
विषय : प्राणी, पक्षी, झाडे यांची स्पंदने
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : मानवी जीवनातील गूढ रहस्ये
नमस्कार,
किती इम्प्रेसिव्ह आहे त्याचे व्यक्तिमत्व, छान Vibes आल्या तो नुसता दिसला तर… नको तूच घे तिचा फोन, तिचा नुसता आवाज जरी कानावर पडला तरी Negative Vibes येतात. आपण बरेचदा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर अथवा नातेवाईकांबरोबर गप्पा मारत असताना Vibes हा शब्द किती सहजगत्या वापरत असतो. विश्वकोशात बघितले तर Vibes या इंग्रजी शब्दाचा चा अर्थ हा व्यक्त होणारा, अनुभवास येणारा, भावात्मिक संदेश असा आपल्याला पाहायला मिळतो.
हे एक प्रकारचे भावनिक संदेश आपल्याला अनुभवावरून किंवा आपल्या समोर जी व्यक्ती असते त्याचे व्यक्तिमत्वामुळे, त्याच्या वर्तनावरून अथवा सान्निध्यात आल्याने, आजूबाजूच्या वातावरणामुळे येत असतात. मराठीमध्ये यालाच आपण स्पंदने असे म्हणतो. स्पंदने ही सकारात्मक (Positive Vibes) अथवा नकारात्मक (Negative Vibes) असू शकतात.
स्पंदने ही फक्त व्यक्तींद्वारेच येतात असे नसून प्राणी, पक्षी, झाडे, वास्तू ई. द्वारे सुद्धा येऊन आपल्या मनावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम घडवत असतात.
आज आपण झाडे, प्राणी, पक्षी यांचे स्पंदनांबद्दल संकलित माहिती पाहणार आहोत.
प्राणी स्पंदने :
गाय : हिंदू धर्मामध्ये लोक गाईला खूप पवित्र मानले जाते. गाईमध्ये खूप पवित्र स्पंदने आहेत. अपवित्र स्पंदने मुळीच नाहीत. यासाठीच गाईची पूजा करतात.
बैल : बैलामध्येही चांगली स्पंदने असतात.
कुत्रा : कुत्र्यामध्येही चांगली स्पंदने असतात. कुत्रा हा भैरवाचा प्रतिनिधी आहे.
गाढव : वाईट स्पंदने असतात.
मांजर : मांजरामध्ये मिश्र स्पंदने आढळतात. शुभ्र मांजरामध्ये चांगली स्पंदने आढळतात. तर काळ्या मांजरामध्ये वाईट पैशाचिक स्पंदने आढळतात. पिशाच्च काळ्या मांजराच्या रूपात दिसते.
शेळी व मेंढी : शेळ्या तसेच मेंढ्यांमध्ये चांगली स्पंदने असतात. शेळ्या मेंढ्यांच्या सहवासात राहणारी व्यक्ती निरोगी असते. त्यांच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तीला क्षयाचा (टी. बी.) विकार होत नाही.
म्हैस व रेडा : या प्राण्यांमध्ये दुष्ट स्पंदने असतात. तांत्रिक दुष्ट शक्ती प्राप्त करण्यासाठी यांचा वापर करतात. स्वप्नात लोक म्हैस वा रेडा येणे, हे खूप वाईट मानले जाते. त्यामुळे संकटे येतात असे हिंदूधर्मात मानले जाते.
डुक्कर : वाईट स्पंदनांचे प्रतिनिधित्व करतो. याच्यामध्ये खूप वाईट शक्ती असतात. पिशाच्चे डुकराच्या रूपात दिसतात किंवा वाटेत आडवी येतात.
वानर : वानर चांगली स्पंदने प्रक्षेपित करतात. वानरामध्ये पिशाच्च शक्ती दूर करण्याचे सामर्थ्य असते असे म्हटले जाते.
हरिण : हरिणामध्ये पवित्र स्पंदने खूप असतात. याच्या चर्मावर बसून मंत्रजप केला असता ज्ञान प्राप्त होते. यासाठी भारतातील बरेच साधू हरिणाच्या चर्मावर बसून जप करतात. आध्यात्मिक प्रगतीसाठीही हरिणाजिनावर बसून जप करणे, श्रेष्ठ मानले गेले आहे. हा सात्त्विक स्पंदनांचा प्राणी आहे.
वाघ : वाघामध्ये नवग्रहांकडून येणारी स्पंदने आपल्याला अनुकूल करण्याचे सामर्थ्य आहे. वाघनख धारण केले असता नवग्रहांची शांती होते, असे मानले जाते. नैसर्गिकरित्या मृत पावलेल्या (मारलेल्या नव्हे) वाघाच्या चर्मावर बसून मंत्रजप केला असता शक्ती प्राप्त होते. वाघाचे, सिंहाचे सामर्थ्य सारखेच मानले गेले आहे. परंतु सिंहाची स्पंदने ही वाघापेक्षा अधिक पवित्र असतात.
अस्वल : अस्वलामध्ये वाईट स्पंदने असतात. पिशाच्च शक्ती यांच्यातही आढळते, परंतु बर्फामध्ये राहणाऱ्या पांढऱ्या अस्वलामध्ये चांगली स्पंदने असतात.
तरस : अतिशय घाणेरडी स्पंदने या प्राण्यात असतात.
लांडगा : याच्यामध्ये वाईट, तामसी स्पंदने आढळतात.
कोल्हा : या प्राण्याची स्पंदने मिश्र स्वरूपाची असतात. कोल्हा स्वप्नात येणे हे शुभ मानले जाते. एखाद्या कामासाठी जात असता वाटेत कोल्हा दिसला तर यश प्राप्ती होते.
हत्ती : हा सात्त्विक व शुद्ध स्पंदनांचा प्राणी आहे. हत्तीमध्ये दैवी स्पंदने आढळतात. हत्तीचे वैशिष्ट्य असे असते, की एखादा हत्ती खूप पिसाळलेला असेल व आपल्या अंगावर धावून येत असेल तर त्याला नमस्कार करताच तो शांत होतो व काहीही न करता बाजूला निघून जातो.
मुंगूस : हा दैवी स्पंदने असणारा प्राणी आहे. हा प्राणीही वाटेत दिसताच यश प्राप्ती होते.
पक्षी स्पंदने :
मोर : अत्यंत चांगली स्पंदने मोरामध्ये असतात. दैवी स्पंदनांचा हा पक्षी असल्याने दुष्ट शक्तीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी मोराची पिसे जवळ बाळगतात. हिंदू घरामध्ये मोराची पिसे ठेवली जातात. मुस्लिम धर्म मध्ये, दर्ग्यामध्येही मोरपीस वापरले जाते.
पोपट : हा अत्यंत शुभ पक्षी मानला जातो. त्यामुळे लोक याला घरी पाळतात.
भारद्वाज : हा पक्षीही दैवी स्पंदनांचा पक्षी आहे. याचे दर्शन हे अत्यंत शुभप्रद मानले जाते. घरातून बाहेर पडताना वा प्रवास करताना याचे दर्शन झाले असता प्रवास सुखरूप होतो व कामे तडीस जातात.
हंस : हा पक्षीही दैवी पक्षी आहे. याच्यामध्ये दैवी स्पंदने असून स्वप्नात याचे दर्शन होणे शुभ मानले जाते.
गरुड : याच्यामध्येही चांगली स्पंदने असतात.
कबुतर : याच्यामध्येही चांगली स्पंदने असतात.
कावळा : हा मिश्र स्पंदनांचा पक्षी आहे. तरीही याच्यामध्ये प्रामुख्याने अशुभ स्पंदनेच जास्त असतात. हा पितरांचे प्रतिनिधित्व करतो. हा शनीग्रहाचे वाहन आहे. शनीग्रहाची स्पंदने प्रसृत करतो. याला खायला दिले असता शनीची पीडा होत नाही, असे हिंदूधर्मात सांगितले आहे. हा मृतात्म्यांचे प्रतिनिधित्व करीत असल्याने याला खायला घातल्याने पितरांचीही तृप्ती होते, असे म्हटले जाते.
चिमण्या : चिमण्यांची स्पंदने ही चांगली असतात. या राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात, यासाठी चिमण्यांना बाजरी खाऊ घालावी म्हणजे राहूची पीडा कमी होते, असे मानले जाते. ज्या वास्तूला आगामी काळात धोका नाही अशाच वास्तूत चिमण्या आपली घरटी बांधतात, असे म्हटले जाते.
कोंबडा : कोंबड्यामध्येही शुभ स्पंदने आढळतात.
पिंगळा : हा पिशाच्च शक्ती स्पंदनांचा पक्षी आहे. हा एक जंगली पक्षी असून, हा भविष्य कथन करतो. भारतात काही लोक स्मशानात काही दिवस साधना करून या पक्ष्याची भाषा जाणण्याची विद्या शिकतात. हा माणसाचे अचूक – भूत-भविष्य कथन करतो.
गिधाड : गिधाडामध्ये खूप वाईट स्पंदने असतात. पिशाच्च शक्तीचे हा प्रतिनिधित्व करतो. प्रवासात गिधाड दिसले तर प्रवास कष्टप्रद होतो, असे मानले जाते.
घुबड : पैशाचिक स्पंदने या पक्ष्यात सर्वांत जास्त असतात. सर्व धर्मांमध्ये हा पक्षी अशुभ मानला जातो. जंगली-जाती जमातीतही हा अशुभ समजला जातो. या पक्ष्यामध्ये खूप वाईट, दुष्ट स्पंदने असतात. तांत्रिक सिद्धींसाठी तांत्रिक लोक किंवा ब्लॅकमॅजिक करणारे या पक्ष्याचा वापर करतात.
घार : घारीमध्ये शुभ स्पंदने असतात.
वनस्पती स्पंदने :
औदुंबर : या वृक्षात अत्यंत दैवी स्पंदने आढळतात. याची स्पंदने शांती प्रदान करतात. या वृक्षात शीतलता अधिक. असते. सात्त्विक स्पंदनांच्या या वृक्षामध्ये दत्तात्रेयांची स्पंदने असल्याने हिंदूधर्मात याला पाणी घालणे वा याच्याजवळ दिवा लावणे हे शुभ मानले जाते. यामुळे साहजिकच त्या व्यक्तीला सात्त्विकता प्राप्त होते. नदीच्या किनारी असणाऱ्या औदुंबर वृक्षामध्ये खूप दैवी शक्ती असते.
आंबा : अत्यंत चांगली स्पंदने असणारा हा वृक्ष आहे. याच्यामध्ये दैवी स्पंदने आहेत, म्हणून शुभ कार्यामध्ये याच्या पानांचा तोरण म्हणून उपयोग करतात. याच्यामध्ये देवीची स्पंदने असतात.
तुलसी : अत्यंत सात्त्विक स्पंदनाचे हे झाड आहे. हिंदू धरांच्यासमोर याचे वृंदावन असते. या झाडालाही पाणी घातल्याने सात्त्विकता व शांती लाभते.
पिंपळवृक्ष : या वृक्षामध्ये चांगली व मध्यम दोन्ही प्रकारची स्पंदने असतात. या वृक्षातळी दिवा लावल्याने भाग्य वृद्धी होते.
वटवृक्ष : चांगली व मध्यम दोन प्रकारची स्पंदने असतात. परंतु या वृक्षाची स्पंदने ही सुप्तावस्थेत असतात. वरील पाचही वृक्षांना नेमाने पाणी दिल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो. कष्ट तसेच त्रास कमी होतात.
रुद्राक्ष : रक्त शुद्ध करणारी स्पंदने या वृक्षात असतात.
चंदन : या वृक्षात सात्त्विक व शांती देणारी स्पंदने असतात.
हिरडा : याची स्पंदने चांगली असतात ही औषधी वनस्पती आहे. हिरडा उशाखाली ठेवून झोपले असता वाईट स्वप्ने पडणे थांबते.
सर्पगंधा : या वनस्पतीच्या जवळ कधीही साप येत ना साप या वनस्पतीपासून सदैव दूर राहतो. या वनस्पतीचा सापाला सहन होत नाही. या वनस्पतीच्या काडीचा एक लहान तुकडा जर गळ्यात बांधला असता साप स्वप्नात येत नाही व जंगल फिरताना सर्प भय रहात नाही.
बाभूळ : या झाडाजवळ सतत पिशाच्चे राहतात. पिशाच्च साधना करणारे या झाडाच्या आश्रयाने साधना करतात.
वड, औदुंबर, पिंपळ या वृक्षांची लागवड केल्याने पुण्य मिळते. तसेच या वृक्षांना तोडू नये असे शास्त्रात सांगितले आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)