वर्ग कुंडल्यांची तोंडओळख


विषय : वर्ग कुंडल्यांची तोंडओळख
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : टेक्स्ट बुक ऑफ अस्त्रोलॉजी

नमस्कार,
आपल्याला सर्वसाधारण पणे लग्न कुंडली, राशी कुंडली व सूक्ष्म फळीतासाठी नवमांश कुंडली ई. माहित असते. कृष्णमूर्ती पद्धतीत सूक्ष्म फळ साधण्यासाठी विशोत्तरी दशेच्या प्रमाणात नक्षत्रांचे उपविभाग करून त्या आधारे फळकथनाची पद्धत विकसित केली. पण त्याही कित्येक आधी आपल्या प्राचीन हिंदू ज्योतिष आचार्यांनी फळांमध्ये वेगवेगळ्या फळीताची सुक्षमता साधण्यासाठी विषयानुसार राशीच्या ३० अंशाचे वेगवेगळ्या अंशात व वेगवेगळे विभाग करून फळ पाहण्याच्या वेगवेगळ्या कुंडल्या विकसित केल्या होत्या. त्यांना वर्ग म्हणतात. वर्गांना इंग्रजी मध्ये डिव्हिजन (division) आणि वर्गावर आधारित कुंडली (वर्ग चक्र) ला डिव्हिजनल चार्ट (divisional chart) म्हटले जाते.
आज आपण याच वर्ग कुंडली विषयी तोंडओळख करून घेणार आहोत. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. सततच्या अथक प्रयत्नांनी व सरावाने या कुंडली परीक्षणात प्रावीण्य मिळवले जाऊ शकते.

वर्गांना ज्योतिषमध्ये नाव दिले गेले आहे जसे राशीला दोन भागात वाटले गेले तर, अश्या भागाला होरा म्हणतात. याच प्रकारे जर राशीचे तीन भाग केले तर त्याला द्रेष्‍काण म्हणतात, नऊ हिस्से केले तर त्याला नवमांश म्हणतात. अश्या प्रकारे प्रत्येक वर्ग विभाजनाला नाव दिले गेले आहे. आजकाल सोळा वर्ग विभाजन बरेच प्रचलित होत आहे आणि त्याला षोडषवर्ग म्हणतात.
सोबत तोंड ओळख होण्यासाठी तक्ते देत आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या विभाजनास काय नाव आहे व किती अंशाचे किती भाग केले जातात व त्यावरून कोणते फळ पाहिले जाते याची माहिती होईल.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment