
विषय : चंद्राची स्थानागत फळे
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना
नमस्कार,
आज आपण चंद्राची स्थानागत फळे पाहणार आहोत.
प्रथम भाव : लग्नस्थानी जर एखाद्या जातकाच्या कुंडलीत शुक्ल पक्षाचा चंद्र असेल, तर आपली शक्ती, राशी स्थिती आणि इतर ग्रहांचे त्यावर होणारे दृष्टिकारक प्रभावानुसार कमी-अधिक फले जातकाला मिळतात.
कुटुंबात सुख-समाधानाचे वातावरण राहते. चंद्र जातक उत्साही व कष्टाळू असतो.
कृष्णपक्षीय चंद्र प्रथम भावात असेल, तर कुटुंबातील सुख-शांतीत बाधा बेते. रोग, अपयश, नुकसान सहन करावे लागते.
द्वितीय भाव : शुक्ल पक्ष चंद्र द्वितीय भावात असेल, तर जातक जातक सुंदर व्यक्तिमत्त्वाचा, धनी व कमी भौतिक सुखे भोगणारा असतो. आई-वडिलांचा लाडका असतो. धनसंपदा जोडतो. तो स्त्री वर्गात लोकप्रिय असतो.
कृष्णपक्षीय चंद्र जातकाच्या कुंडलीत द्वितीय भावात असेल, तर जातकाच्या सुंदर चेहऱ्यावर सुरकुत्या व डाग संभवतात. कामसुखात बाधा येते. खर्च नेहमी वाढता राहतो.
तृतीय भाव : तृतीय भावात शुभ, बलवान व दुष्प्रभावरहित चंद्र असेल, तर जातक आपल्या भावांशी खूप प्रेमाने वागतो. तो प्रसन्नवदनी, आस्तिक, धर्मावर श्रद्धा ठेवणारा, विद्याव्यासंगी, मधुरभाषी असतो. चंद्र अशुभ बलहीन व दुष्प्रभावित असेल तर काही अडचणींना सामोरे जावे लागते.
चतुर्थ भाव : सुखस्थानात शुभ व बलवान चंद्र असेल, तर जातकाला चांगली प्रसिद्धी मिळते. लोकप्रियता लाभते. तो सद्गुणांचा पुतळा असतो. तो उदार, सुखी, प्रतिष्ठित बनतो. अत्यंत कामातुर व रुची असलेला आढळतो.
पंचम भाव : शुक्लपक्षीय चंद्र पंचम भावात असेल, तर जातकाला सुंदर कन्या संतती होते. सहिष्णू, हसतमुख व चांगली कामे करतो.
कृष्ण पक्षातील अशुभ चंद्र असेल तर जातक चंचल वृत्तीचा व अस्थिर भाग्याचा असतो. जातकाची संतती विकारग्रस्त असते.
षष्ठ भाव : सहाव्या भावात चंद्र असेल, तर जातक कफ व नेत्ररोगी तसेच खर्चीक बनतो. स्वतःचे व आईचे आरोग्य चांगले नसते. चंद्र शुभ व बलवान असेल तर शुभ फले मिळतात.
सप्तम भाव : वैवाहिक जीवन व भागीदारीच्या स्थानी चंद्र असेल, तर जातक सुप्रसिद्ध, धैर्यवान, विचारक, अभिमानी असतो. जातकाचा विवाह सुखी होतो. वैभवशाली, प्रवास, सहली, पर्यटन वारंवार होतात.
सातव्या भावात शुक्ल पक्षातील चंद्र असेल तर शुभ फले मोठ्या प्रमाणात मिळतात. वैवाहिक जीवनाचा जोडीदार सुंदर, चपळ व चंचल वृत्तीचा असतो.
अष्टम भाग : आठवा भाव मृत्यूचे घर आहे. या भावात चंद्र असणे अशुभ मानले आहे. या भावातील चंद्र जातकाला सुख-सुविधांपासून वंचित ठेवतो. या भावातील चंद्र कसाही असो, शुभ असो किंवा अशुभ, बलवान असो किंवा बलहीन असो, तो निश्चतपणे दुष्प्रभावित असतो.
नवम भाव : धर्म, भाग्य व पित्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या भावात शुक्ल पक्षातील चंद्र असेल, तर जातक धर्मपारायण गुरू व अतिथींचा सन्मान करणारा असतो. तसेच तो उद्योगी व न्यायप्रिय असतो. त्याचा मान, लोकप्रियता वाढत जाते. याची संतती गुणवान असते व चांगली निपजले.
दशम भाव : दहावा भाव हे कर्मस्थान आहे. या ठिकाणी असलेला चंद्र कार्यकुशल, दयाळू, दुर्बल, बुद्धिजीवी बनतो. प्रगती, प्रतिष्ठा, लोकप्रियता जातकास खूप मिळते.
अशुभ चंद्र दशम भावात असेल तर जातकास मिळणारे लाभ गौण ठरतात.
एकादश भाव : कुंडलीत चंद्र एकादश भावात असलेला जातक चंचल दीर्घायू, यशस्वी व लोकप्रिय बनतो. चांगल्या व गुणवान संततीला जन्म देणारा असतो. एकादश भावात चंद्र, शुभ, बलवान असेल तर वरील चांगली फले मिळतात.
व्यय भाव : जर बाराव्या स्थानी चंद्र असेल, तर जातक नेत्ररोगी, कफरोगी व एकांतप्रिय असतो. या जातकाची बुद्धी अस्थिर असते. तो आपले धनऐश्वर्य गमावतो. अशा जातकाच्या आईचे व पत्नीचे आरोग्य चांगले राहत नाही.
लग्नभाव, पंचम भाव, नवम भाव, दशम भाव या चार भावांत असलेला चंद्र जातकाच्या दृष्टीने विशेष भाग्यवर्धक असतो.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)