पारंपारिक ज्योतिषातील २७ योग त्यांचे योग स्वामी आणि फळे


विषय : पारंपारिक ज्योतिषातील २७ योग त्यांचे योग स्वामी आणि फळे

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ज्योतिष सिद्धांत सार, ज्योतिष अध्याय

नमस्कार,

आज आपण पारंपारिक ज्योतिष शास्त्रात २७ नक्षत्रांसाठी जे २७ योग सांगितलेले आहेत, त्यांचे योग स्वामी व फळे पाहणार आहोत.

सूर्य रोज जवळपास ५९ कला एवढे अंतर पार करतो, तर चंद्र रोज ७९० कला एवढे अंतर पार करतो. योग म्हणजे चंद्र सूर्याच्या राशी-अंश-कला-विकालात्मक स्पष्ट भोगांची बेरीज. प्रत्येक ८०० कला इतक्या बेरेजेचा एक योग होतो. असे सत्तावीस योग आहेत. पहिला योग विष्कंभ आहे. पंचांगात योगाची समाप्तीची वेळ दिलेली असते. नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो. वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात. या योगावर जन्म झाल्यास शांती करावी असे सांगितले जाते.

कांही योग असे आहेत कीं, त्यांच्या आरंभापासून कांही घटिकांपर्यंत त्यांचा दोष असतो.

विष्कंभ आणि वज्र या योगांचा दोष आरंभापासून तीन घटिकांपर्यंत असतो.

परिधयोगाचा पूर्वार्ध संपेपर्यंत,

शूल योगाचा पहिल्या पांच घटिकांपर्यंत,

व्याघातयोगाचा नऊ घटिकांपर्यंत

गंड आणि अतिगंड योगांचा पहिल्या सहा घटिकांपर्यंत दोष असतो.

म्हणून तेवढ्या घटिका सोडून त्या त्या योगांवर शुभकार्ये करण्यास कांही हरकत नाहीं.

प्रत्येक योग विशिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असतो जो त्या विशिष्ट योगाच्या अंतर्गत जन्मलेल्या व्यक्तीमध्ये आढळण्याची शक्यता असते. ज्या नक्षत्रावर हा योग होतो, त्या नक्षत्राच्या उडू दशेत हे फळ प्रकर्षाने जाणवते. २७ योग, योग स्वामी व फळे सोबत दिली आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment