
अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचे (मुंबई) वार्षिक स्नेहसंमेलन (द्वितीय) व पदवीदान समारंभ
रविवार दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी राधा कृष्ण बँक़्विट, बोरीवली येथे आयोजित करण्यात आला होता.
उत्कृष्ट नियोजन आणि त्या नुसार सर्व व्यवस्था असल्यामुळे एक अतिशय उत्कृष्ट, संस्मरणीय कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री.अनिल चांदवडकर गुरुजी यांनी भूषविले. तसेच ज्योतिष मान्यवर श्री. विजयानंद पाटील, डेस्टिनी व्यवस्थापन चे श्री. योगेश्वर गौडा, डॉ.भारती खटावकर, हर्षल पुस्तकाचे लेखक श्री. अजिंक्य नलोले, ज्येष्ठ ज्योतिषी अनंत आठल्ये, ज्योतीशाचार्या सरिता गंभीर ताई, प्रसिद्ध वास्तू तज्ञ धनंजय चौगुले, प्रसिद्ध अष्टक वर्ग तज्ञ श्री.हेमंत उपासनी, व्यवहार ज्योतिष कुशल श्री.ज्योतिष मित्र मिलिंद, प्रसिद्ध पूजा उपासना मार्गदर्शक श्री. मनीष गोसावी, ज्योतिषाचार्य श्री.महेंद्र जोशी, ज्योतिषाचार्य देवेंद्र उपासनी, प्रसिद्ध पुरोहित श्री. सतीश गुरुजी आदी मान्यवरांची उपस्थित होते. मान्यवरांचे विविध विषयांवरील मार्गदर्शन संमेलनाची शोभा वाढवणारे ठरले. समारंभाचे व्यासपीठ महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री.अनिल चांदवडकर गुरुजी, ज्योतिष मित्र मिलिंद, श्री. विजयानंद पाटील व श्री.मनीष गोसावी आदी मान्यवरांनी भूषविले.
यासेच नवोदित ज्योतिषी सौ.सोनल पंडित यांचे नाक्षात्राधारीत संशोधित उदबत्ती तयार करणे ई. गोष्टी हम भी कुछ कम नाही हे सर्वांना दाखवून देणारे होते.
तसेच या समारंभासाठी बडोदा, बंगलोर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा विविध कानाकोपऱ्यातून सर्वजन आवर्जून संमेलनास आले होते.
बाहेरगावाहून बरेचसे जन आले असल्यामुळे सकाळी १० वाजता गरमागरम नाश्ता व चहापान आयोजित केले होते.
त्यानंतर १०.30 वाजता मा. अध्यक्षपद महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री.अनिल चांदवडकर गुरुजी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली. मा. अध्यक्षांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्यानंतर मा.श्री.अनिल चांदवडकर गुरुजी यांचे बहुमुल्य ज्योतिष मार्गदशन सर्वांना ज्योतिषाची वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यानंतर पहिल्या व दुसर्या सत्रात डेस्टिनी व्यवस्थापन चे श्री. योगेश्वर गौडा, ज्योतिष मित्र मिलिंद, डॉ.भारती खटावकर, हर्षल पुस्तकाचे लेखक श्री. अजिंक्य नलोले, श्री. विजयानंद पाटील, ज्येष्ठ ज्योतिषी अनंत आठल्ये, ज्योतीशाचार्या सरिता गंभीर ताई, ज्यो.सोनल पंडित ई. ची त्यांच्या अभ्यासातून व अनुभवाने समृद्ध अशी मौलिक मार्गदर्शन सत्रे झाली. एक २० वर्षीय चुणचुणीत एम.सी.ए. करत असलेली चुणचुणीत मुलगी हीना हाते हिने प्रभावीपणे ज्योतिषांना काळाच्या अनुसार तंत्रज्ञानाचा व वेबसाईट चा कसा वापर वाढवला पाहिजे, याबद्दल दिशा दिली.
दुसरे सत्रात पदवीदान समारंभ झाला. यशस्वी ज्योतिर्विद्या वाचस्पती विद्यार्थ्यांचा मा.श्री.अनिल चांदवडकर गुरुजी यांचे हस्ते पुणेरी पगडी, प्रमाणपत्र, शाल, चांदीचे लक्ष्मीचे नाणे, स्मृतीचिन्हे ई. देऊन कौतुक करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व अनिरुद्ध संस्थेच्या संस्थापिका, अध्यक्ष व सर्वेसर्वा डॉ.सौ. समीक्षा दारवलिकर यांना सत्कार करून प्रश्न मार्ग हे ज्योतिष पुस्तक भेट देण्यात आले.
दोन सत्रांच्या मध्ये उत्कृष प्रीती भोजनाची चोख व्यवस्था होती. व त्यानंतर चहापान झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे डॉ.सौ. समीक्षा दारवलिकर यांनी अथक प्रयत्नामुळे व यशस्वी व काटेकोर नियोजन. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच. तसेच या स्नेह संमेलनामुळे. सर्वांना मान्यवरांच्या अनुभवातून ज्योतिष अभ्यासास नविन दिशा व प्रेरणा मिळाली. सर्वजण एकत्र येऊन ओळख झाली व एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान करण्यास एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले.
असा हा सोहळा नित नेटका, हसता खेळत ज्योतिष ज्ञान देणारा एक संस्मरणीय सोहळा ठरला.
जय ज्योतिष 🚩
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)





























