कुंडलीतील स्थाने आणि नाते संबंध


नाते संबंध हा भारतीय माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. कारण आपल्या देशात कुटुंब प्रधान व्यवस्था हि प्रामुख्याने स्वीकारली गेली आहे. प्रत्येक नात्याचे हे आपल्या आयुष्यात एक विशिष्ट स्थान असते. ते जर स्थान बळकट असेल तर आपली स्थिती सौख्यदायक असेल अन्यथा दु:खास कारण ठरेल.

भारतातील बहुतांशी हिंदू कुटुंबांमध्ये जन्मलेल्या व्यक्तीची कुंडली काढण्याची प्रथा आहे. कुंडलीच्या घरात नवग्रह राहत असतात. मग ज्याचा जसा ताळमेळ तसे त्यांचे संबंध सुख किंवा दु:ख बहाल करतात.

आपण हीच कुंडलीतील घरे किंवा स्थान आपले कोणते नातेवाईक दर्शवतात हे पाहणार आहोत.

  • लग्न स्थान (१ ले स्थान) : हे स्वत:स दर्शवते.
  • २ रे स्थान : आपले कुटुंब दर्शवते.
  • ३ रे स्थान : धाकटा भाऊ/बहिण दर्शवते.
  • ४ थे स्थान : आई दर्शवते.
  • ५ वे स्थान : आपली प्रथम संतती दर्शवते.
  • ५ वे स्थान : धाकट्या भावापासून तिसरे स्थान असल्याने धाकट्याचे धाकटे भावंड म्हणजे आपला २ नंबर चा भाऊ दर्शवते.
  • ५ वे स्थान : ९ वे स्थानापासून ९ वे स्थान जे ५ वे स्थान येते, म्हणून ५ वे स्थान आपले आजोबा दर्शवते. (५ वे स्थानापासून ५ वे स्थान त्यांची संतती म्हणजे आपले वडील(९ वे स्थान) व आपण ९ पासून ५ वे म्हणून आजोबांचा नातू दर्शवते)
  • ५ वे स्थान : ११ वे स्थानापासून ७ वे स्थान जे ५ वे स्थान येते, म्हणून ५ वे स्थान आपले मोठी वहिनी आणि मोठी भावजय दर्शवतात.
  • ६ वे स्थान : आईचे धाकटे भावंड दर्शवते. म्हणजेच आईपासून तिसरे स्थान जे आपल्यापासून सहावे असते, ते आपला मामा किंवा मावशी दर्शवते.
  • ७ वे स्थान : आपली पत्नी दर्शवते.
  • ७ वे स्थान : ५ वे स्थानापासून ३ रे असल्याने आपल्या संततीचे भावंड म्हणून द्वितीय संतती दर्शवते.
  • ८ वे स्थान : ७ वे स्थानापासून २ रे स्थान असल्याने पत्नीचे कुटुंब म्हणजेच आपले सासर दर्शवते.
  • ९ वे स्थान : ७ वे स्थानापासून ३ रे स्थान असल्याने पत्नीचे धाकटे भावंड म्हणजे आपला मेव्हणा किंवा मेव्हणी दर्शवते.
  • ९ वे स्थान : ९ वे स्थानापासून ५ वे स्थान जे १ ले स्थान येते, म्हणून ९ वे स्थान आपले वडील दर्शवते. काही जन ४ वे स्थानापासून ७ वे स्थान असल्याने आईचा पती म्हणून आपले वडीलांचे स्थान मानतात.(पण माझ्या विचारधारेनुसार मुलाच्या आईचा नवरा हा खूप लांबचा वळसा आहे. आईचे वैवाहिक सुख हे फळ आई च्या स्थानानुसार बरोबर आहे. पण स्वत:चे अनुरोधाने वडिलांची (९ वे स्थान) संतती हे जास्त योग्य वाटते.)
  • ९ वे स्थान : ७ वे स्थानापासून ३ रे स्थान असल्याने द्वितीय संततीचे धाकटे भावंड म्हणजे आपली तृतीय संतती दर्शवते.
  • ९ वे स्थान : ३ रे स्थानापासून ७ वे स्थान असल्याने ९ वे स्थान धाकट्या भावाची पत्नी आणि धाकट्या बहिणीचा नवरा दर्शवते.
  • ९ वे स्थान : ५ वे स्थानापासून ५ वे स्थान मुलाची प्रथम संतती दाखवत असल्याने असल्याने ९ वे स्थान प्रथम आपला नातू दाखवते.
  • १० वे स्थान : ७ वे स्थानापासून ४ थे स्थान असल्याने पत्नीची आई म्हणजेच आपली सासू दर्शवते.
  • ११ वे स्थान : ९ वे स्थानापासून ३ रे स्थान असल्याने वडिलांचे धाकटे भावंड म्हणजे आपले धाकटे काका दर्शवते.
  • ११ वे स्थान : ११ वे स्थानापासून ३ रे स्थान आपण धाकटे भावंड असल्याने ११ वे स्थान आपला मोठा भाऊ दर्शवते.
  • १२ वे स्थान :  ७ वे स्थानापासून ६ वे स्थान असल्याने पत्नीचे मामा किंवा मावशी दर्शवते.

 अशा प्रकारे कुंडलीमध्ये एखादे नाते तपासताना अशा प्रकारे विचार करून त्या स्थानास लग्न स्थान मानून त्याप्रमाणे ग्रह व कुंडलीतील इतर शुभाशुभ घटक तपासून  त्या नात्याविषयी व नाते संबंध कसे असतील, हे माहित केले जाऊ शकते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment