
विषय : दग्ध राशी आणि पंचांगातील २७ नक्षत्र योग विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ज्योतिष सिद्धांत सार, ज्योतीर्मयुख
नमस्कार,
हिंदू परिवारात पंचांगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ‘पंचांग’ जे ‘पाच अंगे’ म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांची माहिती देते. विवाह, उपनयनम, गृहप्रवेश इत्यादी महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी शुभ काळ मुहूर्त निश्चित करण्यासाठी सामान्यत: तिथी आणि वार हे गृहीत धरले जातात. नक्षत्र हा कुंडलीचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि भविष्य कथनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जन्मकुंडलीचे विश्लेषण करताना तिथी, वार, योग आणि करण यांचा क्वचितच विचार केला जातो. पण तिथी आणि योगाचे योग्य मूल्यमापन केल्यास ती फार उपयुक्त साधने बनू शकतात.
उदा. ज्या तिथीस आपला जन्म होतो, त्या तिथीनुसार काही राशी त्या जातकास निष्फळ अथवा निरुपयोगी ठरतात. त्यांना ‘दग्धा’ किंवा जळालेली रास म्हणतात.
आपल्या माहितीसाठी जन्म तिथी व त्यास अनुसरून दग्ध राशी देत आहे.
तिथी व दग्ध राशी
१. प्रतिपदा : दग्ध राशी तूळ आणि मकर
२. द्वितीया : दग्ध राशी धनु आणि मीन
३. तृतीया : दग्ध राशी सिंह आणि मकर
४. चतुर्थी : दग्ध राशी वृषभ आणि कुंभ
५. पंचमी : दग्ध राशी मिथुन आणि कन्या
६. षष्ठी : दग्ध राशी मेष आणि मकर
७. सप्तमी : दग्ध राशी कर्क आणि धनु
८. अष्टमी : दग्ध राशी मिथुन आणि कन्या
९. नवमी : दग्ध राशी सिंह आणि वृश्चिक
१०. दशमी : दग्ध राशी सिंह आणि वृश्चिक
११. एकादशी : दग्ध राशी धनु आणि मीन
१२. द्वादशी : दग्ध राशी तूळ आणि मकर
१३. त्रयोदशी : दग्ध राशी वृषभ आणि सिंह
१४. चतुर्दशी : दग्ध राशी मीन, मिथुन आणि कन्या
१५. पौर्णिमा : दग्ध राशी नाही
१६. अमावस्या : दग्ध राशी नाही
पारंपारिक ज्योतिष शास्त्रात २७ नक्षत्रांसाठी २७ योग सांगितलेले आहेत.
सूर्य रोज जवळपास ५९ कला एवढे अंतर पार करतो, तर चंद्र रोज ७९० कला एवढे अंतर पार करतो. योग म्हणजे चंद्र सूर्याच्या राशी-अंश-कला-विकालात्मक स्पष्ट भोगांची बेरीज. प्रत्येक ८०० कला इतक्या बेरेजेचा एक योग होतो. असे सत्तावीस योग आहेत. पहिला योग विष्कंभ आहे. पंचांगात योगाची समाप्तीची वेळ दिलेली असते. नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो. वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात. या योगावर जन्म झाल्यास शांती करावी असे सांगितले जाते.
कांही योग असे आहेत कीं, त्यांच्या आरंभापासून कांही घटिकांपर्यंत त्यांचा दोष असतो.
विष्कंभ आणि वज्र या योगांचा दोष आरंभापासून तीन घटिकांपर्यंत असतो.
परिधयोगाचा पूर्वार्ध संपेपर्यंत,
शूल योगाचा पहिल्या पांच घटिकांपर्यंत,
व्याघातयोगाचा नऊ घटिकांपर्यंत
गंड आणि अतिगंड योगांचा पहिल्या सहा घटिकांपर्यंत दोष असतो.
म्हणून तेवढ्या घटिका सोडून त्या त्या योगांवर शुभकार्ये करण्यास कांही हरकत नाहीं.
प्रत्येक योग विशिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असतो जो त्या विशिष्ट योगाच्या अंतर्गत जन्मलेल्या व्यक्तीमध्ये आढळण्याची शक्यता असते. ज्या नक्षत्रावर हा योग होतो, त्या नक्षत्राच्या उडू दशेत हे फळ प्रकर्षाने जाणवते. २७ योग व फळे खालीलप्रमाणे आहेत.
१. विष्कंभ योग : योग फळ – इतरांवर विजय प्राप्ती व समृद्धी आणि संपत्तीचे वरदान आहे.
२. प्रीती योग : योग फळ – सर्वांचा प्रिय आहे, विभिन्न लिंगी लोकांना आकर्षित करणारा
३. आयुष्मान योग : योग फळ – चांगले दीर्घायुष्य आणि आरोग्य
४. सौभाग्य योग : योग फळ – सुख आणि सुखसोयींनी आशीर्वादित
५. शोभन योग : योग फळ – कामुक, लैंगिक मानसिकता
६. अतिगंड योग : योग फळ – खूनशी स्वभाव, अडथळे आणि अपघातांचा सामना करावा लागणे
७. सुकर्म योग : योग फळ – चांगली आणि उदात्त कृत्ये करणे, श्रीमंती
८. धृती योग : योग फळ – इतरांच्या पैशात आणि स्त्रियांमध्ये गुंतलेला
९. शूल योग : योग फळ – संतापी आणि भांडखोर
१०. गंड योग : योग फळ – वाईट सवयी, चारित्र्य
११. वृद्धी योग : योग फळ – दिवसेंदिवस परिस्थितीत सुधारणा, बुद्धिमान
१२. ध्रुव योग : योग फळ – मनाची स्थिरता आणि आर्थिक स्थैर्य.
१३. व्याघात योग : योग फळ – क्रूर स्वभाव
१४. हर्षण योग : योग फळ – नेहमी आनंदी आणि हुशार
१५. वज्र योग : योग फळ – श्रीमंत आणि कामुक.
१६. सिद्धी योग : योग फळ – इच्छापूर्ती दायक, इतरांचा रक्षणकर्ता
१७. व्यतिपात योग : योग फळ – अविश्वसनीय
१८. वरियान योग : योग फळ – वाईट चारित्र्य आणि कामुक
१९. परीघ योग : योग फळ – श्रीमंत आणि भांडखोर
२०. शिव योग : योग फळ – राजगौरव, शास्त्र पारंगत, शीतल आणि शांत आणि श्रीमंत
२१. सिद्ध योग : योग फळ – सुस्वभावी, धार्मिक संस्कारात रुची
२२. साध्य योग : योग फळ – चांगुलपणा, सद्वर्तणूक
२३. शुभ योग : योग फळ – धनवान, कीर्तिमान, गोरा
२४. शुक्ल योग : योग फळ – डळमळणारे मन, सदाचारी, बोलका आणि आवेगपूर्ण.
२५. ब्रह्म योग : योग फळ – अत्यंत गुप्त, उच्च महत्वाकांक्षा, न्याय करण्याची क्षमता
२६. इंद्र योग : योग फळ – धनवान, शिक्षित आणि लोकोपयोगी.
२७. वैधृती योग : योग फळ – धूर्त, गंभीर, श्रीमंत आणि बलवान
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)