एखादा ग्रह आपल्या राशि पासून ६ वे, ८ वे अथवा १२ वे स्थानामध्ये स्थित असेल तर…


जर एखादा ग्रह आपल्या राशि पासून ६ वे, ८ वे अथवा १२ वे स्थानामध्ये स्थित असेल, तर तो त्या स्थानाचे फळ देण्या मध्ये शक्तिहीन होतो आणि तो ज्या स्थानाचा अधिपती असतो, त्याचे विरुद्ध फळ देऊ शकतो.

६ वे स्थान भांडण, शत्रुत्व दर्शवते, तर त्या पासून ६ वे स्थान अनुकूलता, मित्रता, लाभ दाखवते. कारण हे स्थान लग्नापासून ११ वे येते जे लाभ स्थान मानले जाते. 

जर ८ वे स्थान विघ्न, बाधा, अडचणी दर्शवते, तर अष्टमा पासून ८ वे स्थान, सहाय्यता, हिंमत, कर्तुत्व दाखवते. कारण हे लग्न स्थानापासून ३ रे स्थान आहे ज्याला पराक्रम स्थान म्हणतात.

जर १२ वे स्थान नुकसान, खर्च दर्शवते. १२ वे स्थानापासून १२ वे स्थान लाभ दाखवते.

लग्नेश स्वास्थ्य दर्शवतो. जर लग्नेश ६ वे स्थानामध्ये असता, तो जातकाच्या स्वास्थ्य मध्ये बिघाड दाखवतो. म्हणून ६ वे स्थान रोग स्थान म्हत्सले जाते. लाग्नेश ८ वे स्थानात स्थित असता तो दीर्घआयुष्य देत नाही.  जर लग्नेश १२ वे स्थानामध्ये असेल तर जाताकाजवळ जे असेल तर खर्च करण्याकडे काळ दाखवतो. जातकास आपल्या निवास स्थाना मध्ये राहू देत नाही व प्रवास, दगदग हि फळे देऊ शकतो. त्याची पैशाची बचत होत नाही.

अशा प्रकारे एखाद्या कुंडलीचे परिक्षण करताना विचार करावयास हवा..,

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment