्याची शक्यता असते.
३. षश्ठ्यमांश :
पारंपारिक ज्योतिष शास्त्रात जर लग्न भाव किंवा ग्रहांच्या स्थितीमुळे कोणताही बदल होत नसेल, तर षश्ठ्यमांश हा विभागीय वर्ग तपासतो. तक्ता जीवनाचा मूळ उद्देश दर्शवतो असे मानले जाते. हे लोकांचे कर्म प्रतिबिंबित करते आणि त्यांना ते कसे पूर्ण करावे लागेल. याचा लग्न भाव चार्ट दर २ मिनिटांनी बदलतो आणि जन्माला आलेल्या बहुतेक जुळ्या मुलांसाठी हे वेगळे असेल अशी अपेक्षा आहे. जुळ्या मुलांचे जीवन वेगळे करण्यासाठी हा तक्ता सर्वोत्तम साधन आहे.
विभागीय तक्ते जुळ्या मुलांच्या जीवनाचा अंदाज लावण्यात महत्त्वाची भूमिका कशी बजावतात हे उघड आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि ते त्यांच्या समान/अज्ञात जुळ्यांपेक्षा वेगळे कसे असेल हे जाणून घेण्यास मदत करते. जुळ्या मुलांचे भविष्य वर्तवताना, केवळ जन्मजात तक्त्याचा विचार करणे योग्य नाही कारण अंदाज अचूक करण्यासाठी अनेक विभागीय तक्ते आहेत.
४. कृष्णमुर्ती पद्धत :
या पद्धतीचा उगमच मुळात जुळ्या मुलांच्या भविष्यकथन बाबत विचार करण्यात आहे. या पद्धतीत नक्षत्राचे विमशोत्तरी दशेच्या प्रमाणात केलेले उपविभाग (उपनक्षत्र) व उप उप विभाग (उप उप नक्षत्र) विचारात घेतात व त्यातील भिन्न्तेनुसार भविष्य कथन करतात. ही पद्धत देखील अचूक मार्गदर्शन करते.
५. तृतीय भाव : मध्यंतरी माझी व बडोद्याचे ज्योतिषी श्री. हेमंत उपासनी यांचे बरोबर अशीच जुळ्या मुलांच्या बाबतीत चर्चा झाली होती, तेव्हा हा मुद्दा मांडला होता, की, ३ रे स्थान धाकटे भावंड दर्शवते. मग काही मिनिटे नंतर जन्मणारा भाऊ हा धाकटा भाऊ ठरत असल्याने ३ रे स्थान लग्न भाव मानून कुंडल्या मांडल्या, दोन्ही कुंडली मध्ये रास, नक्षत्र ई. सारखेच आले, तरी स्थान भिन्नत्व झाल्याने तर दोघांचे चित्र व इतर गोष्टी स्पष्ट करता येतील.
आणि कर्म धर्म संयोगाने १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचे वार्षिक संमेलन व पदवीदान समारंभ बोरीवली येथे झाला, तेव्हा महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष मा. श्री.अनिल चंदवडकर गुरुजींनी अगदी याच पद्धतीने दोन जुळ्या मुलांचे भविष्यकथन तृतीय स्थानाचा वापर करून सांगितले आणि ते खरे ठरले, हा त्यांचा अनुभव कथन केला.
तर अशा विविध पद्धतीने अधिकाधिक अभ्यास करून सरावाने सुलभ रीतीने भविष्यकथन करता येईल. यात तुमची योग्य दिशेने वापरलेली तर्क पद्धती अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)