
विषय : चंद्र जन्मा तुझी कहाणी
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्वअध्ययन व नवग्रह साधना व गुगल आंतरजाल
नमस्कार,
ज्योतिष शास्त्रातील चंद्राचे महत्व हे कायम अबाधित असणार आहे. चंद्र मनाचा कारक ग्रह मनाला जातो. मनोभावना, मनोविकार, प्रेम, संमोहन, गूढविद्या, इंद्रिय सुखाचे समाधान, स्पर्शाचे ज्ञान, सुखाची झोप, मनाचा खंबीरपणा, भोळेपणा, विसराळूपणा, दुर्बलता, वेड, माता, स्वतःचे घर व त्यातील सुखसोयी, स्त्री, कलाविष्कार, औषधे, दुध, पातळ पदार्थ, पेये, अन्न धान्ये, उपहारगृहे, मासे, पांढऱ्या रंगाच्या वस्तू, प्रवास, पाणी, गर्भाशय, पोट, गर्भपेशी, स्तन, शरीरातील लस, रसोत्पादक ग्रंथी, जननक्रिया, स्त्रियांचे नैसर्गिक धर्म ईत्यादी अनेक गोष्टी चंद्र दर्शवत असतो.
आयुष्यातील चढ उतार दर्शवणारी प्रसिद्ध विंशोत्तरी महादशा जन्माचे वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल तिथून सुरु होते.
आपले पुराण चंद्राविषयी एक रूपक कथा सांगते, ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ब्रह्म पुत्र आग्नेय याने कठोर तपश्चर्या केली, तापाची सांगता झाल्यावर त्याचे डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या दिव्याश्रूंनी अवघे विश्व प्रकाशमान झाले. दिशांनी मोहित होऊन पुत्र प्राप्तीच्या लालसेने स्त्री रूप धारण करून ते अश्रू प्राशन केले. पण अश्रू पाणी स्वरूप पातळ असल्याने गर्भ धारणा काही होऊ शकली नाही. म्हणून त्याने अश्रुंचा त्याग केला. तेव्हा ब्रह्माने त्याचे नाव चंद्र ठेवले व ब्रह्मलोकी नेऊन ठेवले.
अशीच अजून एक कथा वाचनात आली. अत्रिऋषी व सती अनसूया यांना ब्रह्मदेवांच्या अंशापासून झालेला पुत्र म्हणजेच चंद्र. चंद्राने माता-पित्यांच्या अनुमतीने वाराणसी येथे जाऊन शिवलिंग तयार करून त्रिकाळ स्नान करून तो शिवाराधना करू लागला त्यामुळे भगवान शंकर शिवलिंगातून प्रगट झाले व आकाशात स्वतंत्र चंद्रमंडळ निर्माण करून तेथे चंद्राची स्थापना केली.पुढे प्रजापती दक्ष राजाने आपल्या २७ उपवर मुलींचे विवाह चंद्राशी लावून दिले, त्या मुली म्हणजे २७ नक्षत्रे होय.
रोमन कैथालिक लोक चन्द्राला Vergin Mary म्हणतात व ती स्वर्गाची आई होय, जी पोषण करते. ती ल्यूना आहे. ती रात्रिची राणी आहे. डायना अपोलोची जुळी बहिण आाहे. ही देवी व शिकारी पण आहे, ही शुद्धता व फलोत्पादकेतेची अधिष्ठाती पण आहे. तिला ग्रीक लोकाद्वारे Astors म्हटले जाते.
तसेच आधुनिक विज्ञानास ही सतत खुणावणारा कोण असेल तर तो चंद्र. चंद्रावर वातावरण कसे असेल, मानवी वस्ती तिथे करणे शक्य आहे का. अशा अनेक शक्यतांचा शोध घेण्यासाठी जगातील प्रगत देशांमध्ये चंद्र मोहिमा आखल्या जातात.
१९६९ सालच्या जुलै महिन्यात अमेरिकेच्या अपोलो-११ या यानातून नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलिन्स व एडवीन ऑल्ड्रिन हे अंतराळ वीर चंद्राच्या भेटीसाठी गेले. नील आर्मस्टींग व एडवीन ऑल्ड्रिन चंद्रावर यशस्वी पाउल ठेवले व तेथून माती, दगड ई. नमुने गोळा केले आणि सुखरूपपणे पृथ्वीवर परतले.
तर अशा या चंद्राच्या जन्माविषयी आधुनिक विज्ञानात जे सिद्धांत प्रचलित आहेत त्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
सर्वसाधारणपणे, चंद्र कसा तयार झाला याचे चार सिद्धांत प्रचलित आहेत.
१) कॅप्चर थिअरी
२) कंडेन्सेशन थिअरी
३) जायंट इम्पॅक्ट थिअरी
४) फिजन थिअरी (विखंडन सिद्धांत)
१) कॅप्चर थिअरी :
सन १९०९ मध्ये थॉमस जेफरसन जॅक्सन सी या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाने कॅप्चर सिद्धांत मांडला. त्यांचे मते चंद्राची निर्मिती सूर्यमालेत इतरत्र लघुग्रहांप्रमाणे झाली, परंतु जेव्हा.तो पृथ्वी ग्रहाच्या खूप जवळ आला, तेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्यास आपल्या कक्षेत खेचले व चंद्र त्यानंतर पृथ्वीभोवती भ्रमण करू लागला.
हा सिद्धांत चंद्र आणि पृथ्वीची रचना वेगळी का आहे हे ओळखण्यास मदत करतो. तथापि, हा सिद्धांत वेगवेगळ्या ग्रहांभोवती फिरणाऱ्या इतर चंद्रांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देतो असे मानले जाते, अनेक शास्त्रज्ञांना वाटते की हा सिद्धांत पृथ्वीच्या चंद्रासाठी संभव नाही.
उदाहरणार्थ, फोबी, शनिभोवती फिरणारा चंद्र, या वलयांकित ग्रहाने पकडला आहे असे मानले जाते. फोबीचा आकार लघुग्रहांसारखा अनियमित असतो आणि तो चंद्रासारखा पूर्णपणे गोलाकार नसतो. शिवाय, ग्रहांद्वारे (पकडलेले) कॅप्चर केलेले फोबीसारखे चंद्र सामान्यतः विलक्षण किंवा गोलाकार नसलेल्या कक्षाचे अनुसरण करतात. पृथ्वीचा चंद्र अतिशय गोलाकार कक्षेत ग्रहाभोवती फिरतो. याव्यतिरिक्त, काही आकाषीय वस्तूंना चंद्र पृथ्वीशी टक्कर होण्याआधी त्याचा वेग कमी करावा लागला असता आणि अशा घटनेचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
२) कंडेन्सेशन थिअरी :
हा सिद्धांत असे सांगतो की, पृथ्वी आणि चंद्र एकाच वेळी तेजो मेघातून घनरूप झाले आहेत.
कंडेन्सेशन थिअरी हा सिद्धांत सौर यंत्रणा कशी निर्माण झाली हे स्पष्ट करते. त्यात असे म्हटले आहे की वायू आणि धूळ यांचे एक महाकाय ढग घन पदार्थात घनरूप होऊन ग्रह तयार होतो व सौर वाऱ्यामुळे ग्रहांची वाढ थांबते. हा सिद्धांत असेही सुचवितो की चंद्र आणि पृथ्वी एकाच नेब्युलापासून घनरूप झाले आहेत आणि चंद्र पृथ्वीभोवती कक्षेत फिरत आहे.
३) जायंट इम्पॅक्ट थिअरी :
जायंट इम्पॅक्ट थिअरीला कोलायडिंग किंवा इजेक्टेड रिंग थिअरी असेही म्हटले जाते. पृथ्वीला मोठ्या वस्तुमानाची जोरदार धडक बसली आणि पृथ्वीचा एक तुकडा अवकाशात बाहेर पडला. तो म्हणजे चंद्र. पण हा सिद्धांत फारसा स्वीकारला गेला नाही.
४) फिजन थिअरी (विखंडन सिद्धांत)
सन १८९८ मध्ये चार्ल्स डार्विन चा मुलगा जॉर्ज हॉवर्ड डार्विन याने हा सिद्धांत मांडला. विखंडन म्हणजे विभक्त होणे, आणि विखंडन सिद्धांत असे सुचवितो की, जेव्हा पृथ्वीच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात एक खडकाचा वितळलेला तप्त गोळा होता. तिच्या प्रदक्षिणेचा वेग ४ तास इतका प्रचंड होता. त्याकाळीही पृथ्वीवर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती ओहोटीचे चक्र सुरू झाले होते. त्यावेळी दर दोन तासांनी पृथ्वीवर भरती येत असे. व या सर्वांमुळे केंद्रोत्सारी शक्ती निर्माण होऊन दूर फेकला जाऊन तो पृथ्वीपासून विभक्त झाला व पृथ्वीभोवताली चंद्राच्या स्वरूपात फिरू लागला. पृथ्वीच्या ज्या भागातून चंद्र बाहेर फेकला गेला, त्याची खूण आजही आपल्याला पॅसिफिक महासागराच्या रूपाने दिसत आहे. पृथ्वीपासून चंद्राची निर्मिती झाल्यामुळे पॅसिफिकचा खड्डा तयार झाला असे डार्विनचे म्हणणे होते.
हा सिद्धांत शक्य आहे असे वाटले कारण, चंद्राची रचना संपूर्ण पृथ्वीसारखी नसली तरी ती आपल्या ग्रहाच्या बाह्य स्तरांसारखी दिसते.
१९५३ साली रेमंड आर्थर लिटलटन यांनी गणना करून हे मांडले की, जर केंद्रोत्सारी शक्ती निर्माण होऊन दूर फेकला जाऊन तो पृथ्वीपासून विभक्त झाला, दोन ऐवजी एक मोठा तुकडा दूर उडून पडला व मधला छोटा तुकडा जवळच उडून पडेल. यातील विभक्त होऊन दूर गेलेला मोठा तुकडा म्हणजे मंगळ हा ग्रह आहे. मंगळ व पृथ्वी एकमेकांपासून सुटे होताना मधल्या ताणलेल्या भाग जो सुटा झाला तो चंद्र आहे. हा तुकदा (चंद्र) पृथ्वीपासून बराच जवळ असल्यामुळे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीभोवती फिरत राहिला. मंगळ मात्र भ्रमणातील अस्थैर्यामुळे पृथ्वीपासून बराच लांब उडून स्वतंत्र ग्रह म्हणून सूर्याभोवती फिरू लागला.
इथे एक गोष्ट मांडावीशी वाटते, ती म्हणजे मंगळाचे वस्तुमान साधारणपणे पृथ्वीच्या वस्तुमानाएवढे आहे. वैदिक ग्रंथात मंगळाला ‘कुज’ म्हणजे पृथ्वीपासून जन्मलेला असे नाव आहे. मंगळाला भौम म्हणजे भूमीपुत्र असे ही म्हणतात.
मंगळ जन्माची पुराणातील रूपक कथा वाचनात आली ती आपल्याला सांगतो.
अवंती नगरीत वेदपारंगत भारद्वाज नावाचा एक तेजस्वी ब्राह्मण क्षिप्रा नदीच्या काठी तपास बसला असताना एक अप्सरा तपोभंग करण्यासाठी येऊन आली व भारद्वाज जागेवरून उठल्यावर गुप्त झाली. भारद्वाज कामविकाराने ग्रासल्याने त्याचे रेतस्खलन होऊन भूमीत शिरले व त्यातून एक पुत्र जन्मास आला. स्त्री रूपाने पृथ्वीने त्याचे संगोपन केले व तो ७ वर्षाचा झाल्यावर ती भारद्वाज कडे गेली व त्याला सर्व कथा सांगून त्याचे कडे सुपूर्त केले. तोच हा भौम म्हणजे मंगळ.
रेमंड आर्थर लिटलटन यांच्या मंगळ व चंद्र जन्माच्या संकल्पनेशी आपल्या पुराण ग्रंथांमधील वर्णन जुळणारे आहे, जे अतिप्राचीन काळी दिलेले आहे.
इति चंद्र जन्मकथा अध्याय संपूर्णम I
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)