
विषय : राहूची स्थानागत फळे
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना
नमस्कार,
आज आपण राहूची स्थानागत फळे पाहणार आहोत.
राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत, व पारंपारिक ज्योतिष शास्त्रात पापग्रह समजले आहेत. त्यानुसार हे संकलन दिले आहे. वास्तविक पणे राहू ची फळे तपासताना त्याची रास, नक्षत्र, युती, दृष्टी शुभ, अशुभ संयोग या गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्यात. कित्येकदा शुभ संयोगात राहू जोरदार शुभ फळे देताना सुद्धा आढळून येतो.
प्रथम स्थान : प्रथम स्थानी राहू स्थित असता जातक द्रष्ट, धाडसी, दयाळू, शक्तिमान, स्वार्थी, द्विभार्या, नीच, रागीट, खोटारडा, मानसिक रोगाने त्रस्त आढळतो.
द्वितीय स्थान : धन स्थानी राहू स्थित असता जातक लाचखाऊ, अल्पसंतती, निर्धन, दुःखी, कोपिष्ट, रागीट आढळतो.
तृतीय स्थान : तृतीय स्थानी राहू स्थित असता जातक दुराचारी, दुर्बल स्त्रीचा पती, भाषांचा जाणकार, मातेला अनिष्ट असा आढळतो.
चतुर्थ स्थान : चतुर्थ स्थानी राहू स्थित असता जातक सुखात बाधा, मानसिक विकार ग्रस्त, मातेस त्रास दायक असा आढळतो.
पंचम स्थान : पंचम स्थानी स्थानी राहू स्थित असता जातक मतिमंद, संततिबाधक, कंबरदुखीचा त्रास, मामा व मावशांना अनिष्ट असू शकतो.
षष्टम स्थान : षष्ठ स्थानी राहू स्थित असता जातक शत्रुहंता, पुत्र, धन, सुखयुक्त, मामा- मावशीला अनिष्ट असू शकतो.
सप्तम स्थान : सप्तम स्थानी स्थानी राहू स्थित असता जातक दुराचारी, स्त्रीनाशक, व्यापारात अयशस्वी, कामातुर आढळतो.
अष्टम स्थान : अष्टम स्थानी स्थानी राहू स्थित असता जातक धडधाकट, रागीट, वाचाळ, मूर्ख, पोटाच्या रोगाने पीडित, वाईट कर्मी, चोर, पापी, भित्रा आढळतो.
नवम स्थान : नवम स्थानी राहू स्थित असता जातक आळशी, कठोर प्रशासक, पत्नीभक्त, कमनशिबी, विद्वान, वाचाळ, परिश्रमी असतो.
दशम स्थान : दशम स्थानी राहू स्थित असता जातक आळशी, कठोर, प्रशासक, विद्वान, परस्त्रीगामी, वाचाळ, संततीमुळे दुःखी, चंचल असतो.
एकादश स्थान : लाभ स्थानी राहू स्थित असता जातक देखणा, वक्ता, शास्त्रज्ञ, धनवान, परिश्रमी, कानाचे विकार असलेला जातक आढळतो.
द्वादश स्थान : व्यय स्थानी राहू स्थित असता जातक पापकर्मी, विवेकशून्य, वायफळ खर्च करणारा, मतिमंद, मूर्ख, दुःखी, नेत्ररोगी असू शकतो.
(टीप : फळाबाबत मतमतांतरे असू शकतात. ज्यांना उपयुक्त वाटते त्यांनी संकलन स्वीकारावे. अन्यथा सोडून द्यावे.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)