
विषय : संकल्प रंग प्रतिक आणि जन्मकुंडली
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : अॅनाटॉमी ऑफ नर्व्हस सिस्टिम व स्व अभ्यास
नमस्कार,
वैज्ञानिक संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की रंग लहरींद्वारे उत्सर्जित झालेली उर्जा शारीरिक कार्ये, मन आणि भावनांवर परिणाम करतात. अभ्यासानुसार मेंदू, सर्जनशीलता, उत्पादकता आणि शिक्षणाशी ई. संबंधित असलेल्या रंगांचे फायदे दिसून आले आहेत. आधुनिक विज्ञानात ब्रेन वेव्ह बदलण्यासाठी ठराविक रंग दर्शविले गेले आहेत. ईईजी आणि नाडी मोजण्याच्या प्रणालीनुसार, पुरुष आणि स्त्रिया रंगांवर भिन्न प्रतिक्रिया देतात. रंग डोळ्यापासून मेंदूमध्ये प्रसारित केला जातो तेव्हा मेंदू भावना, मनाची स्पष्टता आणि उर्जा पातळीवर परिणाम करणारे हार्मोन सोडतो.
उदा. आपल्या राष्ट्राचा ध्वज आपण कुठेही पाहिला की, राष्ट्रप्रेमाची उर्मी हृदयात उफाळून येते. एखादे निसर्गाच्या देखाव्याचे चित्र पाहून प्रसन्न वाटते. प्रतिकाचा परिणाम निश्चितच होतो. त्याला विज्ञानामध्ये कंडिशंड रिफ्लेक्स् असे म्हणतात. या सिद्धांताप्रमाणे, अशी प्रतिके आपल्यामध्ये मूळ वस्तुएवढाच परिणाम व फरक आपल्यात घडवून आणत असतात. रंगांचा नकारात्मक आणि सकारात्मक मानसिक प्रभाव माणसांमध्ये वापरल्या जाणार्या संयोजनांच्या आधारावर दिसू शकतो. समोहन, समुपदेशन, मानस शास्त्र या मधे अन्तर्मनात काही गोष्टी प्रक्षेपित करण्यासाठी रंगां चा प्रभावी वापर केला जातो.
ज्योतिष शास्त्रात देखील काही उपाय सांगताना याची विज्ञानाशी कशा प्रकारे सांगड घातली आहे याची कल्पना तुम्ही कल्पना करू शकता. शनिला काळे उड़ीद वहा, गणपतीला लाल फूल वहा, गुरुबळ वाढवण्यासाठी पितांबर नेसून धार्मिक उपासना केली जात असे. वेगवेगळ्या रंगाचे खड़े, विशिष्ट रत्न यांचा वापर ई. गोष्टींचा रंग प्रधान वापर ज्योतिष शास्त्रात केला जातो.
त्याच बरोबर संकल्प शक्ती च्या जोरावर अनेक अशक्यप्राय गोष्टी लीलया शक्य होऊन जातात. मन संकल्पपूर्वक ज्याचा विचार करते, मेंदू ज्यावर एकाग्र होतो ती वस्तु किंवा त्या वस्तूचे प्रतीक माणसाच्या मानसिकतेत व पर्यायाने शरीरात त्या त्या पातळीचे फरक घडवून आणते. मनुष्याच्या शरीरात जैविके असतात. आपण जो दृढ निश्चय जागेपणी करतो. तो निद्रावस्थेतही जागृत असतो.
उदा. लहानपणी दररोज सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो. आईने कितीही हाक मारून प्रयत्न केला तरी लवकर जाग येत नाही. पण तेच तेच जर दुसऱ्या दिवशी जर सहलीला जायचे असेल व त्यासाठी सकाळी ५ वाजता शाळेत बोलावलेले असेल तर, पहाटे कोणीही न उठवता चार वाजताच जाग येते. हा सर्वसाधारण अनुभव आपण घेत असतो. हा सकारात्मक परिणाम त्याचे लवकर उठून सहलीला जायचे या संकल्पामुळे सहज शक्य होतो.
महात्मा गांधी आणि नेपोलियन हे दोघेही झोपताना केलेल्या निश्चयाचे वेळी अलार्म न लावता जागे होऊ शकत असत.
या मागचे वैज्ञानिक कारण असे आहे की, आपल्या मेंदूमध्ये पिरॅमिड सेल्स आणि एक्स्ट्रा पिरॅमिड सेल्स् असतात. ह्या सेल्स् मेंदूतील मोटर एरियामध्ये कार्यरत असतात. मोटर एरिया हा महत्वाचा कार्य करणारा भाग आहे. ह्या पिरॅमिड सेल्सच्या भागावर आपल्या दृढ संकल्पाचा, आपण नोंद घेतलेल्या प्रतिमांचा, आकाराचा, आकृतीचा, घटनांचा परिणाम होत असतो व आपली कार्यतत्परता त्यावर अवलंबून असते. हा भाग जेवढ्या सकारात्मक गोष्टी टिपेल तसे आपले विचार, शरीर व नशीब बदलण्यास उपयुक्त ठरते.
आज आपण आयुष्यात समृद्धी, शांती, समाधान नांदावे, यासाठी आधीच सिद्ध झालेला व त्यास अभ्यासपूर्वक ज्योतिष शास्त्राची जोड देत संकल्प रंग प्रतिकांचा असाच एक कल्पक, सोपा व उपयुक्त उपाय आज पाहणार आहोत.
या संकल्पपूर्वक सकारात्मक मानसिकतेने केलेल्या प्रयत्नाचा उपयोग झोपेतल्या काळात होतो. झोपेच्या आधी मेंदूमध्ये एक प्रकारची निरामय अवस्था सुरु होत असते. या अवस्थेत आकृतीत दाखवल्याप्रमाणे (ही आकृती मेंदूंचे प्रतिक आहे, जी अॅनाटॉमी ऑफ नर्व्हस सिस्टिम या ग्रंथात पान क्र.३०० वर दिलेली आहे.) आकृती स्वतःच्या हाताने कागदावर अर्धवर्तुळाकार आकारामध्ये बरोबरची खूण काढावयाची व तो वरचा भाग तुम्हास जाणकार ज्योतिषाने सुचवलेला भाग्य रंगाने रंगवायचा. व त्यावर रोज एकाग्र होऊन आपला संकल्प आठवायचा. मेंदूत तो ठसण्यासाठी त्याचे चिंतन करायचे. आणि डोक्याखाली ते प्रतिक ठेवून संकल्प आळवत आळवत झोपून जायचे. रात्री झोपेच्या काळात संकल्पपूर्वक ठेवलेले प्रतीक सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा नजरेत साठवायचे.,
शक्तीकाळ आणि शांतीकाळ यांच्यातला दुवा बळकट व अधिक फलदायी ठरतो. जागृती आणि झोप यामध्ये असणाऱ्या अवस्थेत माणूस हा विचाराच्या शांत अवस्थेत असतो. कोणतीही गोष्ट करण्याच्या अवस्थेत असतो असे सुप्रसिद्ध डॉ. थॉमस बुडाझेकी यानी म्हटले आहे. असाच संदर्भ स्लीप पोझिशन्स या डॉ. डंकेल यांच्याही ग्रंथात आहे. तसेच रंगाचा परिणाम माणसावर होत असतो याबद्दलचे संशोधन संदर्भ बिटा पल्स प्रेडिक्टस् शक्तीयोग या ग्रंथात देखील आहेत.
आपल्या राशीनुसार आपल्या विशिष्ट संकल्प पूर्तीसाठी जाणकार ज्योतिषाने सुचवलेल्या भाग्यदायक रंगांचा उपयोग केला, तर तो विशिष्ट रंग तुमच्या अंतरंगास भावेल व त्याचे निश्चितच चांगले परिणाम अनुभवास येतील.
हा उपाय करताना लग्न रास विचारात घेऊन त्यानुसार भाग्य रंग निश्चित केलेला असावा. तसेच लग्न स्वामी ६, ८, १२, स्थान, नीच राशी, शत्रू राशी, मारकेश, बाधकेश ई. संबंधित वा पीडित नाही, दशा अंतर्दशा, ग्रह स्थिती ई. बाबी तपासून अथवा या सर्व गोष्टींचा विचार करून जाणकार ज्योतिषाने सुचवलेल्या रंगाचाच वापर करणे महत्वाचे आहे. केवळ लेखात रंग दिला आह्रे म्हणून योग्य सल्ला न घेता वापर करणे टाळावा.
मेष रास : लाल रंग
वृषभ रास : गुलाबी, हिरवा, पांढरा
मिथुन रास : हिरवा, पिवळा
कर्क रास : पांढरा, क्रीम, लाल, पिवळा
सिंह रास : नारंगी, लाल, हिरवा
कन्या रास : हिरवा, पांढरा, पिवळा
तूळ रास : नारंगी, पांढरा, लाल, मोती
वृश्चिक रास : पिवळा, लाल, नारंगी, क्रीम
धनु रास : पांढरा, क्रीम, हिरवा, नारंगी, हलका निळा
मकर रास : पांढरा, लाल, निळा
कुंभ रास : पिवळा, लाल, पांढरा, क्रीम
मीन रास : लाल
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)