शेतीकाम, फळबाग, फार्म हाऊस, परस बाग, कुक्कुट पालन, पशु पालन, दुग्ध व्यवसाय यासाठी उपयुक्त होरा.


विषय : शेतीकाम, फळबाग, फार्म हाऊस, परस बाग, कुक्कुट पालन, पशु पालन, दुग्ध व्यवसाय यासाठी उपयुक्त होरा.
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : प्रेडिक्टिव्ह स्टेलर ॲस्ट्रोलॉजी रीडर

नमस्कार,
मध्यंतरी होरा विषयी माझा एक लेख प्रकाशित झाला होता. तेव्हा काही जणांनी पिके किंवा शेतीसाठी कोणता होरा उपयोगी असेल अशी विचारणा केली होती.
शेतकरी हा भारताचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी आहेत म्हणून आपला देश सुख समृद्ध आहे. अनिश्चित हवामान वातावरणात वर्षभर कष्ट उपसायचे आणि कोणते ना कोणते निमित्त झाले की प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन जोपासलेल्या पिकाचे नुकसान सहन करायचे. पण हार न मानता परत वर्षानुवर्षे परत जिद्दीने कामाला लागायचे. खरंच सोपे नाही, आपण तासभर घराच्या अंगणातील माती फावड्याने बाजूला केली तर हाताला घट्टे येतात, पोटऱ्या, पाठ बोलायला लागते. मग यांचे काय.
अशा शेतकऱ्यास माझा आदरयुक्त प्रणाम 🙏

मी काही शेती तज्ञ नाही, सहदेव भाडळी आदींनी शेती व अनुमान विषयक लेखन केले आहे. पंचांगात सुद्धा काही भाकिते दिलेली असतात. पण ज्योतिष च्या अनुषंगाने होरा विभागात काही शेत कामा संबंधी माहिती मिळते का याचा शोध घेतला असता काही माहिती मिळाली. त्याचेच संकलन येथे देत आहे.
आशा करतो, ही माहिती शेतीकाम, फळबाग, फार्म हाऊस, परस बाग, कुक्कुट पालन, पशु पालन, दुग्ध व्यवसाय आदि.साठी उपयुक्त ठरेल.

जर तुम्ही शेतकरी असाल अथवा फार्म हाऊस असेल, तर पूर्ण सिंचित जमीनीची शेती, झाडे, झुडपे लावणे, विहिरीची स्वच्छता ई. कामे, कालवा खोदणे चंद्र होरा मध्ये करू शकता.
शुक्रवारी चंद्र होरा ऊस कापणी करिता शुभ असतो.

बैल जंपणे, पशु चिकित्सा, कुक्कुट पालन, पशुपालन, खाद्य, धान्य, फळे, फुल बागा, शेती यासाठी शुक्रवार वा शुक्र होरा चांगला असेल. तांदूळ व्यापारासाठी मंगळवारी शुक्र होरा उपयोगी ठरेल.

जर तुम्ही दुध वा दुधा संबंधी पदार्थ, डेरी फार्म ई. व्यवसाय करत असाल, तर रविवार, मंगळवार व गुरुवार ला चंद्राच्या होऱ्या मध्ये गरम दूध विकणे शुभ असते. शुक्रवार शुद्ध दूध विकणे करता शुभ आहे. सोमवार ला कमी प्रतीचे दूधा करिता व शनिवारी आइस्क्रीम साठी शुभ आहे.

जी व्यक्ति राळ, हिरव्या भाज्या, खाद्य पदार्थ, गुळाचे व्यापार करितात ते आपला व्यापार चंद्र होरा मध्ये प्रारंभ करू शकतात. चंद्र होरा सोमवार व रोहिणी नक्षत्रामध्ये विशेष रूपाने आदर्श असते.

खतांचा उपयोग करण्यासाठी सोमवारी मंगळ होरा शुभ असतो. शेतीची विकत औजारे घेण्याकरता मंगळ होरा उपयुक्त ठरतो.

शेतीसाठी शासकीय योजना लाभ ई. कामे साठी गुरू होरा, कीटकनाशक फवारणी साठी रवी होरा, पीक कापणी साठी शनिवारी गुरू होरा योग्य.

विमा वर अधिकारी सहीसाठी शनी व मंगळ होरा उपयुक्त त्याचा शेतकऱ्यास लाभ होईल.
जमीन मालकी साठी पत्र व्यवहार, कंदमुळे, बटाटा, शेवगा शेंगा, भुईमूग, तेल बियाणे यांची पेरणी करण्यास शनी होरा उपयोगी आहे.

टीप : लेखात ज्या ग्रहांचा होरा सांगितला आहे, त्यांचे वार, तिथी, नक्षत्र, दशा अंतर्दशा गाठून होराचा उपयोग केला तर जास्त प्रभावी ठरेल, असे मला वाटते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment