
विषय : मंगळ बुध त्यांच्या राशी व काही कुयोग
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : असे ग्रह अशा राशी
नमस्कार,
विवाह हा एक संवेदनशील विषय आहे. त्यामुळे पालक मंडळी मुलगा मुलगी उपवर झाली की ज्योतिषाकडे धाव घेतात. गुणमेलन बघितले जातात. मांगलिक कुंडली आहे का तपासली जाते. वैवाहिक सौख्यकारक ग्रह शुक्र, मानसिकता दाखवणारा चंद्र कसा आहे पहिला जातो, संततीकारक गुरु ची स्थिती बघितली जाते. शुक्र मंगळ युती कुयोग, सप्तम स्थान ई. तपासले जाते. पण त्याच बरोबर बुद्धी कारक बुधाची स्थिती देखील तपासणे हे तितकेच महत्वाचे असते. अन्यथा काही वेळा फसवणुकीचे प्रसंग नशिबी येतात.
मध्यंतरी व.दा. भट सरांचे “असे ग्रह अशा राशी” हे पुस्तक वाचनात आले. त्यांची पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते, ती म्हणजे, त्यांचा दांडगा व्यासंग, प्रचंड कुंडली संग्रह आणि, नेहमीच्या योगांचे पलीकडे जाऊन ग्रह स्थितीचा आणि त्यांच्या परिणामांचा मूळ तत्वे, कारकत्वे, स्वभाव यांचा मेळ घालून इतर ग्रह स्थिती तेच इंगित करत असेल तर त्याची सांगड घालून एखाद्या घटनेचे भाकीत करणे. कुंडलीवरून भविष्य सांगताना ज्या काही प्राथमिक गोष्टींचे ज्ञान असावे लागते, त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीतून होणारे परिणाम, बारा राशींचे गुणधर्म व ग्रह कारकत्व चांगले समजलेले असेल, तर प्रत्येक ग्रह कोणकोणत्या राशीत कशी फले देईल याचा अंदाज करता येतो. असे असले तरी ग्रहांच्या शत्रू मित्रत्वाच्या संबंधाने ग्रहाला लाभणारी राशी त्याच्या शत्रूची किंवा मित्राची आहे, यावर त्याच्या कारकत्वाचा आविष्कार अवलंबून असतो. त्यांच्या पुस्तकातील एक एक परिच्छेद म्हणजे ज्योतिष खवय्याना खाद्याची जणू पर्वणीच.
व. दा. भट सर त्यांच्या अभ्यासात मंगळ, बुध, शुक्र, चंद्र ह्या ग्रहांची राशिगत स्थानगत स्थिती जास्त महत्वाची मानतात. शनि, गुरु, राहु वगैरे ग्रहांच्या परिणामांचा विचार ह्या लहान ग्रहांच्या सहकार्यांवर किंवा असहकारातून बघावा लागतो. कुंडलीतील कांही ग्रहांची कांही राशीं मधील स्थिती ही विशेष ठळक परिणाम करणारी असते. कुंडलीतील निर्णायक घटक मनाशी ठरवताना अशी एखादया ग्रहाची राशीगत स्थिती तुमच्या लक्षांत चटकन आली तर तुम्ही कांही उत्तम भाकीते उत्तम रीत्या करु शकता. “असे ग्रह अशा राशी” या पुस्तकात त्यांनी बुध, मंगळ व त्यांच्या राशी यांच्या काही स्थिती विषयी माहिती दिलेली आहे, जी इतर ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जातकास अनिष्ट फलदायी ठरू शकते. आपल्या माहितीसाठी काही संक्षिप्त संकलित रुपात देण्याचा हा छोटासा प्रयत्न. ज्यांना जास्त उत्सुकता असेल त्यांनी जरूर हे पुस्तक आणून वाचावे. ज्यात असे अनेक योग, कुंडल्या दिल्या आह्र्त. जिज्ञासूंनी जरूर त्याचा अभ्यास करावा.
(१) कन्येचा मंगळ :
कन्या रास ही नैसर्गिक कालचक्र कुंडलीत षष्ट स्थान ची द्योतक आहे. ह्या राशीचे कांही महत्वाचे गुणधर्म आहेत. कन्या ही रास स्त्री रास आहे. निसर्गतः ही रास पुरुष राशिपेक्षा अशक्त आहे. षष्ठस्थानची निदर्शक असल्याने निसर्गतः ही रास रोग, रोगाशी-शारीरिक पीडा तसेच मानसिक क्लेश ह्या गोष्टींशी संबंधित आहे. कन्या राशीचा अंमल लहान आतडी, पचनसंस्था, अपचन विकार, पोटाच्या खालचा बेंबीजवळचा भाग ह्यावर आहे. कन्या राशीचे चिन्ह हातात भाताची लोंबी-कणिस घेतलेली स्त्री असे आहे. अन्न आणि कन्या रास ह्यांचा घनिष्ट संबंध आहे.
कन्या राशीचा अधिपति बुध आहे. बुद्धिमान रास आहे, ते परिणाम आपण नंतर पाहू. कन्या रास आणि पोट ह्या तत्वाची अनुभूति प्रथम पाहू. ही अनुभूति नाना तन्हेची असते हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. पण पोटाचे आजार, विकार एवढ्या पुरतीच आपली कल्पना मर्यादित करू नका. त्याचे व्यापक स्वरूप प्रथम समजावून घ्या.
उदा. सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन ह्यांचे कुंभ लग्न व अष्टमात कन्या राशीत अनेक ग्रह. टेबलाचा कोपरा पोटाला लागून अपघात होऊन जीवावरचा प्रसंग येणे हा प्रकार कन्या रास आणि पोट ह्यांचे समीकरण योग्य आहे हेच दर्शवितो.
कांहीच्या डोक्याला मार लागला आहे त्यांच्या कुंडल्यात मेषेत रवि, मंगळ आढळून आले आहेत. ज्यांच्या कुंडल्यात कन्या राशीत पापग्रह आहेत, त्यांच्या पोटावरून वाहन गेल्याने मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. पोटदुखी, पोटाचे विकार, पोटावर ऑपरेशन, अॅमेबिक डिसेंट्री, पोटाचा आंतड्याचा कॅन्सर, क्षय ई. बहुतांशी कुंडल्यात कन्या राशीचा संबंध आढळून येतो..
मंगळाचे कारकत्व :
मंगळ हा ग्रह शारीरिक पीडा, क्लेश, आघात, अपघात, मार, जखम ई. दृष्ट्या पष्ठ स्थानाचा मूळातच कारक ग्रह आहे. कन्या रास ही नैसर्गिक कालचक्र कुंडलीत षष्ट स्थान ची द्योतक रास त्याच्या शत्रुची रास आहे. तेव्हा ह्या राशीत त्याचे परिणाम ठळकपणे दिसणारच.
मानसिक – दृष्ट्या कन्या मंगळ
मंगळ कन्या राशीत असणे हा जातकाची मानसिक जडण घडण जाणून घेण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा परीणामकारक ग्रह ठरतो. कन्या ही रास मुळातच षष्ठस्थानची द्योतक, क्लिष्ट, द्विस्वभाव रास आहे. या राशीत मंगळासारखा शत्रू ग्रह असता स्वभावात भावनाशीलता, तसेच मनाची द्विधा अवस्था निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. संशयीवृत्ति तसेच संशोधक वृत्तिहि असते. इतर कुंडलीतील ग्रहमान मानसिकदृष्ट्या कमकुवतता निर्माण करणारे असेल, विशेषतः चंद्र बुध शुक्र हे भावनाबुद्धि ग्रह हर्षल नेपत्यून, शनि हा ग्रहांच्या प्रथम दर्जाच्या कुयोगांत असून मंगळ कन्या राशीचा असेल, तर मनोविकृति, भग्न व्यक्तिमत्व, मानसिक असंतुलन, नैराश्य हा गोष्टी देतो. अनेक मानसिक रुग्णांच्या कुंडलीत हा योग आढळतो.
उदा. १. (मूळ पुस्तकातील पान क्र. ३८, कुंडली क्र.५३) एक अत्यंत हुशार २-३ पदव्या घेतलेले गृहस्थ, पण मनोरुग्ण. प्रेमसंबंधात अपयश, गृहत्याग. मिथुन लग्नाच्या या कुंडलीत चतुर्थात मंगळ नेपच्यून युती कन्या राशीत आहे. त्या बरोबर शुक्र हर्षल यूती लग्नी आहे. कन्या राशीत मंगळ असता तो ज्या दोन स्थानांचा भावेश होतो, त्यापैकी एक स्थानचा भावेश या दृष्टीनें तो हमखास एखादे अशुभ फल देतोच.
२. बालगंधर्व हयांच्या कुंडलीतहि मिथुनेचा शुक्र सप्तमांत व कन्येचा मंगळ दशमांत. दशमातील मंगळामुळे त्यांच्या जीवनांत अनेक चढ उतार जसे झाले, तसेच धनु लग्नास पंचमेश मंगळ या कन्या राशिस्थ असल्याने त्यांना एक कन्या संतती झाली.
३. एका स्त्रीची जन्मतारीख १९-८-१९३१ धनु लग्न दशमांत कन्येचे मंगळ केतु युतीत. एक संतति अपंग.
४. तुळ लग्नाच्या कुंडलीत कन्येचा मंगळ व्ययांत हा एक जबरदस्त योग होतो. अशावेळी शुक्र किंवा सप्तमस्थान पापग्रह युक्त असेल तर वैवाहिक जीवनांत मोठे त्रास संभवतात. अत्यंत उशिरा विवाह होणे, पत्नीस मोठे आजार, वैधव्य, द्विभार्या योग अशी फलें मिळतात. अशा परिस्थितीत लग्नांत किंवा लाभ स्थानांत शनि असेल, तर अशी फले हमखास आढळतात. अशा जातकांना सांसारिक सुख लाभत नाही. कारक ग्रह शुक्र कितपत अनिष्ट त्याप्रमाणे फलाची तीव्रता अवलंबून असते. एका स्त्रीस तीस वयाच्या सुमारास वैधव्य आले.
कुंडलीत कोणत्याही एखादया घटनेसंबंधी अनेक ग्रहयोगांचा सहभाग असतो. येथे सप्तमेश मंगळ व्ययांत कन्या राशीत आहे. अनेक कुंडल्यांत असतो. केवळ पतिपत्नीची भांडणे हया पलीकडे कित्येक वेळा तो महत्वाचा नसतो, पण कारक ग्रह बिघडला की त्याची तीव्रता वाढते.
(२) वक्री बुध :
वक्री बुध हा असाच एक अति महत्त्वाचा योग व.दा. भट सर मानतात. बुध वक्री असेल तर, त्याच्या फलिताची व्याप्ती बऱ्याच प्रमाणांत निश्चित असते
१) एक बुधाच्या कारकत्वाच्या दृष्टीने कांही वैगुण्य आढळते.
उदा. बोलण्यांत दोष, मेंदूसंस्थेसंबंधी किंवा बुद्धिच्या दृष्टीने कांहीं चांगले अगर वाईट वैशिष्ट्य आढळते. वक्री बुध ज्या दोन स्थानाचा भावेश होतो, त्या दोन स्थानांपैकी एका स्थानासंबंधी निश्चित अशी कांहीतरी कटकटीची त्रासाची फळे मिळतात.
उदा. मिथुन, कन्या लग्न असेल व बुध कोठेहि वक्री अवस्थेत असेल, तर आरोग्याच्या दृष्टीने हमखास, कांहीं तरी त्रास जातकाला जीवनांत होतात. समजा बुध सप्तमेश होऊन वकी असेल तर विवाह ठरतांना अडचणी येतात. ठरलेला विवाह फिसकटणे, बरेच दिवस विवाह ठरून सुद्धा, केव्हा होईल हया बद्दल चिंता उद्भवणे, ऐनवेळी विवाहाची तारीख पुढे ढकलावयास लागणे, मानसिक गोंधळ, द्विधा मनःस्थिती होणे असे प्रकार आढळतात. सप्तमस्थान बिघडले असेल तर विवाह सुखाचा होत नाही. बुध वक्री असता अनेक वेळा मेंदूसंस्थेशी संबंधित आजार संभवतात.
२) जन्मदिवशी बुध स्तंभी अगदी गतिशून्य असणे हा तर एक अति शक्तीशाली योग असतो. तो ज्या स्थानाचा भावेश असेल, त्या स्थानासंबंधी एखादे अशुभ फल मिळते. कन्या व मिथुन लग्नास स्तंभी बुध मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने काही व्यथा, विकृती देण्याची शक्यता असते. लग्नेश हया दृष्टीने स्तंभी, वक्री बुधाला अति महत्त्व देऊन तो अभ्यासावा लागतो.
बुध मंगळामुळे त्वचा विकार, अॅलर्जिक त्रास, निद्रा नाश, तसेच मानसिक चिंता करण्याचा अभाव, प्रतियोग वक्री शनि वगैरेमुळे इतर फलेहि कुंडलीस मिळतात.
बुध जेव्हा शनि सारख्या ग्रहांबरोबर युतीत असतो, तेव्हा इतर पूरक योगात मानसिकदृष्ट्या कमकुवत करतो. मनावर ताबा राहात नाही. त्यातून मानसिक आजार, व्यसनाधिनता आढळते.
(३) मेष राशीतील बुध :
प्राचीन ज्योतिषांनी ग्रहाचे शत्रूमित्रत्व फार व्यवस्थित ठरवले आहे असे आढळून येते. बुध हया ग्रहाचा, मंगळ हा पहिल्या नंबरचा शत्रू ग्रह आहे. तेव्हा त्यांचे परिणाम हथा मंगळाच्या राशीत निश्चितच, ज्याला आपण विशेष उल्लेखनीय म्हणू असे आढळतात.
कोणत्याही ग्रहाची राशीगत स्थिती अभ्यासताना त्या राशीचे गुणधर्म विशेष विचारात घ्यावे लागतात आणि नंतर त्या राशीच्या अधिपतिचे गुणधर्म बघावे लागतात. मेषेचा बुध या बाबतीत मेष ही चर रास आहे, आक्रमक रास आहे. तिचा निसर्गतः अंमल डोके हया भागावर आहे. तसेच बुध हया ग्रहाचा बुद्धि, मन, मज्जासंस्था, मेंदू, वाणी, जीभ, बोलणे, ग्रहणशक्ती, त्वचा, मामा हयाच्याशी संबंध आहे. मेष राशीचा अधिपति मंगळ आहे. तेव्हा आपण जेव्हा बुध मेषेत आहे असे म्हणतो तेव्हां बुध व मंगळ हयाचा संबंध अध्याहृत असतो. बुध हा शुक्राच्या राशीत असेल तेव्हा बुध-शुक्र नाते आलेच. म्हणजे त्या राशीतील बुधाचा कलात्मक दृष्टीकोण, बुद्धिचा कलेकडे ओढा वगैरे आपण मनात धरूनच भविष्यकथन करत असतो.
त्यामुळे बुध-मेष या स्थितीत मंगळाचे गुणधर्म निश्चितपणे आढळतात. मंगळ शक्तीदायक आहे. त्यामुळे असे लोक बुद्धिच्या दृष्टीने चंचल असले तरी चलाख असू शकतात. मंगळ हा ग्रह विघटन करणारा असल्याने मेषेच्या बुधाचे जातक हा दुसऱ्यांच्या दृष्टीने वादग्रस्त ठरतात. नको तेथे स्पष्टवक्तेपणा, चुकीची शब्दयोजना, वितंडवाद घालण्याची वृत्ती,
चटकन् विचार न करता मतप्रदर्शन करण्याचा स्वभाव. इत्यादीमुळे हे जातक इच्छा नसताही वादविवाद उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. मंगळ हा टीका करणारा ग्रह आहे, तसेच लढाऊ आहे. त्यामुळे मेषेचा बुध असणारे जातक सर्वसाधारण दुसऱ्यावर टीका करण्यात, कुरघोडी करण्यात स्वतःला धन्य समजतात.
मंगळाची दुसरी रास वृश्चिक आहे. पण मेषेत व वृश्चिकेत जमीन अस्मानाचे अंतर आविष्कारात आहे. वृश्चिक रास अंतस्थ आहे, तर मेष बर्हिगत आहे. मेष रास राग, मतभेद समोरासमोर व्यक्त करून मोकळे होतील तर वृश्चिक रासवाले तो आंत दाबतील, सूड उगवतील.
मेष डोक्यावर अमंल करते व बुधाचा संबंधही मेंदूवर आहे, मज्जासंस्थेवर आहे त्यामुळे मेंदू विकृति, मेंदूचे आजार, मॅनेजायटीस, ब्रेन हेमरेज, फिटस् डोकेदुखी असे प्रकार मेषेच्या बुधात आढळतात. (या संबंधीच्या कुंडल्या क्र. ७५ ते ८५ मूळ पुस्तकात अभ्यासण्या सारख्या आहेत.) मुख्यतः मज्जातंतू, मज्जासंस्थे संबंधित तक्रारीतून निर्माण होणारे आजार, पोलिओ, अंपगत्व अशा योगांत आढळण्याची शक्यता जास्त असते.
चंद्र हा मनाचा कारक असला तरी बुध व शुक्र हथा ग्रहांचाही बुद्धि, भावना, मन, हया दृष्टीने परिणाम जबरदस्त असतो त्यामुळे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मेष-बुध हा योग मनावर ताण निर्माण करणारा असल्याने अभ्यासावा लागतो. असे जातक इतर कुयोगात मनोरुग्ण किंवा मानसिक दृष्ट्या काही विकृति निर्माण झालेले आढळतात. अत्यंत हट्टवादीपणा, चिडखोर, तिरस्कार, द्वेष, अंहकार परिस्थितीशी सामावून न घेण्याची वृत्ति हयामुळे मेष बुध असलेले जातक मानसिक तणावाखाली वावरत असतात. कित्येक वेळा कुंडलीत इतर कुयोग असता आत्महत्या, आत्मघातकी वृत्ति, अतिरेकी अविचारी कृत्ये अशा स्वरुपाची फलें मिळतात.
नुसता मेष राशीचा बुध हा अगदी वरील स्वरुपाची फळे देईलच असे नाही. साधारण अशा बुधाबरोबर रवि शुक्र असण्याची शक्यता जास्त असते. नुसती रवि-बुध युति जातकास अत्यंत हुशार, चलाख, बुद्धिमान करते किंवा बुध-शुक्र युति सुद्धा. पण अशा परिस्थितीत बुध वक्री असता किंवा एखाद्या पापग्रहाशी बुधाचा कुयोग होत असता चित्र पूर्ण पालटते. असा बुध हर्षल, नेप., शनिच्या युति, केंद्र, प्रतियोगांत असता तो अत्यंत प्रतिकुल फले देतो.
मंगळाच्या राशीतील बुध हा त्वचाविकाराच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. अॅलर्जीमुळे ताचा विकार उद्भवणे, कोड उठणे वगैरे प्रकार आढळतात. हा शिवाय महत्वाचे म्हणजे बुध ज्या दोन स्थानांचा अधिपति होतो त्या दोन स्थानांचा भावेश हया दृष्टीने तो हमखास अशुभफलदायी झालेला आढळतो. एवढेच नव्हे तर बुध मेषेत असता त्याच्या मिथुन व कन्या राशीतील जे ग्रह असतात त्यांच्या फलितात काही उणिवा तो निर्माण करतो. त्या राशीतील ग्रहांचे जोरदार शुभ असे फल मिळत नाही.
मेषेत बुध असताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या राशीचा अधिपति मंगळ कोणत्या राशीत आहे ते पाहून भविष्य वर्तवावे लागते. असा मंगळ नीच राशीत, दुःस्थानांत, शत्रू राशीत असेल तर अशावेळी मेष बुध अत्यंत प्रतिकुल फले देतो. सर्वसाधारण मंगळाच्या राशीचे लग्न असेल म्हणजे मेष किंवा वृश्चिक तर हा बुध जास्त तीव्र परिणाम देतो. मेषेत कृत्तिका नक्षत्रांत असणारा बुध जोरदार अशुभफलदायी होतो.
उदा. १) मूळ पुस्तकातील कुंडली क्र. ११२ श्री. जन्म दिनांक १३ एप्रिल १९४५. पोलीओ
मिथुन लग्न असलेल्या या व्यक्तीचे शिक्षण उत्तम झाले आहे. स्वतः डॉक्टर आहेत. रवि बुध शुक्र तिन्ही युतीतच आहेत. अशा वेळी रवि गुरुचा अनोन्य योग आहे. शुक्र पंचमेश स्वनंवमांशी आहे. शनि राहु लग्नी व लग्नेश बुध मेषेचा वक्री आहे. लग्नेश हया दृष्टीने वक्री बुधामुळे लहानपणी पोलीओ, त्यामुळे पायात दोष. मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग आहे. मंगळ कुंभेचा, रवि मीनेचा मीन नवमांशी आहे. मिथुन लग्नास बुध लग्नेश होतो. असा मेष राशीतील बुध शनि मंगळाने बिघडला तर तीव्र अशुभ परिणाम करतो.
२) मूळ पुस्तकातील कुंडली क्र ११३ श्री. ज. ता. २४ मे १९२४. मेंदूची वाढ झालेली नाही, वेडसर आहे. मिथुन लग्नाच्या या कुंडलीत बुध तीन दिवसापूर्वीच स्तंभीचा मार्गी झालेला आहे. चंद्र मंगळ युति मकरेत अष्टमांत आहे. चंद्र मंगळ युति बुध किंवा शुक्र बिघडले असता मतिमंदता निर्माण करताना दिसते. येथे बुध नुसता गतिहीन अवस्थेत नाही, तर त्याचा मंगळाशी केंद्र योग आहे. मेषेचा बुध, शनि मंगळ दृष्ट आहे. मंगळाचा शुक नेपच्यूनशी प्रतियोग आहे.
३) मेषेत बुध असतानाच मंगळ जर कर्क, मिथुन, कन्या राशीत असेल, किंवा अशावेळी किंवा चंद्रचा कुयोग असेल तर कुंडली मानसिक दृष्ट्या अत्यंत नाजूक होते. काही मनोविकृति असू शकतात. पुढील कुंडलीवरून असे योग कळून येतील.
(मूळ पुस्तकातील कुंडली क्र ११४ अभ्यासावी)
ज्या ज्योतिषांना ग्रहयोगावरुन भविष्य सांगण्याची कला अवगत असते, त्याना कुंडलीचा ढाचा लगेच कळून येतो. काही कुंडल्या केवळ ग्रहयोगांच्या दृष्टीने बलवान असतात.
एका स्त्रीस मानसिक विकृती आहे. काही वेळा अगदी भूतबाधा झाल्यासारखी स्थिती होते. या कुंडलीत महत्त्वाचा योग म्हणजे चंद्र केतु युक्त आणि तो परत हर्षलच्या प्रतियोगांत चंद्र-हर्षल प्रतियोग असतानाच बुध मेष राशीत, मेष राशीचा अधिपति कर्क राशीत मंगळ, त्याचा बुधाशी अंशात्मक केंद्रयोग आहे.
(मूळ पुस्तकातील कुंडली क्र ११५ अभ्यासावी)
मेष-बुध व इतर संबंधित कुयोग असल्यास मानसिक दृष्ट्या नाना तन्हेच्या विकृती असू शकतात, कोणास आपल्या मागे कोणी पळत ठेवत आहे असे वाटणे, कोणास संशयाचे, कोणास चोरीची प्रवृत्ती वगैरे वगैरे. हमा काही काळ स्वच्छतेच्या मॅनियाने पछाडले होते. सतत घरातील भांडी स्वच्छ करणे, फरशी पुसणे ई.
बुध मेष राशीत असता मेंदूला रक्तपुरवठा कमी प्रमाणांत होतो. अशा लोकांना मोठी उशी न घेता झोपण्याचा सल्ला उपयुक्त ठरेल. चक्कर येणे, अंधारी येणे, डोकेदुखी अशा तक्रारी मेषेत बुध असता असण्याची शक्यता असते, तेव्हा वरील उपाय सुचवावा.
.कुंडलीत मेषेचा बुध असला की तो अगदी अशुभच अशी कल्पना हया लिखाणावरून मात्र कोणी करून घेऊ नये. मेषेत बुध असलेल्या अनेक मोठ्या व्यक्तीच्या कुंडल्याही आहेत. रविंद्रनाथ टागोर, सोनोपंत दांडेकर, महर्षी धोंडो केशव कर्वे अशी अनेक उदाहरणे आहेत. पण तेथेहि बुध भावेश या दृष्टीने फलदायी झालेला आहे. रविंद्रनाथांच्या कुंडलीत चतुर्थेश म्हणून आईवडील लवकर वारले, तर मोनोपंत दांडेकरांच्या कुंडलीत तो कुटुंबेश त्यामुळे त्यांचा विवाह नाही ई.
(४) वृश्चिक राशीचा बुध :
वृश्चिकेत बुध असताना तो निश्चित व नजरेत भरण्यासारखे परिणाम केल्याशिवाय रहात नाही. साधारण वृश्चिकेत बुध असता, तो ज्या स्थानाचा भावेश होतो त्या दृष्टीने एखादे जबरदस्त अशुभफल दिल्याशिवाय राहात नाही. अशा वेळी मंगळ जर सुस्थितीत असेल तर मात्र सामान्यफले मिळतात. वृश्चिकेच्या बुधाचे जातक जास्त कारस्थानी, लपवा छपवी करणाऱरे, स्वार्थी आपमतलबी व असतात. हा बुध तसा राजकारणी व धूर्त आहे. कोणत्याही गोष्टीतील उणिवा काढणे, नापसंती दर्शविणे, टीका करणे हा स्थायीभाव असतो. वृश्चिकेत बुध असणारे जातक बुद्धिमान असतात. शैक्षणिक दृष्ट्या हा बुध फारसा अशुभ नाही.
शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा बुध चांगला नाही. सर्वसाधारण गुंतागुंतीची मनोवृत्ति असते. मानसिक सहनशीलता अत्यंत कमी असते. अनेक गोष्टी अशा लोकांना असहय होतात. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हा योग वाईटच. प्रकृतीच्या दृष्टीने हा बुध बिघडला असेल तर मोठी जीवावरची दुखणी आणतो. गुहयेंद्रियाचे, मूत्राशयाचे, घशासे त्रास जास्त संभवतात. आयुष्मान कमी करणारा ग्रह आहे. वृश्चिकेत बुध असणे हा प्रकार मिथुन लग्नास जास्त अशुभफलदायी होतो. मकर लग्नासही अशी फले मिळतात. थोडक्यात असा बुध लग्नेश षष्ठेश, अष्टमेश असेल तर जास्त महत्व देऊन अभ्यासावा.
एका कुंडलीत शेजाऱ्यापाजान्याकडून मनःस्ताप, अनेक चिंता काळज्या अनेक प्रकारचे त्रास, उपासना केल्या पण मानसिक स्वास्थ्य लाभत नाही. सतत व्यग्रता, त्रस्तता. येथे मिथुन लग्न असून लग्नेश बुध षष्ठात वक्री शत्रूराशीत. त्याचवेळी चंद्राचा मंगळाशी योग आहे. शुक्र मुळ नक्षत्रांत, षष्ठेश अष्टमेश शनिमंगळ अनोन्य योग,
मिथुन लग्न व वृश्चिकेचा बुध इतर कुयोगात मनोविकार, मानसिक असंतुलन, आत्मविश्वास गमावणे, पत्नी उत्तम चारित्र्याची असूनही पत्नीबद्दल सतत संशय, खिन्नता, सतत निरुत्साह, नैराश्य अशा अनेक बारीक बारीक व मोठ्या मानसिक त्रास आढळून येतात. चंद्र, शुक्र ज्या प्रमाणात इतर ग्रहांनी बिघडलेले असतील त्या प्रमाणे तीव्रता आढळते. वृश्चिकेच्या बुधाचा तेथे तीव्रतेने परिणाम दिसून येतो.
एका कुंडलीत बुध हा शनि व मंगळ दोन्ही ग्रहांच्या अंशात्मक केंद्रयोगांत शनि मंगळ चंद्राच्या चतुर्थात आहे. हया गृहस्थांना आईबद्दल अत्यंत द्वेष, मानसिक तसेच नैतिक आचरणही चांगले नाही. येथे चतुर्थेश शनि शत्रू राशी स्वस्थानापासून मंगळाच्या युतीत, चंद्राकडून चौथा. तुळ लग्नास गुरु षष्ठेष होतो तो चतुर्थात आहे.
पंचमेश बुध वृश्चिकेचा असेल तर पंचमस्थानाला अनन्य साधारण महत्व येते
(मूळ पुस्तकातील कुंडली क्र १२९ अभ्यासावी) : या स्त्रीस प्रथम एक कन्या संतति झाली त्यानंतर इच्छा असूनहि पुढे मुलगा अगर मुलगी कोणतीच संतति औषध उपाय योजना करूनही झाली नाही. येथेहि पंचमेश बुध वृश्चिकेत आहे. गुरु त्याच वेळी कुंभ राशीत आहे. मंगळ हर्षल प्रतियोग पंचम लाभातून आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)