कौटुंबिक सौख्य आणि रंग विचार


विषय : कौटुंबिक सौख्य आणि रंग विचार

स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ज्यो. मुर्तीदेवी प्रजापत यांचा लेख

नमस्कार,

आपण आणि आपले कुटुंबीय हा एक जिव्हाळ्याचा व तेवढाच संवेदनशील विषय असतो. सर्वांचीच इच्छा असते की आपल्या घरात नांदा सौख्य भरे असेच वातावरण असावे. परंतु वास्तवात बरेच घरात याचे विपरीत वातावरण आढळून येते. घर एकच असते, पण एकाच घरात चार लोक रहात असतात. प्रत्येकाचे स्वभाव, आवड निवड भिन्न कारण प्रत्येकाची जन्मतारीख वेगवेगळी असते. चौघांच्या जन्माच्या वेळी घरातील घटकांचा प्रभाव वेगवेगळा असतो. प्रत्येकावर त्याच्या त्याच्या जन्मकालीन ग्रह स्थितीमुळे फरक असतो. आता एकाच घरात अशा विविधतेतून एकता साधायची म्हणजे तसे कठीणच. एखाद्या वसतिगृहात राहणार्या शांत स्वभावाच्या व्यक्तीला सतत चिडचिड करणारा रूममेट मिळाला तर त्याची काय अवस्था होईल? इथे रूम बदलू शकतो, घराचे काय?  मग वास्तुशात्रीय उपाय, शांती, होम, हवन, मंत्र, तंत्र आदी उपाय सुचवले जातात. ते योग्यच आहेत. या मागे घराचे संतुलन साधले जाणे हाच उद्देश असतो.

असाच एक फरक पाडणारा घटक म्हणजे घराच्या भिंतीना दिलेला रंग, घरातील पडद्यांचे रंग. कारण जेथे आपला सहज वावर असतो, त्या वास्तूतील रंग प्राधान्य हा एक सर्वांवर मोठ परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. रंगांचा ज्योतिष शास्त्रीय उपयातील वापर हा पूर्वापार चालत आला आहे. त्यामुळे एकाच्या आवडीची रंगसंगती त्याच्या तत्वास सुसंगत असते, पण त्याच घरातील विरुद्ध तत्वाच्या व्यक्तीस ती नुकसान देणारी ठरते. एक भाऊ भरपूर कमावतो आणि दुसरा बेरोजगार आढळून येतो. आणि त्यात एखादा भाऊ विवाहित असेल, तर अजूनच वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. एकाच घरात ही अवस्था. त्यामुळे स्वत:चे घराचे संतुलन साधण्यासाठी घरातील वा कपड्यांमधील रंगसंगती साधणे, हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. समान वा मित्रता दर्शक तत्वांची व्यक्ती घरात असतील, तर समस्या कमी उद्भवतील, पण अनावधानाने विरुद्ध तत्वाची रंगसंगती नकळत त्यांच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. तुमच्या घटकानुसार रंग निवडा, आता सर्वांचे घटक सारखे असतील सोपे होईल, नाहीतर घरातील प्रत्येकाचे घटक तपासून त्यातील मित्र व सम श्रेणीतील ग्रह तत्वांचे रंग निवडल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. अन्यथा हा एक प्रकारचा वस्तू दोष वा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो. पण आज प्रत्येक जन व्यक्तिगत उत्कर्षाच्या मागे लागला आहे. त्याला असल्या गोष्टी वाचण्यात, करण्यात काही स्वारस्य नाही आणि वेळ ही नाही. हे सगळे जुन्या पिढीचे विचार असून आधुनिकतेत याला काही महत्व नाही असे मानणारे वाढत चाललेत.

असो. मला या लेखाचा आशय आवडला व उपयुक्त वाटला म्हणून, माझ्या शब्दात आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. पटले तर घ्या, अन्यथा द्या सोडून…

सर्वाना भरपूर कुटुंब सौख्य लाभो हीच या निमित्ताने सदिच्छा व देवास प्रार्थना.

शुभम भवतु I    

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment