दशा संधी आणि एक दशा


विषय : दशा संधि व एक दशा

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडीक्टिव्ह स्टेलर ॲस्ट्रोलॉजी

नमस्कार,

आज आपण दशा संधि व एक दशा या संबंधी माहिती घेणार आहोत.

दशा म्हणजे स्थिती. संधि या शब्दाचे तात्पर्य आहे संयोग म्हणजे भेटणे. दशा संधि हा तो काल असतो, जेव्हा एखाद्या जातकाची एक मुख्य दशा संपून दुसरी मुख्य दशा सुरु होत असते.

जेव्हा एखादी विवाहित जोडप्यास अथवा विवाह ठरवताना काही वेळा अशी स्थिती येते जेव्हा पती व पत्नीची दोघांची दशा संपून दुसरी दशा सुरु होण्याचा काळ, म्हनाज्रेच दोघांच्या दशा संधीचा काळ एकाच येतो, तेव्हा

बरेच ज्योतिषी जातकास हे सांगून घाबरवत असतात, की दशा संधीचा काळ असल्याने किंवा एक दशा दोघांना अशुभ असून नुकसान होणार आहे.

येणारा काळ कसा असेल, हे माहित करून घेण्यासाठी खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे.

१. आधीची दशा शुभ किंवा अशुभ यापैकी कोणते फळ देत होती.

२. येणारी दशा शुभ किंवा अशुभ यापैकी कोणते फळ देऊ शकते.

३. जर दोघांची अशुभ दशा संपून शुभ दशा येणार असेल, तर तो सहजीवनास अनुकूल काळ असेल.

४. जर दोघांची येणारी दशा अशुभ फळ दर्शक असेल, तर लग्न झालेल्या दाम्पत्याला पूर्व कल्पना असल्याने येणारे कटू प्रसंग टाळण्यासाठी किंवा तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. लग्न ठरत असताना दोघांना एकमेकांची मानसिकता तपासण्यासाठी हा काळ महत्वाचा ठरू शकतो. अडचणीत साथ न देणार्या अथवा घाबरणार्या मानसिकतेचा जोडीदार असेल, तर त्यापेक्षा लग्न न जमवलेले योग्य ठरेल. पण याचा देखील विचार होणे गरजेचे आहे की, मुख्य दशा अगदी अनुरूप पाहून विवाह केला तरी, येणाऱ्या अंतर्दशा तुम्ही टाळू शकता का, दोघांची मानसिकता सकारात्मक असेल व काही झाले तरी विवाह टिकवायची मानसिकता असेल तर, कितीही अडचणी आल्या तरी निभावून नेतात व नकारात्मक असेल, तर एखादे निमित्त सुद्धा पुरेसे असेल. शुभ ग्रह दशा तुमच्या सकारात्मकतेला सहाय्यक ठरतात. व अशुभ ग्रह दशा तुमच्या सकारात्मकतेला कणखर बनवतात. या साठीच पूर्ण कुंडलीचे परीक्षण महत्वाचे ठरते.  

५. समजा एखाद्याची वाईट दशा २०२३ मध्ये संपणार आहे आणि दुसर्याची २०२४ मध्ये, तर मधला काळ दोघे परस्प सामंजस्याने सुखाचा नसला तरीही दु:खाचा नसेल याची काळजी घेऊ शकतात.

६. समजा एखाद्या जोडप्यास अनेक वर्षे संतती झाली नाही आणि दशा संधीचे काळात संतती झाली, कारण येणाऱ्या शुभ काळाचा प्रारंभ झालाय, हा संतती योग दोघांच्या कुंडलीत असल्याशिवाय मूल होईल काय?

७. अधिकांश लोक एखाद्या दशेच्या शेवटी अथवा प्रारंभी वास्तविकपणे पीडित होत नाहीत, पण दशाच्या मध्ये अधिक पीड़ा होते व जातकाच्या आयुष्यात परिवर्तन शुभाशुभ फळ देणाऱ्या ग्रहांच्या अंतर्दशेत होत असते.

उदा. जे लोक सेवानिवृत होतात व त्यांना पेन्शन रूपाने काही पैसे मिळत राहतात. हे दशा संधीमुळे नव्हे, तर दशा अंतर्दशा मुळे होत असते.

ज्या लोकांचा अपघात होतो व नोकरी गमवावी लागते, त्यांचा दशा संधि असतो का?

आता आपण पाहू एक दशा म्हणजे काय आणि त्या नुकसान करतात का ?

एक दशा याचे तात्पर्य एवढेच की, पति अथवा पत्नी दोपांना एकच दशा असते, इथे फक्त ग्रहाचे नाव एकच असते. फळ एक सारखेच असेल असे नाही. फक्त कारकत्वास महत्व देणारे ज्योतिषी यास शुभ अथवा अशुभ असे ठरवून मोकळे होतात.

१) पति-पत्नी दोघांची जन्मकुंडली व लग्न स्थान भिन्न असतील, तर ज्या ग्रहाची दशा चाललेली असेल, तो वेगवेगळ्या स्थानांचा अधिपति असतो व विभिन्न फळांचे निर्देशक ग्रह असतात व स्पष्ट रूपाने वेगळे फळ प्रदान करतात.

२) लग्न स्वामी लग्नापासून अथवा चंद्रापासून वेगवेगळ्या स्थाना मधे स्थित असेल म्हणून स्थितिच्या अनुसार फलित भिन्न असेल.

३) युती व दृष्टित असणारे ग्रह भिन्न असल्याने फालत परिवर्तन करतात.

४) दशा स्वामीचे नाव एकाच असले तरी ज्या नक्षत्रात आहे ते भिन्न असू शकते.

उलट काही घटना अशा असतात ज्या एकाच्या कुंडलीत लाभ दर्शवतात, तर दुसर्याच्या कुंडलीत नुकसान.

उदा. पतीने एखादा मौल्यवान दागिना बायकोस घेतला, तर पत्नीच्या कुंडलीत तो लाभ व पतीच्या कुंडलीत त्याच किमतीचे खर्च होणे व बचत खर्च होणे दर्शवते. पण दागिना त्यांचे घरातच येतो ना.

या उलट कठीण प्रसंगी पती पत्नीचे दागिने गहान ठेवतो. ते पत्नीचे स्त्री धन चे नुकसान दाखवते व पतीकडे त्यातून येणारा पैसा दाखवतो.

यात सांगायचा मुद्दा एवढाच की, प्रत्येक कुंडली स्वतंत्र असते व दशा संधि, एक दशा, कारकत्व ई. गोष्टींची भीती वा पूर्वग्रह मनात न बाळगता तटस्थपणे संपूर्ण कुंडलीचे परीक्षण करावयास हवे, लग्नेश, धनेश, पंचमेश, सप्तमेश, लाभेश ई. स्थिती लक्षात घ्यावी, त्रिक् स्थाने व विरोधी स्थाने तपासावी व त्यानंतरच कोणत्याही निर्णयास यावे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment