मृत्यू आणि काही ग्रहयोग


विषय : मृत्यू आणि काही ग्रहयोग

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : आनंदी मृत्यू

नमस्कार,

मानवाला सर्वात जास्त भीती कशाची वाटत असते, तर ती मृत्यू ची. माणसाला आपले भोग संपवायला अनेक आयुष्ये पुरत नाहीत आणि त्यात आपल्या वासना, इच्छापूर्ती ची लालसा अजूनच भर घालत आहे. त्यामुळे मध्येच आपले आयुष्य थांबणार तर नाही ना या कल्पनेनेसुद्धा तो गर्भगाळित होतो.

जन्मकुंडलीतील ग्रहयोगांवरुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती असू शकेल याचा जाणकार ज्योतिषी अंदाज लावू शकतो. व्यक्तीचा मृत्यू कसा आहे? बालमृत्यू आहे का दीर्घायुष्य आहे? अपघातात होईल की व्याधी स्वरूपात मृत्यू समोर येईल यांचे गणित मांडता येते. या संदर्भात वराहमिहीराची कथा प्रसिद्धच आहे.

विक्रमादित्य राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक ‘मिहीर’ नावाचा एक प्रसिद्ध ज्योतिषी होऊन गेला. मिहीर याचा अर्थ सूर्य होय. मिहीराने भविष्य वर्तविले होते की, राजपुत्राचा वयाच्या १८ व्या वर्षी डुकरामुळे (वराह) रक्तस्त्राव होऊन मृत्यू होईल.

विक्रमादित्य राजाने १८ व्या वर्षी राजपुत्राला विशेष सांभाळायचे ठरविले. त्याला राजवाड्याबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. राजवाडयात कुणीही डुकराने प्रवेश करता कामा नये, यासाठी कडेकोट पहारा ठेवण्यात आला. ज्योतिषी मिहीरने, मृत्यूची तारीख आणि वेळ देखील काढून दिली होती. त्या दिवशी राजपुत्रावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी अंगरक्षक, दास- दासी, मंत्रिगण, राजपुत्राचा मित्रपरिवार यांना पाचारण करण्यात आले. मिहीराने मृत्यूची सांगितलेली संध्याकाळी ५.०० वा ही वेळ टळून गेली. तेव्हा राजाला आनंद झाला. ६.०० वा त्याने मिहीरास सांगितले, “राजपुत्र व्यवस्थित आहे. राजवाड्यात कुणीही डुक्कर आलेलं नाही. याचा अर्थ राजपुत्राचा मृत्यू टळला आहे. तुझे भविष्य खोटे ठरले आहे.” मिहीर आत्मविश्वास पूर्वक म्हाणाला की हे असंभव आहे. तेव्हा राजा आणि मिहीर राजवाड्याच्या सातव्या मजल्यावर गेले, जेथे राजपुत्र त्याच्या मित्रांबरोबर बुद्धिबळ खेळत होता. राजा विक्रमादित्य आणि मिहीर तेथे गेले तर राजपुत्र तेथे नव्हता. राजपुत्र कोठे आहे? अशी विचारणा केल्यावर त्याच्या मित्रांनी सांगितले की, त्याला जरा अस्वस्थ वाटत होते म्हणून तो मोकळी हवा घेण्यासाठी गच्चीवर गेला आहे. गच्चीवर जाऊन पाहिले असता तेथे राजपुत्र रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. राजचिन्ह ‘वराह’ हे राजपुत्राच्या पोटात घुसले होते व त्याचा मृत्यू झाला होता. विक्रमादित्य राजाने मुक्त कंठाने मिहीराच्या बुद्धीचे कौतुक केले. तेव्हा मिहीर विनयाने म्हणाला, ही माझी बुद्धी नाही, हे ज्योतिषशास्त्रीय ज्ञान आहे. मी फक्त अभ्यास करुन ते वर्तविले आहे.

विक्रमादित्य राजाने मिहीराला ‘वराह मिहीर’ ही उपाधी दिली. केवेढे हे पूर्वीच्या ज्योतिषांचे अगाध ज्ञान.

पण जन्म कुंडलीत मृत्यू शोधणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. अनेक घटकांचा सूक्ष्म विचार व अभ्यास करावा लागतो.

आपल्या माहितीसाठी काही अनुभवजन्य निरीक्षणे आपल्याला सांगतो.

अल्पमृत्यू : जन्म कुंडली मध्ये कर्क-वृश्चिक-मीन यापैकी लग्न रास असेल, तर हे जातक संसर्गजन्य आजारांना लवकर बळी पडण्याची शक्यता राहते. या तिन्ही जलराशी असल्यामुळे शरीरप्रकृती दुर्बल असते. एक वर्षाच्या आत मृत्यू झालेल्या बालमृत्यू बालकांच्या पत्रिकेत या तिन्ही राशीपैकी एक रास लग्नस्थानी आढळली आहे.

मृत्यूचे निदर्शक स्थान

१) जन्मलग्नकुंडलीत अष्टमस्थान हे मृत्यूचे निदर्शक आहे. या स्थानात असलेल्या ग्रहांवरुन अन् राशीवरुन व्यक्तीचा मृत्यू कधी आणि कसा येणार हे समजते.

२) चतुर्थ स्थानावरुन मृत्युसमयी व्यक्तीची शारीरिक-मानसिक स्थिती कशी असेल याचा अंदाज येतो.

षष्ठ स्थान हे रोगाचे निदर्शक स्थान आहे. आयुष्यभर व्यक्ती कोणत्या आजाराने ग्रस्त होती याचाही येथे विचार करावा लागतो.

३) जन्मलग्नकुंडलीतील व्ययस्थान जे मोक्षस्थान आहे त्याचा हि विचार महत्वाचा ठरतो.

४) सप्तम व द्वितीय या मारक स्थानांचा विचार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.

५) चर राशीस ११ वे, स्थिर राशीस ९ वे व द्विस्वभाव राशीस ७ वे या बाधक स्थानाचे परीक्षण सुद्धा महत्वाचे आहे.

६) प्रथम स्थान किंवा लग्न स्थान व चंद्र’ यावरुन व्यक्तीची शारीरिक-मानसिक ठेवण, जीवनाकडे बघण्याची दृष्टी, व प्रवृत्ती याचा अभ्यास करावा लागतो

७) या सर्व स्थानांशी संबंधीत ग्रह, भावेश, यांची स्थिती, दशा, गोचर भ्रमण याचा साकल्याने विचार करून मग निष्कर्षावर यावे लागते.

हे सगळं सांगण्यामागे माझा इतकाच उद्देश आहे की वरवर अभ्यास करुन किंवा अष्टमात एखादा ग्रह आहे म्हणून मृत्यू लवकर अथवा वाईट होईल असा वाचक समज करुन घेतात अन् चिंतेत पडतात, वाचकहो, तज्ज्ञ ज्योतिषाकडून सविस्तर कुंडली समजून घेणे आवश्यक आहे. नंतरच गरजेचे असलेले उपाय करावेत.

ज्योतिषाचा अभ्यास करु पाहणाऱ्या अभ्यासकांसाठी काही महत्त्वाचे ग्रहयोग उपयुक्त ठरतील.

१) लग्नेश षष्ठ स्थानी असून त्यावर कोणत्याही शुभ ग्रहाचा शुभदृष्टि योग नसेल व अष्टमेशा बरोबर पापग्रह अशुभ योग करत असेल तर अल्पमृत्यू योग समजावा.

२) दोन अगर तीन पापग्रहांची रवी अगर चंद्रावर अशुभ दृष्टी असेल आणि त्यापैकी एखादा पापग्रह रवी व चंद्र या दोघावर अशुभ दृष्टियोग करत असेल तर अल्पायू योग.

३) रवि अगर चंद्र केंद्रात असून पापग्रहाबरोबर असतील व त्यावर शुभग्रहाची दृष्टी नसेल तर अल्पायू योग.

४) पापग्रह लग्नी असून अष्टमेशाचा अशुभ दृष्टि योग असेल तर बालमृत्यू योग समजावा.

५) पुरुषाच्या कुंडलीत रवी आणि स्त्रीच्या कुंडलीत चंद्र यांची स्थिती आणि त्यांचे इतर शुभाशुभ ग्रहांशी होणारे योग याचा देखील विचार करावा.

६) जर जातकाच्या कुंडलीत अष्टमात चंद्र+बुध युती असेल तर जातकास वाईट फळे देते. त्यातून आत्महत्या करण्यापर्यंत त्याची मजल जाण्याची शक्यता असते.

७) अष्टमात राहू दुर्बल किंवा क्षीण असेल तर मनोविकार, आत्महत्येचे विचार हा त्रास होतो.

८) अष्टम स्थानात केतू निचीचा किंवा अशुभ असेल तर त्या व्यक्तीच्या तब्येतीस त्रास होतो. चंद्र केतू युती आईस त्रास देते तर मंगळ केतू युती भावंडांना त्रास देते

दीर्घायुष्य प्रदान करणारे ग्रह आणि ग्रहयोगः –

व्यक्तीचे आरोग्य आयुष्यमान पाहताना रवि, चंद्र या ग्रहांचा व लग्न षष्ठ, अष्टम या स्थानांचा प्रामुख्याने विचार केला जातो. विशेषतः पुरुषांच्या कुंडलीत रवि आणि स्त्रियांच्या कुंडलीत चंद्राचा विचार करावा. पुरुषांच्या कुंडलीत रवि मित्रस्थानी, स्वृग्रही आहे का? कुंडलीत कोणत्या स्थानात आहे आणि कोणत्या ग्रहाचे शुभाशुभ दृष्टियोग त्यावर आहेत याचा प्रथम विचार करावा. जर रवि बलिष्ठ राशीमध्ये असून कोणतेही अशुभ दृष्टियोग नसतील व गुरुचे शुभयोग असतील तर अशा पुरुषाचे आरोग्य उत्तम असेल व आयुष्य भरपूर असेल.

शनि आणि मंगळ हे विरुदध धर्माचे ग्रह जरी रविवर अशुभ दृष्टियोग करत असले तरी आरोग्य तितके से वाईट असणार नाही. कारण रवि आणि मंगळ हे एकाच धर्माचे ग्रह असल्याने मंगळाचा अशुभ दृष्टीयोग झाला तरी रविची जीवनशक्ती उत्तेजित होईल व शनिच्या विरुद्ध धर्माचे अशुभयोग ही जीवनशक्ती कमी करेल, परिणाम तितका होणार नाही. रवि मेषेत असेल सिंहेत असेल तर शरीर प्रकृती उत्तम ठेवतो विशेषतः सिंह राशी इतका बलवान रवि कोणत्याच राशीत असत नाही.

स्त्रियांच्या कुंडलीत चंद्राचा विचार प्रामुख्याने करावा. चंद्राचे राशिस्थान, दृष्टियोग याकडे लक्ष दयावे, चंद्रावर जर रवि, गुरु, शुक्र यांचे दृष्टीयोग असतील आयुष्य भरपूर समजावे. शुक्र किंवा गुरु अष्टमात  असतील, तर मृत्यू शांततेने व विशेष यातना, दुःख न होता होतो.

या सर्व योगामधूनसुद्धा एखादी व्यक्ती तारली जाते. जेव्हा गुरु लग्नी असून शुभ ग्रहाबरोबर शुभयोग करीत असेल तेव्हा हे योग टळले जातात आणि आयुष्य वाढते.

पत्रिकेतील गुरुबल हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. जरी पत्रिकेत गुरुबल उत्तम नसले तरी आपल्या या जन्मातील कर्मानुसार पत्रिकेतील अशुभ योग टाळता येतात. आपण गुरुची सेवा करणे खूप आवश्यक आहे, ज्याने कुणाला गुरु मानला नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. जीवनात सुख शांती-समाधान देण्याचे काम फक्त गुरुलाच करणे शक्य आहे. तसेच, दुःख-चिंता-कष्टी काळापासून देखील फक्त गुरुच आपल्याला वाचवू शकतो.

निःस्वार्थी वृत्तीने दुसऱ्याला केलेली मदत आपल्याला तारत असते. अन्नदान, वस्त्रदान, विदयादान यांसारख्या विविध दानांचे महत्त्व जाणून गरजूंना ते केले पाहिजे. जीवनातील विविध संकटं आणि अपमृत्यू यांपासून आपल्याला आपली सत्कर्म आणि गुरुचा आशीर्वाद हेच तारत असतात.

घरात कोणी आजारी असेल तर श्री महामृत्युंजय यंत्र तांब्याच्या पत्र्यावर उठवावे. या यंत्राला कापूर व उदबत्ती ओवाळून एका पातळ फडक्यात गुंडाळून ते फडके आजारी माणसाजवळ ठेवून दयावे म्हणजे अकाली मरणापासून बचाव होईल .

भगवान शंकर हे लयतत्त्वाचे कारक आहेत. शिव पूजा-अर्चना केल्याने अपमृत्यू टळतो. आजारी, अत्यवस्थ माणसाजवळ महामृत्युंजय जप केल्याने फरक पडतो.

महामृत्युंजय मंत्राचे पठण केल्याने अल्पमृत्यू योग टळतो व शिवकृपा होते असे शास्त्रात सांगितले आहे.

तसेच पद्म पुराणात दिलेल्या श्री मृत्युंजय स्त्रोत्राच्या नित्य पठणाने देखील अकाल मृत्यू टळतो.

यासंबंधी इतरही अनेक ग्रहयोग आहेत पण केवळ या विषयाची आपणांस माहिती व्हावी या उद्देशानेच हा लेख लिहिला आहे. पत्रिकेतील ग्रहस्थितीवरुन व्यक्तीचे आयुर्मान त्याला योणारा मृत्यूचा प्रकार याचे विवेचन करता येते, परंतु त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज असते. अपवादात्मक परिस्थिती वगळता भविष्य सांगताना व्यक्तीला मृत्युविषयी सांगणे शास्त्रसंमत नाही, व त्याचे हि काही संकेत आहेत, त्यानुसारच सांगणे प्रस्तुत ठरते. मृत्यूचे भय हा भाग तेथे आहेच, तसेच मृत्युविषयी गूढता ठेवण्यामागे ईश्वरी संकेत आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, मृत्यूच्या छायेने जीवन दूषित करणारी प्रवृत्ती असण्याची शक्यता असते, तेव्हा जीवन आनंदाने, परोपकाराने जगावे व शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन व्हावे, हीच परमेश्वराची इच्छा आहे.

।। श्री महामृत्युंजय मंत्र ।।

ॐ ऱ्ही जूं सः। ॐ भूर्भुवः स्वः

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगान्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुक मिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीयमामृतात ।

स्वभुवः भूः ॐ । स्वः भुव भूः ॐ । सः – हौ ॐ ।

(अकाली मृत्यू येऊ नये यासाठी या मंत्राचा जप करावा तसेच घरात शिवलिंगाबरोबर श्री महामृत्युंजय यंत्र घरात पूजेसाठी ठेवावे हे यंत्र जाड तांब्याच्या पत्र्यावर उठवलेले असावे.)

श्री पदमपुराणात दिलेले श्री मृत्युंजयस्त्रोत्र –

रत्नसानुशरासनं रजताद्रि शृइ निके तन ।

शिजिनीकृ त पन्नगेश्वरमच्युतानलसायक म् ।

क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदशालयैरभिवन्दिनं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।१।।

पंचपादपपुष्पगन्धिपदाम्बुजव्दयशोभितं

भाललोचनजातपावक दग्धमन्मथविग्रहम् ।

भस्मदिग्धकलेवरं भवनाशिनं भवमण्ययं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।२।।

मत्तवारणमुख्यचर्मकृतोत्तरीयमनोहरं

पइकं जासन पदमलोचनपूजिता डि घ्रसरोरुहम् ।

देवसिद्धतर डिगणीक रसिक्तशीत जटाधरं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।३।।

कुण्डलीकृतकुण्डलीश्वरकुण्डलं वृषवाहनं

नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम् ।

अब्धकान्तकमाश्रिता मरपादप शमनान्तकं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।४।।

यक्षराजसखं भगाक्षिरं भुजङ्गविभूषणं

शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेवरम ।

क्ष्वेडनीलगलं परश्वधधारिणं मृगधारिणं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।५।।

भेषजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं

दक्षयज्ञ विनाशिनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनम् ।

भुक्तिमुक्तिफलपदं निखिलाघसंघ्निबर्हणं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।६।।

भक्तवत्सलमर्चतां निधिमक्षयं हरिदम्बरं

सर्वभूतपतिं परात्परमप्रमेयमनुपमम् ।

भूमिवारिनभोहुताशनसोमपालित स्वाकृति

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ।।७।।

विश्वसृष्टि विधायिनं पुनरेव पालनतत्परं

संहरन्तमथ पपचमशेषलोक निवासिनम ।

क्रीड यन्तमहर्निशं गणनाथयूथसमावृतं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः।।८।।

रुद्रं पशुपतिं स्थाणुं नीलकण्ठमुमापतिम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ।।९।।

कालकण्डं कलानिं कालनाशनम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युःकरिष्यति ।।१०।।

नीलकण्ठं विरुपाक्षं निर्मल निरुपद्रवम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युःकरिष्यति ।।११।।

वामदेवं महादेवं लोकनाथं जगद्गुरुम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युःकरिष्यति ।।१२।।

देवदेवं जगन्नाथं देवेशमृषभध्वजम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्यूःकरिष्यति ।।१३।।

अनन्तमव्ययं शान्तमक्षमालाधरं हरम्।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ।।१४।।

आनन्दं परमं नित्यं कैवल्यपदकारणम् ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्यूःकरिष्यति ।।१५।।

स्वर्गापवर्गदातारं सृष्टि स्थित्यन्तकारिणम ।

नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ।।१६।।

विशेष सूचना : जाणकार ज्योतिषास वा अधिकारी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नये व अर्धवट पद्धतीने उपाय योजना करू नये.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment