निसर्ग दशा साधन पद्धती


विषय : निसर्ग दशा साधन पद्धती

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ज्योतिष सोबती

नमस्कार,

आपण रोजच्या बोली भाषेत काही शब्द सहजगत्या वापरत असतो. पण त्या शब्दांची व्यापकता आपल्या गावीही नसते. असाच एक ज्योतिष शास्त्रीय शब्द म्हणजे दशा. आपण किती सहज बोलून जातो, काय दशा झालीय तुझी. दशा म्हणजे स्थिती मग ती चांगली स्थिती असो अथवा प्रतिकूल स्थिती असो. आणि ती स्थिती जाणून घेण्याच्या व त्याचे कालमापन करण्याच्या काही पूर्वापार चालत आलेल्या काही पद्धती आहेत त्या विशिष्ट पद्धती म्हणजे दशा. दशा साधन म्हणजे एखाद्या घटनेचे कालमापन करण्याचे साधन.

असे म्हणतात की, पूर्वी जवळजवळ ४२ प्रकारच्या दशा वापरात होत्या. काळाच्या ओघात त्यातील बर्याचशा दशा पद्धती लुप्त झाल्या. आज आपल्याला फक्त, विमशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी अशा ठराविक दशा माहित आहेत व प्रचलित आहेत. देशाच्या विविध भागात ठराविक पाडती वापरात असे. जसे उडू किंवा विमशोत्तरी दशा दाक्षिणात्य ज्योतिषी वापरत असत. गुजरात, मारवाड आदी भागात अष्टोत्तरी दशा विचारात घेतात. अशा प्रचलित तसेच अजून काही दशा साधने असतील, तर त्यांचा ही अभ्यास व्हायला हवा. ज्योतिष अभ्यासकाचा ध्यास व अभ्यास कधीच संपत नाही व या प्रवासात आपल्या ऋषी मुनींनी लिहिलेले ग्रंथ जसे मौल्यवान ठरतात, तसेच त्या त्या प्रदेशात प्रांतीय भाषेत लिहिलेली पुस्तके देखील मोलाचे काम करतात. कारण मातृभाषेत ज्ञान असेल, तर समजायला सोपे जाते. अशाच उत्तम ज्योतीशाचार्यापैकी एक अग्रणी व आदराचे नाव म्हणजे श्री.श्री. भट. त्यांचे ज्योतिष सोबती ही ज्योतीषांसाठी हे मार्गार्शिका वाचत असता, त्यात निसर्ग दशा अशी एक दशा पद्धती वाचनात आली. खर्र तर हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे व संग्रही ठेवण्यासारखे आहे. पण ज्यांनी हे वाचलेले नाही, त्यांचेसाठी त्यातील निसर्ग दशा हे छोटेसे संकलन आपल्या समोर ठेवत आहे.

ही निसर्ग दशा कधी अस्तित्वात आली याबद्दल मला कल्पना नाही. या दशेत विमशोत्तरी दशेप्रमाणेच १२० वर्षांचे साधारण आयुष्य धरले आहे व दशेचा कालावधी मात्र वेगळा आहे.

तसेच यात सात ग्रहांच्या दशा धरल्या आहेत. राहू केतू या छाया ग्रहांना व नंतर शोध लागलेल्या ग्रहांना यात स्थान नाही.    

जन्मापासून

१ वर्ष चंद्र महादशा

२ वर्षे मंगळ महादशा,

९ वर्षे बुध महादशा

२० वर्षे शुक्र महादशा

१८ वर्षे गुरु महादशा

२० वर्षे रवि महादशा

५० वर्षे शनि महादशा

एकूण १२० वर्षे अशी विभागणी केली आहे.

या दशातील अंतर्दशा कोष्टक सोबत दिलेले आहे.

दशा व अंतर्दशा यांचे अधिपति गोचरीने अनुकूल असतील, तर शुभ फले मिळतील.

दशा व अंतर्दशा यांचे अधिपति गोचरीने प्रतीकूल असतील, तर अशुभ फले मिळतील.

या दोन अधिपतीचे एकमेकांचे संबंध शत्रुमित्रत्व, बलाबल यांचा विचार करुन प्रमाण ठरवावे.

अर्थात या प्रमाणे कशी फळे मिळतात, हा अभ्यासाचा विषय राहील.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment