राहू केतुचा आगामी काळातील राशी बदल २०२३


विषय : राहू व केतूच्या आगामी राशी बदलाचे राशीनिहाय परिणाम

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

नमस्कार,

आपल्याला कल्पना आहेच, की नोव्हेंबर, २०२३ पासून राहू केतूचे राशी बदल मीन व कन्या राशीमध्ये होत आहे. ही स्थिती त्यापुढे १८ महिने राहणार आहे. ह्या कालखंडामध्ये लग्नस्थान अनुसार राहू केतूच्या स्थितीनिहाय परिणामांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. प्रकर्षाने मूळ जन्म कुंडलीत राहू, केतू व संबंधित ग्रहांच्या दशा अंतर्दशा असतील, तेव्हा ही फळे प्रकर्षाने जाणवू शकतात. कुंडलीतील इतर ग्रह स्थिती संबंधाचे अनुरोधाने यात बदल होऊ शकतात.

१. मेष :

मेष लग्नास राहू व्यय स्थानी आणि केतू षष्ठ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे विवाह  जुळवताना, अडचणी, विवाहितांमध्ये वादविवाद, आरोग्याच्या तक्रारी, प्रवासामध्ये अडचणी, कर्जात वाढ, संतान संबंधी समस्या, दृष्टी दोष, पापाचरण, अपंगांची सहाय्यता,  ई. फळे मिळू शकतात.

२. वृषभ :

वृषभ लग्नास राहू लाभ स्थानी आणि केतू पंचम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे काही शुभ फले देऊ शकतो. शत्रूवर विजय, पंडित, कानाची समस्या, मात्र त्याच वेळेस केतु पंचम स्थानात असल्यामुळे निर्णय चंचलतेमुळे चुका, नोकरी व्यवसायात नुकसान, शिक्षणात अडथळे, संतती विषयक समस्या, ई. फळे मिळू शकतात. एकंदर हा काळ संमिश्र आहे.

३. मिथुन :

मिथुन लग्नास राहू दशम स्थानी आणि केतू चतुर्थ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे हा काळ कसोटीचा जाऊ शकतो. आई वडिलांचे अनारोग्याच्या समस्या, कुटुंबात महत्त्वाच्या स्थावर मालमत्ते   विषयक प्रश्नावर मतभेद, नोकरी- व्यवसायात ताणतणाव, वाढेल आणि धंद्यात स्पर्धकांचे आव्हान,  संघर्ष ई. फळे मिळू शकतात.

४. कर्क :

कर्क लग्नास राहू भाग्य स्थानी आणि केतू तृतीय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे त्यामुळे संमिश्र फळे मिळतील. आलेल्या संधीमध्ये अडचणी आल्यामुळे विलंबाने फायदा, प्रवासात वादविवाद किंवा अडचणी, विलंब, भावंडांशी मतभेद ई. फळे मिळू शकतात.

५. सिंह :

सिंह, लग्नास राहू अष्टम स्थानी आणि केतू द्वितीय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे कसोटीचा काळ, अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला बाधा, कौटुंबिक अडीअडचणी. पंचमाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे निर्णयशक्ती बाधित, स्पर्धात्मक परीक्षात अपेक्षाभंग, संतती विषयक समस्या, ई. फळे मिळू शकतात.

६. कन्या :

कन्या लग्नास राहू सप्तम स्थानी आणि केतू लग्न स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे मानसिक मानसिक अस्वस्थता, जोडीदाराशी मतभेद सांसारिक जबाबदाऱ्यामध्ये वाढ, संबंधात ताणतणाव, चतुर्थ स्थानाच्या केंद्रात राहू असल्यामुळे मातुल घराण्यातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी, स्थावर मालमत्तेसंबंधी योग्य निर्णय न होणे ई. फळे मिळू शकतात.

७. तूळ :

तूळ लग्नास राहू षष्ठ स्थानी आणि केतू व्यय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे संमिश्र कालखंड आहे. षष्ठातील राहू उत्साह वाढवू शकतो, समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांना विरोधाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. मात्र व्ययातील केतूमुळे उत्साहावर पाणी, बंधू-भगिनींशी मतभेद, प्रवासात विलंब अथवा अडचण ई. फळे मिळू शकतात.

८. वृश्चिक :

वृश्चिक लग्नास राहू पंचम स्थानी आणि केतू लाभ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे एकीकडे नोकरी-व्यवसायात चांगले आर्थिक लाभ आणि संधी, वाढता उत्साह तर दुसरीकडे निर्णयामधील चंचलता असा विरोधाभास अनुभवाला येईल. संततीविषयक महत्त्वाचे निर्णयात चूक, धनस्थानाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे आर्थिक अडचणी. कौटुंबिक वादविवाद ई. फळे मिळू शकतात.

९. धनु :

धनु लग्नास राहू चतुर्थ स्थानी आणि केतू दशम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे दोन केंद्र स्थानात राहू-केतू या कालखंडात येत असल्यामुळे स्थावर मालमत्तेसंबंधी कटकट, नोकरी-व्यवसाय साठी संघर्ष युक्त, आईवडिलांसाठी अनिष्ट, प्रतिकूल परिस्थिती ई. फळे मिळू शकतात.

१०. मकर :

मकर लग्नास राहू तृतीय स्थानी आणि केतू भाग्य स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे उत्साहात वाढ, रेंगाळलेली महत्त्वाची कामे पूर्ण, प्रवास लाभदायक, जबाबदाऱ्या पार पाडने, केतू भाग्यस्थानात असल्यामुळे भाग्योदयाच्या फारशा अपेक्षा नको. नोकरी व्यवसायासाठी साधारण. भावंडांकडून थोडा त्रास  किंवा मतभेद ई. फळे मिळू शकतात.

११. कुंभ :

कुंभ लग्नास राहू धन स्थानी आणि केतू अष्टम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे आर्थिक चणचण, खर्चात  वाढ, आर्थिक नुकसान, कौटुंबिक जबाबदाऱ्यात वाढ, असमाधान, आरोग्याच्या तक्रारी, संतती होण्यात अडचणी ई. फळे मिळू शकतात.

१२. मीन :

मीन लग्नास राहू लग्न स्थानी आणि केतू सप्तम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे महत्त्वाचे विचार करताना संभ्रम, चुकीचे निर्णय, वैवाहिक संबंधात वितुष्ट, जोडीदाराशी मतभेद, दशम स्थानापासून राहु चौथा असल्यामुळे व्यवसायाय संघर्ष ई. फळे मिळू शकतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment