नवांश व जातकाचे व्यक्तिमत्व


विषय : नवांश व जातकाचे व्यक्तिमत्व

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : कृष्णमुर्ती पंचांग व आपले नशीब आले ग्रहयोग

नमस्कार,

हिंदू ज्योतिषशास्त्रामध्ये वर्ग कुंडलीतील नवमांश कुंडली ही सूक्ष्म फळ कथनासाठी फार प्रचलित असून लग्न कुंडली नंतर अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही कुंडली वैवाहिक जीवन, जोडीदार, स्वभाव, स्वभाव, जोडीदाराचे चारित्र्य, वैवाहिक जीवनातील सुख-दुःख इत्यादींसाठी पाहिली जाते. ३०° ची राशी ३°२०’ च्या ९ भागांमध्ये विभागली जाते. पंचागात जे अवकहडा चक्राचे कोष्टक दिलेले असते. त्यात एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे व ४ चरण दिलेले असतात. हे एक चरण म्हणजेच एक नवमांश असतो.

नवमांश रास व स्वामी ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे पंचागात जे अवकहडा चक्राचे कोष्टक मध्ये चरणाच्या आकड्याखाली मेष पासून मेष (मं), २ रे चरण खाली वृषभ (शुक्र), ३ रे चरण खाली मिथुन (बुध)…..अशा क्रमाने ओळीने लिहित गेले की तुम्हाला मेध राशीचे नवांश मिळतील. त्या नंतर वृषभ राशीचे चरण सुरु होतील. तिथे धनु राशी पर्यंत मेषेचे नवांश झाल्यामुळे मकर रास १ ले चरण खाली येईल, २ रे चरण खाली कुंभ रास येईल…..असे कुठेही राशींचा क्रम बदलू न देता लिहित जावे. या प्रमाणे मिथुन राशीचा पहिला नवांश तुळ रास येईल. कर्क राशीचा १ ला नवांश कर्क रास येईल.

यानंतर हा पूर्ण चार राशींचा नवांशाचा क्रम सिंह व धनु राशीपासून तोच म्हणजे मेष नवांशापासून सुरु होतो.

याचाच अर्थ निरीक्षण केले असता लक्षात येईल.

अग्नी तत्वाच्या राशी मेष, सिंह, धनु यांचे नवांश मेष पासून धनु पर्यंत असतात.

पृथ्वी तत्वाच्या राशी वृषभ, कन्या, मकर यांचे नवांश मकर पासून कन्या पर्यंत असतात.

वायू तत्वाच्या राशी मिथुन, तुळ, कुंभ यांचे नवांश तुळ पासून मिथुन पर्यंत असतात.

जल तत्वाच्या राशी कर्क, वृश्चिक, मीन यांचे नवांश कर्क पासून मीन पर्यंत असतात.

प्रत्येक कुंडलीचा स्वत:चा असा ढाचा असतो. जन्मकुंडली द्वारे बर्याच गोष्टींचा उलगडा होतो.पण काही गोष्टींत सूक्ष्म अवलोकनाची आवश्यकता असते. अशावेळी हि कुंडली अत्यंत उपयोगी सिद्ध होते. पराशर संहितेनुसार, ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडली मध्ये आणि नवमांश कुंडलीमध्ये एखादा ग्रह एकाच राशीत येत असेल, तर त्यास वर्गोत्तम मानले जाते. एखादी रास व्यक्तीच्या जन्मकुंडली मध्ये आणि नवमांश कुंडलीमध्ये एकच येत असेल, तर त्यास वर्गोत्तम लग्न मानले जाते. तो जातक शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या निरोगी असतो. जन्म कुंडलीत एखादा ग्रह शक्तिहीन असेल आणि नवमांश  कुंडलीमध्ये बलवान असेल तर तो शुभ परिणाम देतो, यावरून नवांश कुंडलीचे महत्त्व लक्षात येते.

या कुंडलीमध्ये

सूर्य वर्गोत्तम असेल तर, जातकास प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळतो.

चंद्र वर्गोत्तम असेल तर, व्यक्ती सभ्य असते आणि चांगली स्मरणशक्ती दर्शवतो.

मंगळ वर्गोत्तम असेल तर, जातकास अतिउत्साह आणि नेतृत्व क्षमता प्रदान करतो.

बुध वर्गोत्तम असेल तर, जातकास बुद्धिमत्ता आणि तार्किक बनवतो.

गुरु वर्गोत्तम असेल तर, जातकास ज्ञानी आणि आदरणीय बनवतो.

शुक्र वर्गोत्तम असेल तर, जातकास सौंदर्य आणि कलाप्रेमी बनवतो.

शनि वर्गोत्तम असेल तर, जातकास न्यायी आणि चिंताहीन बनवतो.

जन्मकुंडलीत लग्न स्थानी कोणती रास असते, त्या राशीत नवांश काय असतात याप्रमाणे त्याचे व्यक्तीमत्व कसे असेल याचे स्थूल भविष्य कथन करता येऊ शकते. जन्मकुंडलीत लग्न स्थानी मेष ते मीन या प्रत्येक राशीमध्ये निरनिराळ्या नवांशाला निरनिराळी फळे मिळतात, त्याचे विवेचन पाहू..

१) मेष राशी

मेष नवांश : छोटे हात, छोटे नाक, मोठा आवाज, नशिबवान व वर्गोत्तम

वृषभ नवांश : सुबक बांधा, लांब नाक, हळुवार आवाज, धीमे बोलणे

मिथुन नवांश : उमदे व्यक्तीमत्व, आकर्षक डोळे, चतुर बोलणे, वयापरत्वे टक्कल पड़ते

कर्क नवांश : प्रवासाची आवड, जीवनऊर्जा कमी, दिसायला क्रूर व चंचल वृत्ती

सिंह नवांश : स्वाभीमानी, हत्तीसारखे छोटे डोळे, मजबूत हात-पाय, भाग्यशाली, उष्ण प्रकृती

कन्या नवांश : हरणासारखे डोके, हात लांब, बडबड्या स्वभावाचा, समाजामध्ये चमकणारा, जीवनशक्ती दुर्बल, चिकित्सक वृत्ती 

तुळ नवांश : रुंद डोळे, निष्ठुर वृत्तीचा, बायको वादग्रस्त प्रवृत्तीची

वृक्षिक नवांश : बोलण्यात दुसऱ्याला गुंगवणारा, गुह्य रोगी, सहजपणे खोटे बोलणारा, शिकारी, माकडासारखे डोळे, बुटका, उष्ण प्रकृतीचा.

धनु नवांश : खेळाची आवड असणारा, दिलदार वृत्तीचा, प्रसन्न व्यक्तीमत्वाचा, फार बोलणारा, उंच शरीराचा

२) वृषभ रास

मकर नवांश : मध्यम उंचीचा, उत्तर आयुष्यात चिकाटीने यश संपादन करणारा, धनलोभी

कुंभ नवांश : आळशी, बडबड्या, अव्यवहारी.

मीन नवांश : भावनाविवश होणारा, धार्मिक, बऱ्यापैकी व्यक्तीमत्त्व

मेष नवांश : पोटाचे दुखणे असलेला, अभागी.

वृषभ नवांश : उंचावलेले नाक, लांब हात, उदार दृष्टीकोन असलेला, वर्गोत्तम

मिथुन नवांश : एकाच वेळेला दोन कामे करणारा, हसत-हसत बोलणारा, हुशार

कर्क नवांश : घरात रमणारा, नाक लांब, मुलांवर अपार प्रेम करणारा.

सिंह नवांश : प्रसन्न चेहऱ्याचा, बोलण्यात हुशार, सरकारी कामाशी संबंध

कन्या नवांश : व्यापारी, रागीट वृत्तीचा, अर्थहीन बोलणारा.

३) मिथुन रास

तुळ नवांश : धारदार नाक, सुंदर नेत्र, लांबसडक केस, आकर्षक व्यक्तीमत्त्व, बुद्धीवादी.

वृक्षिक नवाश : नाकामध्ये वक्रपणा, टापटीप रहाण्याची आवड नसलेला, कलहप्रिय, अभागी.

धनु नवांश : हुशार, सुदृढ शरीराचा, धुर्तपणे काम करुन घेणारा

मकर नवांश : व्यक्तीमत्वाचा ठसा उमटणारा, कामजीवनात रस घेणारा

कुंभ नवांश : चेहऱ्यावर बुद्धीमत्तेची झाक असलेला, फसवा चेहरा, मोठे डोळे.

मीन नवांश : अकारण बडबड करणारा, जुगारी वृत्तीचा, दंतरोगी.

मेष नवांश : संधीचे सोने करणारा, पराक्रमी.

वृषभ नवांश : गोडबोल्या, प्रामाणिक, उच्च शिक्षणाची आवड असणारा.

मिथुन नवांश : वर्गोत्तम असल्यामुळे बुद्धीवान, प्रणयी, चतुर, कवी, धनवान,

४) कर्क रास

कर्क नवांश : वर्गोत्तम, नशिबवान्, समाजप्रिय, तेजवान, विशिष्ट हेतूने जगणारा.

सिंह नवांश : स्वाभिमानी, उच्च शिक्षण, विद्वान असणारा.

कन्या नवांश : चतुर, आळशी, व्यापारी वृत्ती.

तुळ नवांश : सामाजिक कार्यात गुंतलेला, शक्तीवान, सामाजिक बांधिलकी पत्करणारा.

वृक्षिक नवांश : लांब बाहू, नोकरीत रमणारा, संकुचिक वृत्तीचा.

धनु नवांश : सुंदर दांत, गोड बोलून काम करुन घेणारा, लोभस व्यक्तीमत्त्वाचा.

मकर नवाश : रक्तवाहिन्या दृष्टोपत्तीस असणाऱ्या, वेडेवाकडे बोलणारा.

कुंभ नवांश : अकारण विचार करणारा, धंद्यापेक्षा नोकरीत गुंतणारा, संशोधक वृत्ती.

मीन नवांश : मत्स्य नयनी, स्वप्नील, भाग्यवान

५) सिंह रास

मेष नवांश : जिद्दी, मांसल शरीर, स्वाभिमानी, नशीबवान

वृषभ नवांश : आळशी, मोठे कपाळ असलेला

मिथुन नवांश : आवाजात विविधता, लांब हात, बडबड्या

कर्क नवांश : अस्थिर मन, दयाळू, लांब हात

सिंह नवांश : उच्चपदस्थ, धनिक, कर्तुत्ववान

कन्या नवांश : उमदे व्यक्तीमत्त्व, बोलण्याने छाप पाडणारा, धन संचय असणारा.

तूळ नवांश : स्वतंत्र विचाराचा, हटवादी वृत्तीचा, अस्थिर असणारा

वृश्चिक नवांश : सफाईदार वागणे बोलणे, भविष्य उज्ज्वल असणारा, राजकारणाची आवड

धनु नवांश : प्रभावी व्यक्तीमत्त्व, उदारमतवादी, मोठ्या वर्तुळात उठबस.

६) कन्या रास

मकर नवांश : नशिबाची साथ , दानधर्म करणारा, धनिक, प्रतिष्ठित.

कुंभ नवांश : आकर्षक डोळे, धीमे बोलणारा, अस्थिर मन.

मीन नवांश : दोषयुक्त बोलणे, विसराळू, स्वप्नील, भोळा

मेष नवांश : साहित्याची आवड जोपासणारा, कामुक

वृषभ नवांश : परावलंबीत्व, ऐशोआरामी, लांब केसयुक्त.

मिथुन नवांश : जुगारी वृत्ती, लहरी, सफाईदार बोलणे.

कर्क नवांश : पाण्याची भीती असणारा, मोहक व्यक्तीमत्त्व

सिंह नवाश : उमदे व आदरणीय व्यक्तीमत्व.

कन्या नवाश : व्यापारी, भिन्न लिंगी व्यक्तीत लोकप्रिय

(७) तुळ रास

तुळ नवांश : वर्गोत्तम, पैसेवाला, आकर्षक व सुंदर गोष्टीची आवड, उंची वस्तुंचा व्यापार

वृक्षिक नवांश : दुर्बल शरीर, विसरभोळेपणा, आतल्या गाठीचा

धनु नवांश : सुंदर दात, कर्तुत्ववान

मकर नवांश : लांब बाहू, भित्रा, चिकट, खोडकर

कुंभ नवांश : नाकात वक्रपणा, स्थिर वृत्ती, बौद्धिक कामाची आवड

मीन नवांश : वेदशास्त्र संपन्न असलेला, मोठ्या डोळ्यांचा.

मेष नवांश : मोठ प्रस्थ, हटवादी, हुशार

वृषभ नवांश : सुदृढ, भाग्यवान, व्यापारी वृत्ती

मिथुन नवांश : हुशार, मध्यस्थ, दलाल, उच्च शिक्षणाची आवड, मिस्कील.

८) वृश्चिक रास

कर्क नवांश : चांगले नशीब, राजकारणी, आकर्षक कपाळ व व्यक्तीमत्त्व

सिंह नवाश : जिद्दी, लोकांत मिसळणारा, उच्च जीवनऊर्जा, आर या पार वृत्ति

कन्या नवाश : किरकिरां स्वभाव, लेखनाची आवड, समीक्षक, कंजुष

तुळ नवांश : दुसऱ्याच्या चुका काढणारा, दुर्बल शरीर, कला-कौशल्याची आत्यंतिक आवड, ज्योतिषी.

वृक्षिक नवांश : वर्गोत्तम, साहसी, अतिरेकी भूमिका घेणारा, प्रसिध्दी मिळविणारा

धनु नवांश : दयाळू, साहसी, भाग्यवान

मकर नवांश : आतल्या बाजूला झुकलेले दात, चंचल वृत्ती, दुर्बल शरीर

कुंभ नवांश : बुद्धीवादी, निर्णयात दिरंगाई, मोठी नाकपुडी

मीन नवांश : दानशूर, प्रसिद्ध, लोकप्रिय, शांत स्वभावाचा.

९) धनु रास

मेष नवांश : स्पष्ट कल्पना देणारा, आकर्षक व्यक्तीमत्त्व, मोठे नाक

वृषभ नवांश : डोळ्यात फरक, ज्ञानी.

मिथुन नवांश : वेदशास्त्र पारंगत, भिन्नलिंगी व्यक्ती प्रती आदर

कर्क नवांश : हुशार, लांबसडक केसांचा, उठावदार व्यक्तीमत्त्व

सिंह नवांश : मोठा चेहरा, खेळकर स्वभाव, लोकप्रिय, दानशूर, सुदृढ, निश्चयी

कन्या नवांश : कला व साहित्याची आवड, मोठे कपाळ, उच्च राहणी.

तुळ नवांश : नशिबवान, उंच, मोठे डोळे, दयाळू स्वभाव, संगीताची आवड

वृक्षिक नवांश : अर्थहिन बोलणे, खुनशी, धोकादायक.

धनु नवांश : वर्गोत्तम, मोठ्या लोकांत उठबस, उद्योजक, मोजून-मापून बोलणे, औषधांची आवड

१०) मकर रास

मकर नवाश : प्रवास व संगीताची आवड, विनोदी स्वभाव, दातामध्ये फट, वर्गोत्तम

कुंभ नवांश : कामातुर, आळशी, रागीट, उत्तम शरीरयष्टी

मीन नवांश : चंचल वृत्ती, प्रवासाची आवड, कला कौशल्याची आवड, मित्र व नातेवाईकांत रमणारा

मेष नवांश : गोलाकार डोळे, विशाल कपाळ, मितभाषी.

वृषभ नवांश : व्यापारी वृत्ती, उठावदार व्यक्तीमत्त्व.

मिथून नवांश : कपड्यांची आवड, बोलण्यात चतुर, कामुक

कर्क नवांश : सुखासिन, व्यवसाय मग्न, शांतपणे निर्णय घेणारा.

सिंह नवांश : सुंदर नाक, उत्तम शरीरयष्टी, सपाट कपाळ, खोल डोळे

कन्या नवांश : व्यापारी वृत्ती, कलाकार, दयाळू, उच्च विचारसरणी, समाजप्रिय.

(११) कुंभ रास

तुळ नवांश : वेदशास्त्राची आवड, कामुक, प्रभावी व्यक्तीमत्व

वृश्चिक नवांश : त्वचा रोग, शांतवृत्ती, उंच, मंद बुद्धी.

धनु नवांश : काम जीवन बेताचे, पारंपारिक शास्त्राची आवड, हुशार

मकर नवांश : जोडीदाराशी प्रामाणिक, बौद्धिक कामात रस

कुंभ नवांश : वर्गोत्तम, निष्ठुर वृत्ती, अनेक शास्त्रांची आवड

मीन नवांश : प्रथम दर्शनी भीतीदायक वाटणारा, चलाख, कुरळे केस, शिकारी, राजकारणी.

मेष नवांश : जिद्दी, शांत डोक्याचा, निष्ठुर कामे करणारा

वृषभ नवांश : विशाल डोळे, व्यापारासाठी देश-परदेश हिंडणारा.

मिथुन नवाश : पूर्ण चंद्रासारखा चेहरा, भाग्यवान, संतती, राजकारणी, ताकदवान्

(१२) मीन रास

कर्क नवांश : छोटी मान, भिन्नलिंगी व्यक्तीशी जपून बोलणारा, सुंदर शरीर

सिंह नवांश : मांसल शरीर, जंगल दऱ्यात भटकंती, एकांतवासाची आवड, सुदृढ शरीर

कन्या नवांश : उच्च शिक्षण, दयाळू आळशी, शिक्षण क्षेत्राची आवड

तुळ नवांश : व्यसनी गुरुजनांबद्दल आदर, शांत डोक्याचा, गरुडासारखे नाक.

वृश्चिक नवांश : कामुक, माफक उंची, हटवादी.

धनु नवांश : मोठ्या लोकांचा सल्लागार, प्रतिष्ठित, विश्वासार्ह

मकर नवांश : स्वाभिमानी, दुसऱ्यांशी आदराने वागणारा, भटक्या.

कुंभ नवांश : अल्प संतती, दीर्घ बाहू, आळशी.

मीन नवांश : वर्गोत्तम, विशाल डोळे, मोठे नाक, चकाकते शरीर, तीव्र बुद्धीवान, विश्वासार्ह, नशिबवान

ज्यांची जन्मपत्रिका (म्हणजेच जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण) याबद्दल शंका असेल त्यांची पत्रिका कशी बघावयाची व त्यातील नेमकी पत्रिका कशी सुधारून (रेक्टीफिकेशन) घ्यायची हे ठरविण्यासाठी, तज्ज्ञ ज्योतिषी काही निकष लावतात, त्यामधील प्रमुख लग्न रास व त्याचा नवांश पाहून त्याचे व्यक्तीमत्वाप्रमाणे लग्नाचे नवांश ठरविणे सोपे जाते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment