
विषय : केतूची स्थानागत फळे
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : प्रेडिक्टिव्ह स्टेलर ॲस्ट्रॉलॉजी रीडर
नमस्कार,
आज आपण केतूची स्थानागत फळे पाहणार आहोत.
राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत, व पारंपारिक ज्योतिष शास्त्रात पापग्रह समजले आहेत. वास्तविक पणे केतू ची फळे तपासताना त्याची रास, नक्षत्र, युती, दृष्टी ई. गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्यात.
प्रथम स्थान : लग्न स्थानी केतू स्थित असता जातक मृत संतान जन्म होणे, चेह-यावर चिन्ह, आजारी, कंजूस, शुक्र ग्रह युक्त असेल, तर धनवान व दीर्घायु, संतान प्राप्त असू शकतो.
द्वितीय स्थान : द्वितीय स्थानी केतू स्थित असता जातक काही बचत न होणारा, अस्वस्थ, कुटुंबाकरिता दु:खी, विशेष रुपाने मुली करता, काळा चेहरा, दोन वेळा विवाह, केतु बरोबर शुभ ग्रह असेल, तर हनुवटी वर मस्सा, भाग्यवान लोकांचा द्वेष करणारा असा आढळतो.
तृतीय स्थान : तृतीय स्थानी केतू स्थित असता जातक चांगल्या स्वभावाचा, धनवान, संवाद वाहक, ठेकेदार आढळतो.
चतुर्थ स्थान : चतुर्थ स्थानी केतू स्थित असता जातक धनवान, जवाहरात वाला, दोन वेळा विवाह, आई वडिला करिता अनिष्ट, जर शुभग्रह युक्त असेल, तर वाईट परिणाम कमी असणारा आढळतो.
पंचम स्थान : पंचम स्थानी केतू स्थित असता जातक संतती करिता त्रासदायक, वाईट दृष्टि असता, शासना द्वारे दंडित, नीच लोकांचा शेजार, कपटी, पिसाळलेला कुत्रा चावल्याने होणारे रोग, अस्वस्थ संभवतो.
षष्ठ स्थान : षष्ठ स्थानी केतू स्थित असता जातक साहसी, आयुष्यात संतुष्ट, पण काही बचत नाही, प्रसिद्ध विद्वान व अध्ययनशील असा असू शकतो.
सप्तम स्थान : सप्तम स्थानी केतू स्थित असता जातक प्रथम पत्नीच्या हानि नंतर पुनः विवाह, केतुच्या जोडीस एखादा पापग्रह असेल, तर दुसरी पत्नी दीर्घ रोगाने त्रस्त. शुभग्रह युक्त असेल, तर दीर्घायु, भाग्यशाली पत्नी असणारा. पापग्रह युक्त असता जोडीदाराच्या चरित्र हनन करतात व विवाहित आयुष्यात तणाव निर्माण करतात. निरूद्देश्य जगणे, भटक्या दुष्ट असा असू शकतो.
अष्टम स्थान : अष्टम स्थानी केतू स्थित असता जातक दीर्घ रोगग्रस्त, मृत्युपत्र द्वारा धनाची प्राप्ति, दुस-याचे पैशावर मजा, दुस-याचे पत्नी बरोबर सहवासाने सुख प्राप्त योग, मैथुन रोग, कंजूस, केतूबरोबर वा शुभग्रह दृष्टी असता दीर्घायु व धनवान असा असू शकेल.
नवम स्थान : नवम स्थानी केतू स्थित असता जातक संततीस दीर्घायुष्य, हलक्या स्त्री बरोबर, नोकरांनी बरोबर संबंध, कधीही सहानुभूति न ठेवणारा, कधीही दान न करणारा, लगेच उत्तेजीत होणारा, तर्क युक्त, चांगल्या गोष्टी करणारा, दुस-याशी वाईटपणा घेणारा, वाईट व्यक्ति, हट्टी, आत्मप्रशंसा करणारा, अहंकारी व प्रशंसक गोळा करणारा असा आढळतो.
दशम स्थान : दशम स्थानी केतू स्थित असता जातक विधवा स्त्रीशी सहयोग, घाणेरड्या जागी राहणारा, शुभ ग्रह अशुभ फळ कमी करेल, स्वामीभक्त नोकर युक्त, कूटनीतिज्ञ, बहादुर, स्वाभाविक सफलता, प्रवासाची आवड असा असू शकतो.
लाभ स्थान : लाभ स्थानी केतू स्थित असता जातक पुष्कळ मुले, धनवान, साहसी, सामाजिक सफलता प्राप्त, कीर्तिवान, कार्य करण्याकरिता उत्सुक, कमी खर्चिक असा आढळतो.
व्यय स्थान : व्यय स्थानी केतू स्थित असता जातक अल्प संतती, कमजोर दृष्टि, पापी, सिद्धांत हीन, वरिष्ठांचे धन व प्रतिमेचा नाश करून घेणारा असू शकतो.
(टीप : वरील स्थुलमांन अनेक घटकांवर आधारित आहे, कोणतेही निष्कर्ष काढताना जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)