ग्रहांची सकारात्मक-नकारात्मक अभिव्यक्ती


विषय : ग्रहांची सकारात्मक-नकारात्मक अभिव्यक्तीसंकलक : ज्योतिष मित्र मिलिंदसंदर्भ : ELEMENTS OF ASTROLOGY AND PSYCHOLOGY

नमस्कार,

ज्योतिष शास्त्रीय अभ्यासात गोल गोल फिरत आज, पुन्हा एकदा नजर ग्रहांकडे वळाली. व मनात विचार चक्र चालू झाले. आणि मन विचारते झाले के, खरच हे ज्योतिष शास्त्र प्रत्येकाच्या आवाक्यात येऊ शकते का? तर मनाचे हो उत्तर आले. आपण कसे २००९ पासून टप्प्याटप्प्याने अभ्यास सोपा सोपा मार्ग शोधत आत्मसात करत आलो हे आठवले. आणि मग मन ग्रहाच्या मागे लागले.

१. ग्रह हे अनुभवाचे विशिष्ट परिमाण दर्शवतात.

२. राशी अनुभवाचे विशिष्ट गुण दर्शवतात.

३. स्थान/भाव अनुभवाची विशिष्ट क्षेत्रे दर्शवतात, ज्यामध्ये ग्रह आणि राशी यांची ऊर्जा कार्यरत असते.

४. दृष्टी (ग्रहांमधील कोनीय संबंध) अनुभवाची विविध साधने प्रकट करतात.

या सर्व गोष्टींचा एकत्र विचार करून निर्णयापर्यंत येण्याची ही कला व अभ्यास व ऊर्जा आहे. ज्यामुळे उर्जेची भाषा म्हणजे ज्योतिष असे मी मानतो.प्रत्येक ग्रह त्याच्या दशे अंतर्दशेत चांगली व अनिष्ट अशी दोन्ही फळे दयायला बांधील असतो. फक्त प्रत्येक ग्रह त्याच्या स्वभावाप्रमाणे ग्रह स्थिती, रास, दृष्टी ई. द्वारा सर्जनशील किंवा आत्म-विनाशकारी फळ देणार असतो.ग्रहांची सकारात्मक-नकारात्मक अभिव्यक्तीप्रत्येक ग्रह तत्त्व सकारात्मक आणि सर्जनशील किंवा नकारात्मक आणि आत्म-विनाशकारीपणे व्यक्त केले जाऊ शकते. कर्म – कर्माचा परिणाम – आणि त्या परिणाम मुळे निर्माण झालेले कर्म अथवा संचित या अनुभवाची प्रतीक्रिया ही नैतिक दृष्टीने सुसंगत असू शकते किंवा विसंगती आणि मतभेदाच्या स्थितीत असू शकते. याचा परिणाम सर्जनशील वापरात होतो किंवा या विविध ऊर्जा, शक्ती आणि वृत्ती यांचा गैरवापर होतो. यासाठी प्रत्येक ग्रहाच्या प्रत्येक पैलूंचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते. जेणेकरून जातकामध्ये सामंजस्य किंवा मतभेद किती प्रमाणात आहेत हे समजून घेण्यास खूप मदत होते. ग्रहाचे मूळ परिणाम देण्याचे स्वरूप समजले की, मग घटनेच्या जवळ जाण्याचा मार्ग उलगडत जातो.

वर दिलेले ४ मुद्दे तपासून त्यांचा त्रिक स्थाने (६ ८ १२) शी कोणत्याही प्रकारचा संबंध व संबंधित प्रश्नांचे स्थानाचा विरोधी ग्रह प्रभावी आहेत का हे तपासले की जन्म कुंडलीचा निम्मा ढाचा लक्षात येतो.

या छोट्याशा मंथनात दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स व व दिलेल्या तक्त्यातील वैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवत योग्य अभ्यास करून फलादेशाची सांगड घालता आली तर तुम्ही एक ज्योतिषी होऊ शकता.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment