बुधाची स्थानागत फळे


विषय : बुधाची स्थानागत फळे

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना

नमस्कार,

आज आपण बुधाची स्थानागत फळे पाहणार आहोत.

प्रथम स्थान : प्रथम स्थानी बुध स्थित असेल, तर जातक बुद्धिमान, चलाख, हजरजबाबी, सत्य व स्पष्ट वक्ता विलासप्रिय, डोळे व वाणीत दोष असणारा आढळतो. तो सुखी व सुग्रास जेवण करणारा असतो.

द्वितीय स्थान : धन स्थानी बुध स्थित असता पितृभक्त, पापभिरू, सत्यवादी, सुखी, डोळे व वाणीत व्यंग, परदेशात राहणारा आढळतो..

तृतीय स्थान : तृतीय स्थानी बुध स्थित असेल, तर जातक चतुर, वाचाळ, बुद्धिमान, धाडसी व सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगणारा आढळतो.

चतुर्थ स्थान : सुखस्थानी बुध स्थित असेल, तर जातक परस्त्रीगामी चंचल, बाल्यावस्थेत रोगी, परिश्रमाने प्रत्येक कार्यात यश मिळवणारा आढळतो.

पंचम स्थान : सुत स्थानी बुध स्थित असता जातक बुद्धिमान, पुत्रवान, गुरुभक्त, सहृदयी, ऐश्वर्यप्राप्त, यशवंत आढळतो.

षष्ठस्थान : शत्रू व रोगस्थानी बुध स्थित असेल, तर जातक कामातुर, मांसाहारी, दुर्बल, धैर्यहीन, अभिमानी, परिश्रमी, शत्रू असलेला आढळतो.

सप्तम स्थान : सप्तम स्थानी बुध स्थित असता जातक सुंदर, विद्वान, व्यवसायदक्ष, चंचल, ठेंगणा, स्पष्टवक्ता, अल्प वीर्य, दीर्घायू, पत्नी सुंदर आढळते.

अष्टम स्थान : मृत्यु स्थानी बुध स्थित असता जातक सत्यवादी अतिथि प्रिय, दीर्घायू, चिंताग्रस्त ख्यातनाम, कफ व वातरोगाने पीडित आढळतो.

नवम स्थान : भाग्य स्थानी बुध स्थित असेल, तर जातक विद्वान, भाग्यवान, संततीयुक्त, गायक, धनवान आढळतो.

दशम स्थान : कर्म स्थानी बुध स्थित असता जातक धनवान, मातृ-पितृ व गुरुभक्त, श्रीमंत व स्वकर्तुत्वाने पैसा कमविणारा आढळतो.

एकादश स्थान : लाभ स्थानी बुध स्थित असता जातक धनवान, उदार, शास्त्रज्ञ, कुलदीपक, परोपकारी आढळतो. कागदपत्रे व लेखी व्यवहारात घोटाळे संभवतात, म्हणून अशा जातकाने कोणालाही जामीन राहणे शक्यतो टाळावे.

द्वादश स्थान : व्यय स्थानी बुध स्थित असता जातक देवभोळा, गूढशास्त्राची आवड असणारा, ज्योतिष मंत्रावर विश्वास ठेवणारा, दुर्व्यसनी, शत्रू असलेला, दुसऱ्यांच्या स्त्री व संपत्तीचा लोभ ठेवणारा आढळतो.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment