गुरूची स्थानागत फळे


विषय : गुरूची स्थानागत फळे

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना 

नमस्कार,

आज आपण गुरूची स्थानागत फळे पाहणार आहोत.

प्रथम स्थान : प्रथम स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक दीर्घायु, कार्यतत्पर, विद्वान, ज्योतिषी, स्पष्टवक्ता, स्वाभिमानी, धनवान, पुत्रवान, कीर्तिवान, राजमान्य, भोगी व दयाळू आढळतो.

द्वितीय स्थान : द्वितीय स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक सुंदर शरीराचा, धनवान भाग्यवान, पुण्यवान, रत्नांचा व्यापारी, दीर्घायू, भाग्योदायी, काव्यप्रेमी आढळतो.

तृतीय स्थान : तृतीय स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक जितेंद्रिय, कृपण, भोगी, प्रवासी, स्त्री वर्गात प्रिय, वाहनसुख भोगणारा, शास्त्रज्ञ किंवा लेखक आढळतो.

चतुर्थ स्थान : सुख स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक भोगी, अतिसुंदर, अल्प संतती, यशवान, लाभ, मोठा विद्वान ज्योतिषी, शत्रूकडून मान मिळवणारा व पितृभक्त गृहस्थ आढळतो.

पंचम स्थान : सुत स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक आस्तिक, ज्योतिषी, लोकप्रिय, कुलश्रेष्ठ, संततीयुक्त, साहित्यिक, विद्वान व सुखी आढळतो.

षष्ठस्थान : षष्ठ स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक हास्यविनोद प्रिय, नोकर-चाकर बाळगणारा, शत्रुंजय, गोड बोलणारा, आळशी, विवेकशील, शांत व गृहस्थी आढळतो.

सप्तम स्थान : सप्तम स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक देखणा, विद्वान वक्ता, धार्मिक, दयाळू, थोरामोठ्यांच्या ओळखी असलेला, कर्तव्यदक्ष, स्त्री प्रिय, उदार स्वभावाची पत्नी असणारा आढळतो.

अष्टम स्थान : अष्टम स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक गूढ विषयात पारंगत, चिताक्रांत, चंचल, लोभी, धननाश करणारा, पोटदुखी व गुप्तरोगाने त्रस्त, तीर्थयात्री आढळतो.

नवम स्थान : भाग्य स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक यशस्वी, रूढिवादी, दयाळू, परोपकारी, तीर्थयात्री, भाग्यवान, पुत्रवान, विनम्र, ज्योतिषी व श्रीमंत आढळतो.

दशम स्थान : कर्म स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक सत्कार्य करणारा, सदाचारी, धार्मिक संस्था प्रमुख, न्यायप्रिय, प्रसन्नचित्त भावाकडून लाभ मिळवणारा, लेखक, प्रकाशक, वाहनसौख्य प्राप्त आढळतो.

एकादश स्थान : लाभ स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक सुंदर, निरोगी, उद्योगपती, विश्वासू मित्र असणारा, धनाढ्य, नित्य आनंदी, अल्प संतती युक्त, सामाजिक कार्यकर्ता व ध्येयासक्त आढळतो.

द्वादश स्थान : व्यय स्थानी गुरु स्थित असेल, तर जातक खर्चीक, वाईट मित्रांच्या संगतीत रमणारा, दुय्यम कार्यकर्ता, योगाभ्यासी, शास्त्रज्ञ, लोभी, दुष्ट आढळतो.

(सुचना : ही स्थानागत फळे असून रास, युती, दृष्टी ई. स्थितीनुसार फळामध्ये फरक होऊ शकतो.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment